तू झालास मूक समाजाचा नायक - Tu Zalas Muk Samajacha Nayak 10th

तू झालास मूक समाजाचा नायक - Tu Zalas Muk samajacha Nayak 10th


आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (अ) (१) | Page 81

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______ 
SOLUTION
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - मळवाट 

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______
SOLUTION
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - खाचखळगे

3) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य -
SOLUTION
(१) परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला.
(२) मूक समाजाचे नेतृत्व केले.
(३) बहिष्कृत भारत जागा केला.
(४) चवदार तळ्याचा संग्राम केला.

कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा. 

कृती | Q (२) | Page 81

कवितेतील संदर्भ स्पष्टीकरण
(१) मळवाट (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज
(२) खाचखळगे (आ) पारंपरिक वाट
(३) मूक समाज (इ) अडचणी, कठीण परिस्थिती

SOLUTION

कवितेतील संदर्भ

उत्तरे

(१) मळवाट

(आ) पारंपरिक वाट

(२) खाचखळगे

(इ) अडचणी, कठीण परिस्थिती

(३) मूक समाज

(अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज


चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.

कृती | Q (३) | Page 81
1) चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.
SOLUTION
(१) सूर्यफुले ध्यास घेत आहेत.
(२) बिगूल प्रतीक्षा करीत आहे.
(३) चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे.

चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.
पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती
____________
____________
____________

SOLUTION

पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती

पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती

(१) सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती.

(१) सूर्यफुले ध्यास घेत आहेत. 

(२) रणशिंग फुंकले होते.

(२) आता बिगूल वाट पाहत आहे.

(३) चवदार तळ्याचे पाणी पेटले होते.

(३) आता चवदार तळ्याचे पाणी थंड आहे.


काव्यसौंदर्य

कृती | Q (५) (अ) | Page 81

1) तुझे शब्द जसे की 

महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत 

तुझा संघर्ष असा की 

काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’,

या ओळींचे रसग्रहण करा.

SOLUTION

आशयसौंदर्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चवदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्याच्या पन्नास वर्षे पूर्तीनंतर कवी ज. वि. पवार यांनी 'तू झालास मूक समाजाचा नायक' या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे.

काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती. तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या. डॉ. बाबासाहेबांचा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते.

भाषिक वैशिष्ट्ये : मुक्तछंदात (मुक्तशैली) लिहिलेली ही कविता, त्यातील ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भिडते. काव्यात्म पण थेट विधानांमुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत. 'महाकाव्याची नम्रता' व 'काठ्यांच्या बंदुका' या प्रत्येकी शांतरस व अद्भुतरस यांची निर्मिती करतात.


या ओळींचे रसग्रहण करा.

कृती | Q (५) (आ) | Page 81

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून (तू झालास मूक समाजाचा नायक) जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.

SOLUTION

पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडणाऱ्या मूक समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला. अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून, कठीण परिस्थितीवर मात करून डॉ. बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले.

2) अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.

SOLUTION

अतिशय कठीण परिस्थिती मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. ते उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी आपल्या अगाघ ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगिकारले. शोषित, पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या, समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले. त्यांनी 'शिका, संघटित व्हा व संघर्ष करा' हा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. समाजाला बोधितत्त्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारताचे संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी 'भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान सन्मानाने बहाल करण्यात आला.


रसग्रहण दहावी मराठी

1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण

2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी

3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी

4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी

5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी

6) तू झालास मूक समाजाचा नायक कविता रसग्रहण दहावी मराठी

7) खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण दहावी मराठी
 

तू झालास मूक समाजाचा नायक - Tu Zalas Muk samajacha Nayak 10th

ज. वि. पवार (१९४४) :
प्रसिद्ध कवी, कादंबरीकार. १९६६ नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक. ‘बलिदान’ ही कादंबरी; ‘नाकेबंदी’ हा
काव्यसंग्रह; ‘वडवानल’ ही दीर्घ कविता; ‘उच्छ्‌वास युगंधराचे’, ‘अस्तित्वाच्या रेषा’, ‘सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर’ ही संपादने;  ‘आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ’ हा राजकीय विश्लेषणाच्या स्वरूपाचा लेखसंग्रह इत्यादी त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा जो सत्याग्रह केला त्या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रूढ, सामाजिक परंपरा नाकारून नव्या समाजाची  जडणघडण केली. अशा या समाजाच्या नायकाला कवितेतून विनम्र अभिवादन केले आहे. डॉ. आंबेडकरांच्या कर्तृत्वाचे वर्णन या कवितेत करण्यात आले आहे.

तू झालास मूक समाजाचा नायक 

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.
तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.
तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.
आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय

तू झालास मूक समाजाचा नायक - Tu Zalas Muk samajacha Nayak 10th

  • तू झालास मूक समाजाचा नायक या काव्यातून कोणत्या रसाची निर्मिती होते
  • तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेचे रस
  • Tu zalas muk samajacha nayak kavita.

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post