सामासिकशब्द | विग्रह | समास |
जीवनशैली | = जीवनाची शैली | → विभक्ती तत्पुरुष |
कृती (४) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
1) आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. (उद्गारार्थी करा.)
SOLUTION
किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात!
2) आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा.)
SOLUTION
आपल्याकडे कामाच्या ठिकाणांची अंतरे जास्त नाहीत.
3) निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? (विधानार्थी करा.)
SOLUTION
माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही.
1) ‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
SOLUTION
अलीकडच्या काळात जीवन विलक्षण गतिमान झाले आहे. एकाच माणसाला अनेक कामे पार पाडावी लागतात. तीसुद्धा कमी अवधीत. कामांशी संबंधित ठिकाणी अनेक माणसांना अनेक ठिकाणी गाठावे लागते. मोठमोठी अंतरे कापावी लागतात. चालत जाऊन ही कामे करता येणे शक्य नसते. साहजिकच वाहनांचा उपयोग अपरिहार्य ठरतो. फक्त एका-दोघांना किंवा फक्त काहीजणांनाच वाहन वापरावे लागते असे नाही. सामान्य माणसांनाही वाहन वापरणे गरजेचे होऊन बसले आहे. सतत वाहन वापरण्याचे दुष्परिणाम खूप होतात, आपण चालत चालत जाऊन कामे करतो, तेव्हा शरीराच्या सर्व प्रकारच्या हालचाली होतात. इकडे-तिकडे वळणे, खाली वाकणे, वर पाहणे, मागे पाहणे, हात वर-खाली करणे, पाय दुमडून बसणे. पाय लांब करून बसणे, उकिडवे बसणे अशा कितीतरी लहान लहान कृतींतून शारीरिक हालचाली घडत असतात. या हालचालींमुळे शरीराच्या सगळ्याच स्नायूंना आणि सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो. शरीर लवचीक बनते. आपण या हालचाली सहजगत्या, एका लयीत करू शकतो. एक सुंदर, नैसर्गिक लय शरीराला लाभते. मात्र, सतत वाहनांचा उपयोग करावा लागल्यामुळे हालचालींना आपण मुकतो. शरीराला लवचिकता प्राप्त होत नाही. शरीराच्या अनेक व्याधींना सुरुवात होते. दुःखे, कटकटी भोगाव्या लागतात. पैसा, वेळ खर्च होतो. दैनंदिन जीवन विस्कळीत होते. जगण्यातला आनंद नाहीसा होतो. म्हणजे आपल्या शरीर व्यापारात अनेक अडथळे निर्माण होतात.
2) ‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
SOLUTION
माणसे वाहनात बसली की ते दृश्य पाहण्यासारखे असते. सर्वजण उल्हसित मनःस्थितीत असतात. सगळ्यांच्या बोलण्याच्या कोलाहलामुळे वातावरणात आनंद भरून जातो. वाहनचालकाला हळूहळू सुरसुरी येते. तो हळूहळू वेग वाढवू लागतो. सर्वजण उत्तेजित होतात. गाडीचा वेग वाढतच जातो. मागे पडत जाणाऱ्या वाहनांकडे सगळेजण विजयी मुद्रेने पाहू लागतात. चालक हळूहळू बेभान होतो. अन्य गाडीवाले सामान्य आहेत, कमकुवत आहेत, आपण सम्राट आहोत, अशी भावना मनातून उसळी घेऊ लागते. अशा मन:स्थितीत माणूस विवेक गमावतो. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी ही मन:स्थिती अनुकूल नसते. गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चित्त एकवटून वाहनावर केंद्रित करावे लागते. हात आणि पाय यांच्या हालचाली अचूक जुळवून घेण्यासाठी सतत मनाची तयारी ठेवावी लागते. क्लच, ब्रेक, अॅक्सलरेटर, यांच्याकडे बारीक लक्ष ठेवावे लागते. त्याच वेळी पाठीमागून व बाजूने येणारी वाहने आणि आपण यांच्यात सुरक्षित अंतर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न करावा लागतो. अन्य एखादे वाहन मध्येच आडवे येईल का, आपल्या वाहनाला धडकेल का, आपल्याला जिथे वळायचे आहे तिथे वळता येईल का, त्या वेळी बाकीच्या वाहनांची स्थिती कशी असेल, त्यांच्यापैकी कोणीही स्वत:ची दिशा बदलण्याचा संभव आहे का इत्यादी अनेक बाबींचा विचार काही क्षणांत करावा लागतो. त्या अनुषंगाने सतत विचार करीत राहावे लागते. वाहन आणि वाहनाची गती यांखेरीज अन्य कोणतेही विचार मनात आणता येत नाहीत. एकाच विचाराला जखडले गेल्यामुळे डोळ्यांवर, शरीरावर व मनावर विलक्षण ताण येतो. अपघाताची भीती मनात सावलीसारखी वावरत असते. तासन्तास तणावाखाली राहावे लागल्याने मनावर विपरीत परिणाम होतात. वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे अगदी बारीकशा खड्ड्यानेसुद्धा वाहनाला हादरे बसतात. सांधे दुखतात. ते कमकुवत होतात. अशा प्रकारे वाढता वेग म्हणजे ताण, हे समीकरण तयार होते.
3) ‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION
खरे तर प्राचीन काळापासून वाहन निर्माण करणे, हे माणसाचे स्वप्न होते. त्याच्या मनात खोलवर रुजलेले हे स्वप्न प्राचीन कथांमधून, देवदेवतांच्या कथांमधून सतत व्यक्त होत राहिले आहे. माणसाच्या मनातल्या या प्रबळ प्रेरणेतूनच वाहनाची निर्मिती झाली आहे. वेळ आणि श्रम वाचवणे हाच वाहनाच्या निर्मितीमागील हेतू आहे.
अलीकडच्या काळात जीवनाचा वेग प्रचंड वाढला आहे. वेळ थोडा असतो. कामे भरपूर असतात. कामाची ठिकाणेसुद्धा दूर दूर असतात. अनेक ठिकाणी जावे लागते. अनेक माणसांना भेटावे लागते. म्हणूनच वाहनांची निर्मिती झाली आहे. वाहनांमुळे माणसाची प्रचंड प्रगती झाली आहे. त्यामुळे वाहनाला माणसाच्या जीवनात फार मोठे स्थान मिळालेले आहे. अशी ही अत्यंत महत्त्वाची वस्तू आपल्याकडे असावी, असे सगळ्यांना वाटू लागते.
माणसे धडपडून वाहने प्राप्त करतात. प्रतिष्ठा मिळवतात. पण वेळ व श्रम वाचवणे हा उद्देश मात्र त्यांच्या मनातून केव्हाच दूर होतो. वाहन हे साधन आहे. ते आपला वेळ वाचवते यात शंकाच नाही. परंतु काहीही केले तरी किमान वेळ हा लागतोच. शून्य वेळामध्ये आपण कुठेही पोहोचू शकत नाही. वाहन ही अखेरीस एक वस्तू आहे. वस्तूला तिच्या मर्यादा असतात. हे लक्षात न घेता आपण जास्तीत जास्त वेग वाढवून कमीत कमी वेळात पोहोचण्याचा हव्यास बाळगतो. अतिवेगामुळे आपलेच नुकसान होते. अनेक शारीरिक व्याधी आपल्याला जडतात. शारीरिक क्षमता उणावते. जगण्यातला आनंद कमी होतो. हे सर्व आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.
पण हे कोणीही लक्षात घेत नाही. केवळ हौसेसाठी, गंमत-जंमत करण्यासाठी, आपल्याकडे गाडी आहे, ऐश्वर्य आहे हे दाखवण्यासाठी लोक गाडीचा उपयोग करतात. हळूहळू गाडीचे गुलाम बनतात. गाडी हे एक साधन आहे, हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे.
4) वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.
SOLUTION
वाहनाची अतिगती ही विकृती आहे, हे विधान शंभर टक्के सत्य आहे. हे विधान मला पूर्णपणे मान्य आहे. विकृती म्हणजे जे सहज नाही, नैसर्गिक नाही ते.
कल्पना करा. आपल्याला चॉकलेट खप आवडते. सर्व जगात असे किती जण आहेत, जे सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्री आवडते म्हणून फक्त चॉकलेटच खातात? समजा एखादयाला पांढरा रंग खूप आवडतो, म्हणून तो घरातल्या सर्व माणसांना फक्त पांढऱ्या रंगाचेच कपडे घेतो. घराला पांढरा रंग देतो. अंथरुणे-पांघरुणे पांढरी, खिडक्यांचे पडदे पांढरे, भांडीकुंडी, फर्निचर पांढऱ्या रंगाचे. हे असे करणारा जगामध्ये एक तरी माणूस असेल का? सर्वजण पायांनी चालतात. उलटे होऊन हातांवर तोल सावरत प्रयत्नपूर्वक चालता येऊ शकते. पण अशा तऱ्हेने नियमितपणे जाणारा एक तरी माणूस सापडेल का?
जे सहज आहे, नैसर्गिक आहे तेच साधारणपणे माणूस करतो. तीच खरे तर प्रकृती असते. याच्या विरुद्ध वागणे म्हणजे विकृती होय. रोजच्या जेवणात वरण-भात आणि भाजी-पोळी असणे, घरात विविध रंगसंगती योजणे, पायांनी चालणे हे सर्व सहज, नैसर्गिक आहे. सर्व माणसे तसेच वागतात. हाच न्याय वाहनांनासुद्धा लागू पडतो. मर्यादित वेगाने वाहन चालवत, अपघाताची शक्यता निर्माण होऊ न देता, सुरक्षितपणे, वेळेत पोहोचणे हा वाहनाने प्रवास करण्याचा हेतू असतो. हा हेतू आपण अतिवेगाचा हव्यास बाळगला नाही तरच यशस्वी होतो. म्हणून अतिवेग ही विकृती होय, हेच खरे.
Download pdf
ReplyDeleteThanks
DeleteVery useful
ReplyDeleteThanks
ReplyDelete