वाट पाहताना स्वाध्याय | Vaat Pahtana Svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्वमत ]

वाट पाहताना स्वाध्याय | Vaat Pahtana Svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 

वाट पाहताना स्वाध्याय | Vaat Pahtana Svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्वमत ]  स्वमत.

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (अ) | Page 29
1) लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी :
SOLUTION
(१) अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड
(२) सकाळी सकाळी शनिवारवाड्यात जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले
(३) माठातले वाळा घातलेले पाणी
(४) आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई
(५) अंगणभर पसरलेली वाळवणे
(६) कैरीची डाळ आणि पन्हे

2) पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी :
SOLUTION
१) न पाहिलेले देश
२) न पाहिलेली माणसे
३) न अनुभवलेले प्रसंग
४) न जळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी

3) पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये :
SOLUTION
१) नुसता पत्रे पोहोचवणारा सरकारी नोकर नाही; भला माणूस आहे.
२) माणसामाणसांमध्ये भावनेची नाती निर्माण करणारे पूल आपल्या मुलाला दाखवतो.
३) म्हातारीचे वाट पाहणे सुखाचे करणारी रीत जाणतो.

4) लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी :
SOLUTION
(१) कोकिळाचा कुहुकुहु आवाज
(२) परीक्षेनंतरची सुट्टी
(३) गोष्टी-कवितांची पुस्तके अनेक गोष्टी
(४) उंबराच्या झाडावर बसणारा पोपटांचा थवा
(५) कविता


कारणे शोधा.

कृती | Q (२) (अ) | Page 29
1) आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं, कारण ______ 
SOLUTION
आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं; कारण पहाटे कुहुकुहु ऐकू यावा, ही रात्री झोपताना बाळगलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होई.

2) म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं, कारण ______ 
SOLUTION
म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं; कारण दूर परगावी राहणारा आपला मुलगा आपली आठवण काढतो व आपल्याला तो त्याच्याकडे नेणार आहे, या कल्पनेने तिचे मन सुखायचे. 

3) पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण ______ 
SOLUTION
पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा; कारण पुस्तकांतून भाषेची शक्ती, लेखकांच्या प्रतिभेची शक्ती समजू लागली होती. 

4) पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो, कारण ______ 
SOLUTION
पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचतो; कारण त्या म्हातारीला पुत्रभेटीचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस समाधानात जावेत, अशी पोस्टमनची इच्छा होती.  

तुलना करा. 

कृती | Q (३) | Page 29

व्यक्तीशी मैत्री कवितेशी मैत्री
____________
____________
____________
____________
SOLUTION

व्यक्तीशी मैत्री

कवितेशी मैत्री

आपण त्या व्यक्तीला हाक मारतो. तिच्याकडे धावतो. मनसोक्त गप्पा मारतो. ती व्यक्ती प्रतिसादही देते. व्यक्ती हवी तेव्हा भेटू शकते.

कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नसे. मात्र ती प्रसन्न झाली तर कधीही धावत येऊन भेटे. कविता मात्र खूप वाट पाहायला लावते.


‘वाट पाहणे’ या प्रक्रियेबाबत पुढील मुद्‌द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा. 

कृती | Q (४) | Page 29
वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टीवाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टीवाट पाहण्याचे फायदे
   
   
   
SOLUTION

वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी

वाट पाहणे प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी

वाट पाहण्याचे फायदे

दुःख, काळजी, अस्वस्थता, तडफड इत्यादी.

धीर धरणे, संयम बाळगणे, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करणे इत्यादी. 

सुखाची चव वाढते, यशाची गोडी वाढते, प्रेमातली, मायेतली तृप्ती वाढते, आयुष्याबद्दलची ओढ वाढते.



स्वमत - गवताचे पाते स्वाध्याय 

कृती | Q (५) (अ) | Page 30
1) पाठाच्या (वाट पाहताना) शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.
SOLUTION
अरुणा ढेरे यांचा 'वाट पाहताना' हा अत्यंत हृदय ललित लेख आहे. जीवनातील एक मूलभूत महत्त्वाचे तत्त्व या लेखात त्या उलगडून दाखवतात. तसे पाहिले तर माणूस वाट पाहत पाहतच वाटचाल करीत असतो. प्रत्येक पावलावर त्याच्या मनात 'नंतर काय होईल?', 'माझ्या स्वप्नांप्रमाणे, कल्पनेप्रमाणे घडेल ना?' अशी तगमग असते. हीच तगमग त्याला पुढे जायला, जीवन जगायला लावते. हे तत्त्व लेखिकांनी अनेक उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट केले आहे.

सुट्टीतल्या सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहत. अनेक अनोळखी प्रदेश, माणसे, प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते. उंबराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेले ते झाड पाहून लेखिकांचे मन हळवे, कोमल होऊन जाते. त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजतात. वाट पाहण्याने त्यांची निर्मितिशीलता जागृत होते. आत्याची वाट पाहताना त्यांचे मन अस्वस्थता आणि अनामिक भीती यांनी भरून जाते. या सर्वांत जगण्याचाच अनुभव होता. अस्वस्थता, हुरहुर, दुःख, तगमग, शंकाकुलता हे सारे भाव पोस्टमनला भेटलेली म्हातारी, तसेच शेतकरी, वारकरी भक्त यांच्या चेहऱ्यांवर लेखिकांना गवसतात. अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची भावना असल्याचे भान लेखिका या लेखातून वाचकांना देतात. म्हणून 'वाट पाहताना' हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.

2) म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा.
SOLUTION
एखादी निर्जीव वस्तू पोहोचती करावी, त्याप्रमाणे तो पोस्टमन पत्रे देत नसे. कारण पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात. ती माणसांच्या सुखदुःखांनी, आशा-आकांक्षांनी भरलेली असतात. त्यात माणसांचे मन असते, हृदय असते. पत्रांचे हे स्वरूप चित्रपटातल्या त्या पोस्टमनने जाणले होते. म्हणून तो अंध म्हातारीला मुलाचे काल्पनिक पत्र वाचून दाखवतो. ते पत्र खोटे असते. मजकूर खोटा असतो. त्या अंध म्हातारीच्या मुलाचा स्पर्शसुद्धा त्या पत्राला झालेला नसतो. पण म्हातारी सुखावते. तिचे उरलेले दिवस आनंदात जातात. या विपरीत स्थितीने पोस्टमनचे मन कळवळते. पण म्हातारी सुखावणे हे अधिक मूल्ययुक्त होते. आपल्या मुलालाही तो पोस्टमन हीच उदात्त शिकवण देतो. मुलातला माणूस जागा करतो. माणसाशी माणसासारखे वागण्याची ही महान शिकवण होती. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना असे माणूसपण शिकवले पाहिजे; तरच मानवी समाजाला भविष्य आहे.

3) वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे’, या विधानाची सत्यता पटवून द्या.
SOLUTION
'वाट पाहताना' या पाठात लेखिकांनी जीवनाचा एक सुखमंत्रच सांगितला आहे. वाट पाहणे हा तो मंत्र होय. कोणत्याही गोष्टीसाठी पाहायला शिकले पाहिजे, असे त्यांचे सांगणे आहे. वाट पाहणे हे तसे कधीच सुखाचे नसते. आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन अधीर झालेले असते. मन शंकेने व्याकूळ होते. हवी ती गोष्ट आपल्याला मिळेल का? असा प्रश्न मनात काहूर माजवतो.
एखादी गोष्ट वाट न पाहता, चटकन मिळाली, तर ती गोष्ट आपली जिवाभावाची आहे की वरवरची आहे, हे कळायला मार्ग राहत नाही. इच्छा तत्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल, हे खरे आहे. पण आपण कदाचित वरवरच्या गोष्टींमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते. अधिकाधिक वाट पाहिल्यामुळे आपली खरी ओढ कुठे आहे, हे कळते. म्हणजेच आपल्याला खरोखर काय हवे आहे, नेमकी कशाची गरज आहे, हे कळून चुकते. जे आपल्या दृष्टीने मोलाचे आहे, हे शोधण्याची दृष्टी या वाट पाहण्यातून मिळते. आपल्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते. समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते. म्हणून वाट पाहणे त्रासाचे असले तरी अनेक गोष्टींचे मोल ओळखण्यासाठी ते उपयोगी ठरते, हे खरे आहे


वाट पाहताना स्वाध्याय | Vaat Pahtana Svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 

व्याकरण व भाषाभ्यास

कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती :

१. समास:

विग्रहावरून सामासिक शब्द लिहा :
विग्रह – सामासिक शब्द
(i) कानापर्यंत
(ii) राजाचा वाडा
(iii) सात सागरांचा समूह
(iv) दहा किंवा बारा
SOLUTION
विग्रह – सामासिक शब्द
(i) कानापर्यंत – आकर्ण
(ii) राजाचा वाडा – राजवाडा
(iii) सात सागरांचा समूह – सप्तसिंधू
(iv) दहा किंवा बारा – दहाबारा

२. अलंकार :

1) पुढील ओळींमधील अलंकार ओळखा व स्पष्टीकरण दया :
‘कुटुंबवत्सल इथे फणस हा।
कटिखांदयावर घेऊनि बाळे।।’
SOLUTION
अलंकार → चेतनगुणोक्ती
स्पष्टीकरण : फणसाच्या झाडाला लगडलेली फळे म्हणजे फणसाची लेकरे आहेत, अशा मानवी भावनांचे आरोपण फणसाच्या निर्जीव झाडावर केल्यामुळे हा चेतनगुणोक्ती अलंकार आहे.

पुढील वैशिष्ट्यावरून अलंकार ओळखा व समर्पक उदाहरण दया : (सराव कृतिपत्रिका -३)

(i) उपमेय व उपमान या दोघात भेद नाही.
(ii) उपमेय हे उपमानच आहे.
(अ) अलंकाराचे नाव → [ ]
(आ) अलंकाराचे उदाहरण → [ ]
SOLUTION
(अ) अलंकाराचे नाव → [रूपक]
(आ) अलंकाराचे उदाहरण → [वारणेचा ढाण्या वाघ बाहेर पडला]

पुढील ओळींचे गण पाडून वृत्त ओळखा :

1)) तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन जल केली जे कराया मिळाले
SOLUTION
वृत्त : हे मालिनी वृत्त आहे.

४. शब्दसिद्धी :

1) पुढील शब्दांना ‘खोर’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा :
(i) भांडण –
(i) चुगली –
SOLUTION:
(i) भांडखोर
(ii) चुगलखोर

2) पुढील शब्दांच्या आधी ‘अव’ हा उपसर्ग लावून शब्द तयार करा :
(i) गुण – (ii) लक्षण –
SOLUTION
(i) अवगुण
(ii) अवलक्षण

3) वर्गीकरण करा : (सराव कृतिपत्रिका -१).
शब्द : सामाजिक, अभिनंदन, नम्रता, अपयश.
प्रत्ययघटित – उपसर्गघटित
(i) ……………………………
(ii) ……………………………
SOLUTION
प्रत्ययघटित – उपसर्गघटित
(i) सामाजिक – (ii) नम्रता
(i) अभिनंदन – (ii) अपयश

५. सामान्यरूप :

पुढील शब्दांची सामान्यरूपे लिहा :
(i) रात्रीचे –
(ii) पंखांनी –
(iii) आंब्यावर –
(iv) म्हातारीला –
(v) संगीताने –
(vi) हाताला –
SOLUTION
(i) रात्रीचे – रात्री
(ii) पंखांनी – पंखां
(iii) आंब्यावर – आंब्या
(iv) म्हातारीला – म्हातारी
(v) संगीताने – संगीता
(vi) हाताला – हाता

६. वाक्प्रचार :

जोड्या जुळवा :
वाक्प्रचार – अर्थ
(i) चाहूल येणे – (अ) चौकशी करणे
(ii) सार्थक होणे – (आ) गुंग होणे
(iii) थक्क होणे – (इ) अंदाज येणे
(iv) विचारपूस करणे – (ई) धन्य वाटणे
(v) भान विसरणे – (उ) चकित होणे
SOLUTION
(i) चाहूल येणे – अंदाज येणे
(ii) सार्थक होणे – धन्य वाटणे
(iii) थक्क होणे – चकित होणे
(iv) विचारपूस करणे – चौकशी करणे
(v) भान विसरणे – गुंग होणे.

दिलेल्या वाक्यांत योग्य वाक्प्रचारांचा उपयोग करून वाक्ये पुन्हा लिहा : (कपाळाला आठी पडणे, सहीसलामत बाहेर पडणे, भान विसरणे) (सराव कृतिपत्रिका -१)

(i) त्सुनामीच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांना भारतीय जवानांनी सुखरूप बाहेर काढले.
(ii) दिवाळीसाठी आणलेले नवीन कपडे नमिताला न आवडल्यामुळे तिने नाराजी व्यक्त केली.
SOLUTION
(i) त्सुनामीच्या तडाख्यात सापडलेले लोक भारतीय … जवानांच्या मदतीने सहीसलामत बाहेर पडले.
(ii) दिवाळीसाठी आणलेले नवीन कपडे पाहून नमिताच्या कपाळालां आठी पडली.

भाषिक घटकांवर आधारित कृती:

1) गटात न बसणारा शब्द लिहा :
(i) कोकीळ, पोपट, कावळा, गाय, मोर,
(ii) कुरड्या, पापड्या, शेवया, चकल्या, वाळवण.
SOLUTION
(i) गाय
(ii) वाळवण,

2) पुढील पक्ष्यांसमोर त्यांची घरे लिहा :
जसे : कोकिळा – घरटे; तसे
(i) पोपट – …………………….
(ii) कोंबडा – …………………….
SOLUTION
(i) पोपट – ढोली
(ii) कोंबडा – खुराडे.

3) जसे : पोपटांचा – थवा; तसे –
(i) गुरांचा – …………………….
(ii) फुलांचा – …………………….
SOLUTION
(i) गुरांचा – कळप
(ii) फुलांचा – गुच्छ,

पुढील शब्दांचे भिन्न अर्थ लिहा :

← माळा →
← गार →
SOLUTION
मजला ← माळा → हार
थंड ← गार → गारगोटी

गटात न बसणारा शब्द शोधा : (सराव कृतिपत्रिका-३)

(i) खाणे, जेवणे, जेवण, करणे →
(ii) मधुर, स्वस्त, पाणी, स्वच्छ →
SOLUTION
(i) जेवण
(ii) पाणी

विरुद्धार्थी शब्द लिहा :

(i) मऊ x …………………..
(ii) गार x …………………..
(iii) धाकटा x …………………..
(iv) अलीकडे x …………………..
(v) अंध x …………………..
(vi) दूर x …………………..
(vii) पक्की x …………………..
(viii) शहर x …………………..
SOLUTION
(i) मऊ x टणक
(ii) गार x गरम
(iii) धाकटा x थोरला
(iv) अलीकडे x पलीकडे
(v) अंघ x डोळस
(vi) दूर x जवळ
(vii) पक्की x कच्ची
(viii) शहर x खेडे

वाट पाहताना शब्दार्थ

घमघमणे – सुगंध दाटून येऊन पसरणे.
हजारी मोगरा – अनेक फुलांचा गुच्छ येणारे मोगऱ्याचे झाड.
गराडा – गर्दी करून घातलेला वेढा.
प्रतिमा – नवनवीन कल्पना योजून निर्मिती करण्याची क्षमता.
दिंडी दरवाजा – (दिंडी = मोठ्या दरवाजात असलेला लहान दरवाजा.) दिंडी असलेला मोठा दरवाजा.
शोष – कोरडेपणा, सुकलेपणा, घशास पडलेली कोरड.
भला – चांगला, सज्जन.
डोळस – डोळे-दृष्टी शाबूत असलेला, आंधळेपणाने विश्वास न ठेवणारा.
धीर धरणे – अधीरता, उत्सुकता दाबून ठेवून संयम बाळगणे.
वाट पाहताना वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

तोंडावर येणे : (एखादी भावी घटना) नजीक येऊन ठेपणे.
सार्थक होणे : धन्यता वाटणे, परिपूर्ती होणे.
मन आतून फुलून येणे : मनातल्या मनात अमाप आनंद होणे.
जीव फुटून जाणे : अतोनात कासावीस होणे, भयभीत होणे.
नाटक चालू ठेवणे : सोंग, बतावणी चालू ठेवणे.

Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions भाग-२

वाट पाहताना स्वाध्याय | Vaat Pahtana Svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 

  • वाट पाहताना स्वाध्याय
  • वाट पाहताना इयत्ता दहावी
  • वाट पाहताना कविता
  • वाट पाहताना मराठी स्वाध्याय
  • वाट पाहताना आठवा धडा
  • वाट पाहताना धडा
  • वाट पाहताना स्वाध्याय इयत्ता दहावी
  • वाट पाहताना या पाठाचे लेखक कोण
  • वाट पाहताना 10वी
  • वाट पाहताना 10वी स्वाध्याय

वाट पाहताना स्वाध्याय | Vaat Pahtana Svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 

अरुणा ढेरे (१९५७) : 
प्रसिद्ध कवयित्री, कथालेखिका, संशोधक, समीक्षक. कथा, कादंबरी, ललितलेख, आस्वादक समीक्षा, संशोधनपर लेखन असे  त्यांनी विविधांगी लेखन केले आहे. काव्यात्मकता आणि मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे  ‘प्रारंभ’, ‘यक्षरात्र’, ‘मंत्राक्षर’, ‘निरंजन’, ‘जावे जन्माकडे’ हे कवितासंग्रह; ‘कृष्णकिनारा’, ‘अज्ञात झऱ्यावर’ हे कथासंग्रह; ‘रूपोत्सव’  हा स्फुट लेखसंग्रह; ‘मैत्रेयी’ ही कादंबरी; ‘नागमंडल’, ‘लोकसंस्कृतीची रंग-रूपे’, ‘विस्मृतिचित्रे’ हे संशोधनात्मक समीक्षात्मक लेखन  प्रसिद्ध आहे.  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची न कशाची तरी वाट बघणे ही अटळ गोष्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले आहेत. वाट पाहणे हा अनुभव कधी सुखद तर कधी दु:खद असू शकतो. त्यात कधी उत्कंठा,  हुरहुर असते तर कधी दडपण असते, हे या पाठातून लक्षात येते.


होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहोर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर  आलेली असायची. मोकळ्या अंगणात अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर; पण मार्च-एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत  झोपायला मिळायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले, की झोपेची गडद चाहूल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश  जागा व्हायचा, ‘उद्या कोकिळेचं ‘कुहू’ ऐकू येईल का? बघू हं!’ पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो ‘कुहूऽकुहूऽ’  आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं.  नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची; पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात  सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई-आत्यांची कुरडया- पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं...सुट्टीची  किती वाट पाहत असू आम्ही!

आमच्या भल्यामोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली, तरी आख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं  अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले  देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरीपण आपले वाटणारे. ओळखीचे धागे जुळणारे. न जुळणाऱ्या  गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या! म्हणजे, जग असंही असतं तर...! मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची  जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. लिहिलेली होती. जे सुचलं,  जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं! मला भाषेची ताकद समजत होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद  समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेड लावायचा की बस्स! आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठ्ठं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे  दिवस आले, की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं! मी वाट पाहायचे त्या थव्यांची. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची. 

माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची... पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधीपण, केव्हापण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाट्टेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता. तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची. कधीही रात्री-मध्यरात्रीसुद्धा; पण मला मात्र कधीकधी खूप वाट बघायला लावायची.

मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं-अस्वस्थ होणं-कशातच मन लागेनासं  होणं-आई, आत्याची ती बोलणी खाणं! आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर  पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत, असं उगाच वाटत राहतं. आमची आत्या तेव्हा उरुळीकांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरुळीला सहज  जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी आठ वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनल ्टे ा जायची. मग  पॅसेंजरनं उरुळी. परतताना तसंच, गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी नऊ-साडेनऊसुद्धा व्हायचे. आम्ही भावंडं तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाज्यात उभी राहायचो. आत्या  येईपर्यंत र्यं वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं.

 ती आली, की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून, तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजतं; पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमापाहिला. चिनी सिनेमा. ‘पोस्टमन इन द माउंटन’ हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक  नसतो त्या कामाला; पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो.  वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या, हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एका वस्तीवर दोघं बाप-लेक येतात. तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं  तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. 

पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते.  तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं, त्यानं लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप  समाधान पसरतं. मुलगा जेव्हा पुढे होतो, तेव्हा त्याला दिसतं, की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे. त्यावर काही लिहिलेलंच  नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते. आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो,  की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पहात आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहीत नाही. 

तिची चौकशी करत नाही; पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन हाेत नाही.  त्या म्हातारीला आनंद वाटावा, म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे  दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं  आहे. शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्रं हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ,  समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्रं पोहोचवणारा सरकारी नोकर नाही. तो माणूस आहे, भला माणूस!आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही. तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल  दाखवतो आहे. 

     म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. ‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी  सुखाची थोडीच असते! दु:ख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची  वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या  गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो. धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्कीहोत जाते. ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं आहे आणि वाटतं, की जे हवं ते सहज हाती येऊच  नये. थोडी वाट पाहायला लागावी. थोडी तडफड भोगायला लागावी. तरच सुखाची चव वाढेल. यशाची गोडी वाढेल.  प्रेमातली, मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल.

वाट पाहताना स्वाध्याय | Vaat Pahtana Svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post