स्वामी विवेकानंदांची भारतयात्र स्वाध्याय | Swami vivekananda bharat yatra swadhyay
प्रश्न ३ रा : हे केंव्हा घडेल ते लिहा.
(अ) परीच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील
Solution:
मुलांना अक्षरे, शब्द व नंतर वाक्य शिकवून न थांबता परिच्छेद हा घटक घेतला तर परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील.
(आ) माणसाची अंत:स्थ चेतना फुलेल.
Solution:
माणसाच्या आयुष्यात जितका विरोध आणि प्रतिकूलता असेल, तितकी माणसाची अंतः स्थ चेतना फुलेल.
प्रश्न ४ था : परिणाम लिहा.
(अ) स्वामीजींनी जीं ग्रंथपालाला आव्हान दिले.
Solution:
स्वामीजींनी जीं ग्रंथपालाला आव्हान दिल्याचा परिणाम असा झाला की, ग्रंथपालाने स्वामीजींना जीं त्या तीन खंडातले उभे-आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे Solution: ज्या पानावर असायचे, ते अर्धे-पाऊण पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले,'हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे'.
(आ) नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना जीं नावेतून न्यायचे नाकारले.
Solution:
नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना जीं नावेतून न्यायचे नाकारले याचा परिणाम असा झाला की, स्वामींनी मीं एकदम त्या सागरात उडी मारली. पोहत पोहत ते शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले, की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही. हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे.
प्रश्न ५ वा : तुमचे मत लिहा.
(अ) ग्रंथपालाने स्वामीजींच्या जीं शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथवाचनाबद्दल व्यक्त केलेले मत.
Solution:
ग्रंथपालाने म्हटले होते काही लोकांना ग्रंथालयातून जाडीजुडी पुस्तके न्यायची आणि ती न वाचता परत करायची सवय असते. थोडे चाळायचे आणि वाचल्यासारखे दाखवायचे. ग्रंथपालाचे हे मत तसे पाहिले तर खरे आहे, कारण हा अनुभव काही लोकांच्या बाबतीत खरा आहे. पण आणखी एक असे की पुस्तकातल्या केवळ मोजक्याच भागाची आपल्याला वाचनाकरिता गरज असते. पूर्ण पुस्तक वाचायची गरज नसते. पण तेवढ्यासाठीही पूर्ण पुस्तक न्यावे लागते. म्हणून ग्रंथपालाने व्यक्त केलेले मत अर्धसत्य आहे आणि स्वामीजी बाबतीत तर ते पूर्ण असत्य आहे.
(आ) पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना जीं श्रीपादशिलेवर न नेणाऱ्या नावड्यांबाबत तुमचे मत.
Solution:
एका बाजूने विचार केला तर नावाड्यांचा नाव चालवणे हा धंदाच आहे. तेव्हा त्यांनी स्वामीजींकजीं डे पैशांची मागणी केली ते चुकीचे नाही. परंतु स्वामीजींनी जीं त्यांना मी एक संन्यासी आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगितल्यानंतर नावाड्यांनी स्वामीजींना जीं श्रीपादशिलेवर नेऊन सोडायला पाहिजे होते असे मला वाटते.
प्र.६. स्वामीजींचेजीं चेखालील गुण दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधा व लिहा.
(अ) निर्भयता
स्वामी विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली.
(आ) मनाची एकाग्रता
तीन दिवस, तीन रात्र ते फक्त भारतमातेचे चिंतन करत होते.
(इ) दृढनिश्चय
मी आता दोन-तीन दिवस इथेच राहणार आह
स्वामी विवेकानंदांची भारतयात्र स्वाध्याय | Swami vivekananda bharat yatra swadhyay
सुनील चिंचोलकर (१९५१-२०१८) : सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक. ‘संस्काराचे मोती’, ‘समर्थ रामदासांचे
व्यवस्थापन’, ‘विद्यार्थ्यांचे श्री रामदास’, ‘श्रीदासबोध विवरण संच (भाग १ ते ६)’, ‘दहा संत चरित्रे’ इत्यादी चाळीस पुस्तके
प्रकाशित. ‘शिवसमर्थ पुरस्कार’, ‘कृतज्ञता पुरस्कार’, ‘समर्थ रामदास पुरस्कार’ इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित.
या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारतयात्रेदरम्यानचे प्रसंग आले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांच्या वाचनाची गती,
त्यांची आकलनशक्ती या विषयीचे वर्णन आले आहे. भारतयात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी
तीन दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग तीन दिवस आणि तीन रात्री त्यांनी भारतभूमीच्या सद्यस्थितीचे आणि त्यापरिस्थितीमध्ये
परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले.
या प्रसंगातून स्वामीजींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन
घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. प्रस्तुत पाठ हा ‘मानवतेचा महापुजारी : स्वामी विवेकानंद’ या पुस्तकातून
घेतला आहे.
स्वामी विवेकानंदांची भारतयात्रा स्वाध्याय | swami vivekanandachi bharat yatra swadhyay |
ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या
समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश, तो
समाज एकदा डोळ्यांखालून घालावा, म्हणून स्वामी
विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण
केले.
पोरबंदरच्या वास्तव्यामध्येस्वामी विवेकानंद काही
इंग्रजी ग्रंथांचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड
वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी तीन
खंड एकेका दिवसात वाचून परत केले.
ग्रंथपालाने
स्वामीजींच्या शिष्याला विचारले, ‘‘स्वामीजी, न वाचता
पुस्तकं परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्येएवढा
मोठा खंड वाचून होणे हे शक्यतेच्या बाहेर आहे. असे घडूच
शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडीजाडी पुस्तक न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय
असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं.
तसंच बहुतेक हा साधू करत असेल.’’ शिष्यांनी हे सगळे
स्वामीजींना सांगितले. चौथ्या दिवशी चौथा खंड घेण्यासाठी
स्वामीजी स्वत: गेले.
त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला
आणि त्याला सांगितले, ‘‘पहिले तीन खंड माझे पूर्णवाचून
झालेले आहेत. तुम्हांला शंका असेल, तर त्यातले तुम्ही
काहीपण विचारू शकता.’’
आता स्वामीजींनीच आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने
विचार केला, की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक
आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या तीन खंडांतले
उभे-आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे
उत्तर ज्यापानावर असायचे, ते अर्धे-पाऊण पान स्वामीजी
कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, ‘हे
मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे.’
खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले,
‘‘स्वामीजी एवढे लक्षात ठेवणे तुम्हांला कसे शक्य होते?’’
स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना दिलेले उत्तर फार
तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले,
‘‘मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो, तसेच माझा
तासन्तास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो,
त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ
होऊन जाते.’’ पुढे स्वामीजी म्हणाले, ‘‘असं बघा
राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो
आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी
थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य
लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे.
त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची
आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकलो,
तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल.
मी ग्रंथाचे
परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही
ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो.’’
जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले, तेव्हा
त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद
झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले, समुद्राच्या काठी
उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा तीन दिशेला
सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले, की
मध्यभागी एक-दीड फर्लांग अंतरावर दोन शिलाखंड आहेत
आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो
तर?
त्यांनी तिथे असणाऱ्या त्या नावाड्यांना विचारले,
‘‘ते काय आहे?’’ नावाडी म्हणाले, ‘‘त्याला श्रीपादशिला
म्हणतात.’’ स्वामी विवेकानंदांच्या मनात आले, की
आपली भारतयात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या
टोकापर्यंत आलेलो आहोत; पण जिथे आपण उभे आहोत
ते देशाचे टोक नाही. तो शिलाखंड हे देशाचं टोक आहे.
त्या शिलाखंडावर आपण जावे.
कन्याकुमारीच्या चरणी
भारतयात्रा समर्पित करावी. या भावनेने स्वामी विवेकानंदांनी
एका नावाड्याला सांगितले, ‘‘बाबा रे, मला तू त्या
शिलाखंडावर सोड.’’ नावाड्याने सांगितले, ‘‘तुम्हांला
पाच पैसे मला द्यावे लागतील.’’ स्वामीजी म्हणाले,
‘‘माझ्याकडे पैसे काहीच नाहीत. मी निष्कांचन संन्यासी
आहे.’’ नावाडी म्हणाले, ‘‘ते तुमचे तुम्ही बघा. आम्ही
पैसे घेतल्याशिवाय तुम्हांला सोडणार नाही.’’ स्वामी
विवेकानंदांनी एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. कल्पना
करा, फर्लांग-दीड फर्लांग अंतर पोहत जायचे होते. त्यात
स्वामीजींना आणखी एक धोका माहीत नव्हता.
कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि
या शार्क माशांचा जबडा इतका जबरदस्त असतो, की
त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात.
एखादा
मनुष्य जर जबड्यांमध्ये सापडला, तर ते त्याला
काकडीसारखे तोडून तोडून खाऊन टाकतात. जेव्हा स्वामी
विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली, तेव्हा ते नावाडी घाबरून
गेले. लगेच त्या दोघा-तिघांनी आपल्या नावा काढल्या
आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले, या
माणसाला वाटेत काही संकट आले तर? दम संपला तर?
स्वामीजी त्या खडकावर, शिलाखंडावर पोहोचले. त्या
नावाड्यांच्या लक्षात आले, की हा संन्यासी सामान्य मनुष्य
नाही. हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे.
स्वामीजी त्यांना म्हणाले, ‘‘मी आता दोन-तीन
दिवस इथेच राहणार आहे.’’ तेव्हा ते नावाडी आणखी
थक्क झाले.
स्वामीजी तीन दिवस तिथे राहिले. रात्री एकटे,
सोबतीला कोणी नाही. तीन दिवस नुसते थांबले नाहीत. ते
ध्यानस्थ बसले, त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून
अनेकदा हे नावाडी लोक यायचे आणि त्यांच्यासाठी
काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हाका मारायचे; पण
त्यांच्या लक्षात आले, की स्वामीजी भावसमाधीमध्येच
आहेत. त्यांना काही ऐकू जात नाही. त्या नावाड्यांना किती
वाईट वाटले असेल, की आपण पाच पैशासाठी या
माणसाला नाही म्हणून म्हटले; पण त्यामुळेच स्वामीजींचा
अंत:स्थ अग्नी प्रदीप्त झाला. स्वामीजी म्हणतात,
‘‘जितका
विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका
माणसातला अंत:स्थ अग्नी प्रदीप्त होत असतो.
अनुकूलतेमुळे माणसातले फूल कोमेजून जाते. त्याला जरा
संघर्ष करता आला पाहिजे. थोडी संकटं असली पाहिजेत.
थोडा विरोध असला पाहिजे. म्हणजे माणसातली अंत:स्थ
चेतना फुलते.’’
स्वामीजी तीन दिवस आणि तीन रात्री तिथे राहिले.
तीन दिवस, तीन रात्र ते फक्त भारतमातेचे चिंतन करत होते.
डोळ्यांसमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत.
आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या
लक्षात आले, की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत.
ज्यांना जेवायला अन्न नाही, त्यांना आपण वेदान्ताचा काय
उपदेश करत असतो? भाकरीची भ्रांत असताना, वेदान्त
सांगणे धादांत खोटे आहे. लोकांना आधी दाेन वेळ
जेवायला द्या. खरा धर्म हा सूर्यासारखा सर्वप्रकाशक
असतो. वसुंधरेसारखा सर्वसंग्राहक असतो. हे सर्वधर्म
समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी समजावून
सांगितल