गोधडी स्वाध्याय इयत्ता आठवी | Godhadi swadhyay iyatta aathavi

गोधडी मराठी स्वाध्याय | Godhadi swadhyay

गोधडी स्वाध्याय इयत्ता आठवी | Godhadi swadhyay iyatta aathavi

प्र. २. कवितेच्या आधारे आईची वैशिष्ट्ये लिहा.  

Solution:
(अ) कवितेतील आई ही खूप मायाळू आणि भाऊक आहे.
(आ) कवितेतील आई आठवणींना णीं खूप महत्त्व देते.
(इ) कवितेतील आई बस्तूंमध्ये माणसांना अनुभवते.
(ई) कवितेतील आईची गोधडी सोबत भावनिक बंध जोडलेले आहेत.

प्र. ३. तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूशी जुळलेलेतुमचे भावनिक नातेतुमच्या शब्दांत व्यक्त करा. 

Solution:
 माझ्या घरात माझा एक जुना व साधा मोबाईल आहे. आता माझ्याकडे स्मार्ट मोबाईल आहे, पण तरीही मला कधीकधी माझा जुना मोबाईल हातात घ्यावा वाटतो. स्मार्ट मोबाईल येण्यापूर्वी साध्या मोबाईलने मला खूप मदत केली असून त्याने माझ्या प्रत्येक सूख दुःखात माझी साथ दिली. संकटात माझा दोस्त झाला. म्हणून मी माझ्या जुन्या मोबाईलला विसरू शकत नाही. काही वस्तूंसोबत आपले भावनिक बंध जोडलेले असतात तसाच हा माझा मोबाईल माझ्या क्षणांचा साक्षीदार आहे.

प्रश्न ४ था : आईविषयीच्या भावना व्यक्त करणारे कवितेतील शब्द/शब्दसमूह लिह  

Solution:
(१) मायेला मिळणारी ऊब.
(२) आईने दटावून बसवलेल्या चिंध्या.
(३) स्मृतीच्या सुईने शिवलेल

प्रश्न ५ वा : खालील ओळींती ळीं ल भाव स्पष्ट करा. 

(अ) गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते.
Solution:
गोधडीला आईच्या फाटक्या लुगड्याचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते. जेव्हा ही गोधडी अंगावर पांघरून आपण झोपतो, तेव्हा आईचा आणि बापाचा प्रेमळ हात आपल्या अंगावर असल्याची भावना मनात निर्माण होते आणि जसे त्यांच्या मायेचे छत आपल्या डोक्यावर असते तसेच गोधडीतील मायबापाच्या कपड्याचे मायेचे अस्तर म्हणजेच एक प्रकारचे मायेचे आवरण आपल्या अवतीभोवती असते. जणू काय तो त्यांचा आशीर्वादच असतो

(आ) 'गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब.'
Solution:
गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका. त्यामध्ये आईचे फाटके लुगडे, बापाचे फाटके धोतर आणि विशेष म्हणजे बापाच्या शर्टाच्या कोपरीच्या बाह्या असतात आणि त्या आपल्याला जणू काय आशीर्वादच देत असतात. गोधडीतील चिंधी अन् चिंधी ही मायच्या अन् बापाच्या आठवणी असतात. म्हणून गोधडी ही फक्त चिंध्यांचा बोचका नसून तिच्यात मायेची उब असते. हजारो रुपयांच्या महाग दुलईत देखील फक्त थंडी पळविण्याची ताकद असते पण खरी मायेची ऊब ही या गोधडीतच मिळते.

लिहिते होऊया :  

'गोधडीचे आत्मकथन' या विषयावर दहा पंधरा ओळी निबंध लिहा.
Solution:
नमस्कार, बालमित्र आणि मैत्रिणींनो णीं . मी गोधडी. ओळखलात का मला ? याच गोधडीत तुम्ही लहानाचे मोठे झालात, छे पण तुम्हाला आता कदाचित माझी आठवणही नसेल. तुम्ही लहान असताना तुमची आई माझा उपयोग करत असेल. आता तुमच्या महागाच्या व सुंदर दिसणाऱ्या दुलई आणि ब्लँकेटने माझी जागा घेतली. पण खरी | मायेची ऊब माझ्यातच होती. माझ्यात असलेल्या चिंध्या अन् चिंध्या. 

आईचा, बाबांचा, आजींचा जीं , आजोबांचा अप्रत्यक्ष आशिर्वाद होता. तो के आशीर्वाद, ती मायेची ऊब, ती जवळीकता तुम्हाला महागाच्या सुंदर दिसणाऱ्या तुमच्या ब्लँकेटमध्ये सुद्धा मिळणार नाही. चला तर कधीतरी माझाही उपयोग करत जा. माझ्यावरून हात फिरवत जा. मग बघा तुमच्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही एकटे नसून तुमच्या वडिलधाऱ्यांचे छत्र तुमच्यासोबत असल्याची जाणीव तुम्हाला होईल.

Godhadi swadhyay iyatta aathavi |  गोधडी स्वाध्याय इयत्ता आठवी

डॉ. कैलास दौंड (१९७३) : मराठी ग्रामीण कादबरीक ं ार. ग्रामजीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक-कवी म्हणून प्रसिद्ध. त्यांच्या ‘पाणधुई’ व ‘कापूसकाळ’ या कादबऱ् ं या; ‘उसाच्या कविता’, ‘वसाण’, ‘भोग सरू दे उन्हाचा’, ‘अधं ाराचा गाव माझा’ हे कवितासंग्रह;

 ‘एका सुगीची अखेर’ हा कथासंग्रह; ‘तऱ्होळीच पं ाणी’ हा ललित लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध. लेखनासाठी पचवी ं सहून अधिक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित. गोधडी हे केवळ पांघरूण नव्हे, तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय.

 गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे. याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. प्रस्तुत कविता ‘उसाच्या कविता’ या काव्यसंग्रहातून घेतली आहे.

इयत्ता 8वी मराठी।स्वाध्याय गोधडी। Godhdi kavita। 8th class 

गोधडी म्हणजेच
नसतो फक्त चिंध्यांचा बोचका
गोधडी म्हणजेच गोधडी असते.
मायेलाही मिळणारी ऊब असते.
गोधडीला असते अस्तर
बापाच्या फाटक्या धोतराचे
किंवा
आईला बापाने घेतलेल्या
फाटक्या लुगड्याचे
आतगोधडीत
अनेक चिंध्या असतात
बसलेल्या दाटीवाटीनं
आईनं दटावून बसवलेल्या.
तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात
त्यात असतो
मामानं घेतलेला, भाच्याचा
जीर्ण कुडता
माहेरातून आलेलं
आईच्या लुगड्याचं पटकुर
आणि
पहिल्या संक्रांतीला
बानं घेतलेलं-
आईनं असंख्य ठिगळं लावलेलं
तिचं लाडकं लुगडं
आणि
बाच्या कोपरीच्या बाह्या
आईनं ते सगळं
स्मृतीच्या सुईनं
शिवलेलं असतं त्यात.
म्हणून गोधडी म्हणजे
नसतो चिंध्यांचा बोचका
ऊब असते ऊब!

 इयत्ता आठवी मराठी गोधडी स्वाध्याय

  • गोधडी स्वाध्याय इयत्ता आठवी | Godhadi swadhyay | iyatta aathav
  • इयत्ता 8वी मराठी।स्वाध्याय गोधडी। Godhdi kavita। 8th class .
  • गोधडी स्वाध्याय इयत्ता ८ वी मराठी कविता
  • गोधडी कविता इयत्ता आठवी स्वाध्याय | godhadi kavita 8th marathi
  • स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी कविता बारावी गोधडी
  • #12.गोधडी स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी #12.Godhadi swadhyay

 इयत्ता आठवी मराठी गोधडी स्वाध्याय  

Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
१. भारत देश महान (गीत)
२. माझ्या देशावर माझे प्रेम आह
३. लाखाच्या...कोटीच्या गप्प
४. नव्या युगाचे गाणे (कविता)
५. सुरांची जादूगिरी
६. असा रंगारी श्रावण (कविता)
७. अण्णा भाऊंची भेट
८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९. विद्याप्रशंसा (कविता)
१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
१२. गोधडी (कविता)
१३. पाड्यावरचा चहा
१४. फुलपाखर
१५. आळाशी (कविता)
१६. चोच आणि चारा
१७. अन्नजाल (कविता)
१८. जलदिंडी
१९. गे मायभू (कविता)
२०. शब्दकोश (स्थूलवाचन)
२१. संतवाणी

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post