विद्या प्रशंसा स्वाध्याय | Vidya Prashansa Swadhyay | 8th marathi
विद्या प्रशंसा स्वाध्याय | Vidya Prashansa Swadhyay | 8th marathi
विधेमुळे व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या गोष्टी |
- जगात श्रेष्ठत मिळते
- मनोरथ पूर्ण होते
- गुलप्रमाणे संकटसमयी उपदेश
- उपाय सुचतात मिळतात
- विधेसारखे दुसरे धन नाही.
- विधेसारखा दुसरा मित्र नाही.
प्रश्न ३ रा : खालील ओळींचा ळीं तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
नानाविध रत्नांची, कनकांची असतील भुषणे फार
परि विद्यासम एकहि शोभादायक नसे.
Solution:
अलंकार वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नांची, सोन्यांची भरपूर अलंकार असतील, पण विद्येसारखे शोभादेणारे दुसरे
अलंकार नाही.
प्रश्न ४ था : 'विद्या' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
Solution:
जगात सर्वश्रेष्ठ अलंकार कोणता?
किंवा कोणते धन चोरले जात नाही?
प्रश्न ५ वा : तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(अ) कवीने वर्णन केलेले विद्येचे महत
Solution:
कवी म्हणतात, विद्येसारखा दुसरा चांगला 'मित्र' नाही. विद्येसारखा दुसरा 'गुरु' नाही. विद्या माणसाला जगात सर्वश्रेष्ठ
बनवते. विद्या कुणीही चोरू शकत नाही. विद्ये इतका सुंदर जगात दुसरा 'अलंकार' नाही.
(आ) 'त्या विद्यादेवीतें अनन्यभावे सदा भजा भारी',या ओळीचा सरळ अर्थ
Solution:
त्या विद्यादेवीची एकनिष्ठपणे एकरूपहोऊन उपासना (पुजा) करा.
खेळूया शब्दाशी :-
(अ) खालील शब्दांना कवितेतील शब्द शोधा.
मोठेपण - श्रेष्ठत्व
अलंकार - भूषणे
नेहमी - सदैव
मनातील इच्छा - मनोरथ
(आ) खालील शब्दांचे प्रत्येकी पाच समानार्थी शब्द लिहा.
मित्र = दोस्त, सखा, सोबती, सवंगडी, सहचर
सोने = कनक,कांचन,सुवर्ण,हेम,स्वर
विद्या प्रशंसा स्वाध्याय | Vidya Prashansa Swadhyay | 8th marathi
कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८२४-१८७८) : भाषांतरकार, रसिक पंडित. मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथपरीक्षणे त्यांच्या
चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात. पद्य रत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे.
तसेच ‘अरबी भाषेतील
सुरस व चमत्कारिक गोष्टी’, ‘रासेलस’ ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्त्वप्रधान कादंबरी, ‘साक्रेटिसाचे चरित्र’ आणि
‘अर्थशास्त्रपरिभाषा’ ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत.
‘अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह’ या ग्रंथावरून त्यांची
शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी प्रत्ययास येते.
प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे.
दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर वाढतच असते,
माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. विद्येमुळे माणसाच्या सर्व दु:खाचे निवारण होऊ शकते. विद्येसारखा वाटाड्या,
मित्र काेणीही नाही असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितले आहे. प्रस्तुत कविता ही ‘आठवणीतल्या कविता’ भाग ३ या
कवितासंग्रहातून घेतली आहे.
Vidya Prashansa Swadhyay | 8th marathi | विद्या प्रशंसा स्वाध्याय
विद्येनेंच मनुष्या आलें श्रेष्ठत्व ह्या जगामाजीं;
न दिसे एकहि वस्तूविद्येनेंही असाध्य आहे जी.।।१।।
देउनि किंवा भोगुनि उणें न होतांसदैव वाढतसे
ऐसें एकच विद्या-धन, अद्भुत गुण न हा दुज्यांत वसे. ।।२।।
नानाविध रत्नांची, कनकांचीं असति भूषणें फार;
परि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार. ।।३।।
या साऱ्या भुवनीं हित-कर विद्येसारखा सखा नाहीं;
अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणें नसे कांही. ।।४।।
गुरुपरि उपदेश करी, संकट-समयीं उपायही सुचवी,
चिंतित फळ देउनियां कल्पतरूपरि मनोरथां पुरवी. ।।५।।
यापरि सकल सुखें जी देई, दु:खें समस्त जी वारी,
त्या विद्यादेवीतें अनन्यभावें सदा भजा भारी. ।।६।।