निरोप कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

निरोप कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

बाळ, चाललास रणा
घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनी
तुज करिते औक्षण.

याच विक्रमी बाहूंनी
स्वतंत्रता राखायची,
खांद्यावरी या विसावे
शांति उद्याच्या जगाची.

म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दु:खाचा;
मीहि महाराष्ट्रकन्या
धर्म जाणते वीराचा.

नाही एकहि हुंदका
मुखावाटे काढणार.
मीच लावुनि ठेविली
तुझ्या तलवारीला धार.

अशुभाची साउलीहि
नाही पडणार येथे;
अरे मीहि सांगते ना
 जिजा-लक्षुमींशी नाते.

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ति देईल भवानी,
 शिवरायाचे स्वरूप
आठवावे रणांगणी
धन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन,
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन!
Also Read: 
रसग्रहण : संतवाणी - जैसा वृक्ष नेणे रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : संतवाणी (आ) धरिला पंढरीचा चोर रसग्रहण 9th मराठी

रसग्रहण : या झोपडीत माझ्या रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : मी वाचवतोय रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया कविता 9वी मराठी रसग्रहण

रसग्रहण : निरोप कविता रसग्रहण इयत्ता नववी

रसग्रहण : वनवासी रसग्रहण इयत्ता नववी 

रसग्रहण : आपुले जगणे आपुली ओळख रसग्रहण इयत्ता नववी

निरोप कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
निरोप कविता 9वी मराठी 


  1. प्रसिद्ध कवयित्री. ‘नीहार’, ‘स्वप्नजा’, ‘प्रीतिपथावर’, ‘आकाशवेडी’, ‘श्रावणमेघ’ 
  2. इत्यादी कवितासंग्रह; ‘नवी जाणीव’, ‘रायगडावरील एक रात्र’, ‘स्वप्न’ इत्यादी नाटिका; ‘वाळवंटातील वाट’ ही कादंबरी प्रसिद्ध.
  3. प्रस्तुत कवितेत रणांगणावर जाणाऱ्या आपल्या मुलाविषयीच्या आईच्या अंत:करणातील विविध भावनांचे चित्रण कवयित्रीने कवितेतून केले आहे.

निरोप कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post