Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ
विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या या लेखामध्ये आपण बघणार आहोत परिमळ स्वाध्याय परिमळ हा धडा इयत्ता अकरावी मराठी युवकभारती च्या पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या धड्याची पश्न उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत म्हणजेच परिमळ स्वाध्याय मराठी याविषयी माहिती घेऊन आलो आहेत तरी तुम्ही ही ब्लॉग पोस्ट अर्थातच हा लेख पूर्ण वाचावा जेणेकरून परिमळ या धड्याचे प्रश्न उत्तर आणि तसेच परिमळ हा धडा देखील तुम्हाला पूर्ण समजेल
आम्ही प्रथमता तुमच्यासाठी परिमळ धड्याचे प्रश्न उत्तरं या पोस्ट मध्ये टाकले आहेत आणि त्यानंतर आम्ही परिमळ धड्याचे समरी देखील टाकली आहेत आणि त्याखाली पूर्ण परिमळ पाठ टाकलेला आहेत या सिक्वेन्स नुसार तुम्ही परिमळ धडा विषयी संपूर्ण माहिती आमच्या एकाच या लेखामधून मिळवू शकतात असला तर सुरुवात करुया परिमळ प्रश्न उत्तरं किंवा परिमळ स्वाध्याय इयत्ता अकरावी मराठी या लेखाला.
1. अ. कृती करा.
प्रश्न 1.
SOLUTION:
प्रश्न 2.
SOLUTION:
प्रश्न 3.
SOLUTION:
आ. खलील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.
प्रश्न 1.
SOLUTION:
घटना | परिणाम |
1. कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे | संगीत वाहू लागणे |
2. प्राजक्ताची कळी उमलणे | सुगंध दरवळणे |
3. जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेले असणे. | शब्द जीभेवर लीलया येणे |
इ. तुलना करा.
प्रश्न 1.
SOLUTION:
मुद्दे | माणूस | प्राणी |
1. वर्तणूक | कृतघ्न | कृतज्ञ |
2. इमानिपणा | स्वार्थी | निःस्वार्थी |
ई. खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
प्रश्न 1. शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे
SOLUTION:
1. ‘पर्गटले दोन पानं,
जसे हात जोडीसन’
2. ‘आधी हाताला चटके,
तव्हा मियते भाकर’ ‘नही ऊन, वारा थंडी,
आली पंढरीची दिंडी’
प्रश्न 2. बहिणाबाईंची प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता
SOLUTION:
गाय न् म्हैस चारा खाऊन दूध देतात - दूध देणे
कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हालवतो - इमानी
2. व्याकरण.
प्रश्न अ. प्रस्तुत पाठात दिलेल्या कवितेच्या उदाहरणांतून यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या शोधून लिहा…
SOLUTION:
यमक जुळणाऱ्या शब्दांच्या पाच जोड्या :
पीठी - व्होटी
जीव - हीव
थंडी - दिंडी
घाई - पुन्याई
नक्कल - अक्कल
प्रश्न आ. शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा
बावनकशी सोने
करमाची रेखा
सोन्याची खाण
चतकोर चोपडी
SOLUTION:
बावनकशी सोने - अस्सल, खरे
करमाची रेखा - नशीबाचा फेरा, नियतीचा खेळ
सोन्याची खाण - भरभराट, विपुल प्रमाणात
चतकोर चोपड़ी - पुस्तक किंवा वहीचा काही भाग
प्रश्न इ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
1. तोंडात बोटे घालणे.
2. तोंडात मूग धरून बसणे.
SOLUTION:
1. तोंडात बोटे घालणे - अर्थ : आश्चर्यचकित होणे, विस्मय वाटणे.
वाक्य : अपंग मुलाने धावण्याची शर्यत जिंकल्याने सर्वांनी तोंडात बोटे घातली.
2. तोंडात मूग धरून बसणे - अर्थ : काहीही न बोलणे, गप्प बसणे.
वाक्य : सरांनी अवघड प्रश्न विचारताच सर्व मुले तोंडात मूग धरून बसली.
प्रश्न ई खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ - ……………
(आ) कृपा - ……………
(इ) धर्म - …………….
(ई) बोध - …………….
(उ) गुण - ……………..
SOLUTION:
(अ) अनर्थ, अर्थहीन, अर्थपूर्ण
(आ) अवकृपा, कृपाळू
(इ) अधर्म, स्वधर्म, धार्मिक, धर्मवीर
(ई) अबोध, बोधामृत
(उ) अवगुण, सगुण, निर्गुण, गुणी, गुणवान
3. स्वमत.
प्रश्न अ ‘बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे’, हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION:
बहिणाबाई या एक अशिक्षित शेतकरी स्त्री असूनही त्यांची रचना तोंडात बोट घालायला लावणारी आहे. बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा झिरपते. त्यांचे काव्य सरस व सोज्वळ आहे. बहिणाबाई यांची कविता इंग्रजी वळणाच्या सौंदर्यवादी भावकवितेच्या परंपरेला छेद देणारी अस्सल मराठी वळणाची ग्रामीण कविता आहे.
जुन्यात चमकणारी ही कविता आहे, बहिणाबाई यांनी आपली कविता थेट संत कवितेच्या आणि तत्त्वकवितेच्या परंपरेला जोडली आहे, त्यांच्या कवितेत या परंपरेतला भक्तिभाव, तत्त्वचिंतन आणि हितोपदेश आपल्याला दिसतो. ही लोकगीताच्या अंगाने जाणारी कविता आहे. नवकवितेच्या जवळ जाणारी त्यांची कविता आहे. त्यांच्या कवितेत निसर्ग, ग्रामीण जीवन व कृषिसंस्कृतीचे अस्सल दर्शन घडते. शेतकरी हा कर्मयोगी आहे आणि त्याच्या कामात उदात्तता आहे असे सांगणाऱ्या या कविता आहेत.
क्तिकविता आहे. त्यात पारंपरिक तत्वकवितेच्या खुणा सर्वत्र विखुरलेल्या दिसतात. ‘उदा. देव अजब गारोडी’ तसेच ‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस!’ यांसारख्या आधुनिक कवितेतून मानवतेचा संदेश देणारी त्यांची कविता आहे.
प्रश्न आ. ‘बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर.’, या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
SOLUTION:
बहिणाबाईंची कविता ही अर्वाचीन मराठीतील पहिली ग्रामीण कविता होय. ती या अर्थाने की, ती ग्रामीण जीवनातूनच मोहोरून आली आहे. त्यांच्या कवितेतून ग्रामीण जीवन अंतर्बाहय रसरसलेले आहे. ‘देव अजब गारोडी’ या कवितेत पेरणीनंतर धरित्रीच्या कुशीतून जे चैतन्य ओसंडते त्याचे अतिशय प्रभावी दर्शन घडते. ‘येहेरीत दोन मोटा’ यातून कृषिजीवनाचे दर्शन तर घडतेच पण त्यातील दोन्हीमध्ये पाणी एक यातून कणा आणि चाक वेगळे असले तरी त्याची गती एकच आहे हे दिसून येते.
त्यांची कविता निसर्गाशी समरस होणारी, ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणारी आहे. तान्या सोपानाला झोपवून बहिणाबाई शेतात निघाल्या की त्यांच्या काव्यप्रतिभेला धुमारे फुटू लागत आणि त्यातून ग्रामीण, कृषिजीवनाचे दर्शन घडविणारी कविता जन्माला येई. वाटेत दिसलेल्या वडाच्या झाडावर ‘हिरवे हिरवे पानं’ सारखी रचना सहज आकाराला येते. शेतातील कापणी, मळणी या शेतातील कामांबरोबरच मोठ्या, भाविक व कष्टाळू शेतकऱ्याचे जीवन त्यांच्या कवितेतून प्रतिबिंबीत होताना दिसते. थोडक्यात बहिणाबाईंची कविता ही अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारी कविता आहे. शेतात राबणारा शेतकरी आणि कृषिसंस्कृती यांचं अनोखं असणार नातं त्यांच्या कवितेत दिसून येते.
प्रश्न इ. “मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!’ या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION:
बहिणाबाईनी कवितेतून माणसाचा मतलबीपणा आणि त्याच्या स्वार्थी वृत्तीचे वास्तव दर्शन घडविले आहे. बहिणाबाई आणि स्वार्थी वृत्तीची सर्वाधिक चीड आहे. त्या माणसाला संतापून म्हणतात ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!’ ‘माणसा तुला नियत नाही रे’, माणसापेक्षा गोठ्यातील जनावर बरे, गाय न म्हैस चारा खाऊन दूध देतात. पण माणसाचे एकदा पोट भरले की माणस उपकार विसरून जातो. कुत्र्यामध्ये इमानीपणा आहे पण माणूस फक्त मतलबासाठी मान डोलावतो.
माणूस केवळ लोभामुळे माणूस असूनही काणूस म्हणजे पशू झाला आहे. त्याची स्वार्थी प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. माणस स्वतःच्या फायद्यासाठी एकमेकांशी भांडत आहे. मानवता आज संपुष्टात आली आहे. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी बहिणाबाई ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस’? अशी आर्त हाक देतात, संत महात्म्यांनीही मानवतेच्या कल्याणासाठी तळमळ व्यक्त केली आहे. आज माणूस पशूसारखे वागतोय. माणसातला माणूस कधी जागा होतोय? हीच खरी आजची समस्या आहे. स्वार्थासाठी माणूस माणूसपण विसरत आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईसारख्या खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हे त्यांच्यातील नैसर्गिक प्रतिभेचं लेणं आहे.
4. अभिव्यक्ती.
प्रश्न अ. प्र. के. अत्रे यांच्या प्रस्तावना लेखनाची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये लिहा.
SOLUTION:
एखादया शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईच्या काव्याचा शोध महाराष्ट्राला लागला. बहिणाबाईचा जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे असे सरस आणि सोज्वळ काव्य आहे. जुन्यात चमकेल व नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे. प्र. के. अत्रे यांच्यासारख्या मर्मज्ञ, प्रतिभावंताची बहिणाबाई चौधरी यांच्या गीतकाव्यासंबंधीची ही प्रतिक्रिया होय. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचे प्र. के. अत्रे केवळ प्रस्तावनाकारच नव्हते तर ते प्रकाशकही होते.
प्र. के. अत्रे यांची लिहिलेली प्रस्तावना ही बहिणाबाईंच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख करून देणारी आहे. त्यांनी बहिणाबाईंच्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दांची काव्यप्रतिभा आपल्या प्रस्तावनेतून उलगडून दाखवली आहे. बहिणाबाईंची ग्रामीण जीवनाशी जोडलेली नाळ, निसर्गाशी असलेली समरसता, कृषिजीवनाचे संदर्भ हा त्यांच्या काव्याचा विषय. प्र. के. अत्रे यांनी बहिणाबाईंचे हे सूक्ष्म व अचूक निरीक्षण यांतील आत्मियता लीलया वर्णिली आहे. माणसातील लोप पावत चाललेल्या माणुसकीचे वर्णन करणाऱ्या कवितेवर अत्रे यांनी प्रकाश टाकला आहे. अत्रे यांनी आपल्या प्रस्तावनेतून बहिणाबाईच्या अनेक कवितांचा अर्थ उलगडून दाखविला आहे.
बहिणाबाईंची कविता हे बावनकशी सोने आहे. ते महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी अत्रे यांनी स्वतः त्या कवितांचे प्रकाशन केले. अत्रे यांनी बहिणाबाईची काव्यप्रतिभा जाणून आपल्या प्रस्तावनेत बहिणाबाईंचे निसर्गप्रेम, कृषी, शेतकरी त्यांचे अपार कष्ट यांचे वर्णन केले आहे. बहिणाबाईच्या ‘संसार’, ‘स्त्रियांची दुःखे’, ‘माणसातला स्वार्थ’ या कवितांवर अतिशय मार्मिक असे भाष्य केले आहे. प्राणिमात्रांचा प्रामाणिकपणा आणि माणसांचा कृतघ्नपणा या बहिणाबाईंच्या कवितेतून अत्रे यांनी नेमकेपणाने त्यांतील भाव उलगडून दाखविला आहे.
अत्रे यांची प्रस्तावना ही अतिशय प्रतिभावंत साहित्यिकाची प्रस्तावना आहे. बहिणाबाईंच्या काव्यातील तळमळ, माणसाच्या कल्याणाची आस शेतकरी व त्याचे अपार कष्ट या काव्य आशयाचा सुरेल परामर्श अत्रे यांनी घेतला आहे. थोडक्यात अत्रे यांच्या प्रस्तावनेने ‘बहिणाबाईंची गाणी’ या पुस्तकाला एक आगळी वेगळी झळाळी लाभली आहे.
प्रश्न आ. बहिणाबाईंच्या काव्यातील भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
SOLUTION:
बहिणाबाई चौधरी यांनी लिहिलेल्या कविता ह्या निसर्ग, कृषिसंस्कृती, ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, मानवता, प्राणिमात्रांची कृतज्ञता या विषयांशी संबंधित आहेत, बहिणाबाई या अशिक्षित खेड्यातील स्त्री असूनही त्यांच्या काव्यातला जिव्हाळा जबर आहे. त्यांच्या शब्दाशब्दांतून प्रतिभा नुसती झिरपते आहे. त्यांचे काव्य सरळ आणि सोज्वळ आहे.
बहिणाबाईंनी वहाडी, खानदेशी ग्रामीण, बोली भाषेत लिहिलेल्या कवितांना वेगळाच गोडवा आहे. बहिणाबाई कधीही शाळेत गेल्या नव्हत्या. गावातील मंदिरे याच त्यांच्या शाळा असे असतानाही त्यांनी केलेल्या रचना त्यांच्या प्रतिभेचे दर्शन घडवितात. बोली भाषेच्या जिव्हाळ्याने त्यांची कविता आपलीशी वाटते, वहाडी खानदेशी भाषेचे काव्याभिव्यक्तीचे सामर्थ्य फार उंचीचे आहे.
बहिणाबाईंच्या भाषेत जिव्हाळा आहे, तळमळ आहे. माणसाच्या उत्कर्षाची आस त्यांना लागली आहे. ग्रामीण भाषेमुळे, बोलीमुळे शेतकरी, निसर्ग, मानवता या आशयाशी एकरूप होणारी त्यांची कविता वाचकांचे लक्ष वेधून घेते. बहिणाबाई काव्य करताना कुठेही अडखळत असलेल्या, शब्दांसाठी थांबलेल्या अशा दिसत नाहीत. ओघवते असे त्यांचे काव्य आहे. याचे कारण म्हणजे त्यांचे म्हणून जे एक अनुभवविश्व होते. त्या अनुभवाची म्हणून जी भाषा होती ती त्यांना पूर्णत: परिचित होती, नव्हे त्यावर त्यांचे प्रभुत्व होते. म्हणूनच त्यांच्या कवितेच्या हातात भाषा हवी तशी वाकते, आकार घेते व अर्थाभिव्यक्ती साधते. या अर्थाने बहिणाबाई या भाषाप्रभूत्व ठरतात.
प्रश्न इ. माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
SOLUTION:
अलिकडच्या काळात माणसातील माणुसकी लोप पावत चालली आहे. प्रत्येक माणूस आत्मकेंद्री बनत चालला आहे. माणूस आज पशू होऊन एकमेकांशी झगडत आहे. पण पशू मात्र आपला इमानीपणा दाखवत आहे. माणूस हा स्वार्थी, आत्मकेंद्री बनत चालला असताना आजही समाजात माणुसकी शिल्लक आहे अशी अनेक उदाहरणे देता येतील. पैसा म्हटला की प्रत्येकाला त्याची हाव असते.
कोणत्याही मार्गाने का होईना पण पैसा मिळाला पाहिजे ही प्रवृत्ती सर्वत्र आढळते. पण मी अनुभवलेल्या एका प्रसंगातून आजही माणुसकीचा झरा वाहतो आहे याचे दर्शन घडते. आमच्या कॉलेजमध्ये घडलेला प्रसंग, एका गरीब विद्यायनि शैक्षणिक फी, वहया, पुस्तकांसाठी आणलेले पैसे त्याच्याकडून हरवले. तो विदयार्थी ढसाढसा रडत होता. कारण ते पैसे त्याच्या आई वडिलांनी मजुरी करून मिळवलेले होते. हे पैसे मिळाले नाहीत तर आपले शिक्षण थांबणार या चिंतेने त्याला ग्रासले होते. आमच्या कॉलेजमध्ये अतिशय कमी पगारावर काम करणाऱ्या एका सेवकाला हे पैसे सापडले व त्याने ते त्या गरीब मलाला परत केले.
त्या गरीब मुलाला पैसे परत मिळण्याचा खूप आनंद झाला. खरं तर त्या सेवकाला सापडलेल्या पैशाच्या पाकीटाचा मोह झाला नाही. तीन महिन्यांच्या पगाराइतकी ती रक्कम असूनही तो मोह टाळून त्याने ते पैशाचे पाकीट परत केले. ही घटना माणुसकीचा झरा अजूनही आटलेला नाही याचे दयोतक आहे.
प्रकल्प.
प्रश्न 1. ‘बहिणाबाईंची गाणी’ मिळवून निवेदनासह काव्यवाचनाचा कार्यक्रम सादर करा.
प्रश्न 2. तुमच्या परिसरातील ओव्या/लोकगीते मिळवून संग्रह करा.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
प्रश्न 1. बहिणाईच्या काव्याचा आविष्कार - [ ]
SOLUTION:
बहिणाबाईंच्या काव्याचा आविष्कार - सुभाषितांचा
प्रश्न 2.
SOLUTION:
खालील कृती सोडवा.
प्रश्न 1.
SOLUTION:
प्रश्न 2. बहिणाबाईंना प्राप्त झालेली प्रतिभा
……………………….
SOLUTION:
बहिणाबाईंना प्राप्त झालेली प्रतिभा एखादया बुद्धिमान तत्त्वज्ञानी किंवा महाकवीची
कोष्टक पूर्ण करा.
प्रश्न 1. शेतकरी जीवन ……….
…………. तिला रात म्हणू नये
इमानाला जो विसरला …………
……………. शेवटी रिकामेच होणार
उत्तर:
शेतकरी जीवन → कष्टाचे
भुकेल्या पोटी जी → तिला रात म्हणू नये माणसाला निजवते
इमानाला जो विसरला → त्याला नेक म्हणू नये
पोट कितीही भरले तरी → शेवटी रिकामेच होणार
स्वमत :
प्रश्न 1. शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे कष्टाचे हा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
SOLUTION:
‘बहिणाबाईंची गाणी’ या पुस्तकात बहिणाबाई चौधरी यांनी कृषी, ग्रामीण जीवन, शेती आणि शेतकरी यांचे चित्रण केले आहे. बहिणाबाईंची कविता अस्सल शेती आणि शेतकऱ्यांचे भावविश्व उलगडून दाखवणारी आहे. शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे कष्टाचे. ऊन, वारा व पाऊस यांची तमा न बागळता शेतकरी रात्रंदिवस राबत असतो. सर्वसामान्य माणसे शेतकऱ्याच्या जीवावर दोन वेळा पोटभर जेवतात. शेतकरी शेतातच राबतो आणि त्याची माती शेतातच होते. शेतात पेरणी, कापणी व उफणणी या काळात शेतकरी राबराब राबतो.
त्याने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळेल याची शाश्वती नसते. पण जगाचा पोशिंदा असणारा हा भोळा, भाविक व कष्टाळू शेतकरी आयुष्यभर काळ्या आईची सेवा करतो. शेतकऱ्यांच्या संसाराची करुण कहाणी अनेक काव्यात दिसून येते. शेतकरी खळं करत असताना त्याला एक आस लागलेली असते ती म्हणजे यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला मोडलेला संसार पुन्हा उभा राहील पण तसे घडतेच असे नाही. निसर्गाचा लहरीपणा, कर्ज, हमीभाव पिकांवर पडणारी कीड या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे आणि त्यातून ज्यांना बाहेर पडता येत नाही ते आत्महत्या करतात. असे कष्टाळू शेतकऱ्याचे जीवन संघर्षाने भरलेले आहे.
अभिव्यक्ती:
प्रश्न 1. ‘कशाला काय म्हणू नाही’ या काव्यातील सुभाषितांचा अर्थ लिहा.
SOLUTION:
बहिणाबाई चौधरी यांच्या ‘बहिणाबाईची गाणी’ या पुस्तकात अनेक विषयांवरील काव्य आहे. मराठी वाड़मयात अमर होतील अशी अनेकात अनेक सुभाषिते आली आहेत. सुभाषितांचे एक शेतच पिकलेले आहे असे वाटते. ज्यातून कापूस येत नाही त्याला बॉड म्हणू नये, बोंडाची मुख्य अशी ओळख म्हणजे त्यातील कापूस नसेल तर त्या बोंडाला काय अर्थ उरणार? भुकेच्या पोटी माणसाला निजवते तिला रात कशी म्हणणार ? माणसाच्या पोटात अन्न नसेल तर त्याला झोप येणारच नाही, माणसाचा हात हा दानधर्मासाठी असतो असे म्हटले जाते.
इतरांना मदत, दान करताना तुमचा हात आखडत असेल, तुमचा स्वार्थ आडवा येत असेल तर त्या हाताचा काय उपयोग? इमानीपणा जर एखादा विसरत असेल तर त्याला नेक, प्रामाणिक कसे म्हणणार? तुम्ही नेक प्रामाणिक असाल तर तुमच्यात इमान असणारच, जन्मदात्या आई वडिलांची सेवा करणे हे मलाचे कर्तव्य आहे.
जर एखादा लेक जन्मदात्या आई वडिलांची सेवा न करता त्यांना त्रास देत असेल तर त्याला लेक म्हणता येणार नाही. भाव असेल तर भक्ती येईल. (मनी नाही भाव देवा मला पाव) या उक्तीप्रमाणे भावहीन भक्ती फळाला येत नाही. तुमच्यात उत्साह नसेल तर तुमची शक्ती निरर्थक आहे. कारण जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. अशाप्रकारे वेगवेगळ्या सुभाषितांमधून बहिणाबाईंनी जीवनविषयक तत्त्वज्ञान उलगडून दाखविले आहे. जे आजच्या काळातही लागू आहे.
स्वाध्यायासाठी कृती ‘चालू दे रे रगडनं तुझ्या पायाची पुन्याई’ या बहिणाबाईंच्या काव्याचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. वृक्षांची कृतज्ञता तुमच्या शब्दात स्पष्ट करा. बहिणाबाईचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या शब्दात लिहा. बहिणाबाईनी सांगितलेले मानवी जीवनाचे रहस्य शब्दबद्ध करा. शेतातील खळ्याचे बहिणाबाईंनी केलेले वर्णन स्पष्ट करा. ‘मन पाखरू पाखरू’ या ओळीतील भावसौंदर्य उलगडून दाखवा.
परिमळ Summary in Marathi
प्रस्तावनाः
नामवंत लेखक, कवी, नाटककार, चित्रपट कथालेखक, शिक्षणतज्ज्ञ म्हणून महाराष्ट्राला ज्ञात असणारे प्र.के.अत्रे यांनी ‘बहिणाबाईची गाणी’ या काव्यसंग्रहाला प्रस्तावना लिहिली. या प्रस्तावनेतून प्र.के.अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यप्रतिभेची ओळख करून देताना त्यांच्या कवितेतील ग्रामीण जीवन, कृषिजीवन यांचे संदर्भ उलगडून दाखविले आहेत. बहिणाबाईच्या कवितेतून माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवनाचे दर्शन घडते. त्यांच्या कवितेत खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवतो.
पाठाचा परिचय :
शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. एखादया शेतात मोहरांचा हंडा सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतीचित्रा’सारखाच बहिणाबाईचा जिव्हाळा जबर आहे. बहिणाबाईंचे काव्य सरस आणि सोज्वळ आहे. असे काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे आणि त्यातील मौज म्हणजे एका निरक्षर स्त्रीने रचलेले हे काव्य तोंडात बोट घालायला लावणारे, ‘जुन्यात चमकणारे आणि नव्यात झळकणारे’ असे आहे.
सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या या मातोश्री. माजघरात सोन्याची खाण दडावी तसे यहिणाबाईंचे काव्य, खानदेशी वहाडी भाषेमधील अडाणी आईच्या ओव्यांचे महाराष्ट्र कौतुक करील की नाही म्हणून सोपानदेव चौधरी गप्प होते.
सोपानदेव चौधरी यांनी चतकोर चोपडीतून एक कविता प्र.के.अत्रे यांना वाचून दाखविली. या कवितेतून शेतकऱ्याच्या कष्टाचे वर्णन केले आहे, त्या कविता म्हणजे बावनकशी सोने असून ते महाराष्ट्रासमोर यायला हवे या उद्देशाने प्र. के. अत्रे यांनी हे काव्य प्रसिद्ध करण्याचे ठरविले.
प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे, ते उपजतच असते. कोकिळ पक्ष्याच्या तोंडून संगीत वाहू लागते. प्राजक्ताची कळी सुगंध घेऊन येते तसे जातिवंत कवीचे आहे. सृष्टीतील सौंदर्य आणि जीवनातील संगीताशी ती कविता एकरूप होते. डोंगराच्या कपारीतून जसा झरा उचंबळतो तसे काव्य एकसारखे हदयातून उसळ्या घेते. यातूनच जगातील अमरकाव्ये जन्मास येतात.
बहिणाबाईची प्रतिभा वेगळीच, त्यात धरित्रीच्या कुशीत झोपलेले बियाणे कसे प्रकट होते याचे वर्णन येते. तारुण्यात सौभाग्य गमावलेल्या स्त्रीचे हृदयभेदक करुण काव्य हे असामान्य काव्याचे वैशिष्ट्य होय. सकाळी उठून बहिणाबाई जात्यावर बसल्या की ओठातून काव्य सांडू लागते. घरोट्यातून पाठ जसे बाहर पडत तसे बहिणाबाईच गाण पोटातून आठावर यत. स्वयपाकघरात चूल प म्हणत माझा जीव घेवू नकोस. संसाराची रहस्य उलगडताना त्यातील कष्टमय जीवनाचे चित्रण त्यांच्या काव्यात दिसून येते. तान्हुल्या सोपानाला शेतावर घेऊन जाताना वडाच्या झाडाचे आणि त्याच्या लाल फळाचे सुंदर चित्रण काव्यातून येते. वारा आणि थंडीची पर्वा न करणाऱ्या वारकऱ्याचे दर्शन त्यांच्या काव्यात घडते.
ठणी व सुगीच्या दिवसातील शेतकऱ्याची लगबग, कष्टमय जीवन हा त्यांच्या काव्याचा विषय. पण एवढाच त्यांच्या काव्याचा विषय नसून जीवनाकडे बघण्याचे स्पष्ट तत्त्वज्ञान हे त्यांच्यातील बुद्धिमान, तत्त्वज्ञानी, महाकवीची प्रतिभा असण्याची जाणीव होते.
त्यांच्या काव्यांचा आविष्कार सुभाषितांचा आणि आत्मा उपरोधी विनोदाचा आहे. ‘कशाला काय म्हणू नाही’ या सुभाषितातून ‘ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंडू म्हणू नये’, ‘भुकेल्या पोटास निजवणारी रात्र नसते’. ‘दानासाठी आखडणारे ते हात नाहीत’, ‘इमानाला विसरणारा नेक नसतो’. ‘जन्मदात्यास भोवणारा लेक कसा’ ? ‘जिच्यात भाव नाही तिला भक्ती म्हणू नये’. यातून त्यांची भाषा आणि विचारांची श्रीमंती दिसते.
मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात ? मन हे पाखरासारखे आहे. एका क्षणात जमिनीवरून आभाळात जाणार असा भाषा आणि विचारांचा सुरेख मेळ त्यांच्या काव्यात दिसून येतो.
जीवनाचे खरे रहस्य शुद्ध प्रेमात आहे. स्वार्थात नाही. माणसाने मतलबी होऊ नये. भुकेल्या पोटाला अन्न मिळावे म्हणून पिके ऊन, वारा, पाऊस सहन करत शेतात उभी असतात. माणूस स्वार्थी असून खोटेनाटे व्यवहार करतो. बोरीबाभळी उपकाराच्या भावनेतून शेताला काटेरी कुंपण करतात. पोट कितीही खाल्ले तरी शेवटी रिकामे राहणार आणि शरीरसुद्धा एक दिवस निघून जाणार, जे शिल्लक राहते ते हदयाचं नातं, शुद्ध आणि निःस्वार्थी प्रेम यापेक्षा वेगळं काय असणार?
बहिणाबाईंना सर्वाधिक चीड कशाची असेल तर ती माणसाच्या कृतघ्नपणाची, माणसांना संतापून त्या म्हणतात, माणसाला नियत नाही.
माणसापेक्षा गोठ्यातील जनावरे बरी, ती चारा खाऊन दूध देतात. माणसे उपकार विसरून जातात. कुत्रा इमानीपणाने वागतो, लोभामुळे माणूस काणूस म्हणजे पशू झाला आहे. स्वार्थाचा वणवा आज सर्वत्र पसरला आहे. माणूसे पशू होऊन एकमेकांशी भांडत आहेत. मानवता नष्ट होत चालली आहे. ‘मानसा, मानसा कधी व्हशीन मानस!’ मानवतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या संतमहात्म्याच्या अंत:करणातन हीच सल बाहेर पडत आहे. माणसाने माणूस कसे व्हायचे हा प्रश्न मानवजातीपुढे आहे. या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईना होतो ही त्यांच्या प्रतिभा सामर्थ्याची खरी ओळख आहे.
बहिणाबाईची चुलत सासू ‘भिवराई’ या विनोदी व नकलाकार होत्या. नाव ठेवून नक्कल करता करता सर्वांना हसविण्याची त्यांची पद्धत म्हणजे हसवून शहाणे करणे हा हेतू. यातून बहिणाबाईंच्या विनोदात उपरोध, सहानुभूती आणि मायेचा ओलावा दिसतो, बहिणाबाईंचे काव्य रचना व भाषेच्या दृष्टीने अत्यंत आधुनिक असून प्रत्येक काव्यात एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. थोडक्यात एखादी भावना जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलेले आहे. बहिणाबाईचे मराठी भाषेवरचे प्रभुत्व केवळ अद्भुतच आहे.
बहिणाबाईंनी आपल्या काव्यात रस आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण किंवा विरस होणार नाही अशा कौशल्याने सोपे व सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खानदेशी वहाडी भाषेने काव्याची लज्जत वाढविली आहे. ‘अशी कशी वेडी ग माये’, अशी कशी येळी माये, किंवा ‘पानी लौकीचं नित्तय त्याले अनीताची गोडी’. या भाषेत लडिवाळपणा भासतो.
मराठी मनास भुरळ घालील आणि स्तब्ध करून टाकील असे भाषेचे, विचारांचे आणि कल्पनेचे विलक्षण माधुर्य त्यांच्या काव्यात शिगोशीग भरलेले आहे. मानवतेला त्यांनी दिलेल्या ‘मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस’ ! हया अमर संदेशाने तर मराठी साहित्यामध्ये त्यांचे स्थान अढळ करून ठेवलेले आहे.
समानार्थी शब्द / पर्यायी शब्द :
- परिमळ - सुगंध - (fragrance).
- प्रतिभा - काव्य निर्माण करण्याची असलेली उपजत क्षमता - (intelligence, imaginative power).
- सोन्याची खाण - भरभराट, विपुल प्रमाणात, येहेर - विहिर - (well).
- चतकोर चोपड़ी - वही किंवा पुस्तकाचा काही भाग - (notebook).
- मोट - जुन्या काळी विहिरीतून पाणी काढण्याचे चामड्याचे एक साधन.
- अधाशी - हावरटपणा, एखादी गोष्ट आपल्यालाच मिळावी हा हेतू - (greedy).
- बावनकशी सोने - अत्युत्तम खरे सोने.
- कृतघ्न - उपकाराची जाणीव नसलेला - (ungrateful).
- काणूस - पशू - (animal)
- लपे - लपणे - (hide).
- अहिराणी भाषेत ‘ळ’ ऐवजी ‘य’ वापरतात.
- खेयता - खेळता.
- घरोटा - जातं.
- व्होट - ओठ - (lip).
- चुल्हया - चूल.
- फयं - फळ - (fruits).
- आभाय - आभाळ - (sky).
परिमळ स्वाध्याय | Parimal Swadhyay 11th | Maharashtra State Board 11th Marathi Solution
प्रल्हाद केशव अत्रे : (१८९८ ते १९६९) :
नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथालेखक, वक्ता, शिक्षणतज्ज्ञ म्हणून परिचित. त्यांच्या
असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रांत त्यांनी मानदंड निर्माण केले. ‘केशवकुमार’ या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले.
‘झेंडूची फुले’ हा त्यांचा विडंबनपर कवितांचा संग्रह; ‘साष्टांग नमस्कार’, ‘तो मी नव्हेच’, ‘कवडी चुंबक’, ‘ब्रह्मचारी’, ‘डॉक्टर
लागू’, ‘मोरूची मावशी’ इत्यादी त्यांनी लिहिलेली लोकप्रिय नाटके;
‘अशा गोष्टी अशा गमती’, ‘फुले आणि मुले’ इत्यादी
कथासंग्रह; ‘कऱ्हेचें पाणी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध. सानेगुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले सुवर्णकमळ देऊन गौरवण्यात आले. १९४२ साली झालेल्या
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
प्रस्तुत पाठ हा आचार्य अत्रेयांनी ‘बहिणाबाईंची गाणी’ या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना होय. या प्रस्तावनेतून
आचार्य अत्रेयांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दांत करून
दिली आहे.
ग्रामीण जीवन, कृषिजीवन यांच्याशी निगडित संस्कृतीचे बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते. त्यामुळे
त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे व कृषिसंस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भदेते. माणुसकी, निसर्गाशी समरसता,
श्रद्धा आणि खेड्यातील समूहजीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकटली आहे. त्यांच्या काव्यातील खानदेशी
बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणारा आहे.
परिमळ
एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा
तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत
महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध
क्वचितच लागतात. सोळा वर्षांपूर्वी मराठी साहित्यात
असाच एक मौल्यवान शोध लागला. लक्ष्मीबाई टिळकांची
‘स्मृतिचित्रे’ प्रसिद्ध झाली
तेव्हा. लक्ष्मीबाईंसारखाच
बहिणाबाईंचा जिव्हाळा
जबर आहे. त्यांच्या
शब्दाशब्दांतून प्रतिभा
नुसती झिरपते आहे. असे
सरस आणि सोज्वळ काव्य
मराठी भाषेत फार थोडे
आहे आणि मौज ही आहे,
की जुन्यात चमकेल आणि
नव्यात झळकेल असे त्याचे तेज आहे.
एका निरक्षर आणि
अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे सारे रचलेले आहे हा तर तोंडात
बोट घालायला लावील असा चमत्कार आहे.
सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी यांच्या ह्या
मातोश्री. वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्या मरण पावल्या.
सोपानदेवांची आणि माझी वीस-बावीस वर्षांची मैत्री आहे;
पण त्यांच्या माजघरात सोन्याची खाण दडलेली असेल
ह्याची मला माहिती नव्हती. त्यांना स्वत:ला त्याची
जाणीव असेल; पण ते पडले मुलखाचे लाजाळू. त्यांना
वाटले, की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी
आईच्या ओव्यांचे ‘सुशिक्षित आणि सुसंस्कृत’ महाराष्ट्र
कौतुक करील की नाही कोणास ठाऊक! म्हणून ते इतकी
वर्षे तोंडात मूग धरून बसले होते.
मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच
माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून
त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत
त्यांनी मला वाचून दाखवली.
येहेरीत दोन मोटा
दोन्हीमधी पानी एक
मोट हाकलतो एक
जीव पोसतो कितीक?
त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन्
ओढून घेतली आणि अधाशासारख्या साऱ्या कविता भरभर
चाळल्या. भाषेची मला कुठेच अडचण वाटली नाही. मी
ओरडून सोपानदेवांना म्हणालो, ‘‘अहो, हे बावनकशी सोने
आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे हा गुन्हा आहे.’’
त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचे आम्ही ठरवले.
प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे. ते
त्याच्याबरोबरच यावे लागते. यत्नाचा किंवा विद्येचा
त्याच्याशी काही संबंध नाही, हे माझे आता ठाम मत झाले
आहे. कोकिळ पक्ष्याने तोंड उघडले, की आपोआप संगीत
वाहू लागते. प्राजक्ताची कळी उमलली, की ती सुगंधाचेच
नि:श्वास टाकू लागते. तसे जातीच्या कवीचे आहे. त्याचे
हृदयच ताल धरून बसलेले असते. त्यामुळे त्याच्या जिभेवर
शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो. सृष्टीतले सौंदर्य तेवढे
त्याच्या डोळ्याला दिसते आणि जीवनातले संगीत त्याला
ऐकू येते. डोंगराच्या कपारीआडून जसा एखादा झरा
उचंबळत असतो, तसे काव्य एकसारखे त्याच्या हृदयातून
उसळ्या घेत असते, असे मानल्याखेरीज जगातील अमर
काव्य कसे जन्माला येते हे कोडे सुटणार नाही.
बहिणाबाई ह्यांनी तर शाळेचे कधी तोंड पाहिले
नाही.
त्यांना लिहिता येत नव्हते नि वाचताही येत नव्हते.
‘गावातील मंदिरे ह्याच माझ्या शाळा’ असे त्या म्हणत.
रोजचे घरातले अन्शेतामधले काम करता करता त्यांनी
गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून
ठेवली. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच गेली. अशी ही एक
अपढिक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता
किंवा चूल फुंकता फुंकता ‘माय भीमाई माऊली, जशी
आंब्याची साऊली’ किंवा ‘माझ्या माहेराची वाट, माले वाटे
मखमल’ असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या
सहजपणे कशी करू शकते?
कुणी म्हणेल आपल्या
बायकांच्या जुन्या गाण्यांत असले काव्य वाटेल तितके
आढळून येते; पण तसे नाही.
बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार निराळी आहे.
धरित्रीच्या कुशीत झोपलेले बी-बियाणे कसे प्रकट होते
ह्याचे त्यांनी केलेले वर्णन वाचा.
ऊन वाऱ्याशी खेयता
एका एका कोंबातून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन
असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतात
आढळून येईल?
हे मनोहर चित्र जिची प्रतिभा पाहू शकते किंवा ऐन
तारुण्यात सौभाग्य गमावले असताना
लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली
पुशीसनी गेलं कुकू
रेखा उघडी पडली
वैधव्याचे असे हृदयभेदक करुणकाव्य जिच्या
मुखातून प्रकट होते तिचे कवित्व सामान्य आहे असे कोण म्हणेल? सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे
जात्यावर बसून दळू लागल्या, की जात्यातून तिकडे पीठ
पडू लागायचे अन्इकडे ह्यांच्या ओठातून काव्य सांडू
लागायचे
:
अरे, घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पीठी
तसं तसं माझं गानं
पोटातून येतं व्होटी
हे त्यांचे वर्णनच मुळी त्यांनी स्वत: करून ठेवले
आहे. स्वयंपाकघरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या
अन्चूल पेटता पेटेनाशी झाली आणि तिच्यातून नुसताच
धूर बाहेर पडू लागला म्हणजे त्या काव्यामधेच संतापून
‘चुल्ह्या’ला म्हणत,
पेट पेट धुक्कयेला
किती घेसी माझा जीव
आरे इस्तवाच्या धन्या!
कसं आलं तुले हीव!
पुढे चूल पेटली, तवा तापला आणि भाकरी टाकताना
हाताला चटके बसू लागले म्हणजे संसाराची रहस्ये
काव्यरूपाने त्यांच्या मुखावाटे प्रकट होत :
अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताले चटके
तव्हा मियते भाकर
‘तानक्या सोपाना’ला हाऱ्यात निजवून आणि तो हारा
डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य
आपले निघालेच त्यांच्याबरोबर.
वाटेत तांबड्या फळांनी
लकडलेले हिरवे वडाचे झाड दिसले, की लागले ते त्यांच्या
ओठावर नाचायला :
हिरवे हिरवे पानं
लाल फयं जशी चोच
आलं वडाच्या झाडाले
जसं पीक पोपटाचं!
रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावरच्या
पिवळ्या निंबोळ्या पाहिल्या, की घेतलीच त्याने त्याच्यावर
झेप :
कडू बोलता बोलता
पुढे कशी नरमल कडू निंबोयी शेवटी
पिकीसनी गोड झाली!
समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी
दिसला, की गहिवरून केलाच त्यांनी त्याला प्रश्न :
अारे वारकऱ्या, तुले
नही ऊन, वारा थंडी
झुगारत अवघ्याले
आली पंढरीची दिंडी
शेतामध्ये कापणी चालो, मळणी चालो किंवा
उफणणी चालो, काव्याने बहिणाबाईची पाठ कधी सोडली
नाही. खळ्यात बैलाची पात सुरू झाली अाणि मेढ्याभोवती
बैल गरागरा फिरू लागला, की लागलेच ते त्या बैलाला
गोंजारायला :
पाय उचल रे बैला,
कर बापा आता घाई
चालू देरेरगडनं
तुझ्या पायाची पुन्याई
शेतकऱ्याचे जीवन म्हणजे कष्टाचे.
शेतकऱ्याची हाडे
अखेर शेतातच मोडावयाची अन्त्याची राख तापीमाईतच
पडावयाची ह्याची बहिणाबाईंना जाणीव होती.
भोळ्या, भाविक, कष्टाळू अाणि समाधानी
शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य बाळबोध आणि जिवंत
जिव्हाळ्याने बहिणाबाईंच्या ह्या गाण्यातून प्रकट झालेले
आढळून येईल.
मात्र, बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य
नाही. मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी
तत्त्वज्ञान त्यांच्याजवळ होते. एखाद्या बुद्धिमान
तत्त्वज्ञानी किंवा महाकवीची जणूकाही प्रतिभाच त्यांना
प्राप्त झालेली होती. म्हणून त्यांच्या काव्याचा सर्व
आविष्कार सुभाषितांचा आहे आणि त्याचा आत्मा उपरोधी
विनोदाचा आहे.
मराठी वाङ्मयात अमर होतील अशी अनेक सुभाषिते
जागोजाग त्यांच्या काव्यात विखुरलेली आढळतील.
‘कशाला काय म्हणू नाही?’ या काव्यात अशा सुभाषितांचे
जणूकाही एक शेतच पिकलेले आहे, ‘ज्यातून कापूस येत
नाही त्याला बोंड म्हणू नये. भुकेल्या पोटी जी माणसाला
निजवते तिला रात म्हणू नये, अन्दानासाठी जो आखडला
जातो त्याला हात म्हणू नये.
इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये अन्जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक
म्हणू नये. जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये अन्
जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये’ ह्या
बहिणाबाईंच्या उद्गारांत भाषेची आणि विचारांची केवढी
देदीप्यमान श्रीमंती प्रकटलेली आहे!
महाकवी झाला तरी तो ह्यापेक्षा अधिक काय
आणखी बोलू शकतो?
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात
हा भाषेचा अन् विचारांचा हृदयंगम मासला कुठे
आढळून येईल काय?
मानवी जीवनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे. स्वार्थ नाही.
नको लागू जीवा, सदा मतलबापाठी
हिरीताचं देनं घेनं, नही पोटासाठी
ऊन, वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी
असतात.
कशासाठी? भुकेल्यांच्या पोटात आम्हांला
लवकर जाऊ दे रे, असा मनामध्ये ती देवाचा धावा करत
असतात. माणसांचे खोटेनाटे व्यवहार बघून तर
बोरीबाभळींच्या अंगावर काटे आले तरी देखील माणसांवर
उपकार करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती आपल्या शरीराची
त्या कुंपणे करतात! पोट कितीही भरले तरी ते शेवटी
रिकामेच होणार! अन्शरीर तर कधी तरी निघूनच जाणार!
मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणेघेणे.
दुसरे काही नाही. शुद्ध आणि नि:स्वार्थी प्रेमाचे यापेक्षा
अधिक हृदयंगम स्तोत्र कोण लिहू शकेल?
बहिणाबाईंना सर्वांत कशाची जास्त चीड असेल तर
ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या त्याच्या
कृतघ्नपणाची! त्या माणसाला संतापून म्हणतात, ‘माणसा,
तुला नियत नाही रे. तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जनावर बरे.
गाय न्म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात. तुझे एकदा पोट
भरले, की तू उपकार साफ विसरून जातोस. कुत्रा आपले
शेपूट इमानीपणाच्या भावनेने हालवतो. तर माणसा, तू
आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतोस. केवळ
लोभामुळे तू माणूस असूनही काणूस म्हणजे पशू झाला
आहेस.’ एवढे सांगून झाल्यानंतर बहिणाबाईंनी माणसाला
तळमळून विचारले आहे :
22
मानसा मानसा,
कधी व्हशीन मानूस!
मानवतेलाच जणूकाही त्यांनी हे व्याकूळ हृदयाने
आवाहन केले आहे! स्वार्थाचा वणवा सर्व जगभर आज
पसरलेला आहे. माणसे पशू होऊन एकमेकांशी झगडत
आहेत. मानवता आज रक्तबंबाळ झाली आहे. म्हणूनच
‘माणसा, माणसा, कधी होशील माणूस?’ हीच आर्त हाक
मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संतमहात्म्यांच्या
कारुणिक अंत:करणातून उचंबळते आहे! माणसाने माणूस
कसे व्हायचे हीच प्रचंड समस्या मानवजातीपुढे आज उभी
आहे.
ह्या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाईंसारख्या
खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हा
तिच्या प्रतिभासामर्थ्याचा केवढा पडताळा आहे!
बहिणाबाईंची चुलत सासू ‘भिवराई’ ही मोठी विनोदी
होती. ती अनेकांच्या नकला करून लोकांना हसवी. तिचे
वर्णन करता करता बहिणाबाईने विनोदाचा एक मोठा
सिद्धान्त सांगून ठेवला आहे.
नाव ठेये अावघ्यालं
करे सर्व्याची नक्कल
हासवता हासवता
शिकवते रे अक्कल!
माणसांना हसवून शहाणे करायचे हाच विनोदाचा
प्रधान हेतू आहे. बहिणाबाईंच्या विनोदात नुसता उपरोध
नाही. त्यात सहानुभूतीचा आणि कारुण्याचा ओलावा
ओथंबलेला आहे.
रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीने बहिणाबाईंचे काव्य
अत्यंत आधुनिक आहे. प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण
घटना किंवा विचार आहे.
त्याचा प्रारंभ आणि अखेर
परिणामाच्या दृष्टीने नाट्यात्मक व्हावा ह्याबद्दल त्यांचा
कटाक्ष आहे. शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न
करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने
कशी व्यक्त करता येईल ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेले
आहे. त्या दृष्टीने मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व केवळ
अद्भुतच म्हटले पाहिजे.
रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण
किंवा विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे
आणि सुंदर शब्द वापरले आहेत. त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी
भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवली
आहे असे माझे मत आहे. ‘अशी कशी वेडी ग माये’
ह्यापेक्षा ‘अशी कशी येळी माये’ किंवा ‘पाणी ‘लौकीचं’
नितळ । त्याला अमृताची गोडी’ ह्यापेक्षा ‘पानी लौकीचं
नित्तय । त्याले अम्रीताची गोडी’ ह्या भाषेत अधिक
लाडकेपणा वाटतो. एखादे गोजिरवाणे बालक बोबड्या
भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो, तसे
बहिणाबाईंचे काव्य वाचताना मनाला नि कानाला वाटते.
मराठी मनाला माेहिनी घालील आणि स्तिमित करून
टाकील असा भाषेचा, विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण
गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशीग ओथंबलेला आहे
आणि
मानसा मानसा,
कधी व्हशीन मानूस!
मानवतेला त्यांनी दिलेल्या ह्या अमर संदेशाने तर
मराठी वाङ्मयात त्यांचे स्थान अढळच करून ठेवलेले
आहे!
(बहिणाबाईंची गाणी-प्रस्तावन
परिमळ स्वाध्याय | Parimal Swadhyay 11th | Maharashtra State Board 11th Marathi Solution
Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 5 परिमळ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 परिमळ
11th Marathi Digest Chapter 5 परिमळ Textbook Questions and Answers
- परिमळ शब्दाचा अर्थ
- परिमळ स्वाध्याय
- परिमळाची धाव भ्रमर ओढी अभंग
- परिमळ म्हणजे काय
- परिमळाची धाव
- परिमळाची धाव अभंग
- परिमळाची धाव भ्रमर ओढी
- परिमळ धडा
- परिमळ meaning
- परिमळ meaning in english
- नाना परिमळ
- परिमळ मराठी
- meaning of परिमळ in marathi
- परोपरी meaning
- परोपरी meaning in english
- meaning of परिमळ
Balbharati solutions for Marathi - Yuvakbharati 11th Standard Maharashtra State Board chapter 1 - परिमळ [Latest edition]
विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही परिमळ स्वाध्याय इयत्ता अकरावी ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्यासाठी परिमळ या धड्या विषयी जास्तीत जास्त स्टडी मटेरियल म्हणजेच अभ्यासासाठी जास्तीत जास्त कशी मदत होईल हे पाहतात तुमच्यासाठीही ब्लॉग पोस्ट किंवा आलो होतो यामध्ये तुम्हाला काही शंका असेल ते देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अजून चांगल्या प्रकारच्या अभ्यासा विषयी लेख घेऊन येण्याचा प्रयत्न करूया
निर्मळ याकडे मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन प्रकारचे लेख घेऊन येत आहेत यामध्ये आम्ही तुमच्यासाठी इयत्ता अकरावी मराठी चे सर्व प्रश्न उत्तर घेऊन आलेलो आहेत तरी तुम्ही खाली दिलेल्या अनुक्रमाने की नुसार सर्व प्रश्न-उत्तरांची यादी पाहू शकतात आणि तसेच या प्रश्नोत्तरांचा आपल्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त उपयोग देखील करू शकता आम्हाला तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला अजून कोणत्याही प्रकारची अभ्यासा विषयी माहिती हवी असेल तर धन्यवाद ही पोस्ट पूर्ण पहिली याबद्दल आपले अकरावीचे वर्ष चांगले जाऊ हीच निर्मळे अकॅडमी ची इच्छा धन्यवाद
'प्रतिभा हे कवीला लाभलेले निसर्गाचे देणे आहे'. या विधानाचे समर्थन करा.
ReplyDeleteयाचे उत्तर द्या.....🙏👍