स्थूलवाचन शब्दकोश स्वाध्याय इयत्ता ८ मराठी | Shabdkosh Swadhyay Marathi

स्थूलवाचन शब्दकोश स्वाध्याय इयत्ता ८ मराठी | Shabdkosh Swadhyay Marathi

स्थूलवाचन शब्दकोश स्वाध्याय इयत्ता ८ मराठी | Shabdkosh Swadhyay Marathi

इयत्ता आठवी मराठी शब्दकोश मराठी स्वाध्याय | शब्दकोश म्हणजे काय

Q.1. नम्रता, अंबर, आलोक, वरद, वनिता, समीर, शर्वरी, शेखर, समिरा, मानसी, माधवी हे शब्द अकारविल्हे प्रमाणे लावा.
Solution:
अंबर, आलोक, नम्रता, माधवी, मानसी, वनिता, वरद, शर्वरी, शेखर, समिरा, समीर.पाड्यावरचा चहा इयत्ता आठवी स्वाध्याय । Padyavarcha chaha swadhyay
Q.2. तुम्हांला पाठातील एखादया शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही तो कसा शोधाल? सोदाहरण सांगा.
Solution:
अकारविल्हे म्हणजे ‘अ’ या अक्षरापासून लावलेला क्रम होय. उदाहरणार्थः ‘झुळूक’ हा दामोदर कारे यांच्या कवितेतील शब्द शोधायचा असेल तर शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून मूळचा शब्द शोधू. क्रियापदाचा मूळ धातू कोणता ते पाहू. च, छ, ज, झ या क्रमाने ‘झ’ ने सुरू होणारे शब्द काढून झ च्या बाराखडीत झ, झा, झि, झी, झु पर्यंत येऊन शब्दातील दुसरे अक्षर ‘ळ’ अकारविल्हेनुसार पाहू. अशा त-हेने सरावाने शब्द पहाणे सोपे होईल.

Q.3. शब्दकोशाचा तुम्हांला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा.
Solution:
शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो. त्यात प्रमाण उच्चार असतात. तेही आपणास कळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. संदर्भानुसार कोणता अर्थ घेणे उचित आहे ते कळू शकते. काही शब्दांचे अर्थ लिहून ही संकल्पना स्पष्ट होत नाही. त्याकरिता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही दिलेली असतात. त्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळतो. अशा प्रकारे शब्दकोश समर्पक अर्थ सांगतात.

Q.4. शब्दकोशासंबंधी खालील मुद्द्यांना धरून परिच्छेद तयार करा.
Solution:
(अ) शब्दकोशाचा उपयोग:

शब्दकोशात आपण नवीन शब्दांचे अर्थ पाहू शकतो. त्यात प्रमाण उच्चार असतात. तेही आपणास कळतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात. संदर्भानुसार कोणता अर्थ घेणे उचित आहे ते कळू शकते. काही शब्दांचे अर्थ लिहूनही संकल्पना स्पष्ट होत नाही. त्याकरिता अर्थाचे स्पष्टीकरण करणारी चित्रेही दिलेली असतात. त्यावरून त्या शब्दाचा अर्थ कळतो. अशा प्रकारे शब्दकोश समर्पक अर्थ सांगतात.

(आ) शब्दकोश पाहण्याची उद्दिष्टे:
भाषिक समृद्धीसाठी प्रत्येक शब्दाचा योग्य अर्थ माहित करून घ्यावा लागतो. त्यासाठी शब्दकोश पहाणे गरजेचे असते. प्रत्येक शब्दाचा अर्थ कळणे, त्या अर्थाच्या छटा समजणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत. शब्दकोश म्हणजे काय हे कळण्यासाठी तो प्रत्यक्ष पाहणे, शब्दकोश हाताळता येणे आवश्यक असते. शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात घेणे हे शब्दकोश पाहण्याचे उद्दिष्ट आहे.

Q.1. शाळेत येताना दोन मित्रांमधील शब्दकोशासंबंधी संवाद लिहा.
Solution:
दोन मित्रांमधील शब्दकोशासंबंधीचा संवाद खालीलप्रमाणे:

विनय: अरे विशाल, ‘गुण’ या शब्दाचा अर्थ तुला माहीत आहे?
विशाल: हो! अरे परीक्षेत आपणास ‘गुण’ मिळतात ना.
विनय: तू शब्दकोशात याचा अर्थ पहा. शब्द एक पण अर्थ अनेक असतात.
विशाल: खरंच रे! आई नेहमी म्हणते दुसऱ्याचे चांगले ‘गुण’ घे.
विनय: होय. संदर्भानुसार अर्थ बदलतात. म्हणून शब्दकोश हाताळण्याची सवय असावी. मग अडचण येत नाही.
विशाल: चल आपण असे नवीन शब्द व त्याचे विविध अर्थ समजून घेऊ या.
विनय: मी तर म्हणतो आपण शब्द बँकच तयार करू. तुला काय वाटते?
विशाल: हो नक्कीच!

२०. शब्दकोश (स्थूलवाचन)

दिन – दिवस – day
दीन – गरीब – poor
धडा – पाठ – lesson
साम्य – सारखेपणा – similarity
शब्दकोश – शब्दसंग्रह – dictionary
उद्दिष्टे – प्रयोजन – aim
सहजतेने – सोपेपणा – easily
वर्णक्रम – अकारविल्हे – alphabetically
आदय – प्रथम – first
चटकन – त्वरीत – soon
व्युत्पत्ती – शब्दांचा उगम सांगणारे शास्त्र – etymology
समानार्थी प्रतिशब्द – पर्यायवाची – synonyms
धातू – मुळ क्रियापदाचे रूप – the root (of a verb)
क्रियापद – क्रियादर्शक शब्द – verb
जोडाक्षरे – संयुक्त वर्ण – a compound letter
समर्पक – योग्य – suitable
शब्दमांडणी – शब्दरचना – word formation

स्थूलवाचन शब्दकोश स्वाध्याय इयत्ता

(१) प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो, हे कळणे.
(२) शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे.
(३) शब्दाच्या अर्थाच्या छटा समजणे.
(४) ‘शब्दकोश’ ही संकल्पना समजणे.
(५) शब्दकोशाची गरज व महत्त्व लक्षात येणे.
(६) शब्दकोश हाताळता येणे.

काय असते शब्दकोशात-

(१) शब्दांचा संग्रह
(२) शब्दांचे प्रमाण उच्चार
(३) व्युत्पत्ती
(४) समानार्थी प्रतिशब्द
(५) संदर्भानुसार बदलणारे शब्दाचे अर्थ
(६) अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र
(७) प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर

शब्दकोश कसा पाहावा?
शब्दकोशात एखादा शब्द शोधताना ‘अकारविल्हे’ म्हणजे ‘अ’ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो. आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील एका कवितेचे उदाहरण पाहू.

 ‘‘अणूरेणूतुनि शब्द प्रगटति... ‘चला चला पुढती’ विज्ञानाचा प्रकाश आला घडे दिव्य क्रांती’’ आता समजा, आपल्याला ‘अणूरेणूतुनि’, ‘प्रगटति’, ‘विज्ञान’, ‘प्रकाश’, ‘दिव्य’ आणि ‘क्रांती’ असे सहा शब्द शोधायचे आहेत. 

पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून, सामान्यरूप वगळून मूळचा शब्दच शोधायचा असतो. ‘अणूरेणूतुनि’ या शब्दातला-तुनि हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो, म्हणजे ‘प्रगटति’ या शब्दाचा ‘प्रकट’ हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल. ‘अणूरेणू’, ‘प्रकट’, ‘विज्ञान’, ‘प्रकाश’, ‘दिव्य’, ‘क्रांती’ या सहा शब्दांचा आता आपण क्रम लावू. 

आपल्या वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहू. आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दांचा क्रम आधी लागेल. म्हणजे इथे ‘अणूरेणू’ हा शब्द आधी येईल. त्याचा पहिला क्रमांक, यानंतर उरलेल्या पाचपैकी कुठलं अक्षर आधी येईल? यात साहजिकच स्वरानंतर येणारे पहिले व्यंजन ‘क’, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल ‘क्रांती’. नंतर क्रम येईल ‘दिव्य’ मधील ‘द’ चा. मग येतील प्रकट आणि प्रकाश हे शब्द. 

सर्वांत शेवटी येईल विज्ञान. आता ‘प्रकट’ आणि ‘प्रकाश’ यांत ‘प्र’ नंतर कुठली अक्षरे येतात? तर ‘क’ आणि ‘का’ आता तुम्हीच सांगा. ‘क’

आणि ‘का’ यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल. अर्थात ‘क’ चा. म्हणून ‘प्रकट’ आधी येईल आणि ‘प्रकाश’ नंतर. मग आता आपला क्रम तयार झाला. ‘अणूरेणू’, ‘क्रांती’, ‘दिव्य’, ‘प्रकट’, ‘प्रकाश’, ‘विज्ञान’. आहे ना सोपे? यात ‘क्रांती’, ‘प्रकट’, ‘प्रकाश’ यांमध्ये पहिले अक्षर जोडाक्षर आहे. ते कसे शोधायचे? 

तर ‘अ’ पासून ‘औ’ पर्यंतचे शब्द संपले, की जोडाक्षरे सुरू होतात; म्हणजे ‘क’ पासून ‘कौ’ पर्यंतचे शब्द संपले, की जोडाक्षरे सुरू होतील. त्यात क्+र=क्र शाेधायचा, मग क्रा शोधायचा, त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे. तेव्हा आपल्याला ‘क्रांती’ सापडेल. आता तुम्ही स्वत: शब्दकोशात शब्द पाहायचा सराव करा. 

टीप : ‘क्ष’, ‘ज्ञ’ यांचा क्रम अकारविल्हे लावताना ‘ळ’ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो. शब्दकोश पाहण्याची, हाताळण्याची सवय लागली, की शब्दाचे अर्थ व मोल तुम्हांला कळेल. योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल. समर्पक शब्दमांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे.

 या साधनाचे महत्त्व जाणा. तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात. भाषिक समृद्धीच्या वाटचालीत शब्दकोशाचे महत्त्व जाणावे, यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल. 

स्थूलवाचन शब्दकोश स्वाध्याय इयत्ता ८ मराठी | Shabdkosh Swadhyay Marathi 

Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
१. भारत देश महान (गीत)
२. माझ्या देशावर माझे प्रेम आह
३. लाखाच्या...कोटीच्या गप्प
४. नव्या युगाचे गाणे (कविता)
५. सुरांची जादूगिरी
६. असा रंगारी श्रावण (कविता)
७. अण्णा भाऊंची भेट
८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९. विद्याप्रशंसा (कविता)
१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
१२. गोधडी (कविता)
१३. पाड्यावरचा चहा
१४. फुलपाखर
१५. आळाशी (कविता)
१६. चोच आणि चारा
१७. अन्नजाल (कविता)
१८. जलदिंडी
१९. गे मायभू (कविता)
२०. शब्दकोश (स्थूलवाचन)
२१. संतवाणी

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post