जयपूर फूटचे जनक [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] Jayapur Futache Janak Marathi 12th

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita 

जयपूर फूटचे जनक [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] Jayapur Futache Janak Marathi 12th

Q.1) परिणाम लिहा :

घटना

परिणाम

(१) अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला.

______________

(२) परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते.

______________

SOLUTION
घटना

परिणाम

(१) अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला.

तिचे नृत्य कायमचेच बंद पडण्याच्या मार्गावर होते.

(२) परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते.

पंडितजींच्या कल्पकतेला येथे आव्हान मिळाले.


Q.2)अभिव्यक्ती.

1) ‘कृत्रिम पायाच्या मदतीने दि व्यां गत्वाव र मात करता येते’, हे सोदाहरण स्पष्ट करा.
SOLUTION
जयपूर फूट आता जगप्रसिद्ध झाला आहे. आजपर्यंत हजारो विकलांग लोकांनी हा कृत्रिम पाय बसवून घेतला आहे. ही मुलेमाणसे आता सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. यांच्या कथा प्रेरणादायक आहेत.
एक कथा आहे नायरा नावाच्या तीन वर्षांच्या मुलीची. तिचे वडील स्वतः फार्मासिस्ट आहे. नायरा जन्मतः च कमकुवत होती. तीन वर्षांपर्यंत तिला उभे राहता येत नव्हते, चालता येत नव्हते. हा जयपूर फूट बसवल्यावर मात्र नायरा सोबतच्या मुलीबरोबर खेळू लागली; बागडू लागली; धावू लागली.

कॉर्पोरेट जगताने आता यात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांपैकी एक आहे - लेमन ट्री हॉटेल. एक २३ वर्षांचा तरुण पायाने अधू होता. त्याला एक दानशूर व्यक्तीने जयपूर फूट बसवून दिला. तो आता सहायक म्हणून या हॉटेलमध्ये काम करतो. हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांची देखभाल करण्याचे काम तो करतो. तो आता हॉटेलचा मॅनेजर होण्याचे स्वप्न पाहत आहे. त्या कंपनीत आतापर्यंत ४०० विकलांगांची भरती केली गेली आहे. एकंदरीत, विकलांगत्वावर मात करून सर्वसाधारण माणसाचे आयुष्य नक्की जगता येऊ शकते, हे आता सगळ्यांनाच मान्य झालेले आहे.

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita 

‘नाचे मयूरी’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. सुप्रसिद्ध नर्तिका सुधा चंद्रन हिच्या आयुष्यावर तो आधारित  होता. एका अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला होता. साहजिकच तिचं नृत्य कायमचंच बंद पडण्याच्या मार्गावर होतं; पण सुधा जयपूरला गेली आणि तिथं तयार करण्यात आलेला कृत्रिम पाय आपल्या गमावलेल्या पायाच्या जागी बसवला. नृत्याची कारकीर्दतिनं नव्यानं सुरू केली आणि त्या कृत्रिम पायाच्या आधारानं तिनं भरघोस  यश मिळवलं. सुधानं बसवून घेतलेल्या त्या कृत्रिम पायाचंच नाव आहे ‘जयपूर फूट’. जयपूरमधल्या एका रुग्णालयात  तो प्रथम विकसित केला गेला म्हणून त्याला ते नाव मिळालं. जयपूरच्या रुग्णालयात डॉ. प्रमोद किरण सेठी अनेक विकलांगांवर उपचार करत होते. 

पोलिअोची बाधा  झाल्यामुळे दिव्यांगत्व आलेल्या मुलांना पाहून त्यांना एक कल्पना सुचली. पंडित राम चरण शर्मा या कलाकाराला  विविध प्रकारची विलक्षण साधनं तयार करताना त्यांनी पाहिलं होतं. त्यांनी पंडितजींना रुग्णालयात येण्याचं आमंत्रण  दिलं. पंडितजींनी रुग्णालयात, ज्यांचे पाय काही कारणांनी गमावले आहेत अशांना परदेशातून आयात केलेले, महागडे  कृत्रिम पाय बसवताना पाहिलेलं होतं. ते परवडणारे नव्हते आणि ज्यांना ते परवडणारे होते त्यांचीही चाल काही सुलभ  होत असताना त्यांना दिसली नव्हती.

 ते पाहून त्यांच्या कल्पकतेला आव्हान मिळालं. त्यांनी व्हल्कनाईज्ड रबर आणि लाकूड या सहजगत्या उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून हालचाल करण्यास सुलभ असा पाय तयार केला.  डॉ. सेठी यांनी तो आपल्या एका रुग्णाला बसवून पाहिला. त्यासाठी शस्त्रक्रियेची नवी पद्धत विकसित केली. त्या रुग्णाला त्याचा फायदा झाल्याचं पाहून त्यांनी पंडितजींना आणखी तसेच पाय तयार करायला सांगितलं. आता  परदेशातून कृत्रिम पाय आयात न करता हे लाकडी पाय बसवण्याचाच सिलसिला सुरू झाला. सुरुवातीला तर पंडितजींनी  बांबूचाच वापर केला होता; पण हळूहळू इतरही पदार्थांचा वापर करायला त्यांनी सुरुवात केली. आता जगभर त्याचं रोपण केलं जातं. अद्ययावत प्लास्टिक व ॲल्युमिनियम यांचा वापरही आता करण्यात  येतो. पण मूळ कल्पना मात्र पंडितजींचीच राहिली आहे.
- डॉ. बाळ फोंडके

समुद्र कोंडून पडलाय (कविता) संपूर्ण स्वाध्याय | Samudra Konḍuna Padalaya Kavita 

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

भाग - 3

साहित्य प्रकार स्वाध्याय LINK
00: कथा-साहि त्यप्र कार-परिचय Click Now
01: शोध Click Now
02: गढी Click Now

भाग - 4

उपयोजित लेखन स्वाध्याय LINK
01: मुलाखत Click Now
02: माहितीपत्रक Click Now
03: अहवाल  Click Now
04: वृत्तलेख  Click Now

भाग - 5

व्याकरण लेखन स्वाध्याय LINK
0: व्याकरण-वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार Click Now
0: निबंध लेखन Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post