असा रंगारी श्रावण कविता स्वाध्याय | Asa Rangari Shravan Swadhyay
प्रश्न १ ला: खालील चौकटी पूर्ण करा.
- रंगारी
- खेळगा
- गोपाळ
प्रश्न २. प्रश्न तयार करा.
(अ) 'श्रावण ' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा .
Solution:
रंग उधळीत येणारा रंगारी कोण ?
(आ) 'इंद्रधनुष्याचा बांध ' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा .
Solution:
श्रावणाने नभाला कोणता बांध घातला आहे ?
प्रश्न ३ : अर्थ लिहा.
(अ) रंगारी - रंगाचे काम करणारा कारागीर
(आ) सृष्टी - निसर्ग
(इ) झूला - झोका '
(ई) खेळगा सवंगडी
प्रश्न ४ था : श्रवण महिन्याची विविध रूपे.
- सृष्टीचा हिरवा देखावा
- रिमझिम सरी चे गाणे
- चित्राची मांडलेली पंगत
- पानाफुलांचे पातळ व फुलांची नक्षी
प्रश्न ५ : स्वमत.
(अ) 'जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत ,' या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा .
Solution:
कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या 'असा रंगारी श्रावण' या कवितेत श्रावण महिन्याच्या मोहक रूपांचे वर्णन । केलेले आहे. जून महिन्यात पावसाचा वेग वाढू लागतो, आषाढ महिन्याच्या खेळीमेळीनंतर श्रावणाचे सुंदर रूप आपल्याला पहायला मिळते. ऊन, पावसाच्या खेळाचा हा महिना, कधी कधी आभाळ मेघांनी पूर्ण झाकोळून जाते तर कधी लखलखीत ऊन पडते . तापल्या उन्हात पावसाच्या सरींनी वातावरणाला पुन्हा चैतन्य दिले जाते . असा हा श्रावणमहिना फुलांनीही सजून आलेला असतो . दरी, डोंगर, घाटमाथा, ओढे, आकाश या ठिकाणी निसर्गाची विविध रूपं पहायला मिळत असतात . ती चित्रांसारखीच वाटतात , प्रत्येक रूप छायाचित्रात वा चित्रात बंदिस्त करावे असं वाटत राहतं . इतका लोभसवाणा निसर्ग या महिन्यात पहायला मिळतो
(आ) नागपंचमी' आणि गोकुळाष्टमी या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दांत लिहा.
Solution:
श्रावण महिन्यात नागपंचमी व गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात . नागपंचमीचा सण बहीणभावाचे नाते सांगणारा असतो . अनेक स्त्रिया नागाला आपला भाऊ मानतात . शेतकरी मित्र मानतो, शेतकऱ्याचा रक्षक म्हणून सापाला पूजले जाते . यावेळी रानावनात स्त्रिया जातात, झुल्यावर झोके घेतात, गाणी गातात. त्या गाण्याला श्रावणं नादमय लय देतो तर दहीहंडी खेळण्यासाठी तरुण मुले उत्सुक असतात . आजूबाजूच्या वातावरणाचे अवघे 'गोकुळ होऊन जाते . 'गोविंदा रे गोपाळा' असे म्हणत लहान मुले झंडीने गोपाळकाला खेळतात या दहीदुधाच्या दहीहंडीत रमणारा तरुण स्वतःला श्रीकृष्ण समजायला लागतो . त्यांचे निसर्गाशी सण-उत्सवाशी एकरूप होणं ही आनंदाची गोष्ट आपल्याला अनुभवता येते .
(इ) कवितेतून व्यक्त झालेला रंगारी श्रावण तुम्हांला का आवडला ते तुमच्या शब्दांत सांगा .
Solution:
निसर्गामध्ये रंगांची उधळण करणाऱ्या श्रावणाला कवींनी रंगारी म्हटले आहे . हा रंगारी श्रावण प्रत्येक माणसाला, कवीला भुरळ घालणारा आहे . हा सृष्टीचा चित्रकार वाटतो कारण त्याचे प्रत्येक क्षणी, विविध ठिकाणी रंग वेगळे दिसतात, त्याचे रूप वेगवेगळे होते . हा साजिरा कलावंत आहे त्याच्या कलाकृतींनी तो सृष्टीत विविध कशिदा काढत राहतो .
श्रावणात डोंगरदरीतून, ओढ्यातून जलप्रवाह खळखळ वाहत असतात. हिरवाईने निसर्ग नटलेला असतो, वेली जोमाने वाढलेल्या असतात. पाने, फुले यांची नक्षी ठिकठिकाणी दिसत असते. अनेक सण-उत्सव या महिन्यात येतात त्यामुळे आनंदाला उधाण आलेले असते. ऊन-पाऊस यांचा 'पाठशिवणीचा खेळ चालू असतो त्यामुळे सगळ्यांची धावपळ होत असते. असा हा रंगाचा जादूगार असलेला श्रावण मला खूप आवडतो.
खेळूया शब्दाशी :-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावा :
(१) नदीशी-झाडांशी
(२) लाजल्या-सजल्या
(३) झाडाला-गाण्याला
(४) बांधतो-लपतो
झोका व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा.
- झोका : तुझ्या फांदीला बघ झुला मी बांधला.
- झाड : पण माझी फांदी म्हणजेच आहे एक झुला.
- झोका : खाली - वर, वर-खाली मी झोकात किती झुलतो !
- झाड : अरे, पण माझ्यामुळेच तू इतका खुलतो !
- झोका : मागे-पुढे आहे माझी ठेक्यावरती लय.
- झाड : मी नसेन तर होईल तुझा लगेचच विलय.
- झोका : तू तर आहेस एका जागी पूर्ण गाइलेला
- झाड : मी घट्ट आहे मातीत म्हणूनच तुझा झोका वाढलेला.
- झोका : तू एका जागी स्थिर, बघ मी किती गतिमान !
- झाड : नको धरूस फुकटचा हा व्यर्थ अभिमान !
- झोका : तू येतोस का झुल्यावर ? येईल तुला मजा.
- झाड : मी जर हललो जागेवरून तर तुलाच होईल सजा.
- झोका : नको, नको रे झाडा ! तू तर माझा मोठा भाऊ !
- झाड : आरामात झोके घे तू, आपण दोघे सुखात राह !
असा रंगारी श्रावण स्वाध्याय मराठी | इयत्ता आठवी | वर्ग आठवा
ऐश्वर्य पाटेकर (१९७७) : प्रसिद्ध लेखक, कवी. ‘भुईशास्त्र’ हा कवितासंग्रह आणि ‘जू’ हे आत्मकथन प्रसिद्ध. ‘भुईशास्त्र’ या
कवितासंग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिलाच ‘राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ यासह अन्य अनेक
पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
या कवितासंग्रहातील कवितांचा उडिया, हिंदी, ब हिं गं ाली, उर्दू आणि इग्रजी ं या भाषांत अनुवाद झालेला
आहे. २०१२ साली भारत सरकारच्या सांससां ्कृतिक मंत्रालयातर्फे चीन भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून निवड.
‘कविता-रती’, ‘अनुष्टुभ’, ‘साधना’, ‘किशोर’ यांसारख्या विविध नियतकालिकांतून कविता, कथा प्रसिद्ध झाल्या आहेत.
श्रावणात केवळ निसर्ग फुलून गेलेल निसर्ग ा नसतो; तर माणसाचे जीवनही सण, उत्सव आणि विविध क्रीडांनी गजबजून गेलेले
असते. श्रावणरगं ात सारेच रगून ज ं ातात. प्रस्तुत कवितेत श्रावण महिन्याच्या निसर्गातील निसर्गा विलोभनीय बदलांचे सदर व ुं र्णन केले आहे.
प्रस्तुत कविता ‘किशोर’, ऑगस्ट २०१७ या मासिकातून घेतली आहे.
असा रंगारी श्रावण कविता | असा रंगारी श्रावण इयत्ता आठवी स्वाध्याय|iyatta 8 vi marathi
असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो
सृष्टीचा गा चित्रकार हिर्वा देखावा रेखितो
कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत
जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत
नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी
रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी
वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या
पाना-फुलांचे पातळ थेंबाथेंबांनी सजल्या
झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला
देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला
पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा
दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा
पावसाचं घर कसं लख्ख उन्हात बांधतो
खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो
इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो
रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गांेदतो
असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो
हिर्व्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो