'अ' गट | ‘ब’ गट |
लेखकाचीव्यंगचित्रे | व्यंगचित्रांचीकार्ये |
(१) लेखकाचे स्त्रीभ्रूणहत्येचे पोस्टर | - लिहिता वाचता नयेणाऱ्यांना संदेश देते. |
(२) लेखकाच्या मते व्यंगचित्रे ही | - भाषा इतकी संवादी बनून प्रेक्षकांशी संवाद साधतात. |
(३) शेतकऱ्याने व्यंगचित्राचा अर्थ इतरांना सांगताना
| -स्वकल्पनाशक्तीने चित्र समजून घेऊन इतरांचे उद्बोधन केले.
|
कृती (१) लेखकाला लागू पडण्याचा व्यक्तिवैशिष्ट्यांसमोर (√) अशीखूणकरा.
कृती (१) | Q 4.1 | Page 58
1) लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती.
SOLUTION
लेखकामध्ये जबरदस्त निरीक्षणशक्ती होती.(√)
2) लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली.
SOLUTION
लेखकाच्या व्यंगचित्रांना सहजासहजी प्रसिद्धी मिळाली. (×)
3) लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती.
SOLUTION
लेखकामध्ये प्रयोगशीलता पुरेपूर भरलेली होती. (√)
4) अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत.
SOLUTION
अपेक्षित उत्तर मिळेपर्यंत ते विचारांचा पाठलाग करत. (√)
5) प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती.
SOLUTION
प्राप्त प्रसंगांतून आणि भेटलेल्या व्यक्तींकडून शिकत राहण्याची वृत्ती होती. (√)
6) नवनिर्मितीक्षमता हा त्यांचा गुण होता.
SOLUTION
नवनिर्मितीक्षमता हा त्यांचा गुण होता. (√)
7) इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती.
SOLUTION
इतरांच्या आधाराने पुढे जाण्याची त्यांची वृत्ती नव्हती. (√)
कृती (२ वर्णनकरा.
कृती (२) | Q 1 | Page 58
1) वाई येथील प्रदर्शनाला भेट देणारा शेतकरी कुटुंबप्रमुख.
SOLUTION
चित्रकलेच्या प्रदर्शनाला साधारणपणे सुशिक्षित व उच्चभ्रू वर्गातील लोक जास्त असतात. ग्रामीण भागातील लोक तर अशा प्रदर्शनांकडे सहसा फिरकत नाहीत. मात्र वाई येथे लेखकांनी भरवलेल्या स्वत:च्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला शेतकरी कुटुंबातील थोडीथोडकी नव्हेत, तर चक्क वीस-बावीस माणसे भेट देण्यासाठी आली होती. त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना हे प्रदर्शन दाखवण्यासाठी घेऊन आला होता.
त्या शेतकरी कुटुंबप्रमुखाचे वय सत्तरीच्या आसपास होते. पांढऱ्या मिशा, रंग काळाकभिन्न, डोक्याला खूप मोठे बांधलेले मुंडासे असा नखशिखान्त शेतकरी पण अंगावर वागवीत होता. असा हा कुटुंबप्रमुख सर्वांना व्यंगचित्र समजावून सांगत होता. तो एकेका चित्रासमोर उभा राही आणि त्याला समजलेला चित्राचा अर्थ स्वत:च्या माणसांना समजावून सांगे. मुलानातवंडापासून लहानथोर सोबत आलेले ते कुटुंबीय आपल्या प्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली चित्रांचा आस्वाद घेत होती. हे दृश्यच विलक्षण व दुर्मीळ होते. लेखकांच्या मनातली चित्र काढण्यामागील कल्पना आणि त्या कुटुंबप्रमुखाला जाणवलेला अर्थ यांतली तफावत लेखक समजावून घेत होते. फार मोठे अनौपचारिक शिक्षण लेखकांना या प्रसंगातून मिळत होते.
2) स्त्रीभ्रूणहत्येबद्दलचे लेखकाने तयार केलेले पोस्टर
SOLUTION
लेखक एका कार्यक्रमाला गेले होते. पाहुणे म्हणून त्यांना पुष्पगुच्छ व नारळ दिला गेला. तो नारळ टेबलावर ठेवला. लेखक त्या नारळाचे निरीक्षण करीत बसले. त्या नारळात त्यांना चिमुरड्या मुलीचे डोके भासले. त्यांना नारळावरून, देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. हा प्रसंग आठवला. एवढ्या तपशिलाच्या आधारे त्यांनी स्त्रीभ्रूणहत्येविरुद्धचे पोस्टर तयार केले. एक पुरुषी हात. त्या हातात नारळ, नारळात मुलीचे रूप भासावे म्हणून बारीकसा कानातला डूल दाखवला. तो हात वरून खाली या दिशेने येत दगडावर नारळ फोडणार होता. तेवढ्यात एका तरुण हाताने तो पुरुषी हात अडवला. चिमुरड्या मुलींची, भ्रूणाची हत्या होऊ न देण्याचा निर्धार त्या चित्रातून व्यक्त झाला.
3) लेखकांनी रेखाटलेले आईचे काव्यात्म चित्र.
SOLUTION
लेखकांनी आईचे, आईच्या प्रेममय हृदयाचे अत्यंत हृदय चित्र रेखाटले आहे. चित्रातल्या परिसरात वैशाखातला वणवा पेटला आहे. त्यात एक सुकलेले झाड आहे. त्या झाडावर एकही पान नाही. अत्यंत भकास वातावरण आहे. तरीही त्या झाडावर एका पक्ष्याचे घरटे बांधले आहे. त्या घरट्यात चोच वासून आकाशाकडे व्याकुळपणे बघणारी तीनचार पिल्ले आहेत. अत्यंत हृदयद्रावक असे हे दृश्य आहे. त्या चित्रात वर दूरवर ठिपक्यासारखी दिसणारी पक्षीण पाण्याच्या ढगाला चोचीत धरून जिवाच्या आकांताने ओढीत घरट्याकडे नेत आहे. एवढ्या या एका कृतीतून त्या पक्षिणीची आपल्या पिल्लांना वाचवण्याची चाललेली जिवापाड धडपड प्रभावीपणे व्यक्त होते. आईची अपार माया या चित्रातून दिसून येते.
कृती (३) खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
कृती (३) | Q 1.1 | Page 58
1) या चित्रांचे स्रोत मला सापडतात.
SOLUTION
कर्तरी प्रयोग.
2) हा संदेश मला पोहोचवता आला.
SOLUTION
कर्मणी प्रयोग.
3) त्यांनी ती सातआठ चित्रं पुन्हा चितारुन दाखवली.
SOLUTION
कर्मणी प्रयोग.
4) मार्गदर्शन संपवून चहा मागवला.
SOLUTION
कर्मणी प्रयोग.
रंगरेषा व्यंगरेषा [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
मला व्यंगचित्रांसाठी अखंडपणे विषय मिळत राहणं हा मूळ प्रेरणेचा भाग सुदैवानं माझ्यासाठी कधी अडचणीचा ठरला नाही. विचारांचा पाठलाग करत क्षितिजापर्यंत जाण्याची माझी सवय हा माझा यातला एक महत्त्वाचा स्रोत आहे. ज्या विचाराचा पाठलाग करतो तो विषय हाती लागत नाहीच; पण त्या वाटेवर काय काय नवीन नवीन सापडत जातं, त्याचीच व्यंगचित्रं होतात.
मी बऱ्याच कार्यक्रमांना जात असतो. तिथेही या चित्रांचे स्रोत मला सापडतात. असले कार्यक्रम हे कच्चा माल पुरवणारे मार्ग आहेत माझे. प्रयत्न केला तर किती चांगले धागे हातात येतात याचं प्रत्यंतर देणारा एक प्रसंग एका अतिशय साध्याशा कार्यक्रमात घडला. प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. तो घेऊन मी टेबलावर ठेवला आणि शांतपणे खुर्चीत बसलो होतो. बोलणारा माझी कुठून कुठून जमवलेली माहिती उपस्थितांना सांगत होता. मला त्यात स्वारस्य नव्हतं. मी टेबलावरच्या नारळाकडे बघत होतो. बघता बघता मला ती नारळाची शेंडी, नारळाचा ताे लहानसा आकार पाचसात वर्षांच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नारळाची शेंडी तिच्या पोनीटेलसारखी बांधलेली! हे स्मरणात घिरट्या घालायला लागलं.
कार्यक्रम संपला. घरी आलो. बाकी सगळी कामं नेहमीसारखी सुरू होती. रात्री दहानंतर मी समोर ड्रॉईंगपेपर घेऊन बसलो होतो. त्यावर चित्र चितारत गेलो ते अशा क्रमानं. देवळासमोर दगडावर आपटून नारळ फोडतात. नारळ फोडणारा तो पुरुषी हात मी चितारला. तो नारळ नसून ते चिमुरड्या मुलीचं डोकं आहे हे सूचित व्हावं म्हणून त्या नारळाला बारीकसा कानातला डूल दाखवला. त्यानं तो नारळ दगडावर आपटण्यासाठी वर उगारलाय आणि त्याचबरोबर मी दुसरा एक हात दाखवलाय ज्या हातानं तो नारळ उगारलेला पुरुषी हात धरून ठेवलाय. स्त्रीभ्रूण हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातून तयार झालं. ज्यांना लिहिता-वाचता येत नाही त्यांच्यापर्यंतही हा संदेश मला पोहोचवता आला. त्या समारंभाला मी गेलो नसतो तर मला हे सुचलं नसतं.
व्यंगचित्राची कल्पना सुचणं ही प्रक्रिया खरंतर मजेदार आहे. आपण मासे पकडणारे लोक पाहतो. काही जाळी टाकून पकडतात, काही गळ टाकून! त्यात एक समूह असाही आहे, की त्यामधील लोक वाहत्या उथळ पाण्यामध्येजाऊन उभे राहतात. न हलता शांतपणे; पण सावध असे ते उभे असतात. एखादा मासा गाफिलपणे त्यांच्या पायाजवळून जातो. तो मासा हातानं झडप घालून ते पकडतात आणि जमिनीवर ठेवतात. ही माणसं मी पाहिलेली आहेत. वाहत्या आयुष्यामध्येजर सावधगिरीनं उभं राहिलं, तर व्यंगचित्राची कल्पना अगदी जवळून जाते. ती तिथून उचलायची आणि कागदावर उतरायची एवढाच भाग असतो. व्यंगचित्राची नेमकी कल्पना मनात ठेवून चित्रं रेखाटताना कधीतरी अचानकपणे आपली एखादी सुप्त इच्छा त्या चित्रात स्वतंत्र रूप घेऊन उतरून येते.
अशी अनेक चित्रं काढता काढता एका क्षणी माझ्या लक्षात आलं, की व्यंगचित्रं ही नि:शब्द भाषा आहे. त्या रेषांना शब्द नाहीत; पण तरीही ती एक प्रभावी भाषा आहे. मला वाटतं तशी ती खरंच भाषेइतकी संवादी आहे का हे अजमावण्यासाठी म्हटलं, घेऊ अनुभव! माझे हे खेळ सुरू झाले. एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का? तर उत्तर आलं ‘येते’. हे मी स्वत: अनुभवलं. व्यंगचित्रातून एखाद्या माणसाबद्दलची भावना व्यक्त करता येते का? तर तीही येते. शब्दांतूनसुद्धा ती व्यक्त होणार नाही इतकी छान करता येते. व्यंगचित्राच्या भाषेला जी मार्मिकता आहे ती शब्दाहून प्रभावी आहे.
अशी जी काव्यात्म चित्रं मी रेखाटली त्यातलं एक ‘आई’विषयी सारं काही सांगण्यासाठीच होतं. आईचं नातं हे सगळ्या जगातलं एकमेव खरं आणि सुंदर नातं आहे. बाकीची नाती ही जोडलेली असतात. माणसांमध्ये मला जर कुठे ईश्वराचा अंश दिसत असेल तर तो आईमध्येदिसतो. हे नातं मला कसं दिसतं हे व्यक्त करण्यासाठी मी जे चित्र काढलेलं होतं, त्यात उन्हाळ्यातला वैशाख वणवा आहे. त्यात एक सुकलेलं झाडपण आहे. एकही पान नसलेल्या त्या झाडाच्या फांदीवर एका पक्ष्यानं घरटं केलेलं आहे. त्या घरट्यात चोच उघडून आकाशाकडे बघणारी तीनचार पिल्लं आहेत आणि त्या पिल्लाची कणसदृश्य आई पार आकाशात गेलीय. दूरवर सापडलेला एक पावसाचा ढग ती चोचीनं घरट्याच्या दिशेनं ओढून आणतेय. आता आई हे नातं मी कितीही शब्द वापरले तरी या चित्रासारखं मला व्यक्त करता येणार नाही. हे व्यक्त झालं असेल तर हा मोठेपणा माझा नाही. ही या माध्यमाची ताकद आहे. मी या चित्राखाली काही लिहीत नाही. हे चित्र आवडल्याचं सांगत अनेक लोक माझ्याकडे येतात. ते का आवडलं हे त्यांना सांगता येत नाही; पण त्यातला आशय त्यांच्यापर्यंत पोहोचताे म्हणूनच ते त्यांना आवडलेलं असतं.
व्यक्त होण्याची गोष्ट खूप पुढे नेत नेत मी माझ्या वडिलांना माझ्या व्यंगचित्रांमधून खूप मनापासून श्रद्धांजली वाहिली. या चित्रांमधल्या पहिल्या चित्रात मी भर पावसात उभा आहे आणि माझ्या डोक्यावर दोन अक्षरं आहेत ‘बाबा’. पाऊस ‘बाबा’ या शब्दाच्या दोन्ही बाजूंनी पडतो आहे. खाली इवलासा मी सुरक्षित आहे. मी त्यात माझं लहानपण दाखवलंय. दुसऱ्या चित्रात आता ते शब्द नाहीयेत; पण तरीदेखील तो पाऊस माझ्या दोन्ही बाजूंनी जातो आहे. मी तिथे उभा आहे तो आत्ताच्या वयाचा- पंचाहत्तरी पूर्ण केलेला आहे. बाबांनी जे काही माझ्यासाठी निर्माण करून ठेवलं आहे ते त्यांच्यामागे आत्तापर्यंत मला खूप मोठा आधार, खूप मोठा आश्रय देत आलं आहे. माझ्या व्यंगचित्रातून मी हेही व्यक्त करू शकलो.
माझ्या व्यंगचित्रांची प्रदर्शनं भरवण्याचे माझे जे जगावेगळे हेतू आहेत, त्यात व्यंगचित्राचा परिचय ‘एक छान भाषा’ म्हणून करून देणं हाही आहे. पुणे, मुंबई, गोवा, दिल्लीपासून महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या शहरांपर्यंत कितीतरी ठिकाणी माझी प्रदर्शनं झाली. या प्रदर्शनांमधला माझा सगळ्यात चांगला अनुभव आहे तो वाईसारख्या छोट्या शहरामध्ये लोकमान्य वाचनालयामध्ये प्रदर्शन भरवलं होतं तेव्हाचा. जुनी कौलारू वास्तू होती ती. उद्घाटन झालं. दुसऱ्या दिवशी मी आणि लता दोघंही खुर्च्या टाकून शांतपणे बसलो होतो. तिथे खाली रस्त्यावर उतरणारा जिना होता. रस्त्यावर एक वीसबावीस जणांची शेतकरी कुटुंबाची ट्रॅक्टरट्रॉली थांबली. तिथे काही दुकानं
होती. मला वाटलं ती मंडळी त्या दुकानांमध्ये आली असतील. मी कुतूहलानं पाहत होतो. मंडळी ट्राॅलीमधून उतरली आणि जिना चढून वर प्रदर्शनाकडे आली. मला बरं वाटलं.
त्यांच्यासोबत सत्तरीच्या आसपासचा कुटुंबप्रमुख होता. पांढऱ्या मिशा, रंग काळाकभिन्न, डोक्याला केवढंतरी मोठं मुंडासं बांधलेलं. नखशिखान्त शेतकरीपण वागवणारा तो आणि त्याच्या घरातली मुलं-नातवंडं प्रदर्शन पाहायला लागली. हा कुटुंबप्रमुख माझ्या प्रत्येक चित्रासमोर उभा राहत होता आणि त्याच्यामागे उभे राहिलेल्या त्याच्या माणसांना अर्थ समजावून सांगत होता. तो काय सांगत होता ते मी शांतपणे ऐकत होतो. तो कुठल्या चित्रासमोर उभा आहे तेही मला दिसत होतं आणि मनाची स्वच्छ पाटी घेऊन आलेल्या या शेतकऱ्यापर्यंत हे चित्र कसं पोहोचतंय हे मी थेट अनुभवत होतो. चित्रं चितारताना माझ्या मनात होतं ते आणि आत्ता त्याच्यापर्यंत पोहोचत होतं ते याच्यात जी तफावत मला जाणवत होती ती तशी का जाणवत होती हे मी मनोमन समजून घेत होतो. हे माझं केवढं तरी मोलाचं शिक्षण होतं, जे मला एखाद्या विद्यापीठातही मिळालं नसतं ते त्या अनोळखी शेतकऱ्यानं त्या दिवशी मला दिलं.
व्यंगचित्रांच्या प्रसिद्धीसाठी प्रारंभीच्या काळात मी केलेली धडपड आठवली, की गंमत वाटते. तेव्हाचा तो काळ मोठा अवघड होता. मासिकं, नियतकालिकं यांना मी सतत चित्रं पाठवायचो आणि ती सतत परत यायची. त्या चित्रांसाठी मी अपार मेहनत केलेली असे, ती स्वीकारली जात नव्हती, त्यांची स्वतंत्र ओळख तयार होत नव्हती या सगळ्यांचा मी बऱ्यापैकी मनस्ताप करून घ्यायचो. नाव नाही म्हणून प्रसिद्धी नाही आणि प्रसिद्धी नाही म्हणून नाव नाही या चक्राच्या तळाशी गोल गोल फिरत होतो. एखादं दुसरं चित्र प्रसिद्ध व्हायचं तर पन्नासएक परत यायची. या काळात तीन संपादकांनी मात्र मला हात दिला. दीनानाथ दलाल हे त्यापैकी एक होते. या श्रेष्ठ चित्रकाराचं ऑिफस मुंबईत केनेडी ब्रीजला होते. तो पत्ता मी त्यांच्याच मासिकावरून उतरून घेतला. त्यांना पोस्टकार्ड टाकलं, मला तुम्हांला भेटायला यायचंय’ असं लिहिलं. मला असं वाटत होतं, की ‘दीपावली’ मध्ये माझी चित्रं प्रकाशित झाली तर बाकीच्या मासिकांतून ती विनातक्रार स्वीकारल जातील. मग मी ‘दीपावली’ साठी खास चित्रं तयार केली. दरम्यान दलालांनी मला भेटीचा दिवस व वेळ कळवली. ठरल्या दिवशी सकाळी जनता एक्स्प्रेसनं मी मुंबईला गेलो.
चर्नी रोडला उतरलो आणि केनेडी ब्रीजला गेलो. दलाल किती वाजता ऑफिसमध्ये येणार आहेत, आलेत का? हे विचारण्यासाठी मी ऑफिसमध्येफोन केला. फोन खुद्द दलालांनी घेतला. ‘नमस्कार, मला दीनानाथ दलालांशी बोलायचंय’ मी म्हणालो. ‘स्पीकींग!’ त्यांचा आवाज इतका स्त्रीच्या आवाजासारखा होता, की दलाल स्वत: बोलत असतील असं मला वाटलंच नाही. मी त्यांना पुन्हा सांगितलं, ‘मला श्रीयुत दीनानाथ दलाल यांच्याशी बोलायचं आहे. मी मंगेश तेंडुलकर.’ ‘स्पीकींग स्पीकींग...’ त्यांनी मंजुळ आवाजात आणखी दोनदा सांगितलं. ‘अहो, मला तुमच्याशी नाही बोलायचं. मला संपादक दीनानाथ दलालांशी बोलायचं आहे. तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही?’ माझा आवाज थोडा वाढला. ते मला म्हणाले, ‘अहो तेंडुलकर, मी दीनानाथ दलाल!’ मी किंचितसा अवघडलोच. म्हटलं, ‘तुम्ही ऑफिसमध्ये आहात ना हे विचारायला मी फोन केला.’ ‘हो, आहे मी. या तुम्ही’, ते म्हणाले आणि मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. पहिल्या मजल्यावर त्यांचं ऑफिस होतं.
‘ये. बस.’ अगदी तोच आवाज. टेबलवर इझेल ठेवून ते काम करत होते. माझ्या मोठ्या बंधूंचा-विजयचा आणि त्यांचा परिचय होता. तोपर्यंत विजय लेखक म्हणून प्रसिद्ध झालेला होता. मी प्रथमच त्यांच्यासमोर गेलो होतो. ‘तू विजयचा कोण?’ दलालांनी विचारलं. ‘कुणीही नाही.’ मी क्षणार्धात सांगून टाकलं. काही क्षण भुवया उंचावून गंभीरपणे त्यांनी माझ्याकडे बघितलं. माझ्याकडे बघत म्हणाले, ‘ठीक आहे! दाखव काय चित्रं काढली आहेस?’ माझी व्यंगचित्रं त्यांना दाखवली. ती पाहून त्यांनी मला त्यांच्या खुर्चीच्या मागे येऊन उभं राहायला सांगितलं. राहिलो. दलालांनी कोऱ्या कागदाचे तुकडे ड्रॉईंगबोर्डवर ठेवले. माझं चित्र शेजारी धरून ब्रशच्या फटकाऱ्यांनी त्यांनी ते पुन्हा त्या कागदाच्या तुकड्यांवर चितारलं. म्हणाले, ‘व्यंगचित्रातला नवा ट्रेंड हा असा आहे.
कमीत कमी रेषा, कमीत कमी तपशील आणि त्यातून जास्तीत जास्त आशय. तोही शब्दांशिवाय! तुझी चित्रं चांगली आहेत; पण तुझी पद्धत जुनी झाली आहे आता. चित्राला एक परस्पेक्टिव्ह असतं. सगळी चित्रं सपाट नाही काढायची. त्याला खोली असायला हवी.’ खोली कशी घ्यायची हेही त्यांनी मला दाखवलं. म्हणाले, ‘मी सांगितलेलं लक्षात ठेव आणि ही चित्रं पुन्हा काढून पाठव.’ औपचारिक शिक्षण म्हणतात ते माझं असं दीनानाथ दलालांकडून झालं. पंधरा-एक मिनिटांत त्यांनी ती सातआठ चित्रं पुन्हा चितारून दाखवली. दलालांनी आपलं महत्त्वाचं मार्गदर्शन संपवून चहा मागवला. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता एके ठिकाणी चुकून मी विजयचा एकेरी उल्लेख केला आणि मीच दचकलो.
माझ्याकडे शांतपणे पाहून ते म्हणाले, ‘तू खोटं बोलतोयस हे तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. कबूल कधी करतोयस त्याची वाट बघत होतो; पण तू असं का म्हणालास? तुझं त्याच्याशी भांडण वगैरे आहे का?’ मी म्हटलं, ‘अजिबात नाही. तो माझा सख्खा भाऊ आहे आणि त्याच्याबद्दल मला खूप आपुलकी आहे; पण त्याच्या खांद्यावर उभं राहून मला मोठं नाही व्हायचं. त्याचा भाऊ म्हणून माझी चित्रं तुम्ही घ्यावीत असं मला वाटलं नाही, म्हणून मी तसं म्हणालो.’ दलाल म्हणाले, ‘मला आवडलं. अशी माणसं क्वचितच सापडतात. तू चित्र तयार करून पाठव. मी घेतो.’ मी पुण्याला परत आलो. दोन दिवसात त्यांना हवी तशी चित्रं तयार केली. पाठवली. पाठवलेली एकूण एक चित्रं ‘दीपावली’ मध्येप्रसिद्ध झालेली पाहून मला अतोनात आनंद वाटला.
रंगरेषा व्यंगरेषा [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]