मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय | Manaky peren laga [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ]

मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय | maanaky peren laga svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

 मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन याविषयी आपण आजच्या या अत्यंत महत्वाच्या अशा ब्लॉग ला सुरुवात करूया यामध्ये आपण प्रथम  बघणार आहोत मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय आणि त्यानंतर या स्थुलवाचन देखील आपण बघणार आहोत इयत्ता दहावीच्या आम्ही अशाच अगदी महत्त्वाच्या पाठा विषयी ब्लॉग पोस्ट घेऊन आलो आहेत या सर्व ब्लॉगपोस्ट विधी सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये तसेच सोप्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये घेऊन आलो आहेत म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी अगदी सोपे जाईल

 निर्मळ अकॅडमी इयत्ता दहावीच्या मराठी विषयाच्या सर्व  धड्यांचे व पाठाचे प्रश्न उत्तर घेऊन आलेली आहेत तुम्ही आमच्या निर्मळे अकॅडमी ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देऊन हे सर्व प्रश्न उत्तरे मिळवू शकता चला तर आता पाहूया मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय

मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय | maanaky peren laga svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ]

खालील संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करा. 

कृती | Q (१) | Page 38
1) 
SOLUTION
'बी'चे झाड होणे
(१) बीच
(२) माती
(३) झाड होते

माणसाचे माणूसपण जागे होणे
(१) माणूस
(२) प्रगल्भता
(३) माणुसकी

गवताचे पाते स्वाध्याय  - Gawateche pate svaadhyaay [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 

कृती | Q (२) | Page 38
1) माणसं पेरायला लागू’ या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ उलगडून दाखवा.
SOLUTION
कवी वीरा राठोड यांनी 'मनक्या पेरेन लागा' या कवितेत "बीज" व 'माती' यांचा जिव्हाळ्याचा स्नेहभाव व्यक्त करताना माणसे पेरण्याचा बहुमोल सल्ला दिला आहे.
त्यांनी माती व बीज यांच्या प्रतीकांतून एक सुंदर विचार मांडला आहे. एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेने जोपासते. बीजाचे झाड करण्यात तिच्या जन्माचे सार्थक आहे. त्याप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसे रुजवली व त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतन माणुसकी निर्माण होईल, हा आशय या कवितेतून अभिव्यक्त होतो. म्हणून 'माणसं पेरायला लागू' हे शीर्षक अतिशय समर्पक ठरते.

2) माणूस पेरा! माणुसकी उगवेल!' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
SOLUTION
मातीत बीज पेरलं की, मातीच्या कष्टमय मायेतून त्याचे झाड होते. माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक आपत्तींपासून वाचवते. दुष्काळाशी लढते. बीजाची मायेने निगराणी करते. या सर्व प्रक्रियेतून बीजाचा वृक्ष होतो. त्याप्रमाणेच आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्काराच्या मातीत जर माणसांना पेरले, तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा राहील, अशी आशादायक भावना या विधानातून व्यक्त झाली आहे. नवविचारांच्या नवसमाजात माणुसकीला बहर येईल व मानवजात सुखी होईल, असा सर्जनशील आशय 'माणूस पेरा! माणुसकी उगवेल!' या विधानातून व्यक्त होतो.

3) माणुसकी पेरणे काळाची गरज’ या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
SOLUTION
मातीमध्ये बी पेरले की, मातीच्या मायेच्या संस्कारांमधून वृक्ष जन्माला येतो. माती ऊन-वारा-पाऊस-वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते. बीजाला दुष्काळाची झळ सोसावी लागू नये; म्हणून ती दुष्काळाशी सामना करते. या प्रतीकांतून कवीनं सामाजिक आशय मांडला आहे. आज भ्रष्टाचार, दैन्य, अंधश्रद्धा व इतर धर्मांध घटक यांमुळे समाज पोखरलेला आहे व त्यात माणुसकी लयाला जात आहे. अशा या आधुनिक काळात माणसांवर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणे आवश्यक आहे. म्हणून माणुसकी पेरणे म्हणजेच विवेकी माणूस निर्माण करण्याची आजच्या काळाची गरज अधोरेखित होते.

मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय | maanaky peren laga svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 


वीरा राठोड (१९८०) :
आधुनिक काळातील कवी. ‘सेन सायी वेस’, ही बंजारा भाषेतील प्रार्थना व ‘पिढी घडायेरी वाते’ हा बंजारा बोलीभाषेतील  कवितासंग्रह प्रकाशित. त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा ‘राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०१५’ मिळाला आहे. सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने भटके, विमुक्त, वंचित, दलित यांच्या  प्रश्नांवर त्यांनी लेखन केले आहे.  त्यांच्या बंजारा भाषेतील ‘मनक्या पेरेन लागा’ या कवितेचे विनायक पवार यांनी मराठी भाषेत रूपांतर केले आहे. कवीला व्यक्त होताना भाषेचा अडसर नसतो. बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना, ‘माणसं पेरायला हवीत’, हा विचार कवितेतून  व्यक्त झाला आहे. कवी अभिव्यक्त होत असताना त्याच्या कवीमनावर झालेले भाषिक संस्कार व त्याची उपजत प्रतिभा यांचा कस  लागत असतो.  विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून अभिव्यक्त होऊन सहज व सोप्या पद्धतीने एखाद्या विषयाची  काव्यरूपात गुंफण करावी, या उद्देशानेच या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.

मनक्या पेरेन लागा

एक बी जमीम गडचं 
जमीती ओरो नातो जुडचं
धुड वोनं लगाडछं जीव
आसो कांयी घडचं
पाणी-पावस
उंदाळो-वरसाळो
आंधी-आंघोळो
दुष्काळेती लडचं
एक दन वोनं झाड करनच छोडचं 
चालो
आपणबी मनक्या पेरेन लाग जावा.
- वीरा राठोड

माणसं पेरायला लागू

माणसं पेरायला लागू
एक बी मातीत पडतं
मातीशी त्याचं
घट्ट घट्ट नातं जडतं
माती त्याला लावते जीव
अशी काय घडते
ऊन-वारा
पाऊस-पाणी
वारं-वावधान
दुष्काळाशी लढते
एक दिवस त्याला
झाड करूनच सोडते
चला आपणही
माणसं पेरायला लागू.
- विनायक पवार

वाचा - विचारांचं संतुलन हवं!

विचारांचं संतुलन हवं!
माणसाचं मन एक अजब यंत्रणा आहे. अनेक परस्परविरोधी भावना आणि विचारप्रवाह तिथे वास करत असतात,  पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचारांच्या अमलाखाली वावरतो. त्यामुळे आपण  निष्क्रिय तरी होतो किंवा हातून चांगलं काम घडत असलं तरी त्यातून आनंद, आत्मविश्वास आणि समाधान मिळत  नाही. अशा नकारात्मक भावना व विचार मनातून नष्ट व्हावेत. अशी इच्छा बाळगून वावरतो. ते शक्य असतं का? प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे होकारात्मक आणि सृजनात्मक विचार झाले तरी त्यांना विरुद्ध  बाजूही असतेच. 

त्याचप्रमाणे नकारात्मक विचार व भावना यांचादेखील काही उपयोग होतच असतो. तो उपयोग  करून घेणं हे आपलं कौशल्य आणि हुशारी, हे लक्षात ठेवायला हवं, म्हणून तर अशा परस्परविरोधी भावना व विचार  मनात वावरतात. त्या नकारात्मक गोष्टींनी गांगरून जाण्याचं जरासुद्धा कारण नाही. त्यांचं संतुलन राखणं महत्त्वाचं. ज्याप्रमाणे चार चाकी गाडीत ब्रेक व ॲक्सिलेटर म्हणजे वेगनियंत्रक व प्रवर्तक असतात. त्याप्रमाणे मनाला वेगानं पुढे नेणारे होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारे नकारात्मक विचार असतात. गाडीच्या सुरक्षिततेसाठी  ब्रेकची आवश्यकता भासते म्हणून ते असतात. त्यांना भिण्याचं काहीच कारण नाही. त्याप्रमाणे मनात नकारात्मक  विचार येतात. त्यांच्या मदतीने सावधगिरी कशी व कुठे बाळगायची याचं स्पष्ट भान निर्माण होतं आणि चुकीच्या  निर्णयांनादेखील आळा बसतो. अर्थात नुसताच ब्रेक दाबला तर गाडी सुरूही होणार नाही आणि वेगदेखील घेणार  नाही. म्हणूनच सतत आपल्या विचारांचं संतुलन असणं आवश्यक आहे.
(गंमत शब्दांची- डॉ. द. दि. पुंडे)

मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय | maanaky peren laga svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

  • मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन
  • मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय
  • मनक्या पेरेन लागा कविता
  • Manaky peren laga
  • मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय 

मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय | maanaky peren laga svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

 आपल्याला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अजून कोणत्याही प्रकारची तुमची समस्या असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा मी लवकरात लवकर त्या समस्यांवर समाधान म्हणून नवीन एक ब्लॉग पोस्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post