समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळीं : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे
पाय, बसचीं चाकं.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.
त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी.
समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.
समुद्र कोंडून पडलाय कविता
वसंत आबाजी डहाके (१९४२) :
- सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, संपादक व चित्रकार. वाङ्मयीन कारकीर्द काव्यलेखनापासून सुरू. ‘योगभ्रष्ट’,
- ‘शुभवर्तमान’, ‘शुन:शेप’, ‘चित्रलिपी’ हे कवितासंग्रह, ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या, ‘यात्रा-अंतर्यात्रा’ हे
- चिंतनात्मक ललितलेखन असे साहित्य प्रकाशित. भोवतीच्या समाजव्यवस्थेने मानवी जगण्याला ज्या पातळीवर आणून सोडले आहे,
- त्याबद्दल कवी अस्वस्थ आहे. या युगातील मानवी दु:ख, एकाकीपणा, जीवनातील अस्थिरता, दहशत, सर्वव्यापी भय आणि पराधीनता
- या साऱ्यांचे चित्रण समृद्ध आणि समर्पक प्रतिमांचा वापर असलेल्या भाषेत केलेले आहे. त्यांची भाषा आशयाचे अंत:स्तर उलगडून
- दाखवणारी आहे, निसर्गातील प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्णवापर करणारी आहे. ‘शालेय मराठी शब्दकोश’, ‘संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश’
समुद्र कोंडून पडलाय photos |
समुद्र कोंडून पडलाय कविता
आणि ‘वाङ्मयीन संज्ञा-संकल्पनाकोश’ यांचे संपादनही केले आहे. त्यांचा ‘चित्रलिपी’ हा काव्यसंग्रह ‘साहित्य अकादमी पुरस्कारा’ने
सन्मानित झाला आहे. तसेच ‘जनस्थान पुरस्कार’ आणि उत्कृष्ट साहित्यनिर्मितीचा ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’ आदि पुरस्कारांनीही त्यांना
सन्मानित केले आहे.
समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. यादृष्टीने या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. समुद्रासारखे
अथांग जीवन जेव्हा शहरांच्या, महानगरांच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने या कवितेतून व्यक्त केली आहे.
बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतींमध्ये बालपण आक्रसून गेले आहे, तसेच वाहनांसोबत रस्त्यांवर अथवा रेल्वेस्टेशनवरच्या
एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो. मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात बकाल
होत जाणारे बाल्य कवीला अधिकच व्यथित करते.
वर्ग १२वा नविन अभ्यासक्रम मराठी कविता ९ . समुद्र कोंडून पडलाय साध्याय
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: वेगवशता | Click Now |
02: रोज मातीत | Click Now |
03: आयुष्य... आनंदाचा उत्सव | Click Now |
04: रे थांब जरा आषाढघना | Click Now |
05: वीरांना सलामी | Click Now |
* आत्मविश्वासासारखी शक्ती नाही | Click Now |
06: रंग माझा वेगळा | Click Now |
07: विंचू चावला | Click Now |
08: रेशीमबंध | Click Now |
09: समुद्र कोंडून पडलाय | Click Now |
10: दंतकथा | Click Now |
11: आरशातली स्त्री | Click Now |
12: रंगरेषा व्यंगरेषा | Click Now |
* जयपूर फूटचे जनक | Click Now |