या झोपडीत माझ्या कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

या झोपडीत माझ्या कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्वप्राप्त झाली, या झोपडीत माझ्या
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या

पहारे आणि तिजोऱ्या, त्यांतूनि होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या

महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हां जमीन माने, या झोपडीत माझ्या
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या

पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या

या झोपडीत माझ्या कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज-माणिक बंडोजी ठाकूर (१९०९-१९६८) : संतकवी, समाजसुधारक. अंधश्रद्धा, जातिभेद, धर्मभेद यांसारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्लेचढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले. गावागावातून ‘गुरुदेव सेवा मंडळे’ स्थापन केली.

 कार्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला. ‘अनुभवसागर’, ‘भजनावली’, ‘सेवास्वधर्म’, ‘राष्ट्रीय भजनावली’ इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्मसमभाव यांविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो.

 सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख-दु:ख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. लहानशा झोपडीतही शांतिसुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो, याचे वर्णन प्रस्तुत कवितेत केले आहे.

या झोपडीत माझ्या कविता 9वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post