अन्नजाल कविता इयत्ता आठवी | Annajal Swadhyay 8th

अन्नजाल कविता इयत्ता आठवी | Annajal Swadhyay | iyatta 8 vi annajal kavita swadhyay 

अन्नजाल कविता इयत्ता आठवी | Annajal Swadhyay | iyatta 8 vi annajal kavita swadhyay

पाड्यावरचा चहा इयत्ता आठवी स्वाध्याय । Padyavarcha chaha swadhyay

प्र.१. अन्नजालाचे महत्व पटवून देण्यासाठी कवीने दिलेली दोन उदाहरणे
Solution:
१) पहिले उदाहरण साखळीचे : मनुष्य कडीला कडी जोडून साखळी तयार करतो. पण मधली कोणतीही एक कडी जरी तुटली तर कडीची संपूर्ण मालाच भंगून जाते, म्हणजेच साखळी तुटून जाते.
२) दुसरे उदाहरण कोळ्याच्या जाळ्याचे : कोळ्याच्या जाळ्यात एका धाग्याला खूप धागे जोडलेले असतात. त्या खूप धाग्यांना अनेक धागे जोडलेले असतात. त्यामुळे काही धागे तुटले तरी जाळे कायम राहते. जाळे तुटत नाही.

प्र.२. चुकीचे विधान शोधा. 

प्र.२. चुकीचे विधान शोधा.
(अ) 
(१) मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते.
(२) निसर्गनारायणाने महाजाल निर्माण केले.
(३) कोळी आपले जाळे स्वकष्टाने विणतो.
(४) कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये.
Solution:
चुकीचे विधान (१) मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते.


(आ)
(१) अन्नजालातील प्राणिजाती नष्ट झाल्यास ते क्षीण होते. 
(२) कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तर काही बिघडत नाह
(३) एक प्राणिजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते. 
(४) अनेक प्राणिजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते.
Solution:
चुकीचे विधान (३) एक प्राणिजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते. 

कोळ्याचे जाळे :- तुटले तरी कोळ्याचे जाळे टिकून राहते.
अन्नजाल :- अनेक प्राणी नष्ट झाले तरी अन्नजाल टिकून राहते.

प्र.४. खालील कृतीचा / घटनेचा परिणाम लिहा. 

मानवाने प्राण्यांना मारले तर
Solution:
मानवाने प्राण्यांना मारले तर अन्नजाल क्षीण होईल, तुटून जाईल आणि पुढे ते संपून जाईल.

प्र.५. तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.  

(अ) तुम्हांला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दांत सोदाहरण स्पष्ट करा.
Solution:
परिसंस्थेत एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण होताना तयार होणाऱ्या साखळीलाच अन्नसाखळी असे म्हणतात. अन्नसाखळी ही अन्न तयार करण्याच्या जालातील एका ओळीत असलेली साखळी दुवे असतात. अन्नसाखळीत स्वतः अन्न मिळविणे आणि दुसऱ्याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. उदाहरणार्थ- गवत - ससा - लांडगा - सिंह किंवा
गवत - हरिण - सिंह

(आ) कवितेच्या आधारे 'जीवो जीवस्य जीवनम्।' हे सुवचन स्पष्ट करा. 
Solution:
'जीवो जीवस्य जीवनम्' याचा अर्थ एक जीव हाच दुसऱ्या जीवाचे जीवन आहे असा होतो. अन्नसाखळी पाहिली असता एक जीव हा दुसऱ्या जिवाला खाऊन जगतो म्हणजेच एक जीव हा दुसऱ्या जिवाचे जीवन आहे. जसे नाकतोडा गवत खातो, बेडूक नाकतोडे खातो, साप बेडकाला खातो तर गरुड सापाला खातो म्हणजेच एक जीव हा दुसऱ्या जीवाला खाऊन जगत आहे.

अन्नजाल कविता इयत्ता आठवी | Annajal Swadhyay | iyatta 8 vi annajal kavita swadhyay

हर्ष सदाशिव परचुरे(१९७९) : प्रसिद्ध कवी व लेखक. सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांतून भटकताना वाढलेल्या जाणिवांमधून परिस्थितीकीचा अभ्यास करण्याची गरज जाणवली. पलाश आणि इकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया यांचा परिस्थितीकीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. कॉलेजच्या दिवसांत निर्माण झालेली गद्य आणि पद्य लेखनाची आवड पुढे वाढत गेली. वर्तमानपत्रांतून भटकंतीवर लिखाण केले. पुढे ‘वनाचे श्लोक’ हे परिस्थितीकीवरचे आगळेवेगळे लेखन त्यांनी केले. 

आज ते त्यांच्या कवीभूषणाच्या काव्यावरील अभ्यास व व्याख्याने आणि ‘वनाचे श्लोक’ यासाठी ओळखले जातात. निसर्गातील सर्व सजीव आणि निर्जिवांत परस्परसंबंध असतात. ते उत्तरोत्तर गाढ अाणि क्लिष्ट होत जातात. जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्नसाखळ्या तुटत गेल्याने निसर्गानेच अन्नजाल निर्माण केले. म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला, त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या. असे असले तरी अन्नजाल पूर्ण नष्ट होत नाही मात्र ते नक्कीच कमकुवत होते. हेच या ‘वनाचे श्लोक’मधून घेतलेल्या पद्याचे सार आहे

Annajal Swadhyay | iyatta 8 vi annajal kavita swadhyay 

कडीस जोडोनि दुज्या कडीला
मनुष्य बनवीतसे साखळीला
जरी तोडिले त्यात मधल्या कडीला
तरी भंगुनी जाइ संपूर्ण माला! ।।१।।

पाहा कसे कोळि विणतात जाळे
धाग्यास एका बहू जोडलेले
बहुतांस त्या जोडलेलेकित्येक
बिघडते न जरिही तुटले अनेक ।।२।।

एकीस खायी दुजी प्राणिजात
दुजीस तीजी अशी साखळीत
जर का दुजी जात मेली समस्त
उभी साखळी होउनी जाय नष्ट! ।।३।।

निसर्गनारायणें देखिले हे
अन् वीणिले अन्नजालासि पाहे!
जरी प्राणिजाती किती लोपल्या रे
तरिही टिकोनी महाजाल राहे! ।।४।।

तगले असे की महाजाल रेते
तरीहि जाणा ते क्षीण होते!
मारीत जाता बहू प्राणिजाती
तुटोनि संपेल ते जाल पुढती! ।।५।।

Annajal Swadhyay | iyatta 8 vi annajal kavita swadhyay 


Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
१. भारत देश महान (गीत)
२. माझ्या देशावर माझे प्रेम आह
३. लाखाच्या...कोटीच्या गप्प
४. नव्या युगाचे गाणे (कविता)
५. सुरांची जादूगिरी
६. असा रंगारी श्रावण (कविता)
७. अण्णा भाऊंची भेट
८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९. विद्याप्रशंसा (कविता)
१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
१२. गोधडी (कविता)
१३. पाड्यावरचा चहा
१४. फुलपाखर
१५. आळाशी (कविता)
१६. चोच आणि चारा
१७. अन्नजाल (कविता)
१८. जलदिंडी
१९. गे मायभू (कविता)
२०. शब्दकोश (स्थूलवाचन)
२१. संतवाणी

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post