लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय | Lakhachya kotichya gappa swadhyay

लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय | लाखाच्या कोटीच्या गप्पा प्रश्न उत्तर

लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय | Lakhachya kotichya gappa

लाखाच्या कोटीच्या गप्पा इयत्ता आठवी स्वाध्याय | लाखाच्या कोटीच्या गप्पा वर्ग आठवा स्वाध्याय

लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय | Lakhachya kotichya gappa

लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय | Lakhachya kotichya gappa

Q २ योग्य विधान शोधा. 

उत्तर 
[१] लेखकाची नागपूर-दादर पॅसेंजर गाडी होती.
[२] म्हातारा व तरुण करोडपती होते.
[३] तरुण वकिली करायला परदेशात जात होता.
[४] दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण !
योग्य विधान  :- दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण !

[१] म्हातारा व तरुण दोघांच्या बॅगेत खूप पैसे होते.
[२] म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते.
[३] म्हातारा व तरुण एकमेकांचे नातेवाईक होते.
[४] म्हातारा व तरुण बेजबाबदार होते.
योग्य विधान :-म्हातारा व तरुण दोघेही कलाकार होते.


Q ३ रा : तुमच्या शब्दात उत्तर लिहा.  


१] समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाआधारे लिहा.
Solutions :
भामट्यांनी बॅगा पळवल्या हे पाहिल्यावर समोरच्या बाकावरच्या प्रवाशाला काका-पुतण्याबद्दल सहानुभूती वाटली आणि आश्चर्यसुद्धा वाटले. 

त्या प्रवाशाचे म्हणणे मला तर पूर्णपणे पटले. एक तर प्रवासामध्ये उचले, भुरटे चोर संधी शोधतच असतात. खरेतर सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्याकडे काय काय आहे, विशेषतः पैसा-अडका किती आहे, मौल्यवान वस्तू किती आहेत, हे मोठ्याने बोलून सांगू नये. 

पोलिसांमध्ये तक्रार देण्याची त्या प्रवाशाने केलेली सूचना मला पटली. अशा वेळी ताबडतोब पोलिसांची मदत घेतली पाहिजे, विशेष म्हणजे कोणताही परिचय नसताना त्या प्रवाशाने त्या काका-पुतण्याला खर्चासाठी पैसे देऊ केले. यातून त्या प्रवाशाचा दयाळू स्वभाव प्रत्ययाला येतो. कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा पळवल्यावरही काका-पुतणे शांत कसे, हे आश्चर्य वाटण्यासारखे होते. त्या प्रवाशालाही तसे आश्चर्य वाटले, यात नवल काहीच नाही.


२] पाठाचा शेवट वाचण्यापूरवी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा.
Solutions : सुरुवाती सुरुवातीला ते दोघेजण काका-पुतण्याच आहेत, असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहेत. काकांबद्दल आदर वाटू लागला. पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी, असे वाटू लागले. पुढे मात्र लाखो-कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात. 

सुरुवाती सुरुवातीला ते दोघेजण काका-पुतण्याच आहेत, असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहेत. काकांबद्दल आदर वाटू लागला. पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी, असे वाटू लागले. पुढे मात्र लाखो-कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात. 

त्यातही विशेष म्हणजे दहा कोटी, ऐंशी लाख, चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवासातल्या बॅगेमध्ये मावणे शक्यच नाही. कोणताही शहाणा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वेप्रवासात घेऊन जाणे शक्यच नाही. त्यामुळे सगळे खोटे वाटले. लोकांची केवळ गंमत करावी, म्हणून ते अशा गप्पा मारीत असावेत, असे वाटू लागले. पण शेवटी सत्याचा उलगडा होतो.


खेळूया शब्दांशी  

अ] खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा :
[i] “राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना ?”
Solutions :  Qार्थी वाक्य

[ii] “तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. “
उत्तर  विधानार्थी वाक्य

[iii] “तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये.”
Solutions :  आज्ञार्थी वाक्य

[iv] “म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार!”
Solutions : उद्गारार्थी वाक्य


आ] खालील तक्ता पूर्ण करा.  

शब्द मूळ शब्द सामान्यरूप 
१] भावाला भाऊ भावा 
२] शाळेतून शाळा शाळे 
३] पुस्तकांशी पुस्तक पुस्तकां
४] फुलाचा फुल फुला 
५] आईने आई आई


इ] खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा .  

१] गप्पा रंगणे. 
वाक्य :- दहा वर्षांनी घरी आलेल्या मामाशी रवीच्या छान गप्पा रंगल्या.

२] पंचाईत होने.
वाक्य : – या वर्षी सहलीला जायचे नाही असे सरांनीच म्हटल्यावर सर्व विद्यार्थ्यांची पंचाईत झाली.


ई] खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे वचन बदलनी वाक्ये पुन्हा लिहा : 

१] त्यांचा खेळातील दम संपत आला.
Solutions :   त्याचा खेळातील दम संपत आला.

२] कॅप्टनने खेळाडूला इशारा दिला.
Solutions : कॅप्टनने खेळाडूंना इशारा दिला.

३] क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती.
Solutions :  क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती. 

पाठ तिसरा लाखाच्या कोटीच्या गप्पा | lakhachya kotichya gappa swadhyay

वसंत जोशी : कथाकार, कवी, विनोदी साहित्याचे लेखक. त्यांनी कथा आणि कवितांबरोबर लोकनाट्, बालनाट् ये आये णि बालकुमार वाङ्मयाचेही लेखन केले आहे. त्यांच्या कथांचे तमिळ आणि कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘बिनबियांच्या गोष्टींचे संग्रह’ लोकप्रिय आहेत. बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग काल्पनिक असले तरी त्यामधील व्यक्ती मात्र खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहेत. थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निखळ विनोदनिर्मिती हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून या विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरले आहेत. प्रस्तुत पाठात दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनमध्येबिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. त्यानंतर त्यांच्यात लाखा...कोटींच्या गप्पा सुरू होतात; परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपणाला हसू आवरत नाही. प्रस्तुत पाठ ‘हास्यकल्लोळ-बिनबियांच्या गोष्टी’ या संग्रहातून घेतला आहे. 

lakhacha koticha gappa | lakhacha koticha gappa prashn uttar

इंजिनमध्येबिघाड झाल्यामुळे नागपूर-दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबून राहिली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येरझारा घालू लागले. कुणी बुकस्टॉलवरची वर्तमानपत्रं घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे एक तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते एवढ्या मोठ्यानं हसत आणि बोलत होते, की त्यांचा शब्द नि शब्द दूरवर ऐकू जात होता. त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण!

म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, ‘‘राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना?’’

‘‘असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले. चार सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ, तर मी आताच वापरायला काढलं आहे.’’

‘‘राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे. दहा हजार मोजलेत. पिटस्बर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला पन्नास हजार रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन! पण बेटा सांभाळून जायचं बरं का!’’

‘‘पण काका, तुमच्या पन्नास हजारांत इंग्लंडला मी तीन वर्षे कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान पंधरा लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. कोट्यधीपती काकाचा हा पुतण्या कुठल्यातरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हांला चालेल का?’’ ‘‘नको... नको... तू एक स्वतंत्र बंगलाच घे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी.’’ ‘‘त्यासाठी काका वर्षाला किमान पंधरा लाख याप्रमाणे तीन वर्षांसाठी पंचेचाळीस लाख लागतील.’’

‘‘त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद ऐंशी लाख आहे. आत्ताच देऊ का?’’ ‘‘नको. गाडीत बसल्यावर द्या! पण काका एक, मोटारही मला लागेल. रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार, नाही का? मी चालत कसा जाणार? 

वीस लाख तरी त्यासाठी लागतील!’’ ‘‘ती रक्कमही आता याच बॅगेत आहे. बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे!’’ ‘‘काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान एक वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने तिनं मला परवाच दिले. ते आहेत आता या माझ्या बॅगेत!’’ 

‘‘राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे दोन मळे आणि सफरचंदाचा एक मळा विकून जे १० कोटी आले तेपण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवले आहेत.’’ त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. 

ते दोन प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. पाच-दहा मिनिटांतच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. केव्हातरी कल्याण स्टेशन आलं. त्या दोन प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. त्यानं आपल्या सीटखाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं. बापरे! त्याची बॅग तिथं नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं, 

‘‘ए, माझी बॅग कोणीतरी पळवली. तुझीपण दिसत नाही.’’ म्हातारा प्रवासीपण दचकून जागा झाला. ‘‘आता काय करायचं?’’ दोघंही किंचाळले. समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, ‘‘तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं थ्री टायरमधून प्रवास करणंच योग्य नाही. इगतपुरी स्टेशनवर 

तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगांमधून किती रकमा आहेत हे उघड उघड मोठ्यानं बोलत होता, तर...ते कुणीतरी भामट्यानं ऐकलं असणार, त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या. आता बसा हरी हरी करत. तुमची जाम नुकसानी झाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा. बॅगा अजून सापडतील! आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की मी देऊ?’’ ‘‘नको...नको...पैशाची गरज नाही. माझ्याकडे तीन-चार रुपये आहेत. 

त्यात आमचा चहाचा खर्च भागेल.’’ तो तरुण प्रवासी म्हणाला. ‘‘पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचाईत होणार. त्यात माझ्या मिश्या होत्या. आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिश्या घ्याव्या लागतील. म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार!’’

 तो म्हातारा प्रवासी म्हणाला. ‘‘म्हणजे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हांला नव्या मिश्या कशाला लागतात? कोट्यवधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे?’’ समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्यानं हसले. 

तरुण प्रवासी म्हणाला, ‘‘अहो, आम्ही नाटकवाले. मी राजा गोसावी आणि हे शरद तळवलकर... आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचंसामान होतं. बाकी काही नव्हतं.’’ ‘‘मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखाच्या... कोटीच्या गप्पांचं काय?’’ ‘‘ते तुम्ही खरंच मानलंत की काय? अहो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. 

lakhacha koticha gappa marathi |  लाखाच्या कोटीच्या गप्पा.

 • लाखाच्या कोटीच्या गप्पा
 • ३. लाखाच्या ... कोटीच्या गप्पा
 • पाठ तिसरा लाखाच्या कोटीच्या गप्पा
 • लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय
 • लाखाच्या कोटीच्या गप्पा इयत्ता आठवी स्वाध्याय
 • लाखाच्या कोटीच्या गप्पा पूर्ण स्वाध्याय
 • इयत्ता आठवी लाखाच्या कोटीच्या गप्पा
 • धडा तिसरा लाखाच्या कोटीच्या गप्पा
 • पाठ तिसरा लाखाच्या कोटीच्या गप्पा स्वाध्याय
 • लाखाच्या कोटीच्या गप्पा प्रश्न उत्तर

lakhacha koticha gappa marathi | लाखाच्या कोटीच्या गप्पा


Navneet Marathi Digest std 8th Pdf Download मराठी इयत्ता आठवी स्वाध्याय पाठ/कविता
१. भारत देश महान (गीत)
२. माझ्या देशावर माझे प्रेम आह
३. लाखाच्या...कोटीच्या गप्प
४. नव्या युगाचे गाणे (कविता)
५. सुरांची जादूगिरी
६. असा रंगारी श्रावण (कविता)
७. अण्णा भाऊंची भेट
८. धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
९. विद्याप्रशंसा (कविता)
१०. लिओनार्दो दा व्हिंची (स्थूलवाचन)
११. स्वामी विवेकानंदांची भारतयात्र
१२. गोधडी (कविता)
१३. पाड्यावरचा चहा
१४. फुलपाखर
१५. आळाशी (कविता)
१६. चोच आणि चारा
१७. अन्नजाल (कविता)
१८. जलदिंडी
१९. गे मायभू (कविता)
२०. शब्दकोश (स्थूलवाचन)
२१. संतवाणी
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url