रोज मातीत कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गांेदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

फुलं सोन्याची, झेंडू तोडते
बाई तोडते
नाही फुलं ग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला, तोरण बांधते
बाई बांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

ऊस लावते, बेणं दाबते
बाई दाबते
नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते
बाई सांधते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
(सिझर कर म्हणतेय माती)

रोज मातीत कविता स्वाध्याय  [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

कृती (1) Page 9
कवितेतील स्त्री करत असलेली विविध काम
SOLUTION
(१) सरी-वाफ्यात कांदे लावणे
(२) झेंडूची फुले तोडणे
(३) घरादाराला तोरण बांधणे
(४) उसाचे बेणे मातीत दाबणे

संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.

(१) नाही कांदा गं जीव लावते -
(इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.

(२) काळ्या आईला, हिरवे गोंदते -
(अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.

(३) हिरवी होऊन, मागं उरते -
(आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते.

कृती (२) | Q 1 | Page 9

खालील ओळींचा अर्थ लिहा.

सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते

SOLUTION
कष्टकरी शेतकरी स्त्री शेतमळ्यामध्ये खणलेल्या चरात कांद्याची रोपे लावते. ते कांदे नव्हतेच; जणू ती स्वत:चा जीव कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.

रोज मातीत कविता काव्यसौंदर्य.

कृती (३) | Q 1 | Page 9
‘काळ्या आईला, हिरवं गोंदते बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

SOLUTION
'रोज मातीत' या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे हृदय मनोगत आर्त शब्दांत व्यक्त केले आहे.

काळ्याभोर मातीचे शेत हे शेतकरी स्त्रीचे सर्वस्व आहे. शेतातल्या धान्याने शेतकऱ्यांचे जीवन पोसले जाते. म्हणून या काळ्या शिवाराला शेतकरी स्त्री 'आई' असे संबोधते. लेकरांचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा ती शेतीला देते. ती तिची 'काळी आई' आहे. या काळ्या मातीवर स्वत:च्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून हिरवेगार पीक येते. तेव्हा या काळ्या-आईचे आपण पांग फेडले, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. जणू ती गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.

पिकाने फुलून आलेले शिवार म्हणजे धरतीच्या अंगावरचे हिरवे गोंदण अशी हृदय कल्पना कवयित्रींनी केली आहे. स्त्रीसुलभ नितळ, प्रेमळ भावना या ओळीतून कमालीच्या साधेपणाने व्यक्त झाली आहे. शेतकरी स्त्रीच्या मनातील हृदय भाव या ओळींतून समर्पकरीत्या प्रकट झाला आहे.

कृती (३) | Q 2 | Page 9

‘नाही बेणं ग, मन दाबते बाई दाबते कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.

SOLUTION
कवयित्री कल्पना दुधाळ यांनी 'रोज मातीत' या कवितेमध्ये शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन यथायोग्य शब्दांत चित्रित केले आहे.

शेतकरी स्त्री दिनरात शेतामधील अनेक कष्टांची कामे करते. ती जशी वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपे लावते, तशी ती उसाची लागवडही करते. उसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये उसाची छोटी कांडे पेरावी लागतात. हे उसाचे बेणे रुजवणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम असते. भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते. बेणे नव्हे तर ती स्वत:चे मन त्यात दाबते. स्वत:ला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरते. अशा प्रकारे काडी-काडी जोडून ती तिचा संसार सावरते. शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा आहे.

शेतकरी स्त्री जी अहोरात्र शेतात जीव ओतून काम करते, त्याचे वर्णन करताना 'मन दाबणे' हा वाक्यप्रयोग करून शेतकरी स्त्रीचे मनोगत समर्थपणे कवयित्रीने या ओळीत व्यक्त केले आहे. काडी-काडी जोडून संसार सांधणे यातून तिच्या अविरत कष्टाचे यथोचित चित्र साधले आहे.

रोज मातीत कविता रसग्रहण.

कृती (४) | Q 1 | Page 9
खालील ओळींचे रसग्रहण करा.

उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते 
बाई उरते 
खोल विहिरीचं, पाणी शेंदते 
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
 
SOLUTION
आशयसौंदर्य : 'रोज मातीत' या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन यशोचित शब्दांत केले आहे. उपरोक्त ओळींमध्ये शेतात शेतकरी स्त्रीचे नांदणे कसे कष्टमय असते याचे चित्र हृदय शब्दांत केले आहे.

काव्यसौंदर्य : शेतकरी महिला आपल्या संसारासाठी शेतजमिनीत अहोरात्र खपत असते. ती वाफ्याच्या सरीने कांदा लावते. मन दाबून उसांची कांडे जमिनीत पुरते. हे कष्ट भर उन्हात, उन्हाची पर्वा न करता अविरत करीत असते. ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते. पुढचे हिरवे स्वप्न पाहते. सुगीच्या हंगामात जेव्हा तरारलेले हिरवेगार शेत फुलते, तेव्हा जणू या हिरवेपणात तिचे कष्टच उगवून आलेले असतात. खोल विहिरीतून पोहऱ्याने ती पाणी उपसते व पिकांना पाजते. अशा प्रकारे संसार फुलवण्यासाठी शेतकरी स्त्री रोज मातीत नांदत असते.

भाषासौंदर्य : अतिशय साध्या, सोज्ज्वळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरीण आपले मनोगत व्यक्त करते. तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात. तिच्या अभिव्यक्तीसाठी कवयित्रीने या कवितेत लोकगीतांसारखा सैल छंद वापरला आहे. नादयुक्त शब्दकळा हा कवितेचा घाट आहे. त्यातल्या 'हिरवे होऊन मागे उरणे', 'रोज मातीत नांदणे' या प्रतिमा काळीज हेलावून टाकणाऱ्या आहेत. या कवितेत प्रत्ययकारी शब्द रचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यांसमोर साकारत व उलगडत जाते.

रोज मातीत कविता अभिव्यक्ती.

कृती (५) | Q 1 | Page 9
शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.
SOLUTION

'रोज मातीत' या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे हृदयद्रावक चित्रण सार्थ शब्दांत केले आहे.

कष्टकरी शेतकरी महिला शेतातल्या वाफ्यातील सरीत कांदे लावते. जीव ओतून काम करते. काळ्या मातीला हिरव्या गोंदणाने सजवते. सोन्यासारखी झेंडूची फुले तोडून, त्यांची माळ करून घरादाराला तोरण लावते. उसाच्या पिकासाठी उसाची छोटी कांडे मातीत दाबते.

 जणू ती स्वत:चे मनच त्यात दाबते. काड्या-काड्या जमवून आपला संसार सांधते. उन्हातान्हात दिवसभर खपून भविष्यातले हिरवे सुगीचे स्वप्न पाहते. विहिरीचे पाणी शेंदन काढते. अशा प्रकारे अहोरात्र शेतात कष्ट करून शेतकरी स्त्री आपल्या संसारातील साऱ्या माणसांना आनंदी राखण्यासाठी झटत असते. काळ्या आईच्या कुशीत हिरवेगार पिकाचे स्वप्न पाहत मातीतच नांदत असते.

कृती (५) | Q 2 | Page 9
तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
 
SOLUTION
आमच्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या पलीकडे कामगारांची वस्ती आहे. या वस्तीतील काही स्त्रिया सकाळी इमारतीच्या बांधकामात मजुरीसाठी जातात. पहाटे पहाटे आपापल्या खोपटात चुलीवर जेवण करतात. जाळाचा धूर घरभर पसरलेला असतो. त्यातही त्या आपल्या लहानग्या मुलांना जोजवत भाजी-भाकरी करीत असतात. लगबगीने सर्व आवरून पटकुरात भाकरी गुंडाळून नि छोट्यांना कमरेवर घेऊन झपाझपा मजुरीसाठी निघतात.

कष्टकरी स्त्रिया घाईघाईने कामावर मजुरीच्या ठिकाणी पोहोचतात. ठेकेदाराचा आरडाओरडा सहन करीत लहानग्याला झोळीत ठेवतात अन् मग रेतीची घमेली डोईवर घेऊन त्यांची मजुरी सुरू होते. न थकता ओझे उचलून नि शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करून इमानेइतबारे दिवसभर उन्हातान्हात पायऱ्यांवरून चढ-उतार करून आपले काम नेटाने करतात. 

दुपारी थोडा वेळ एकत्र जमून मीठ-भाकर खाऊन तिथल्याच एखादया नळाचे पाणी पितात आणि पुन्हा झटझटून त्यांचे ओझी उचलणे सुरू होते. दिवस सरून गेल्यावर जड पावलांनी घरी परततात. मिळालेल्या रोजगारातून रात्रीच्या जेवणाचे सामान खरेदी करून घरी येतात. पुन्हा त्यांच्या वाट्याला पेटलेली चूल, रडणारे मूल व 'आ'वासलेली भुकेली तोंडे हेच येते. काहीही तक्रार न करता निमूटपणे ही कामगार स्त्री आपल्या संसारासाठी हाडाची काडे करून जगत असते

 रोज मातीत रसग्रहण . खालील ओळींचे रसग्रहण करा . 

उन्हातान्हात , 
रोज मरते बाई मरते हिरवी होऊन , 
मागं उरते बाई उरते खोल विहिरीचं
पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत 
मी ग नांदते बाई नांदते

 रोज मातीत ' या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन यशोचित शब्दांत केले आहे . उपरोक्त ओळींमध्ये शेतात शेतकरी स्त्रीचे नांदणे कसे कष्टमय असते याचे चित्र हृदय शब्दांत केले आहे . 
शेतकरी महिला आपल्या संसारासाठी शेतजमिनींत अहोरात्र खपत असते . ती वाफ्याच्या सरीने कांदा लावते . मन दाबून उसांची कांडे जमिनीत पुरते . हे कष्ट भर उन्हात , उन्हाची पर्वा न करता अविरत करीत असते . ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते . पुढचे हिरवे स्वप्न पाहते . सुगीच्या हंगामात जेव्हा तरारलेले हिरवेगार शेत फुलते , तेव्हा जणू या हिरवेपणात तिचे कटव उगवून आलेले असतात . खोल विहिरीतून पोहऱ्याने ती पाणी उपसते व पिकांना पाजते . अशा प्रकारे संसार फुलवण्यासाठी शेतकरी स्त्रीरोज मातीत नांदत असते . 
अतिशय साध्या , सोज्वळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरीण आपले मनोगत व्यक्त करते . तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात . तिच्या अभिवाक्तीसाठी कवयित्रीने या कवितेत लोकगीतांसारखा सैल उंद वापरला आहे . नादयुक्त शब्दकळा हा कवितेचा घाट आहे . त्यातल्या हिरवे होऊन मागे उरणे , रोज मातीत नादणे या प्रतिमा कालीन हेलावून टाकणाऱ्या आहेत . या कवितेत प्रत्ययकारी शब्द रचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यांसमोर साकारत व उलगडत जाते . end ans 


रोज मातीत - कल्पना दुधाळ (१९७८) 

प्रसिद्ध कवयित्री. ‘सिझर कर म्हणतेय माती’, ‘धग असतेच आसपास’ हे कवितासंग्रह प्रकाशित. ‘सिझर कर म्हणतेय माती’ या  पहिल्या कवितासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘कवी कुसुमाग्रज’ पुरस्कारासह एकूण अठ्ठावीस पुरस्कारांनी व ‘धग असतेच  आसपास’ या कवितासंग्रहास ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

रोज मातीत राब राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे. आपला स्वत:चा जीवच जणू मातीत  रुजवावा इतक्या मन:पूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते, तेव्हा कुठे शेतात गोंदणाच्या नक्षीसारखी  हिरवाई फुलू लागते. 

आपल्या ओढगस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी वा उसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते. हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही, तर  जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून, मर मर मरून, सर्वस्व अर्पण करते, तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते. साध्या सरळ शब्दांतील ही गेय कविता ओळी-ओळींतून पुढे जाताना अंत:स्थ वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते ते अनुभवूया.

सर्व प्रश्न उत्तर बघणं साठी या लिंक वर क्लिक करा  Click Now

रोज मातीत कविता 12वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

अनुक्रमणिका  / INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: वेगवशता Click Now
02: रोज मातीत Click Now
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव Click Now
04: रे थांब जरा आषाढघना Click Now
05: वीरांना सलामी Click Now
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Click Now
06: रंग माझा वेगळा Click Now
07: विंचू चावला Click Now
08: रेशीमबंध Click Now
09: समुद्र कोंडून पडलाय Click Now
10: दंतकथा Click Now
11: आरशातली स्त्री Click Now
12: रंगरेषा व्यंगरेषा Click Now
* जयपूर फूटचे जनक Click Now

1 Comments

Thanks for Comment

  1. रसग्रहण हे अत्यंत सुंदर पद्यते स्पष्ट केले आहे जणू आपण तिथे स्वतः आहोत असे वाटते

    ReplyDelete
Previous Post Next Post