भारत देश महान कविता आठवी | Maza Desha mahan kavita 8th


भारत देश महान कविता आठवी | Maza Desha mahan kavita 8th

भारत देश महान कविता आठवी | Maza Desha mahan kavita 8th

चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान
भारत देश महान, भारत देश महान ।।धृ.।।
हिमालयाची हिमशिखरे ती भारतभूच्या शिरी डोलती
गंगा, यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान ।।१।।
इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा अन् पराक्रमाचा
समतेचा अन्विश्वशांतिचा जागवी राष्ट्राभिमान ।।२।।
शौर्याने जे वीरचि लढले रणांगणी ते पावन झाले
भारतभूचे स्वप्न रंगले चढवूनि उंच निशाण ।।३।।

माधव विचारे : प्रसिद्ध कवी व लेखक. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे. हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गगं ा-यमुनेमुळे सुपीकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परपरं ा लाभली आहे. प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल् जपण् ये याचा संदेश सं दिला आहे. प्रस्तुत गीत हे ‘गीतपुष्पांचा फुलोरा’ या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेले आहे. 

भारत देश महान कवितेचा अर्थ :  

( 1 ) चला चला पवित्र स्नान ॥॥॥ 

अर्थ- चला आपण सर्व एकच गाणे गावू आणि त्यातून सांगू की आपला भारत देश किती महान आहे . उत्तरेला भारतभूमीच्या शीटावर हिमालयाची पांढरीशुभ्र शिखरे आहेत . गंगा , यमुना , गोमती यासारख्या अतिशय पवित्र नद्या ह्या जणू माझ्या भारत भूमीला पवित्र स्नानच घालत आहेत . 

( 2 ) इतिहास नवा . जागवी राष्ट्राभिमान ॥ 2 ॥ 

अर्थ- भारत भूमी ही शूटांची भूमी आहे . देशासाठी हसतहसत बलीदान करणे ही भारतीयांची जुनीच परंपरा आहे . आम्ही आमचे शौर्य आणि पटाक्रम दाखवून समानतेचा व विश्वशांतिचा संदेश जगाला देवू तसेच सर्वामध्ये राष्ट्राभिमान जागृत करू 

( 3 शोर्याने जे उंच निशाण ॥3 ॥ 

अर्थ या भूमीचे शूट पुत्र जे या देशासाठी लढले , ज्यांना रणांगणावर वीरमरण प्राप्त झाले . ज्यांनी मायभूमीचे स्वप्न पूर्ण केले अशा महान वीटांना ध्वज उंचातून आपण सर्वजण अभिवादन करू या ...

भारत देश महान कवितेचा भावार्थ

देशवासीयांच्या मनात देशाभिमान जागृत करताना कवी म्हणतात भारतवासी जनहो, चला आपण आता 'भारत देश महान आहे, हे गीत एकमुखाने गाऊया. आपल्या भारताची थोरवी एकजुटीने गाऊ या.।। धृ.॥। 

माझ्या भारतभूमीच्या मस्तकावर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे डोलत आहेत. (जणू हिमशिखरांचा मुकुट भारतभूमीने मस्तकावर धारण केला आहे.) गंगा, यमुना व गोमती या नद्या आपल्या पवित्र पाण्याने जणू भारतभूला अंघोळ घालत आहेत. ।।१।।

भारतभूमीचा हा नवीन इतिहास अपूर्व बलिदानाचा, शौर्याचा व पराक्रमाचा आहे. राष्ट्राभिमान जागृत करणारा समता व विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे. ।।२।।

या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे वीर शौर्याने लढले; स्वातंत्र्यसंग्रामाच्या रणभूमीवर प्राणार्पण करून जे पवित्रमय झाले; त्यांच्या बलिदानाने भारतभूमीचे स्वप्न रंगले आहे. त्याची ग्वाही उंच फडकत असलेला आमचा राष्ट्रीय ध्वज देत आहे. आपले निशाण असेच अभिमानाने उंच उंच फडकत राहो. ।।३।।H

भारत देश महान कविता आठवी | भारत देश महान कविता मराठी | Maza Desha mahan kavita 8th

  •  भारत देश महान कविता मराठी 
  • भारत देश महान कविता आठवी
  • Maza Desha mahan kavita 8th
  • भारत देश महान निबंध
  • भारत देश महान स्वाध्याय
  • भारत देश महान निबंध
  • भारत देश महान मराठी निबंध
  • आळाशी कविता
  • इयत्ता आठवी मराठी कविता
  • इयत्ता आठवी विषय मराठी

भारत देश महान कविता चा अर्थ | भारत देश महान निबंध मराठी 8th

    Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
    १. भारत देश महान (गीत)
    २. माझ्या देशावर माझे प्रेम आह
    ३. लाखाच्या...कोटीच्या गप्प
    ४. नव्या युगाचे गाणे (कविता)
    ५. सुरांची जादूगिरी
    ६. असा रंगारी श्रावण (कविता)
    ७. अण्णा भाऊंची भेट
    ८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
    ९. विद्याप्रशंसा (कविता)
    १०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
    ११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
    १२. गोधडी (कविता)
    १३. पाड्यावरचा चहा
    १४. फुलपाखर
    १५. आळाशी (कविता)
    १६. चोच आणि चारा
    १७. अन्नजाल (कविता)
    १८. जलदिंडी
    १९. गे मायभू (कविता)
    २०. शब्दकोश (स्थूलवाचन)
    २१. संतवाणी

    Post a Comment

    Thanks for Comment

    Previous Post Next Post