रंग माझा वेगळा - Rang Maza Vegla 12th [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

रंग माझा वेगळा - Rang Maza Vegla [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 

रंग माझा वेगळा - Rang Maza Vegla [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] .
रंग माझा वेगळा - Rang Maza Vegla 

कृती (१)  खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा. 

1)

अर्थओळ
सर्वांमध्येमिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो.____________
SOLUTION

अर्थ

ओळ

सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!


2)
अर्थओळ
मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतो.____________
SOLUTION

अर्थ

ओळ

मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतो.

कोण जाणे कोठुनी ह्या आल्या पुढे; मी असा की लागती या सावल्यांच्या ही झळा!


3)
अर्थओळ
हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे?____________
SOLUTION

अर्थ

ओळ

हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे?

हें कशाचें दुःख ज्याला लागला माझा लळा!

4)
अर्थओळ
आयुष्याने माझीच का बरे फसगत केली?____________
SOLUTION

अर्थ

ओळ

आयुष्याने माझीच का बरे फसगत केली?

अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!


कृती (१)  कृती करा.

 कृती (१) | Q 2 | Page 29
1) कवितेतील विरोधी भाव दर्शवणाऱ्या गोष 
SOLUTION
(१) साऱ्या रंगात रंगूनही माझा रंग वेगळा आहे.
(२) साऱ्या गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे.
(३) उन्हाऐवजी सावल्यांच्याही झळा मला लागतात.
(४) माणसांच्या मध्यरात्री मी हिंडणारा सूर्य आहे.

कृती 1. Q.3) योग्य जोड्या लावा.

कृती (१) | Q 3 | Page 29

'अ' गट

‘ब’ गट

(१) माणसांची मध्यरात्र

(अ) नैराश्यातील आशेचा किरण

(२) मध्यरात्री हिंडणारा सूर्य

(आ) इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्

(३) माझा पेटण्याचा सोहळा

(इ) माणसांच्या आयुष्यातील नैराश्

SOLUTION
'अ' गट

‘ब’ गट

(१) माणसांची मध्यरात्र

(इ) माणसांच्या आयुष्यातील नैराश्य.

(२) मध्यरात्री हिंडणारा सूर्य

(अ) नैराश्यातील आशेचा किरण.

(३) माझा पेटण्याचा सोहळा

(आ) इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्ती.

कृती (1)  Q.4) एका शब्दांत उत्तरे लिहा.

कृती (१) | Q 4.1 | Page 29

1) कवीची सदैव सोबत करणारी ____________
कवीची सदैव सोबत करणारी - आसवे

2) कवीचा विश्वासघात करणार ____________ 
कवीचा विश्वासघात करणारे - आयुष्य

3) खोट्या दिशा सांगतात त ____________
खोट्या दिशा सांगतात ते - तात्पर्य

4) माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा ____________
माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा - सूर्य

कृती (२)  खालील शब्दांचे अर्थलिहा.

1) तात्पर्य-
SOLUTION
तात्पर्य - सार, सारांश

2) लळा-
SOLUTION
लळा - माया, ममता, प्रेम

3) गुंता-
SOLUTION
गुंता - गुंतागुंत

4) सोहळा-
SOLUTION
सोहळा - उत्सव, समारंभ.

कृती (2)   खालील ओळींचा अर्थलिहा.

कृती (३) | Q 1 | Page 29
1) रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
SOLUTION
अर्थ : स्वत:च्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात - साऱ्या रंगात रंगूनही माझा रंग वेगळाच आहे. सर्व गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे. मी पायात बंधने घालून घेणारा नाही. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे.

2) कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
SOLUTION
अर्थ : कवी म्हणतात - कोणत्या क्षणी मला जीवनाचे भान आले, ते मला कळले नाही. मी आयुष्य जगायला लागलो. पण या आयुष्याने माझा विश्वासघात केला.

कृती (४) | Q 1 | Page 30
1) माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
या ओळींमधील भावसौंदर्य स्पष्ट करा.
SOLUTION
'रंग माझा वेगळा' या गझलमध्ये सुरेश भट यांनी स्वत:च्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत.
कवी म्हणतात - मी कुठल्याही बंधनात स्वत:ला कोंडून ठेवले नाही. मी बेधडक माझे स्वतंत्र विचार मांडले. माणुसकीला काळिमा फासणारा अन्याय मी सहन केला नाही व करू दिला नाही. समाजात नैराश्येचा अंधार असला नि माणुसकीची भयाण मध्यरात्र जरी झाली असली, तरीही मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे. मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो. मी माझ्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही हापापलेला नाही. मी दुःखाचा सोहळा साजरा करीत नाही.
तडफदार व ओजस्वी शब्दांत कवींनी स्वयंभू विचार प्रतिपादन केले आहेत. या ओळींतून समता व स्वातंत्र्याचे ठोस विचार प्रकट झाले आहेत.

कृती (5)  रसग्रहण.

कृती (५) | Q 1 | Page 30
1) खालील ओळींचे रसग्रहण करा.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
SOLUTION
आशयसौंदर्य : समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार 'रंग माझा वेगळा' या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे, असे कवींनी म्हणायचे आहे.

काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. कशा, कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली. जगण्याचे भान मला कधीतरी आले; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली. विश्वासघात झाला; पण मी प्रेरक व माणुसकींचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत 'गझल' हे मात्रावृत्त आहे. अंत्य यमकाचा रदिफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे. 'मतला' धरून यामध्ये सहा शेरांची (रेखो) मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. 'सावल्याच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य' इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पक्कड यांमुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते.

कृती (6)  अभिव्यक्ती.

कृती (६) | Q 1 | Page 30
1) ‘समाजात स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’, सोदाहरण स्पष्ट करा.

SOLUTION
जीवनाचे सार्थक होण्यासाठी आयुष्यासमोर ध्येय हवे आणि त्या ध्येयाची पूर्तता निष्ठेने व व्रतस्थ वृत्तीने करायची असेल, तर स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, अत्यंत गरजेचे आहे.
स्वत:च्या कर्तृत्वाची शक्ती आधी माणसाने जाणली पाहिजे, म्हणजे समाजात त्याचे वेगळेपण प्रकर्षाने ठसते. कर्तृत्व ही माणसाची 'माणूस' असण्याची निशाणी आहे. सामाजिक बांधिलकी मनापासून असायला हवी. आदरणीय बाबा आमटे यांनी वकिली सोडून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेऊन 'आनंदवन' उभारले. समाजात त्यांचे वेगळेपण उठून दिसते. गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून समाजातील स्वच्छता नि मनाचा विवेक जागवण्यासाठी 'स्वच्छता अभियान' एकहाती पार पाडले. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. गाडगेमहाराज आज आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आपणास वंदनीय आहेत.

2) कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION
'रंग माझा वेगळा' या गझलमध्ये कवींनी स्वत:च्या बेधडक व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य सांगताना त्यांच्या वाट्याला आलेल्या फसवणुकीचाही मागोवा घेतला आहे.
ते म्हणतात - मी कोणत्याही गुंत्यात अडकलो नाही, ना कुठल्या रंगात रंगलो, मी स्वत:चे व्यक्तित्व वेगळे राखले. पण मला कळले नाही सुखाची सावली कधी लाभली; पण या क्षणिक सुखाच्या झळा मी सोसल्या. माझ्या कवितेच्या सोबतीला माझे अश्रू होते. त्यामुळे समाजाच्या दुःखाचा लळा मला लागला. 'तात्पर्य' सांगणारे महाभाग भेटले. वस्तुस्थिती विपरीत दर्शवणारे लोक भेटले. चालतोय त्याला पांगळा' नि पाहणाऱ्याला 'आंधळा' संबोधणारे फसवे लोक मला मिळाले. कोणत्या बेसावध क्षणी माझा आयुष्याने विश्वासघात केला ते कळलेच नाही. पण मी या फसवणुकीला पुरून उरलो. मी स्वार्थासाठी जगलो नाही. सामाजिक दुःख दूर करणारा मी नैराश्येतील सूर्य झालो.

2)‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’, असे कवी स्वत:बाबत का म्हणताे ते लिहा.
SOLUTION
 समाजात पसरलेल्या दुःखदैन्याचा अंधकार नष्ट करण्याची बेधडक व खंबीर वृत्ती बाळगणारा मी माणूस आहे, असे स्वत:चे व्यक्तिमत्त्व कवीनी 'रंग माझा वेगळा' या कवितेत साकारले आहे.
ते म्हणतात - 'तात्पर्य' सांगणारी फसवी माणसे व दुसऱ्याची वंचना करणारी माणसे खोटेपणाचा आव आणून समाजात वावरत आहेत. हे महाभाग समाजाची फसवणूक करण्यासाठी टपलेले आहेत. त्यामुळे समाजात नैराश्येची मध्यरात्र झाली आहे. मध्यरात्री जसा सूर्य झाकोळून अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. अशा या माणुसकीहीन मध्यरात्री मी तळपणारा सूर्य आहे. माझ्या तेजस्वी विचारांनी मी समाजातील नैराश्येचा अंधकार दूर करीन, हा विचार शेरातून मांडताना कवी 'मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे' असे स्वत:बद्दल सार्थ उद्गार काढतात.

रंग माझा वेगळा 

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;

हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
सांगती ‘तात्पर्य’ माझें सारख्या खोट्या दिशा :
‘‘चालणारा पांगळा अन् पाहणारा आंधळा!’’

माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
(रंग माझा वेगळा)

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post