बालसाहित्यिका गिरिजा कीर स्थूलवाचन स्वाध्याय | Balsahityika girija kir Swadhyay

बालसाहित्यिका गिरिजा कीर स्थूलवाचन स्वाध्याय | Balsahityika girija kir Swadhyay

विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी इयत्ता दहावी चे सर्व प्रकारचे प्रश्न उत्तर घेऊन आलो आहेत आजच्या या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बालसाहित्यिक गिरिजा कीर यांचे स्थूलवाचन याचा स्वाध्याय आहेत बघणार आहोत आपल्याला अजून कोणत्या धड्याचे प्रश्न उत्तर हवे असतील तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की काय चला तर पाहूया बालसाहित्यिक गिरिजा कीर स्थूलवाचन स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी


आकृत्या पूर्ण करा.

कृती | Q (१) (अ) | Page 19
1) साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
SOLUTION
१) माणुसकीचे दर्शन घडते.
२) काठवाचकांना खिळवून ठेवतात.
३) वास्तववादी चित्रणावर भर.

2) साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये
SOLUTION
१) प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडलेला आहे.
२) मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा.
३) महान लोकांचे कार्य समजावून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती.

टिपा लिहा.

कृती | Q (२) (अ) | Page 19
1) गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष.
SOLUTION
गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्यनिर्मिती केली. त्यांनी नऊ ते बारा वर्षे वयोगटासाठी आणि खास बालवर्गासाठी (सुमारे पाच ते नऊ वर्षे) नाटिका लिहिल्या. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या, सोप्या व जोडाक्षरविरहित बालनाटिका देण्याचाही प्रयत्न केला. गिरिजाबाईंच्या बालनाटिकांचे त्या काळाच्या तुलनेत एक खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारावर आधारित कथानके आवडतात, असा समज असतो. गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधला प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहे, असे वाटत राहते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

2) ‘यडबंबू ढब्बू’ या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद.
SOLUTION
'कोणाला दुःखी ठेवू नये' असा आईने ढब्बूला उपदेश केला होता. ढब्बूने तो शिरोधार्य मानला. व्याह्यांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना अर्थातच प्रचंड आनंद झाला. पण घरातली मंडळी खूप कातावली. आईचा उपदेश ढब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसेच. त्यांना तरी दुःखी का ठेवावे, असा व्यापक विचार त्याने केला. पण लोक जेव्हा असा व्यापक विचार मांडतात, तेव्हा त्यांच्या मनात खराखुरा व्यापक विचार नसतो. लोक संस्कृत विचार करतात. सर्वांशी प्रेमाने वागावे, असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातली माणसे असतात किंवा फार फार झाले तर नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी इत्यादी असतात. जात-धर्म यांचा विचार करू नये, असे त्यांच्या मनात नसते. यातून विसंगती निर्माण होते. ढब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती दाखवून देतो. त्यामुळे विनोद निर्माण होतो.

3) ‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा.
SOLUTION
आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. तो एका गृहस्थाचे पाकीट मारतो.
पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्य स्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशांमुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो. या विचाराने तो व्याकूळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कृतीमुळे कोणाचातरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणाच होय, ते त्याला जाणवते. आपली जशी आई आहे, तशीच दुसऱ्या व्यक्तीलासुद्धा आई असते. त्या व्यक्तीलासुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःचे आईवरील प्रेम लक्षात घेतो; दुसऱ्याच्या मनाचा विचारच करीत नाही, हे मधूच्या लक्षात येते. यातून त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते.

4) साहित्यकृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे, तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
SOLUTION
आपण एखादया कलाकृतीचा आस्वाद घेतो. आपल्याला ती कलाकृती खूप आवडते. इतरांनीही त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, असे आपल्याला मनोमन वाटते. अशा वेळी आपण बोलतो किंवा लिहितो तो रसास्वाद असतो. रसास्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात :

कलाकृतीचा आशय किंवा कथानक, व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत. त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती असली पाहिजे. लेखकाची भाषाशैली, वर्णनशैली वाचनीय व प्रभावी असली पाहिजे. कथानक उत्कंठा वाढवणारे असले पाहिजे.
आपल्या समोरची कलाकृती ही कविता असेल तर त्या कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्याला अनुसरून भाषा, अलंकार, प्रतिमा-प्रतीके इत्यादी आहेत का, हेसुद्धा पाहिले पाहिजे. कवितेतून उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजेत.
कथा, कादंबरी वा नाटक असा कोणताही साहित्यप्रकार असो, साहित्यातून व्यापक मानवी मूल्ये प्रकट झाली पाहिजेत. उच्च, उदात्त असे संदेश साहित्यातून मिळायला हवेत. या सर्व गोष्टी आपल्या रसास्वादामध्ये असल्या पाहिजेत.

भाषासौंदर्य

Q १. | Page 20

1) यात डावीकडील चौकटीत शब्द दिलेला आहे. त्याच अर्थाचे दोन अक्षरी जोडाक्षर असलेले शब्द तुम्हांला ओळखायचे आहेत. त्या शब्दातील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून दोन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते लिहिण्यासाठी तुम्हांला दोन चौकटी दिलेल्या आहेत. शब्द ओळखण्यासाठी त्यांचे सूचक अर्थ उजवीकडील दोन चौकटीत दिले आहेत.

छान____________चामखीळ, अंगावरील तीळ
______सल्ला, अभिप्राय

SOLUTION

छानमस्तमसचामखीळ, अंगावरील तीळ
मतसल्ला, अभिप्राय

2) भाषासौंदर्य | Q २. | Page 20

खरे____________ढीग
______रजनी

SOLUTION

खरेरास्तरासढीग
रातरजनी

3) भाषासौंदर्य | Q ३. | Page 20

कविता____________गेरू, तांबडी माती
______प्रश्नार्थक अव्यय

SOLUTION

कविताकाव्यकावगेरू, तांबडी माती
कायप्रश्नार्थक अव्यय

4) भाषासौंदर्य | Q ४. | Page 20

प्रशस्त, टोलेजंग____________धास्ती
______संसार

SOLUTION

प्रशस्त, टोलेजंगभव्यभय धास्ती
भवसंसार

5) भाषासौंदर्य | Q ५. | Page 20 

सारखेपणा____________वेदाचे नाव, गोड बोलणे
______मलई

SOLUTION

सारखेपणासाम्य  सामवेदाचे नाव, गोड बोलणे
सायमलई

6) भाषासौंदर्य | Q ६. | Page 20

पसंत____________गळा, आदर
______आई

SOLUTION

पसंतमान्य  मानगळा, आदर
मायआई


बालसाहित्यिका-गिरिजा कीर (स्थूलवाचन)

डॉ. विजया वाड (१९४५) :
प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी-कथा, कादंबऱ्या, नाटके अशी सुमारे  ११७ पुस्तके प्रकाशित आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या ९ वर्षेअध्यक्ष होत्या. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धांच्या  कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डी.लिट् ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. साहित्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार,  महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिक्षण क्षेत्रातला जिजामातापुरस्कार यांसह वेगवेगळ्या ९५ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात  आले आहे. 

सन २००७ साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांचे ‘अंतरंग’,  ‘अभिनेत्री’, ‘अक्षांश रेखांश’ या कादंबऱ्या; ‘आपली माणसं’, ‘ऋणानुबंध’, ‘गप्पागोष्टी’, ‘हृदयस्पर्शी’ हे कथासंग्रह; ‘एक हिरवी  गोष्ट’, ‘तिची कहाणी’, ‘त्या तिघी’ ही नाटके; ‘झिप्री’, ‘बिट्टीच्या बारा बाता’ या बालकादंबऱ्या; ‘उत्तम कथा’, ‘अद्भुत जगाच्या  सफरीवर’, ‘गोष्टी घ्या गोष्टी’ इत्यादी बालकथा; ‘चिंगू चिंगम’, ‘दोन मित्र’, ‘बंडू बॉक्सर’ ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध  आहे.  काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात, गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे,  

कारण त्यांच्या लेखनप्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांतून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका. प्रस्तुत पाठातून गििरजा कीर यांच्या  नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉ. विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. एखाद्या  साहित्यकृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आला आहे.

आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे. त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषांचे विवेचन करता यायलाहवे. एखादं पुस्तक तुम्हांला खूप आवडलं  तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे  चिकित्सक, अभ्यासपूर्णविश्लेषण म्हणजे ‘समीक्षा’ होय. कोणत्याही साहित्यकृतीची/कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली  पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा, साहित्य कृतीचा रसास्वाद घेणे. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात  घेणे आवश्यक असते. 
(१) पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता?
(२) पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष.
(३) व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या, की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत?
(४) कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का?
(५) काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचारसौंदर्य व अर्थसौंदर्य कशातून जाणवते?
(६) लेखकाची भाषाशैली कशी आहे? 
(७) पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का?
(८) पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय
 या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का?
आज मी गिरिजा कीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या  लेखनात तोचतोचपणाचा दोष अभावानेही आढळत नाही, हे त्यांचे सर्वांत मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण  वाचलीत तर आपल्या असं लक्षात येईल, की चमत्कार, अद्भुतरम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकंाच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात ‘आमच्या आपल्या गप्पाटप्पा’, ‘चला खेळू नाटक नाटक’, ‘साळुंकीची कहाणी’, 

‘एऽऽ’ गेले गेले’ या बालनाटिकानऊ ते बारा या वयोगटासाठी आहेत. तर ‘नीला राणीचा दरबार’ आणि ‘मी कोण होणार’  या नाटिका बालवर्गासाठी आहेत. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयाेगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून  तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते. नाव आहे, ‘एक अर्ज आहे बाप्पा’. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचारविनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो? तर आई, बाबा, शेजारी या मोठ्यांचं  बॉसिंग त्यांना सहन होत नाही; पण हे सांगणार कुणाला? 

मग सर्वांना वाटतं, की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात  आणि हा अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया. देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन. इथे  लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बरफ का गोला खाण्याची  आझादी पाहिजे. भेळ खायला मिळायलाच हवी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात  आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे. या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या  उघडण्याचे कौशल्य लाभले आहे. छोटे-मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगात रंगून जातील. नाटकाला जे दृश्य परिणाम  असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात, प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रांतून जिवंत दृश्य साकार करणे आणि बालप्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे; पण बाई ती लीलया पेलतात. 

 आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्यकृतींकडे वळूया.  लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई  वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा जोतीबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रेलिहिली आहेत.  त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साद घालते. त्या म्हणतात, ‘‘थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक!’’ प्रत्येक चरित्रात त्यांनी एकेक महत्त्वाचा विचार मांडला आहे. उदा., महात्मा जोतीबा फुले यांच्या चरित्रात गिरिजा कीर लिहितात, ‘‘प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला, आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही.’’ ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, ‘‘माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे.’’ खरं आहे! मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात. ताराबाई मोडक  यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, 

‘‘ज्या भागात काम करायचं  त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं,  कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात  प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे  येवोत! हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल!’’ संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा ‘‘मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत.  विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही. पहाडात निघून जावे लागत नाही. लोकांत राहून लोकजागृती कशी करावी हे  संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत होत.

’’ दु:खाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या  लिहितात, ‘‘प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या  अचल दीपस्तंभासारख्या. त्याचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं.’’  अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्ययकारी संदेश दिला आहे. मुलांना पचेल, रुचेल अशी  सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्रलेखनाला एक नवा आयाम दिला आहे.

गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत.  ‘‘तू सावित्री हो!’’ या पुस्तकात एकूण आठ कथा आहेत. त्यातील ‘‘गोष्ट एका माणसाची’’ ही कथा नितांत सुंदर  उतरली आहे. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने  तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात.  मधू नोटा मोजतो, तब्बल दोन हजार. पण सोबत चिठ्ठी असते, ‘‘प्रिय आनंदा, सोबत दोन हजार रुपये पाठवतोय. आईचं औषधपाणी नीट कर. मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील. आईच्या  उपयोगी पडतील...’’ खाली पत्ता. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. त्या माणसाने आपल्या आईच्या  आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात.

 मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो; पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत  करतो. ‘‘आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी  झाली तर माझीच आई बरी झाली, असा आनंद मिळेल मला!’’ मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. ‘‘फुलं फुलवणारा म्हातारा’’ या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार  असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल.  ‘बालकादंबरी’ हे कथेच्या पुढले पाऊल. गिरिजाबाईंचा ‘झंप्या द ग्रेट’ खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या,  वळवळ्या, बघावं तेव्हा नसत्या उद्योगात गढलेला झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. 

आग  लागली असे वाटून आगीचा बंब बोलावण्याचे प्रकरण त्या कथेत रंगले आहे. यडबंबू ढब्बू’ ही बालकादंबरी मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं.  ढब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो. त्यासाठी घरात मिठाई केलेली  असते. काही गरीब मुले मागू लागतात. ढब्बू नाही म्हणतो; पण आई म्हणते, ‘‘तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दु:खी ठेवू नये. सर्वांवर प्रेम करावे.’’ ढब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात, त्या वेळी आईने  व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट ढब्बूभिकाऱ्यांना वाटतो, तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरिजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे, की ‘अनंत हस्ते कमलाकराने, देता किती घेशील दो  कराने?’ असे वाटावे. गिरिजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंत:करणपूर्वक मानाचा मुजरा! 
(बोलकी पाने)

बालसाहित्यिका गिरिजा कीर स्थूलवाचन स्वाध्याय | Balsahityika girija kir Swadhyay #SuhaniSuryawanshi #SclasseducationbySuhani

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post