संतवाणी स्वाध्याय इयत्ता आठवी | santvani swadhyay class 8

संतवाणी स्वाध्याय इयत्ता आठवी | santvani swadhyay class 8

संतवाणी स्वाध्याय इयत्ता आठवी | santvani swadhyay class 8

प्र.५. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.  

(अ) शब्द वाटूं धन जनलोकां' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 
Solution:
शब्द हे धन आहे आणि आम्ही हे धन लोकांमध्ये वाटणार आहोत. संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही अभंगांद्वारे चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. जसे धनाने लोक श्रीमंत होतात तसेच अभंगांतील विचारांमुळे लोक विचाराने श्रीमंत होतील, अभंगांमधून त्यांच्यापर्यंत सुंदर-सुंदर विचार म्हणजेच चांगले विचार पोहोचतील. माणसं विचाराने श्रीमंत होतील. म्हणून आम्ही शब्दांचे धन लोकांमध्ये वाटणार आहोत असे तुकाराम महाराज म्हणतात.

(आ) संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा, 
Solution:
संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात. ते म्हणतात शब्द हेच आमच्यासाठी धन आहे. शब्द हेच आमच्यासाठी रत्ने आहेत. आम्ही ही शब्दांची रत्ने अभंगांद्वारे माणसांपर्यंत पोहोचवून माणसांना विचाराने श्रीमंत बनवतो. तसेच संत तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हेच आमच्यासाठी शस्त्र आहेत ज्याद्वारे आम्ही वाईट विचारांच्या माणसांचा पराभव शब्दानेच करतो, शब्द हे आमच्या जीवनाचे जीवन आहे म्हणजेच आमच्या जीवनाचे सर्वस्व हे शब्दच आहेत. संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव शब्दाला देव माणून करतात. ते शब्दांची पुजा करतात.

(इ)'शब्दांचे सामर्थ्य अफाट असते या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा. 
Solution:
खरंच शब्दांचे सामर्थ्य हे अफाट असते. शब्द हे आपल्यासाठी शस्त्र असतात. शस्त्र हे शāसोबत लढण्यासाठी असतात, परंतु शब्दशस्त्र हे शत्रूचे मन जिंकण्यासाठी असते. ज्याद्वारे आपण शचे मन जिंकून शत्रुचा पराभव करतो. अशीच एक घटना माझ्या आयुष्यात घडली. एक व्यक्ती सतत माझा तिरस्कार करत असे.मला उलट-सुलटबोलत असे पण, कधीच त्यांना वाईट बोलले नाही. उलट शब्दांच्या साह्याने त्यांचा आदरच करत गेले. त्याचा परिणाम असा झाला की त्या व्यक्तीलाच स्वत:च्या बोलण्याची, स्वत:च्या वागण्याची लाज वाटली आणि त्या व्यक्तीने माझी माफी मागितली.

संतवाणी स्वाध्याय | santvani swadhyay class 8

संत तुकाराम (१६०८ ते १६५० ) : वारकरी परंपरेतील श्रेष्ठ संतकवी. त्यांच्या रचनांमध् अध् ये यात्म, भक्ती आणि व्यवहार यांची सांगड घातलेली दिसते. ढोंग, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे. 

प्म, नैत रे िकता, करुणा व सर्वांमध् ईशये ्वराचे अस्तित्व ही मूल् सये ्वीकारून आदर्श प्रापंचिक जीवन कसे जगावे, याचा उपदेश ते आपल्या अभंगांतून करतात. त्यांच्या अभंगातील ओळींना सुभाषिताचे मोल प्राप्त झाले आहे. प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज यांनी शब्दांचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन पटवून दिलेले आहे.

आम्हां घरीं धन शब्दांचींच रत्नें ।
शब्दांचींच शस्त्रें यत्न करूं ।।१।।
शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन ।
शब्द वाटूं धन जनलोकां ।।२।।
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव ।
शब्देंचि गौरव पूजा करूं ।।३।।

सकलसंतगाथा खंड दुसरा : श्रीतुकाराममहाराजांची अभंगगाथा
अभंग क्रमांक १६२७
संपादक : प्रा. डॉ. र. रा. गोसावी

भावार्थ: संत तुकाराम महाराज सांगतात, ‘‘आमच्या घरी धन कोणते? तर शब्दरूपी रत्ने हेच आमचे धन आहे. आमच्या शब्दांना रत्नांचे मूल्य प्राप्त झालेले आहे. समाजप्रबोधनासाठी, स्वत:चे मत पटवून देण्यासाठी आम्ही शब्दरूपी शस्त्र जाणीवपूर्वक वापरतो. कधी समाजप्रबोधनासाठी अत्त परखड शब यं ्दांचा वापर करतो, तर कधी मृदू शब्दांत चर्चा करतो, बोलतो. 

शब्द हेच आमच्या जीवनाचे सर्वस्व आहे. समाजातील लोकांना धन म्हणून आम्ही शब्दच वाटतो. म्हणजेच शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून लोकांचे जीवन सुधारतो. शब्द आमच्यासाठी देवस्वरूप आहेत, म्हणून या शब्दांचा गौरव व सन्मान करून आम्ही त्याची पूजा करतो.’’ 

संतवाणी स्वाध्याय इयत्ता ८ मराठी | संत तुकाराम अभंग

Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
१. भारत देश महान (गीत)
२. माझ्या देशावर माझे प्रेम आह
३. लाखाच्या...कोटीच्या गप्प
४. नव्या युगाचे गाणे (कविता)
५. सुरांची जादूगिरी
६. असा रंगारी श्रावण (कविता)
७. अण्णा भाऊंची भेट
८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९. विद्याप्रशंसा (कविता)
१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
१२. गोधडी (कविता)
१३. पाड्यावरचा चहा
१४. फुलपाखर
१५. आळाशी (कविता)
१६. चोच आणि चारा
१७. अन्नजाल (कविता)
१८. जलदिंडी
१९. गे मायभू (कविता)
२०. शब्दकोश (स्थूलवाचन)
२१. संतवाणी

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post