गे मायभू स्वाध्याय इयत्ता आठवी । Ge maybhu Swadhyay 8th

गे मायभू स्वाध्याय इयत्ता आठवी । Ge maybhu Swadhyay 

गे मायभू स्वाध्याय इयत्ता आठवी । Ge maybhu Swadhyay 8th

प्र.१.ला : एका वाक्यात उत्तरे लिहा.  

(अ) कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो ?
Solution: 
कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो. 

(आ) मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती ? 
Solution: 
सूर्य, चंद्र, तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत.

(इ) कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला. 
Solution:
कवीच्या जन्माला मातृभूमीमुळे अर्थ प्राप्त झाला.

प्र.२ ला : खालील काव्यपंक्तींचा क्तीं तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.  

(अ) आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे
Solution: 
आपण जेव्हा आरती करतो तेव्हा दिवे लावून आरती करतो पण इथे मातृभूमीची आरती करण्यासाठी कवी चक्क सूर्य, चंद्र, तारे हे प्रकाश देणारे दिवे मातृभूमीच्या आरतीसाठी आणणार आहे.

(आ) आई तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा
Solution: 
मुल कितीही मोठे झाले तरी आईसाठी लहानच असते, म्हणन येथे कवीने मातभूमीला म्हटले आहे आई तुझ्यापुढे मी आहे अजून तान

प्र.३ रा : हे केव्हा घडते ते लिहा. 

(अ) कवीची ललाटरेषा प्रयाग काशी बनते ...... 
Solution: 
जेव्हा कवी मातृभूमीची थोडीशी पायधूळ घेतो तेव्हा कवीची ललाटरेषा प्रयाग कार्शी बनते.

(आ) कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो ......."
Solution:
कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो कारण कवीची वाणी मातृभूमीच्या दुधाने भिजून गेली आहे.

प्र.४. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. 

(अ) माझी भाषा मधुर आणि समृद्ध बनव. 
Solution:
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. 

(आ) शब्दसामर्थ्य, प्रतिभासामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईन. 
Solution:
आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी; माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !

प्र.५ वा : कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यात उपयोग करा. 

(१) पांग फेडणे  - 
Solution:
केलेल्या उपकाराची परतफेड करणे आपल्यावर उपकार करणाऱ्यांचे पांग फेडणे हे आपले कर्तव्य असते.

(२) अर्थ येणे  - महत्त्व येणे
Solution:
समाज सेवा करत असल्यामुळे माझ्या जीवनाला खरा अर्थ आला.

प्र.६ वा :  कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा.
Solution:
  1. सारे-तारे
  2. जराशी- काशी
  3. गाणी - वाणी
  4. कशाला- आला

प्र.७ वा : स्वमत.  

(अ) कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे, ते स्पष्ट करा.
Solution: 
येथे पायधूळ या शब्दाचा एक अर्थ असाही होऊ शकतो की, कवीने मातृभूमीच्या मातीलापायधूळ म्हटले असावे आणि ही पायधूळ त्याने कपाळाला लावली असता त्याची कपाळ म्हणजेच ललाटरेषा बनते प्रयाग काशी म्हणजेच त्याचे भाग्य उजळते असे होऊ शकते किंवा कवी मातृभूमीची स्तुती कवितेतून गातो यालाच कवीने पायधूळ म्हटले असावे.

(आ) 'गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ लिहा.
Solution:
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे या ओळीचा सरळ अर्थ हे मातभूमी मी तझे सर्व उपकार फेडीन' असा होतो

(इ) कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा. 
Solution:
आपल्यावर आई इतकेच मातृभूमीचे देखील अनंत उपकार असतात. ज्याप्रमाणे आपण आईचे उपकार फेडू शकत नाही त्याचप्रमाणे आपण मातृभुमीचे उपकार देखील फेडू शकत नाही पण आईचे उपकार आणि मातृभूमीचे उपकार फेडण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. यासाठी कवीने येथे मातृभूमीला सांगितले आहे. हे मातृभूमि मी तुझी आरती करण्यासाठी सूर्य,चंद्र,तारे आणेल, हे मातृभूमी मी कितीही मोठा झालो तरी मी तुझ्यासमोर लहानच आहे. तुझ्यामुळेच माझ्या जन्माला अर्थ आला आहे.

चर्चा करूया :-  

आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल, याची गटात चर्चा करा व वर्गात सांगा. माझ्या मते आताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी आम्ही प्रदूषण कसे कमी करता येईल, जास्तीत जास्त स्वच्छता कशी राखता येईल, जास्तीत जास्त झाडे कसे लावता येतील. लावलेली झाडे कशी जगवता येतील, पाण्याची बचत कशी करता येईल. वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकोप्याने व गुण्यागोविंदाने कसे राहतील, भ्रष्टाचारमुक्त भारत कसा होईल या सर्वांसाठी अविरत प्रयत्न करू (ge maybhu tuze mi fedin pang sare swadhyay)

गे मायभू । स्वाध्याय इयत्ता आठवी । Ge maybhu Swadhyay 

सुरेश भट (१९३२-२००३) : सुप्रसिद्ध कवी, गझलकार. सुरेश भट यांचे खरे यां सामर्थ्य त्यांच्या राजकीय, सामाजिक आशयाच्या कवितांतून जाणवते. ‘रूपगधं ा’, ‘रग म ं ाझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झझं ावात’ हे त्‍यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘गझल’ या रचनाबधं ाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार केला. त्यांच्यामुळे ‘गझल’ हा प्रकार मराठीत अत्त लयं ोकप्रिय झाला. ‘काफला’ या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेश आहे. मातृभूमी आपणाला वाढवते, सर्वांगाने घडवते. 

आपल्या जीवनात आईइतकेच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते. प्रस्तुत कवितेत आपल्या अत:कर ं णातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे.

8th standard marathi ge maybhu swadhyay | गे मायभू स्वाध्याय

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;

शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला.

मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग काशी.
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी!


Ge maybhu swadhyay | गे मायभू स्वाध्याय आठवी मराठी

Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
१. भारत देश महान (गीत)
२. माझ्या देशावर माझे प्रेम आह
३. लाखाच्या...कोटीच्या गप्प
४. नव्या युगाचे गाणे (कविता)
५. सुरांची जादूगिरी
६. असा रंगारी श्रावण (कविता)
७. अण्णा भाऊंची भेट
८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९. विद्याप्रशंसा (कविता)
१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
१२. गोधडी (कविता)
१३. पाड्यावरचा चहा
१४. फुलपाखर
१५. आळाशी (कविता)
१६. चोच आणि चारा
१७. अन्नजाल (कविता)
१८. जलदिंडी
१९. गे मायभू (कविता)
२०. शब्दकोश (स्थूलवाचन)
२१. संतवाणी

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post