सुरांची जादुगिरी स्वाध्याय इयत्ता आठवी | Suranchi jadugari swadhyay iyatta aathvi
प्रश्न १ : चौकटी पूर्ण करा.
(अ) : गाणाऱ्या जात्याच्या आवाजही वैशिट्ये.
Solution:
(१) मंद, लयबद्ध, प्रौढ व दमदार आवाज .
(२) जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज .
(३) पीठ होताना सौम्य सूर .
प्रश्न २. एक किवा दोन शब्दात उत्तरे लिहा.
(अ) खेडे जिथे विसावते ते ठिकाण.
Solution:
निसर्गाची लडिवाळ मांडी .
(आ) खेड्याला दिलेली उपमा -
Solution:
रानफुले .
(इ) लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वादय
Solution:
दळणाचे जाते .
प्रश्न ३ : का ते लिहा
(अ) घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते, कारण....
Solution:
घरातल्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त होते ; कारण अर्धी जाग व अर्धी निद्रा अशी लेखकांची अवस्था झालेली असते आणि त्यातच अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा मिळालेला असतो .
(आ) कंटाळलेले वासरू टाहो फोडते, कारण..
Solution:
कंटाळलेले वासरू टाहो फोडते; कारण ते दुधासाठी आसुसलेले असते.
प्रश्न ४. खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा..
(अ) पहाटेला पुरती जाग आली नव्हती.
Solution:
क्वचित कुठेतरी एखादे काम सुरू झालेले असते. त्याचा फारसा आवाज येत नसतो. माणसाच्या हालचाली झालेल्या नसतात.
(आ) थोड्या वेळाने दिशांना आकार आला.
Solution:
काळोख विरळ होत गेला. प्रकाश हळूहळू पसरू लागला. सर्व दिशांकडील झाडे झुडपे दिसू लागली.
(इ) अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला .
Solution:
आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते. तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो.
प्रश्न ५ वा : योग्य जोड्या लावा.
(१) चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू - व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात
वादयवृंदासारखे वाटते .
(२) सकाळचे हे संगीत -वादयवृंदासारखे वाटते .
(३) एखादा पोपट - या संगीतात आपल्या सरांनी भर घालतो.
(४) गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातल्या घंटा म्हणजे - काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज.
(५) कोंबड्यांचा कॉक् - कॉक् असा - ठेका धरणारा आवाज.
प्रश्न ६ : आवाजाची सोबत ' ही संकल्पना तुमच्या शब्दांत
प्रश्न ६ : आवाजाची सोबत ' ही संकल्पना तुमच्या शब्दांत
Solution:
कधी कधी आपल्याला खुप शातता जाणवते. आपण त्या शांततेला नीरव शांतता म्हणतो. इंग्रजीत तिला ' पिन - ड्रॉप सायलेन्स ' म्हणतात. त्या वेळी आजूबाजूला आवाजाचा टिपूसही नसतो, असे आपण समजतो. पण हे अजिबात खरे नाही.
जर अचानक आवाजाला रगरूप प्राप्त झाले, तर आपल्या अवतीभोवती हजारो आवाज असून, आपण आवाजाच्या समुद्रातच राहत असल्याचे आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल. आपल्या अवतीभोवती प्रत्येक क्षणाला शेकडो आवाज अस्तित्वात असतात.
दिवसा किंवा रात्री कधीही एक प्रयोग करून पाहा. डोळे मिटून घ्या. स्वतः पूर्णपणे शांत राहा. आता जवळचे आवाज ऐकायचा प्रयत्न करा. तुम्हांला किती तरी आवाज ऐकू येऊ लागतील. आपल्याला कल्पनाही येणार नाही, इतके आवाज निर्माण होत असतात. आता दुरुन येणाऱ्या आवाजांवर लक्ष केंद्रित करा. दुरूनही खूप आवाज ऐकू येतात, हे लक्षात येईल.
थोडक्यात, आपण आवाजाच्या सोबतच राहत असतो. आवाजच नसतील तर आपले जगणे कठीण होईल. या पृथ्वीतलावर समजा सगळी माणसे नष्ट झाली आणि आपण एकटेच एक मानव म्हणून शिल्लक राहिलो, तर आपण फार काळ जगूसुद्धा शकणार नाही. आपल्याला आवाजाच्या सोबत राहावे लागते, आवाजाशिवाय आपण राहू शकत नाही.
प्रश्न ७ वा : दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजाचे वर्गीकरण करा.
प्रश्न ७ वा : दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजाचे वर्गीकरण करा.
ऐकावेसे वाटणारे आवाज :-
सकाळची शाळेतील प्रार्थना. चिमण्यांची चिवचिव, कबुतरांचा गुटरग, गाईचे हंबरणे, बकरीचा बेंबें, कपबश्यांची किणकिण, भाकरी थापण्याचा आवाज,
त्रासदायक वाटणारे:-
आवाज कुकरची शिट्टी, मिक्सरचा आवाज, किरकिया मुलाचे रडणे, कावळ्याचा आवाज, कुत्र्याचे भुंकणे, गाढवाचे ओरडणे, गॅजलेल्या बिजागरांचा आवाज, रहाटाचा कुर्र असा दीर्घ आवाज.
प्रश्न ८.भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधून लिहा.
प्रश्न ८.भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधून लिहा.
उदा., निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो
Solution:
(१) खेड्यातला दिवस हा जणू पायांत आवाजांचे अलंकार घालून जन्माला येत असतो.
(२) पहाटेला पुरती जाग आलेली नसते .
(३) त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ व दमदार आवाज छोट्या - मोठ्या ताना व हरकती घेत आसमंतात भरून जातो .
(४) अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लाभलेला असल्याने । घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्निल रूप प्राप्त झालेले असले
खेळूया शब्दाशी :-
विशेषण -----------विशेष्य
१) आसुसलेला ---------टाहो
२) मुलायम ------------स्पर्श
३) लडिवाळ ------------मांडी
४) भरभरीत -----------झाज
५) कर्रेबाज ------------तान
६) किरटा--------------आवाज
सुरांची जादुगिरी स्वाध्याय | इयत्ता आठवी मराठी | Suranchi jadugari swadhyay iyatta 8 vi
डॉ. द. ता. भोसले (१९३५) : प्रसिद्ध लेखक व अभ्यासू वक्. त्यांचे क ते था, कादबरी, ं समीक्षा, ललित असे विपुल लेखन
प्रसिद्ध आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, शेतमजूर, ग्रामीण संससं ्कृती, तेथील समस्या, ताणतणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्या
विविध कथांमधून प्रतिबिंबित होतात. त्याचबरोबर ग्रामजीवनातील सौंदर्य, माणसामाणसातील जिव्हाळा, निसर्ग या गोष्टी टिपणारे
ललित लेखनही त्यांनी केले आहे.
‘इथे फुलांना मरण जन्मता’, ‘खसखशीचा मळा’, ‘जन्म’, ‘पाऊस’ हे कथासंग्रह; ‘परिघावरची
माणसं’, ‘पार आणि शिवार’ हे ललित लेखन; ‘समीक्षा आणि संवसं ाद’,
‘साहित्य : आस्वाद आणि अनुभव’ ही समीक्षात्मक
पुस्तके; ‘शिक्षणातील अधिक-उणे’, ‘संस्कृतीच्या पाऊलखुणा’ व ‘चावडीवरचा दिवा’ ही अन्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना
‘महर्षी वि. रा. शिंदे पुरस शिं ्कार’, ‘भैरू रतन दमाणी पुरस्कार’ यांसा रख्या एकूण ५२ हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले
आहे.
ग्रामजीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संससं ्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज. तेथील निसर्ग सान्निध्यामुळे
निसर्गातील पशुपक्षी, झाडे, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज, हे जगण्यात आनद ं निर्माण करत
असतात. अशा विविध आवाजांचे सदर व ुं र्णन या पाठात लेखकाने केलेले आहे. प्रस्तुत पाठ हा ‘चावडीवरचा दिवा’ या ललितलेख
संग्रहातून घेतला आहे.
सुरांची जादुगिरी स्वाध्याय | suranchi jadugari swadhyay
निसर्गाच्या लडिवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा
जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो. तसाच नानाविध
सुरांच्या लकेरींनी मोहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक
खेडी नेहमी ताजी व टवटवीत रानफुलांसारखी असतात.
खेड्यातला दिवस हा जणू पायांत आवाजांचे अलंकार
घालून जन्माला येत असतो.
अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली नसते,
तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या
कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. रात्रीच्या
तीन-साडेतीनपासूनच ताे आपल्या कुर्रेबाज अन्नखरेल
तानांनी आसमंत भारून टाकायला प्रारंभ करत असतो.
हळूहळू या तानांची संख्या वाढत जाते.
सादाला प्रतिसाद
दिला जातो. एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली, की
त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग
एकच कोलाहल सुरू होतो. एका विशिष्ट लयीत अन्
ठेक्यात पहाटेला घातलेली ही साद अंथरुणावर पडल्या-
पडल्या मनात
मुरवायला मोठी छान
वाटते. मनातल्या मनात
आपणही त्याला
नि:शब्द मनाने साद
घालत असतो.
त्यानंतर संगीताचे
दुसरे वाद्य हळूहळू
वाजायला लागते, त
म्हणजे घरातले दळणाचे जाते. घराघरांतल्या बायका
कोंबड्याच्या बांगेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या
प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत, झोपलेल्या
जात्याला गायला लावतात. त्या जात्याचा मंद, लयबद्ध,
प्रौढ अन्दमदार आवाज छोट्या-मोठ्या ताना व हरकती
घेत आसमंतात भरून जातो.
घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज,
पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर
जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आईच्या
ऊबदार अन् मंदपणे हालणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून
ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो.
पापण्या जड झालेल्या असतात.
अर्धवट जाग आलेली
असते. अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा
लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्निल रूप
प्राप्त झालेले असते. त्या ओळखीच्या असूनही अनोळखी
वाटत असतात अन्त्यात जात्याचे संगीत साऱ्या अंगावर जात्यातून पीठ भुरुभुरु पडावे तसे, सांडत असते. या
संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ
दिलेली असते. त्यातून तिच्या मनातली लपून बसलेली
स्वप्ने प्रकट होत असतात अन्त्यामुळे आपण आपले उरत
नाही. मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत
नाही. या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार
मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो.
त्याची खुमारी
केवळ शब्दातीत.
थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो.
अवतीभवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते.
त्या वेळी मात्र गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने
आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ
फुटतो. कावळ्यांचे भरभरीत आवाजही पानाफांद्यांतून
सांडत असतात. व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा
छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिव सुरू झालेली
असते. त्या घराच्या भिंतीवर, अंगणात, एखाद्या झाडाच्या
फांदीवर बसून सकाळची प्रार्थना म्हणतात.
मध्येच झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत
एखादा पोपट या संगीतात आपल्या सुराची भर घालत
असतो. सकाळचे हे संगीत वाद्यवृंदासारखे वाटते.
परस्परांना पूरक असणारे अन्तरीही भिन्नत्व असणारे हे
नानाविध आवाज परस्परांत इतके कालवले जातात, की
त्यांची एक वेगळीच मैफिल निर्माण होते. याच वेळेला
एखाद्याने पार्श्वसंगीत द्यावे, तसे काही आवाज त्यामध्ये
मिसळत जातात. त्यात एखाद्या कंटाळलेल्या वासराचा
दुधासाठी आसुसलेला टाहो असतो, बकरीची भरभरीत
झांज मध्येच वाजते. गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या
गळ्यातल्या घंटा काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज
व्हावा तशा वाजत असतात.
त्यातच मग कासेखाली
बसलेल्या बाईच्या गुडघ्यातले दुधाचे भांडे एकतारीचा सूर
छेडत असते. धारेच्या या संगीतातही एक जादू असते.
मोकळ्या भांड्यात सांडणाऱ्या धारेचा आवाज गाण्याला
प्रारंभ करताना निघणाऱ्या सुरासारखा असतो. मग भांडे
जसजसे भरत जाते, तसतसा आवाजात लक्षणीय फरक
पडत जातो. गळ्याशी दूध आल्यावर मग याच धारेचा
आवाज गंभीर अन्वजनदार बनतो. त्या वेळी पलीकडच्या
विहिरीवरील चाक वाजत असते. एखादी बाई दोराला घागर
बांधून ती ओढत असते. त्या वेळी किरट्या आवाजात
तक्रार करणारे ते चाक सहज कुणाचेही लक्ष वेधून घेत
असते. कुठेतरी एखादी मोटही त्या सुरात आपला सूर
मिसळत असते. तो कुईकुई करणारा आवाज एखाद्या
अशक्त पोराने किरकिरावे तसा वाटतो.
मात्र या आवाजाकडे
आपले लक्ष जातेच जाते.
आसमंतात सुरांचे, शब्दांचे आणि आवाजांचे
संमेलनच भरलेले असते. गावाला जाग आलेली असते.
शाळेतली प्रार्थना मंदपणे आपल्या कानांवर येत असते.
जनावरांचे हंबरणे मध्येच वातावरणाला भारभूत करते.
लहान मुलांचा आवाज वातावरणाला छेदून अवकाशात
जात असतो. घरातल्या भांड्यांचे आवाज, धुण्याचा
आवाज, भाकरी थापण्याचा आवाज, काटक्या माेडण्याचा
आवाज, कोरड्याशाला दिलेल्या फोडणीचा तड्तड्
करणारा आवाज,
ओठ मिटून रवीचे तोंड दाबून ठेवणाऱ्या
ताक घुसळणाऱ्या माठाचा आवाज, त्याबरोबर स्स्स्स्
असा आवाज काढणाऱ्या गौळणीचा आवाज, नानाविध
पशुपक्ष्यांचे आवाज, दूर अंतरावरून घुमतघुमत येणारा
झऱ्याचा आवाज, ओढ्याची खळखळ, पानांची सळसळ,
मध्येच फाटकन येणारा चाबकाचा आवाज, रस्त्यावर
अकारण भुंकणाऱ्या कुत्र्यांचा आवाज, किडामुंगी
टिपण्यासाठी बाहेर पडणाऱ्या कोंबड्यांचा कॉक्-कॉक्
असा ठेका धरणारा आवाज, देवळातल्या नानाविध
आकारांच्या घंटांचा आवाज, नवजात कोकराचा मधल्या
पट्टीचा आवाज, स्वयंपाक करणाऱ्या आईसमोर आठवून
आठवून रडत बसणाऱ्या लेकराचा आवाज, जनावरांच्या
हंबरण्याचा, त्यांना गायरानात नेताना येणारा शेकडो खुरांचा
आवाज, घरकामात दंग झालेल्या एखाद्या सुनेच्या
बांगड्यांचा आवाज! किती म्हणून सांगावेत?
आपण कानांत प्राण आणून ऐकल्यावर आवाजांची
दुनिया आपल्याभोवती फेर धरू लागते. हे सारे आवाज
एकमेकांत कालवलेले असतात. वातावरणाला जिवंतपणा
आणतात. आपल्या मनांना लसलसत्या सुरांचे पान
आपोआप अंकुरलेले असते. आपले मनही मग आपोआप
या नानाविध सुरांच्या संमेलनात तरंगत जाते.