आळशी स्वाध्याय इयत्ता आठवी । Alashi marathi kavita
प्रश्न १ ला : खालील आकृती पूर्ण करा .
Solution:
- सगळीकडे पाणीच पाणी होते.
- मातीत चिखल होतो.
प्रश्न 2 रा : हे केव्हा घडते ते लिहा.
Solution:
(अ) पाखरांचा थवा येतो - पीक आल्यानंतर
(आ) तान्हा रडत उठतो - बाप आरोळी मारतो तेव्हा
प्रश्न ३ रा : कवितेतील शेतकऱ्याच्या कामाच्या कृतींचा तीं ओघतक्ता तयार करा.
Solution:
- अनवाणी पायाने उन्हातले काम करणे.
- पाऊस आल्यावर शेतात पेरणी करणे.
- पेरणीनंतर शेतीची निगा राखणे.
- अत्यंत मेहनतीने पाटातून शेतीला पाणी देणे.
- कणसाला दाणे आल्यावर पाखरांना हाकलणे.
- जोंधजों ळ्याची काढणी करणे.
प्रश्न ४ था : कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
Solution:
- उठतो - फुटतो
- फाटतो - फुटतो
- ओला - आला
- वाटतो - फुटतो
- करतो - भरतो
- तुटतो - फुटतो
प्रश्न ५ वा : स्वमत लिहा.
(अ) 'भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फटतो' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
Solution:
शेतकरी दिवस-रात्र उन्हात,पावसात,थंडीत शेतामध्ये राबतो कष्टतो. कष्ट करत असताना त्याच्या भाळावर म्हणजेच कपाळावर घाम येतो आणि हा घाम पाहुन जणू काय नभाला म्हणजेच आभाळाला पान्हा फुटतो. लहान बाळ रडत असले की आईला दुधाचा पान्हा फुटतो. आईचे दुध आपोआपच वाहू लागते. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा घाम पाहिला की आभाळाला पान्हा फुटतो आणि आपोआपच पाऊस पडायला लागतो.
(आ) 'शेतकरी जगाचा पोशिंदा आहे' हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Solution:
आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज असते आणि हे अन्न आपल्याला मिळते ते शेतातून. जेव्हा शेतात शेतकरी राबतो कष्टतो तेव्हाच शेतामध्ये पीक उगवले जाते. त्यातून मिळालेले धान्य आपण अन्न म्हणून वापरतो. म्हणूनच खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा म्हणजेच जगाला जगवणारा, जगाला अन्नधान्य पुरवणारा हा शेतकरी आहे.
गंमत शब्दाची :-
कणसाचा जन्म ताटातून होतो. आम्ही पाहुण्यांच्या जेवणासाठी ताट तयार केले. या दोन वाक्यांत 'ताट' शब्दाचे दोन अर्थ आलेले आहेत. याप्रमाणे काही शब्दांचे दोन किंवा अधिक अर्थ असतात. असे जास्तीत जास्त शब्द शोधा. त्यांचा भिन्न भिन्न
अर्थ स्पष्ट करणारी वाक्ये लिहा. वर्गात वाचून दाखवा.
(१) माझी खेळात हार झाली.
(२) जिंकलेल्या मुलांच्या गळ्यात हार घालण्यात आला.
(१) मी माझे दोन्ही कर देवासमोर जोडले.
(२) सोनू लवकर-लवकर अभ्यास पूर्ण कर
स्वाध्याय वर्ग आठवा मराठी, स्वाध्याय आळाशी, swadhyay class 8, Alashi swadhyay
हनुमंत चांदगुड (१९७७) : े प्रसिद्ध कवी व गीतकार. शेती, निसर्ग, ग्रामीण भाग व शेतकरी हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय.
विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक यांसाठी कथा, कविता व ललितलेखन. अनेक चित्रपट व अल्बम यांसाठी गीतलेखन.
याशिवाय त्यांचा ‘काकरी’ हा कवितांचा अल्बम प्रसिद्ध आहे. त्यांचा ‘भेगा भुईच्या सांदताना’ हा काव्यसंग्रह प्रकाशित असून या
काव्यसंग्रहाला आजपर्यंत १७ पुरस्कार मिळाले आहेत.
शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून नभालाही पाझर फुटतो. त्यांच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते. भरघोस पीक यावे
यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखलपाण्यात राबत असतात. त्यामधून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालनपोषण होते.
त्यामुळे आपण शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहिले पाहिजे, हे या कवितेतून स्पष्ट होते. प्रस्तुत कविता ‘भेगा भुईच्या सांदताना’ या
काव्यसंग्रहातून घेतली आहे.
alashi kavita 8th swadhyay | आळाशी कविता इयत्ता आठवी स्वाध्याय
बा अनवाणी पायाचा ठसा मातीत उठतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...
नभ पाणी पाणी होतो, माती चिखल होतीया
कुणब्याच्या जीवनाची मग उकल होतीया
भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...
हातापायाला चिखल बाप घामामधी ओला
पीक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला
बाप आरोळी मारता तान्हा रडत उठतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो..
बाप रगात होऊन रोज पाटातून व्हातो
मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो
दाणे कणसाला येता बाप हुरडा वाटतो
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...
येता भरात जोंधळा बाप काढणी करतो
स्वत: राहून उपाशी पोट जगाचं भरतो
जातो आळाशी होऊन तरी ‘आळा’ का तुटतो?
भाळावरल्या घामाचा पान्हा नभाला फुटतो...