अण्णा भाऊंची भेट स्वाध्याय इयत्ता आठवी | Anna Bhaunchi Bhet Swadhyay 8th
प्र. १. नातेसंबंध लिहा.
(अ) विठ्ठल उमप - भिकाजी तुपसौंदर
Solution:
मित्र- मित्र.
(आ) जयवंता बाय- अण्णा भाऊ साठे
Solution:
पत्नी पती.
(इ) अण्णा भाऊ- गॉर्की
Solution:
लेखक- गुरु, आदर्श,
प्र. २. आकृत्या पूर्ण करा.
(अ) अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तिमत्त्व विशेष
Solution:
1) मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून आणि एका दांडीच्या जागी धागा बांधलेला तुटका चष्मा लावून लिहीत बसलेले अण्णा.
2) जेव्हा जेव्हा उमप अण्णांना भेटायला जात तेव्हा तेव्हा अण्णा लिहीत बसलेले दिसत.
(आ) झोपडीतील वास्तव
Solution:
प्र. ३. एका शब्दात उत्तरे लिहून चौकट पूर्ण करा.
अ) अण्णा भाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण
Solution:
चिरागनगर
(आ) विठ्ठल उमप यांच्यासमोर अण्णा भाऊंना मिळालेले कथेचे मानधन
Solution:
ट्रान्झिस्टर
(इ) अण्णांच्या कादंबन्या अनुवादित झाले ते शहर .
Solution:
मॉस्को
प्र. ४. उत्तरे लिहा.
(अ) अण्णा भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दांत करा.
Solution:
ऐषआरामात राहता येणे शक्य असूनही अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीत राहत. त्यांची झोपडी गळकीच होती, झोपडीतच डबकी होती. मोडकी खुर्ची, मोडके टेबल एवढेच फर्निचर त्यांच्या झोपडीत होते. एक तांब्या, जर्मनचे एक ताट. एकच डेचकी एवढीच भांडीकुंडी होती. एक लेंगा, एक सदरा एवढेच कपडे. चुलीत लाकडे होती. पण तीही अर्थी जळलेली. कोणी पाहुणा आल्यास तिथल्या तिथे वावरताना घालण्यासाठी त्यांच्याकडे एक मळके बनियन होते. अण्णा महान लेखक होते. त्यांच्या कथा-कादंबऱ्या गाजत होत्या. ते सतत लिहीत बसलेले दिसत. लिहिताना लागणारा चष्माही गोडका होता. अशा दैन्याच्या अवस्थेत अण्णा राहत होते.
(आ) अण्णा भाऊंसाठी असलेल्या सुदिनाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
Solution:
अण्णाभाऊ साठे हे स्वतः लोकप्रिय शाहीर व गोठे लेखक होते. ते आपल्या साहित्यातून दीनदलितांची हलाखी त्यांचे देन्य, दारिद्य मांडत होते. त्याच वेळी त्यांना एक नवीन, क्रांतिकारक कलावंत विठ्ठल उमपाच्या रूपात उदयाला येत असलेला आढळला. विठ्ठलरावांच्या अनेक रचना त्यांनी आकाशवाणीवरून एकल्या होत्या. त्यांचा दुल्द पहाडी आवाज, त्यांची वर्तणूक त्यांच्या आवाजातला गोडवा हे सर्व त्यांनी विठ्ठलरावांच्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांतून अनुभवले होते. दीनदलितांच्या उद्धाराच्या कार्याला उमप पुढे नेऊ शकणारे होते. म्हणून त्यांना भेटण्याची अण्णांना ओढ लागली होती. तो भेटीचा दिवस प्रत्यक्षात आला. म्हणून अण्णांच्या दृष्टीने तो सुदिन होता.
(इ) पाठाच्या आधारे विठ्ठल उमप यांचे शब्दचित्र रेखाटा.
Solution:
उमप हे प्रसिद्ध शाहीर व लोककलावंत होते. त्यांच्या मनात गरिबांविषयी, दीनदुबळ्यांविषयी अमाप करुणा होती. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावान अनुयायी होते. त्यामुळेच त्यांच्यासारखीच साहित्यिक प्रकृती असलेले अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर होता अण्णांना भेटण्याची त्यांना तीव्र ओढ लागली होती. म्हणूनच ते अण्णांकडे गेले तेव्हा झोपडपट्टीची अवस्था पाहून त्यांना तिटकारा, किळस वाटली नाही. अण्णांच्या कलेचे मोठेपण ते ओळखत होत. अशा मोठ्या कलावंताला लोक अत्यल्प मानधन देतात याची उमपांना खंत वाटत असे.
(ई) प्रस्तुत पाठात विठ्ठल उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले, ते लिहा.
Solution:
विठ्ठल उमप यांनी अत्यंत जिव्हाळ्याने अण्णाभाऊ साठे यांचे शब्दचित्र रेखाटले आहे. अण्णा हे खरोखरच महान लेखक होते. दीनदुबळ्यांविषयी त्यांना खरोखरीचा कळवळा होता. त्यांच्या व्यथा-वेदना, सुखदुःखे साहित्यातून मांडावीत, असे अण्णांना वाटे. मात्र हे साहित्य गरिबांची वास्तव स्थिती दाखवून देणारे असायला हवे. वास्तव स्थिती दाखवायची तर ती स्वतःला माहीत हवी. म्हणूनच गरिबीचा अनुभव घेण्यासाठी झोपडीत राहत.
साहित्यिकाने लोकांमध्ये मिसळले पाहिजे. त्यांच्याबरोबर जगले पाहिजे, तरच लोकांची दु:खे, त्यांच्या अडीअडचणी समजतील. लोकांच्या जीवनाचा परिचय नसेल. तयांच्यावर लिहिलेले साहित्य कृत्रिम बनेल. खोटे बनेल. अण्णाभाऊंना अस्सल साहित्य निर्माण करायचे होते. साहित्यिक असाच असला पाहिजे.
खेळूया शब्दांशी.
खालील वाक्यांत विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) जुई रेहाना जॉर्ज सहलीला निघाले
Solution:
जुई, रेहाना, जॉर्ज सहलीला निघाले.
(२) अबद केवढा हा साप
Solution:
अबब! केवढा हा साप!
(३) आई म्हणाली सर्वांनी अभ्यासाला बसा
Solution:
आई म्हणाली, "सर्वांनी अभ्यासाला बसा."
(४) आपला सामना किती वाजता आहे
Solution:
आपला सामना किती वाजता आहे?
आपला सामना किती वाजता आहे?
(५) उदया किंवा परवा मी गावी जाईन उत्तरः उदया किंवा परवा मी गावी जाईन.
Solution:
आपण समजून घेऊया कर्मणी प्रयोग
पुढील वाक्यांतील प्रयोग ओळखा.
(१) त्याने मागे वळून बघितले.
Solution:
भावे प्रयोग
(२) विज्ञानाने माणसाला दृष्टी दिली.
Solution:
कर्मणी प्रयोग
(३) तो नेहमी नवे संकल्प करतो.
Solution:
कर्तरी प्रयोग
कर्तरी, कर्मणी व भावे या प्रयोगांची प्रत्येकी पाच-पाच वाक्ये तयार करा.
Solution:
कर्तरी प्रयोगः
(i) मनाली अभ्यास करते.
(ii) अथर्व व्यायाम करतो.
(iii) काल मावशी बाजारात गेली.
(iv) मी दररोज थोडा वेळ खेळतो.
(v) आई देवळात जाते.
कर्मणी प्रयोग:
(ii) राजूने काम केले.
(i) मनालीने अभ्यास केला.
(iv) स्वातीने पुस्तक मागितले.
(v) मेरूने बेल ओताला जोडला.
(ii) तुषारने पेढा खाल्ला.
भावे प्रयोगः
(i) रामाने रावणारा मारिले.
(ii) शिक्षकाने विदयार्थ्याला शिकवले.
(iii) राजूने माकडाला पकडले.
(iv) मितालीने वहीवर लिहिले,
(v) पोलिसाने चाराला पकडले
अण्णा भाऊंची भेट स्वाध्याय इयत्ता आठवी | Anna Bhaunchi Bhet Swadhyay
विठ्ठल उमप (१९३१-२०१०) : प्रसिद्ध लोकशाहीर, लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्य र्ते. र्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या विचारांचे निष्ठावंत पुरस्कर्ते. ्कर्तेत्यांच्यां या नावावर १००० हून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी यां दहा चित्रपटांमध्ही ये
काम केले आहे. पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, कवने, लावणी, तुंबडी, बोबडी, धनगर गीते, नंदीबैल, वासुदेव,
डोंबारी, पोतराज असे अस्सल मराठमोळे कलाप्रकार तसेच कव्वाली आणि गझल गायन या लोककलेच्या सर्वच र्व प्रकारांत त्यांनी यां
लीलया संचार केला. त्यांचयां े ‘फू बाई फू’ हे आत्मचरित्र; ‘अबक, दुबक, तिबक’, ‘अरे संसार संसार’, ‘खंडोबाचं लगीन’, ‘जांभूळ
आख्यान’, ‘दार उघड बया दार उघड’ या कलाकृती; ‘उमाळा’ हा गझलसंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
१९८३ साली
आयर्लंड यर्लं यथे े झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत ्पर्धे त्यांनी यां भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही
मिळवून दिले आहे. त्यांना यां १९९६ साली महाराष्ट्रशासनाचा ‘राज्य सांस्कृतिक पुरस्कार’ तसेच २००१ साली ‘दलित मित्र पुरस्कार’
या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
प्रस्तुत ्तु पाठात शाहीर उमप यांनी प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तिचित्र रेखाटले
आहे. सुमारे ३५ कादंबऱ्या, अनेक कथा, लोकनाट्य यांसारखे विपुल लेखन करणारे अण्णा भाऊ साठे हे एक अत्त यं झंझावाती
व्यक्तिमत्त्व होते. सुखवस्तू जीवन जगणे शक्य असूनही त्यांनी यां दीनदुबळ्यांच््यां या जगातच कायम वास्तव्य केले आणि त्या जगाचे
प्रखर वास्तव आपल्या साहित्यातून मांडले. त्यांच्यां या मनातील गोरगरिबाविषय ं ीच्याव्यापक सहानुभूतीचा आणि उगवत्याकलाकारांना
प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा परिचय या पाठातून आपल्याला होतो. प्रस्तुत पाठ हा ‘फू ्तु बाई फू’ या आत्मचरित्रातून घेतला आहे
अण्णा भाऊंची भेट स्वाध्याय इयत्ता ८ वी मराठी बालभारती
माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत
राहिले. ते अण्णा भाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा
अण्णा भाऊ साठे यांनी मला ‘‘चिरागनगरात येऊन भेटा’’,
असा भिकाजी तुपसौंदर या माझ्या मित्राकडे निरोप
पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसानं
मला भेटायला बोलावलं म्हणजे, काहीतरी शाहिरी कार्यक्रम
असावा. दुसऱ्या सायंकाळी चारच्या सुमारास
चिरागनगरीची, खाचखळग्यांची ओबडधोबड वाट तुडवत,
अण्णांचं घर विचारत विचारत एका झोपड्यापाशी आलो.
त्या झोपड्याच्या दारात वलानीला बाळवती सुकत घालत
असलेल्या बाईला ‘‘अण्णा भाऊ साठेंचं घर कोणतं?’’
म्हणून विचारलं.
ती म्हणाली, ‘‘ही बगा, डाव्या अंगानं आसंच म्होरं
जावा, थितं च्यावाल्याचं हाटील हाय, आंगं तेच्याच
म्होरल्या आंगाला इचारा. थितंच जयवंताबाय ऱ्हातीया.’’
मी म्हणालो, ‘‘आहो ताई, मी अण्णा भाऊ साठेंचं घर
विचारतोय.’’
ती म्हणाली, ‘‘आवं, मग मी तेच की सांगतीया.
आवं, जयवंता बाय हायना, ती अण्णांची मालकीण हाय.
जावा कडंकडंनं, चिरागनगरातली ही वाट सदान्कदा
चिखलापान्यात लोळत पडलिया-कडंकडंनंच जावा.’’
मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलाजवळ गेलो.
चहावाल्याला विचारलं, ‘‘अण्णा भाऊ साठेंचं घर
कोणतं?’’ ‘‘वो क्या, वो पांचवा झोपडा है ना, वहांच
अण्णा रहेता है ।’’ त्यानं दुरून घर दाखवलं. मी झोपड्याच्या
दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णा भाऊंना हाक
मारली. साडेचार फूट उंचीची माझ्यासारखीच काळीसावळी
मूर्ती घामेजलेल्या अंगानंच बाहेर आली. अण्णा भाऊंना मी
प्रथमच पाहत होतो.
त्यांनी मला ओळखलं. ‘‘तुम्ही
विठ्ठल उमप शाहीर ना?’’ मी ‘‘होय’’ म्हणालो. ‘‘या’’
असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं.
अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितलं.
अण्णांनी आपलं मळकं गंजीफ्राक (बनियन) घातलं आणि
आम्ही बाहेर आलो. मला अण्णा भाऊंचं घर दाखवलं
त्याच चहावाल्याच्याहॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथेच
त्यांनी ‘‘शाहीर, तुम्ही केव्हापासून गाता?’’ वगैरे चौकशी
केली. मी मोकळेपणाने; पण लाजतबुजत सारं काही सांगून
टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला.
अण्णा म्हणाले, ‘‘तुम्ही फार चांगलं गाता, तुमच्या रचना
आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी
आवाजाने मला मोहून टाकलं. तुमच्या वागणुकीची,
वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. तुमच्यामधला
आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलाय विठ्ठलराव.
मला रहावेच ना. तुम्हांला केव्हा भेटेन असं सारखं वाटत
होतं. तो सुदिन आज उगवला.’’
अण्णा भाऊंची व माझी पहिली भेट १९६३ वा ६४
सालात झाली असावी.
‘‘अण्णा भाऊ, आपण थोर साहित्यिक आहात,
आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. यापूर्वी मी आपणाला
पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो.’’ असं
म्हणताच अण्णा हसले. ‘‘आता आपली गट्टी जमली.
माझ्याकडे येत चला, विसरू नका.’’
एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ
केलं. जणूकाही फार वर्षांची आमची ओळख आहे, अशाच
पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं, वागणं चाललं होतं.
पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो.
अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो, तिसऱ्या
दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर
तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका
चश्मा डोळ्याला लावून अण्णा लिहीत होते. जेव्हा जेव्हा
मी जाई तेव्हा ते लिहीतच असत. पाचेक मिनिटं मी आतल्या
एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं
होतं. चुलीजवळ साठेवहिनी गालाला हात लावून विचारमग्न
बसलेल्या होत्या. त्यांच्याजवळच एक तांब्या, एकच
जरमनचं ताट, एक डेचकी असा हा संसार तोंड वासून
पडलेला.
चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं होती.
अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा; लेंगा-हँगरला
लोंबकळत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो
गॉर्कीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं,
की अण्णा गॉर्कीला गुरू मानतात, तो त्यांचा आदर्श आहे
वगैरे. हे दृश्य पाहत असताना, एकाएकी मजकडे अण्णांनी
पाहिलं. ‘केव्हा आलात’ विचारलं. ‘नुकताच आलो’ असं
मी सांगितलं.
मी चिरागनगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत.
अण्णांना माझ्याविना करमत नसे व मलाही गमत नसे.
हळूहळू आमचा घरोबा वाढला.
एकदा अण्णांना विचारून त्यांची वही चाळली, त्या
ऐंशी पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठलीही ओळ
अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. एकदा कुठले दोन
प्रकाशक आले, त्यांनी अण्णांच्या ऐंशी पानी दोन वह्या
घेतल्या. माझ्यासमक्ष एक ट्रान्झिस्टर अण्णाला देऊन ‘बरं
अण्णा येतो’ असं म्हणत निघून गेले. अण्णांच्या कथेचं
मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर! मी विचार करतच राहिलो.
कधी कधी अण्णाही माझ्या घरी येत. असेच एकदा
माझ्या घरी अण्णा जेवायला आले होते. जेवण उरकल्यावर
आम्ही गप्पा करत होतो. माझ्या पत्नीला म्हणाले, ‘‘बाय,
मी जर जगलो वाचलोच तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला
घेऊन जाईन.’’ अण्णांचं बोलणं मध्येच थांबवून मी
म्हणालो, ‘‘अण्णा, मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्यांचं
तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असं मी ऐकलंय.’’ अण्णा
‘‘होय’’ म्हणाले.
‘‘अण्णा, मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्यांच्या
अनुवादांचे अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही
म्हणतात. तुम्ही ते मानधन काही करून मिळवा. आलिशान
बंगला बांधा. त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम,
पुस्तकांची कपाटं-सगळं सगळं थाटामाटाचं करता येईल
आणि अण्णा, तुम्हांला लिहायला सुरेख टेबल, त्यावर
टेबललॅम्प, लिहायला उत्तम लेखण्या, असा सरंजाम
असल्यावर तुम्ही जे लिहिता त्याहूनही तुमचंलिखाण सरस
होईल.’’
अण्णा हसत हसतच म्हणाले, ‘‘विठ्ठला, बंगला,
मोटर, बागबगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी
वेगळी खोली, खोलीत फुलदाणी, टेबल, आरामखुर्ची या
सर्वसाधनांचा मला मोह नाही.
अरे, झोपड्यात दीनदलितांची
दु:खं मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची
पोटतिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता
मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक
अक्षरही सुचणार नाही. बंगल्यात ओढूनताणून काल्पनिक
लिखाण होईल, झोपडीत उपाशी पोटं कशी जगतात,
पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी
भगुलं, परात कशी लावली जाते, थंडीच्या महिन्यांत
दीनदुबळ्यांना थंडीत कुडकुडत बसावं लागतं, इथं दु:खाला
झेलत जगणारी माणसे-त्यांची पालं-त्यांच्या हाणामाऱ्या,
विठ्ठल, काय सांगू-अरे, वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या
दुबळ्या जगाचंसत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता
येणार नाही. माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे.
त्या संपत्तीनं मी बिघडून जाईन, गरिबीला विसरून जाईन,
सत्य लिखाणाला पारखा होईन, म्हणून मला ते मानधन
नको.’’