विंचू चावला भारुड कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ।।धृ.।।
पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।।१।।

मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ।।२।।

ह्या विंचवाला उतारा ।
तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरां ।।३।।

सत्त्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ।।४।।


विंचू चावला रसग्रहण -खालील ओळींचे रसग्रहण करा .

 विंचू चावला वृश्चिक चावला । 
कामक्रोध विंचू चावला । 
तम घाम अंगासी आला ।।धृ .।। 

पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला । 
सर्वांगाचा दाह झाला ।।१ ।। 

मनुष्य इंगळी अति दारुण ।
 मज नांगा मारिला तिनें । 
सर्वांगी वेदना जाण । 
त्या इंगळीची ।।२ ।।

विंचू चावला रसग्रहण

संत एकनाथ महाराज यांनी विंचू चावला ' या भारुडामध्ये दुर्गुणांवर कसा विजय मिळवावा व सत्संगाने काम क्रोधरूपी विंचवाचा दाह कसा शमवावा , याची महत्त्वपूर्ण शिकवण दिली आहे . काम क्रोधरूपी विंचू चावल्यामुळे झालेला दाह कमी करण्याचा नामी उपाय या भारतात नाट्यमयरीत्या संत एकनाथ महाराजांनी विशद केला आहे . 

काम क्रोधाचा विंचू जेव्हा दंश करतो , तेव्हा दुर्गुणांचा घाम अंगाला येतो . तामसवृत्ती उफाळून येते . त्यामुळे जीव व्याकूळ होऊन प्राणांतिक वेदना होतात . सान्या अंगाला दाह होतो ; कारण मनुष्यरूपी इंगळी अतिभयंकर आहे . तिचा डंख तापदायक व वेदनेचे आगर असते . असा उपरोक्त ओळींचा भावार्थ नाट्यमय रीतीने लोककथेच्या बाजाने सार्थपणे व्यक्त होतो .

लोकशिक्षण देणारे ' विचू चावला हे आध्यात्मिक रूपक आहे . या भारुडाची भाषा द्विरुक्तपूर्ण असल्यामुळे आशयाची घनता वाढली आहे . यातून सांसारिक माणसांना नीतीची शिकवण मिळते . षड्विकारांवर सद्गुणांनी मात करा , असा मोलाचा संदेश हे भारूड देते . विंचू , वृश्चिक व इंगळी अशा चढत्या भाजणीचे शब्द विषाचा विखार दाखवतात . तमघाम , दाह , दारुण , वेदना अशा शब्दबंधामुळे डंखाची गती आवेगाने मनात होते ही भारुड रचना विलक्षण नाट्यमय आणि मनाचा ठाव घेणारी ठरली आहे

विंचू चावला भारुड मराठी - [ रसग्रहण स्वाध्याय इयत्ता बारावी ]
विंचू चावला भारुड मराठी

 विंचू चावलासंत एकनाथ (१५३२ ते १५९९)

  1. श्रेष्ठ संतकवी. संत एकनाथ महाराज यांनी ‘चतु:श्लोकी भागवत’ हा पहिला ग्रंथ रचला. ‘रुक्मिणी स्वयंवर’ हे आख्यानकाव्य
  2. लिहिले. ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून 
  3. सातत्याने प्रसार केला. जोहार, गौळणी, आरत्या, अभंग, भारूडे यांसारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. 
  4. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतले.
  5. ‘भारूड’ हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला; संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी 
  6. अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारूडे रचली. त्यामुळे ‘भारूड’ म्हटले की ‘एकनाथ महाराज’ असा ठसा 
विंचू चावला भारुड मराठी - [ रसग्रहण स्वाध्याय इयत्ता बारावी ]
विंचू चावला भारुड

Vinchu Chavala Marathi Kavita 12th 

जनमानसात उमटला. ‘भारूड’ हे ‘अाध्यात्मिक रूपक’ असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी, हा त्यामागील  उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारूडांतून सांसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली.  एकनाथी भारूडांची रचना विलक्षण नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास तीनशे भारूडे रचली. त्यांची काही भारूडे हिंदीतही आहेत.

  • ‘विंचू चावला’ हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे. या भारूडातील ‘विंचू’ हे ‘काम’ आणि
  • ‘क्रोध’ या विकारांचे प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे 
जीवन दूषित होते. कामक्रोधाची बाधा झाली, की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात, तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळेसुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय  म्हणजे कामक्रोधांनी बाधित झाल्यावर सत्त्वगुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारूडांमधून अंधश्रद्धेवर  कोरडे ओढले आहेत. इथे सुद्धा अंगारेधुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल, तर तो सत्त्वगुणांचा  लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा. मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल, असा मोलाचा उपदेश संत 
एकनाथ महाराज यांनी या भारूडातून केला आहे.

विंचू चावला संपूर्ण स्वाध्याय कृति |12th Marathi Yuvakbharti | Maharashtra board new syllabus 2020

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post