वनवासी कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

वनवासी कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

आम्ही डोंगरराजाची
पोऱ्हं कळसू आईची
आम्ही उघडी बोडकी
बाळं परवरा माईची.

घेऊ हातावं भाकर
वर भाजीला भोकर
खाऊ खडकावं बसून
देऊ खुशीत ढेकर.

खेळू टेकडी भवती
पळू वाऱ्याच्या संगती
वर पांघरू आभाळ
लोळू पृथ्वीवरती.

आम्ही वाघाच्या लवणाचे
आम्ही वांदार नळीचे
गाव वहाळापल्याड
आम्ही उंबर माळीचे.

बसू सूर्याचं रुसून
पहू चंद्राकं हसून
बोलू वाज तिंकिड्याशी
नाचू घोंगडी नेसून.

डोई आभाळ पेलीत
चालू शिंव्हाच्या चालीत
हिंडू झाडा-कड्यांवरी
बोलू पक्ष्यांच्या बोलीत.

आम्ही सस्याच्या वेगानं
जाऊ डोंगर यंगून
हात लाऊन गंगना
येऊ चांदण्या घेऊन.

Also Read: 
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 

रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

  1. प्रसिद्ध कवी. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकांतून कथा व ललित लेखन. 
  2. निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय. ‘वळीव’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध. 
  3. आदिवासी, त्यांचे डोंगरदऱ्यांतील जीवन, निसर्ग, निसर्गाविषयीचे प्रेम व त्यांमधील अतूट नाते यांचे वर्णन प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. 
  4. वळीव’ या कवितासंग्रहातून प्रस्तुत कविता घेतली आहे.

वनवासी कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post