नव्या युगाचे गाणे स्वाध्याय इयत्ता आठवी | Navya yugache gane swadhyay

नव्या युगाचे गाणे स्वाध्याय इयत्ता आठवी | Navya yugache gane swadhyay

नव्या युगाचे गाणे स्वाध्याय इयत्ता आठवी | Navya yugache gane swadhyay

प्रश्न १ ला : हे केव्हा घडेल ते लिहा. 

(अ) दिव्य क्रांती
उत्तर
 विज्ञानाचा प्रकाश आल्यावर म्हणजेच विज्ञान विषयक नवनवीन शोध लागल्यावर, 

(आ) शून्यामधून विश्व उभारेल
उत्तर
 विज्ञानाच्या नवयुगाची सकाळ झाल्यावर

(इ) दुबळेपणाचा शेवट
उत्तर
 अंत:करणात नवीन चेतना निर्माण झाल्यावर

प्रश्न २ रा : खालील चौकटीतील घटनांचा पद्य पाठाआधारे योग्य क्रम लावा. 

उत्तर
  • विज्ञानाचा प्रकाश आला.
  •  क्रांती घडली.
  • हृदयातील अशांततेचा वणवा विझला.
  • उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्ग दिसला.
  • नैराश्य नष्ट झाले.

च्या ओळी शोधा. 

(अ) माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो.
उत्तर
 शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य

(आ) माणसाच्या अंगात जोश आणि नवीन आशा निर्माण होतात. 
उत्तर 
नवी चेतना अंतरि स्फुरली दुबळेपण गेले


प्रश्न ४ था : तक्ता पूर्ण करा.     

कवीला नको असणाऱ्या गोष्टी विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी
खिन्नता/दीनतादिव्यक्रांती
दुबळेपणामनामध्ये जोश
नैराश्य नवीन आशा 
अशांतता नवी चेतना 


प्रश्न ५ वा : तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. 

(अ) ‘नबसूर्य पहा उगवतो‘, ‘संघर्ष पहा बहरतो‘ या शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करा,
उत्तर 
  नवीन सूर्य उगवतो म्हणजेच मनात नवीन आशा निर्माण होतात. मनात नव चेतना निर्माण होते. अशांतता, दुबळेपण,नैराश्य नाहीसे होते. एखादे काम पूर्ण करण्यासाठी माणूस संघर्ष करतो आणि त्या संघर्षातून त्याच्या हातून काहीतरी चांगले महान कार्य घडते. उदा. एडिसन, एडिसनच्या मनात विज्ञानाचा नवीन सूर्योदय झाला. त्याने त्याचे विविध प्रयोग करण्यासाठी खूप संघर्ष केला. शेवटी जगाला उजळून टाकणा-या दिव्याचा शोध लावून एडिसनने सगळे जग उजळून टाकले.

(आ) कवीनेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद स्पष्ट करा.
उत्तर 
  कवी म्हणतात, विज्ञानाने दिव्य क्रांती घडते. त्यामुळे हृदयातील अशांतता, निराश्य, दुबळेपण नाहीसे होवून माणूस नव्या आशेने, चेतनेने, जिद्दीने कामाला लागतो. स्वतःचे काम करण्यासाठी संघर्ष करतो आणि त्यातूनच उत्कर्ष म्हणजेच प्रगती होते. 

  खेळूया शब्दाशी.   

(अ) कवीतेतील यमक जुळणा-या शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.
उत्तर
दिव्य – भव्य,
गेले  – आले,
ज्वाला – माला,
चित्ती – पुढती. याप्रमाणे…

(आ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा.
उत्तर
उजेड  = प्रकाश
तेज  =  प्रभा
रस्ता = मार्ग
उत्साह = चेतना


नव्या युगाचे गाणे इयत्ता आठवी स्वाध्याय | Navya Yugache Gane Class Eight   

वि. भा. नेमाडे (१९२०-२०१६) : कवी, लेखक. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून बदलत्या काळातील मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य आढळून येते. अतिशय वेगाने घडणाऱ्या वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारण्याची जिद‌द् मानवामध्ये निर्माण होत आहे, मानवी जीवनातील दैन्य दूर होत आहे, नव्या प्रगतीच्या आशा पल्लवीत होत आहेत, हे या कवितेतून कवीने स्पष्ट केले आहे. प्रस्तुत कविता ही ‘किशोर’, जानवेारी १९९८ या मासिकातून घेतली.


नव्या युगाचे गाणे( कविता ) मराठी बालभारती इयत्ता आठवी |  Navya yugache gane marathi balbharti aathvi.  


अणूरेणूतुनि शब्द प्रगटति... ‘चला चला पुढती’
विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती
नवयुग आले प्रभा तयाची पहा दिसत दिव्य
शून्यामधुनी विश्व उभारू जिद्द असे भव्य
हृदयांतरिच्या अशांततेचा वणवा झणि विझला
उत्कर्षाचा अन् प्रगतीचा मार्गनवा दिसला
नवी चेतना अंतरि स्फुरली दुबळेपण गेले
नैराश्याच्या होळीमधुनी तेज नवे आले
मानवतेच्या मार्गावरती उठती जरि ज्वाला
अमरत्वाची फुले वेचुनी गुंफूया माला
 नको खिन्नता... नको दीनता
 नवसूर्य पहा उगवतो
उत्कर्ष पहा झळकतो
संघर्ष पहा बहरतो
नसानसातुन जोश उसळतो नव आशा चित्ती
अणूरेणूतुनि शब्द प्रगटति... ‘चला चला पुढती’

navya yugache gane marathi swadhyay |  नव्या युगाचे गाणे स्वाध्याय  


Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
१. भारत देश महान (गीत)
२. माझ्या देशावर माझे प्रेम आह
३. लाखाच्या...कोटीच्या गप्प
४. नव्या युगाचे गाणे (कविता)
५. सुरांची जादूगिरी
६. असा रंगारी श्रावण (कविता)
७. अण्णा भाऊंची भेट
८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९. विद्याप्रशंसा (कविता)
१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
१२. गोधडी (कविता)
१३. पाड्यावरचा चहा
१४. फुलपाखर
१५. आळाशी (कविता)
१६. चोच आणि चारा
१७. अन्नजाल (कविता)
१८. जलदिंडी
१९. गे मायभू (कविता)
२०. शब्दकोश (स्थूलवाचन)
२१. संतवाणी

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post