आरशातली स्त्री कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले
आरशातील स्त्रीने मला विचारले, ‘तूच ना ग ती!
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य...!
तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग
ऐक हं...! तू कशी होतीस ते!

पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका
अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू... तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून
ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे,
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात
जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला 
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून 
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी
अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते
रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून

शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय
नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा’
तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली-
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात 
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’


हिरा बनसोडे (१९३९) :

  1. सुप्रसिद्ध कवयित्री. फुले-आंबेडकरी साहित्यचळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री. ‘अस्मितादर्श’, ‘निकाय’, 
  2. ‘सुगावा’, ‘युगवाणी’, ‘समुचित’ इत्यादी नियतकालिकांतून सातत्याने काव्यलेखन. आपल्या काव्यलेखनातून आणि काव्यवाचनातून 
  3. ‘आंबेडकरांची विचारधारा’ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करण्यात हिरा बनसोडे यांची कविता अग्रणी ठरली. त्यांचे ‘पौर्णिमा’, 
  4. ‘फिनिक्स’ व ‘फिर्याद’ हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारून 
  5. न्याय्यहक्कांची, अधिकारांची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यत: लिहिली. समताधिष्ठित समाजरचनेला जन्म देणारी ‘दलित 
  6. स्त्री’ ही त्यांची नायिका आहे, तिचे भावविश्व त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याने त्यांची कविता सामाजिक वास्तव तसेच 

आरशातली स्त्री (कविता वर्ग 12th  )

सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनेही आपल्या कवेत घेते. ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात 
आलेला आहे. त्यांच्या कवितांचे गुजराती, इंग्रजी, फ्रेंच भाषांत अनुवाद झालेले आहेत.
स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना कवयित्रीने या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहज आरशात 
पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येते, की ‘मी ती हीच का?’ आणि मग तिला वाटत राहते किती 

अंतर्बाह्य बदलले मी! चैतन्यमय बाल्य, तेजस्वी तारुण्य-त्यांमधील स्वप्ने, ध्येय कुठल्याकुठे जाऊन आता कशाचेही काहीच न 
वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली कोठून? पूर्वी हवेहवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई अशा छोट्याछोट्या गोष्टींतील 
आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील ‘बालसखी’ नव्या
उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते, हे या कवितेतून समजून घ्यायचे आहे.

आरशातली स्त्री कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

स्वाध्याय वर्ग बारावा मराठी I कविता ११ . आरशातली स्त्री I Aarshatali stri

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post