कंबर बांधून ऊठ घाव झेलाया
महाराष्ट्रावरूनी टाक आेवाळून काया ।
महाराष्ट्र मंदिरापुढती । पाजळे याशीची ज्योती ।
सुवर्ण धरा खालती । निल अंबर भरले वरती
गड पुढे पोवाडे गाती । भूषवी तिला महारथी
तो अरबी सागर लागे जयाचे पाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
ही मायभूमि धीरांची । शासनकर्त्या वीरांची
घामाची आणि श्रमाची । खुरप्याची आणि दोरीची
संतांची, शाहीरांची । त्यागाच्या तलवारीची
स्मरून धुरंधर आता त्या शिवराया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
पहा पर्व पातले अाजचे । संयुक्त महाराष्ट्राचे
साकार स्वप्न करण्याचे । करी कंकण बांधून साचे
पर्वत उलथून यत्नाचे । सांधू या खंड की त्याचे
या सत्यास्तव मैदानि शिंग फुंकाया
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया ।।
धर ध्वजा करी ऐक्याची । मनीषा जी महाराष्ट्राची
पाऊले टाक हिंमतीची । कणखर जणु पोलादाची
घे आण स्वातंत्र्याची । महाराष्ट्रास्तव लढण्याची
उपकार फेडुनी जन्मभूमीचे जाया
Also Read:
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी
रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी
रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण
रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी
रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

अण्णा भाऊ साठे(१९२०-१९६९) : लोकशाहीर, कथाकार, कादंबरीकार, नाटककार.
‘वारणेचा वाघ’, ‘फकिरा’, ‘रूपा’, ‘गुलाम’, ‘चंदन’, ‘मधुरा’, ‘चिखलातील कमळ’, ‘रानगंगा’, ‘माकडीचा माळ’,
‘वैजयंता आवडी’, ‘वैर’, ‘पाझर’, ‘चित्रा’, ‘आग’, ‘अहंकार’, ‘आवडी’, ‘गुऱ्हाळ’ इ. कादंबऱ्या; ‘चिरानगरीची भुतं’, ‘निखारा’, ‘पिसाळलेला माणूस’, ‘फरारी’, ‘कृष्णाकाठच्या कथा’, ‘गजाआड’ इत्यादी कथासंग्रह; ‘इनामदार’, ‘पेंग्याचं लगीन’, ‘सुलतान’ ही नाटके; ‘माझा रशियाचा प्रवास’ हे प्रवासवर्णन प्रसिद्ध.
अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली आहे. महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दाशब्दांतून व्यक्त होते. प्रस्तुत कविता ही ‘कविता व माझा रशियाचा प्रवास’ या पुस्तकातून घेतली आहे.
महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी
Tags:
मराठी कविता