अव्ययीभाव समास मराठी | Avyayibhav Samas in Marathi
अव्ययीभाव समास म्हणजे काय?
जेव्हा समासातील पहिले पद अव्यय असून ते प्रधान असते व सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्यय असतो तेव्हा समासास अव्ययीभाव समास (
Avyayibhav Samas ) असे म्हणतात.
अव्ययीभाव समासातील शब्द बहुदा स्थळ, काळ व रितीवाचक असतात.
अव्ययीभाव समासाची वैशिष्ट
- पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असत
- संपूर्णसामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतमध्ये अव्यय म्हणतात.
- ‘जागोजागी’ या शब्दात अव्यय दिसत नसले, तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो म्हणून या शब्दाचा समावेश अव्ययीभाव समासात होतो. उदा., जागोजागी-प्रत्येक जागी
खालील उदाहरणे अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा.
(अ) गरजूंना यथाशक्ती मदत करावी.
(आ) त्या शहरात जागोजागी वाचनालये आहेत.
(इ) क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण कष्ट सोसले.