गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय - Gosht Arunimachi svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ]

गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय - Gosht Arunimachi svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

विद्यार्थी मित्रांनो गोष्ट अरुणिमाची हा पाठ आपण सर्वांनी अभ्यासला असेल हा पाठ अत्यंत गरजेचा असून या पाठाचे आम्ही तुमच्यासाठी प्रश्न उत्तर देखील घेऊन आलो आहेत गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय तसेच इयत्ता दहावी च्या सर्व प्रकारचे स्वाध्याय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत  तसेच स्वाध्याय यानंतर आपण गोष्ट अरुणिमाची हा ऑनलाइन माध्यमातून धडा देखील बघणार आहोत अशाच नवनवीन आणि अभ्यासासाठी मदत करणाऱ्या पोस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तरी तुम्ही आमची ही वेबसाईट स्क्रीनवर ॲड करा जेणेकरून वेबसाईट शोधण्यात सोपे जाईल आणि अभ्यास करणे देखील सोपे जाईल

 खाली आम्ही गोष्ट अरुणिमाची प्रश्न उत्तर दिली आहेत हि सर्व प्रश्न उत्तरे गाईड नुसार आणि पुस्तकाच्या  प्रमाणे लावलेली आहेत जेणेकरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अगदी सोपे होईल आणि तसेच तुम्ही सर्च ऑप्शन वापरून देखील प्रश्नांची उत्तरे शोधू शकता चला तर पाहूया गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय आणि त्यानंतर धडा इयत्ता दहावी मधील हा पाठ सर्वात महत्त्वाचा आहे असे मला वाटते

गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय - Gosht Arunimachi svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ]

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) | Page 42
1) अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती :
SOLUTION
(१) फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली.
(२) खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला.

खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.

कृती | Q (२) (अ) | Page 42
1) भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
SOLUTION
भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला - वडीलधाऱ्या व्यक्तीचा आदर

2) चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
SOLUTION
चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला - चपळता

3) उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.
SOLUTION
उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती - ध्येयवादी

4) ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.
SOLUTION
ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला - व्यवहारी

कोण ते लिहा.

कृती | Q (३) (अ) | Page 42
1) एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला - ______ 
SOLUTION
एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला - बचेंद्री पाल 

2) सर्वांत मोठा मोटिव्हेटर - ______ 
SOLUTION
सर्वांत मोठा मोटिव्हेटर - स्वतःच 

3) अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे - ______ 
SOLUTION
अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे - भाईसाब

4) फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन - ______
SOLUTION
फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन - अरुणिमा

कृती | Q (४) | Page 42

1) अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
SOLUTION
(१) ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून-सुलाखून निघत होते.
(२) उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत.
(३) मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला.
(४) आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं.
(५) मी अशी नि तशी मरणारच होते; तर मग माझ्या यशाचे पुरावे असणे अत्यावश्यकच होते.

अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.

कृती | Q (५) (अ) | Page 42
1) शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.
SOLUTION
समाजातील बहुसंख्य लोक मनाने दुबळे असतात. त्यामुळे अरुणिमाच्या अपार धाडसावर विश्वास बसत नाही. शरीरावर झालेल्या आघातामुळे तिचा मानसिक तोल ढळून वेडाच्या भरात तिच्या हातून असे कृत्य घडले असावे, अशी शंकाही अनेकांच्या मनात आली असणार.

2) अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.
SOLUTION
अरुणिमाने तिकीट काढले नसणार. त्यामुळे टी.सी.च्या नजरेतून सुटण्याच्या प्रयत्नात तिने गाडीतून उडी मारली असावी, अशी शंका काही जणांना येते. अलीकडे प्रामाणिकपणावरील, सज्जनपणावरील समाजाचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे कोणाच्याही चांगल्या कृतीतून वाईट अर्थ काढण्याची सवय समाजाला लागली आहे, हेच या प्रतिक्रियेवरून दिसून येते.

3) पाठातून (गोष्ट अरुणिमाची) तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
______
______
______
______
______
SOLUTION
(१) पराकोटीचे धैर्य
(२) अमाप सहनशक्ती असणारी
(३) जबरदस्त आत्मविश्वास असलेली
(४) अन्यायाविरुद्ध लढणारी
(५) ध्येयवादी
(६) जिद्दी.

पाठात (गोष्ट अरुणिमाची) आलेल्या इंग्रजी शब्दाला प्रचलित मराठी शब्द लिहा.

कृती | Q (७) (१) | Page 42

1) नॅशनल
SOLUTION
नॅशनल - राष्ट्रीय

2) स्पॉन्सरशिप
SOLUTION
स्पॉन्सरशिय - प्रायोजकत्व

3) डेस्टिनी
SOLUTION
डेस्टिनी - नियती

4) कॅम्प
SOLUTION
कॅम्प - छावणी

5) डिस्चार्ज
SOLUTION
डिस्चार्ज - मोकळीक, पाठवणी

6) हॉस्पिटल
SOLUTION
हॉस्पिटल - रुग्णालय

पाठात (गोष्ट अरुणिमाची) आलेल्या खालील वाक्याचे मराठीत भाषांतर करा.

कृती | Q (८) (१) | Page 42

1) Now or never!
SOLUTION
आता नाही तर कधीच नाही!

2) Fortune favours the braves
SOLUTION
शूर माणसाला नशीब नेहमी साथ देते.

1) ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’ तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.
(अ) ______
(आ) ______ 
(इ) ______
(ई) ______
SOLUTION
(अ) अपंगत्व
(आ) अतिशय कठीण प्रशिक्षण
(इ) जीवघेणे आणि कठीण गिर्यारोहण
(ई) मरणप्राय यातना

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्य पुन्हा लिहा.

कृती | Q (१०) (अ) | Page 43

1) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच.
SOLUTION
प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच, असे नाही.

2) सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
SOLUTION
सूर्यास्ताच्या वेळीही सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.

3) खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत.
SOLUTION
खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहू नका.

4) प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.
SOLUTION
प्रयत्नाने सोपी वाटही पार करता येते.

खालील वाक्यातील क्रियापद ओळखा.

कृती | Q (११) (अ) | Page 43

1) सायरा आज खूप खूश होती.
SOLUTION
सायरा आज खूप खूश होती - होती

2) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
SOLUTION
अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला - टाकला

3) अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
SOLUTION
अनुजाने सुटकेचा नि:श्वास टाकला - टाकला

4) जॉनला नवीन कल्पना सुचली.
SOLUTION
जॉनला नवीन कल्पना सुचली - सुचली

खालील तक्ता पूर्ण करा.  

कृती | Q (१२) | Page 43

शब्दमूळ शब्दलिंगवचनसामान्य रूपविभक्ती प्रत्ययविभक्ती
(१) कागदपत्रांचे____________________________________
(२) गळ्यात____________________________________
(३) प्रसारमाध्यमांनी____________________________________
(४) गिर्यारोहणाने____________________________________
SOLUTION
शब्द

मूळ शब्द

लिंग

वचन

सामान्य रूप

विभक्ती प्रत्यय

विभक्ती

(१) कागदपत्रांचे

कागदपत्र

नपुंसक लिंग

अनेक वचन

कागद पत्रां

चे

षष्ठी

(२) गळ्यात

गळा

पुल्लिंग

एकवचन

गळ्या

सप्तमी

(३) प्रसारमाध्यमांनी

प्रसारमाध्यमे

नपुंसक लिंग

अनेक वचन

प्रसार माध्यमे

नी

तृतीया

(४) गिर्यारोहणाने

गिर्यारोहण

नपुंसक लिंग

एकवचन


मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन स्वाध्याय | maanaky peren laga svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

कृती | Q (१३) (अ) | Page 43
1)  आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
SOLUTION
आपले ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसते, हा अरुणिमाचा संदेश आहे. याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी एडिसन चे उदाहरण उत्तम ठरेल. या एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्याला आपण बल्ब म्हणतो. या बल्बचा शोध लावण्यासाठी त्याने हजारापेक्षा जास्त प्रयोग केले. शेवटी तो यशस्वी झाला. म्हणजे यशस्वी प्रयोगाच्या आधीचे त्याचे हजारापेक्षाही जास्त प्रयोग फसले, वाया गेले, असे म्हटले पाहिजे. पण हे असे म्हणणे चूक आहे. कारण आपण निष्फळ समजतो, त्या प्रयोगांमधून एडिसनला एक भक्कम ज्ञान मिळाले होते. त्या निष्फळ प्रयत्नांच्या पद्धतींनी बल्ब निश्चितपणे तयार करता येत नाही, हे ते ज्ञान होते. हे नीट समजून घेतले, तर भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करता येते आणि यश निश्चितपणे मिळवता येते. म्हणून अपयशाने खचून जाता कामा नये. अपयशाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. अपयश हे भावी यशाचा पाया असते.
दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये अपयश मिळाले की अनेकजण खचून जातात. हे योग्य नाही. निकालानंतर शांत चित्ताने बसून आपल्या परीक्षेतील अपयशाचे विश्लेषण केले पाहिजे. आपल्या कोणत्या चुका झाल्या, अभ्यासातला कोणता भाग आपल्याला कळला नाही, तो आपण नीट समजावून घेतला होता का, समजावून घेताना कोणत्या अडचणी आल्या या व अशा प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजे. हे आपण प्रामाणिकपणे केले, तर भविष्यात आपण कधीही नापास होणार नाही.

2) प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
SOLUTION
कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती सारखी नसते. एखादयाला नृत्य आवडते. एखाद्या खायला आवडते. एखाद्याला दुसऱ्याला मदत करायला आवडते. तर कोणाला समाजातील घडामोडींशी दोस्ती करणे आवडते. आपल्यातला असा वैशिष्ट्यपूर्ण गुण कोणता आहे, हे आपण शोधले पाहिजे. या गुणाची जोपासना केली पाहिजे. मग आपल्या हातून आपोआपच लोकोत्तर कामगिरी पार पडेल. अरुणिमाने नेमके हेच केले. खरे तर अपंग बनलेली अरुणिमा आयुष्यात काहीच करू शकली नसती. पण तिने जिद्दीने स्वत:मधला वेगळा गुण ओळखला. स्वत:चे सामर्थ्य शोधले आणि अशक्य वाटणारी कामगिरी पार पाडली. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी अरुणिमा असतेच. फक्त त्या अरुणिमाचा आपण शोध घेतला पाहिजे. जीवनाचा हाच महामंत्र आहे.

3) तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
SOLUTION
आपण दिवसभर कोणती ना कोणती कृती करीत असतो, त्या वेळी आपल्या मनात कोणता तरी हेतू असतो, हेतूशिवाय कोणतीही कृती अशक्य असते. आपला हेतू म्हणजेच आपले ध्येय होय. खूप पैसे मिळवणे हे ज्याचे आयुष्यातले सर्वोच्च ध्येय असते, तो माणूस सतत पैसे मिळवण्याचाच विचार करीत राहील. कळत नकळत सतत पैसे मिळवून देण्याच्या कृतीकडेच ओढला जाईल. म्हणजे आपले आपल्या मनातले ध्येयच खूप महत्त्वाचे असते. तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवीत असते. म्हणून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. ते नीट समजून घेतले पाहिजे. पर्वतांमध्ये एव्हरेस्ट जसा सर्वांत जास्त उंच आहे, तसेच आपले ध्येय आयुष्यातील सर्वांत जास्त उंच, सर्वांत जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट आपल्या मनातील एव्हरेस्टच होय. या एव्हरेस्टचा आपण शोध घेतला पाहिजे. तो सर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

उतारा वाचून दिलेली कृती करा. 

अपठित गद्य आकलन | Q (अ) (१) (अ) | Page 44
1) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.

1) वृक्ष बहरू लागले आहेत. ____________ 
 वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार? 
- राजा मंगळवेढेकर
SOLUTION
वृक्ष बहरू लागले आहेत - वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. 

2) खालील भाव व्यक्त करणारे वाक्य उताऱ्यातून शोधून लिहा.

अपठित गद्य आकलन | Q (अ) (१) (आ) | Page 44

1) नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे. ____________  
       वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार? 
- राजा मंगळवेढेकर
SOLUTION
नदी, नाल्यात भरपूर पाणी आहे - करंगळीची सोंड झाली आहे.  

उतारा वाचून दिलेली कृती करा. स्पष्ट करा.

अपठित गद्य आकलन | Q (अ) (२) (अ) | Page 44

1) पाणी समजूतदार वाटते ______
      वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार? 
- राजा मंगळवेढेकर
SOLUTION
पाणी समजूतदार वाटते, पाणी शांतपणे वाहते, तेव्हा ते जणू काही कोणतेही नुकसान होऊ नये, याची काळजीच घेत असावे असा भास होतो. म्हणून ते त्या वेळी समजूतदार वाटते.

उतारा वाचून दिलेली कृती करा.

अपठित गद्य आकलन | Q (अ) (२) (आ) | Page 44
स्पष्ट करा.
1) पाणी क्रूर वाटते ______ 

      वर्षाऋतूचा काळ आहे. आभाळ ढगांनी व्याप्त आहे. दिशा पाणावलेल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताहेत. वृक्ष-पर्णांनी अंग धरले आहे. करंगळीची सोंड झाली आहे. उसळत घुसळत नवे पाणी फेसाळत चालले आहे. कुठे काठाला भिडले आहे, कुठे काठावर चढले आहे, कुठे संथ-गंभीर राहून दबदबा दाखवत आहे. भव्य, स्तब्ध पुलाच्या कमानीखालून जाणारे पाणी समजूतदार वाटते, शहाण्यासारखे वागते; पण तेच पुढे जाऊन काठावरची गरीब बिचारी खोपटी उद्ध्वस्त करून आपल्याबरोबर घेऊन जाताना क्रूर, अडाणी आणि उद्दाम वाटते. पुढे जाता जाता कुठे झाडावर चढते, कुठे गच्चीवर लोळते, कुठे घाट बुडवते तर कुठे वाट तुडवते. पाणी येते आणि जाते. एवढे उदंड येणारे पाणी लांब समुद्राच्या पोटात गुडुप्प होते. पाणी किती शहाणे असते! जोवर कोणी अडवत नाही, शेतमळे, बागा फुलवत नाही, रान-रान हसवत नाही तोवर पाण्याने तरी काय करावे? दरवर्षी वर्षाऋतूत यावे अन् वाहून जावे. पाण्याला जाता जाता कृतार्थ होऊन जावे, फुलवत-खुलवत, पिकवत जावे असे वाटल्याशिवाय का राहत असेल? पण पाण्याचे मन कोण जाणणार? 
- राजा मंगळवेढेकर
SOLUTION
पाणी क्रूर वाटते, नदकाठावरच्या गरिबांच्या झोपडया उद्धवस्त करणाऱ्या पुराच्या पाण्याला पाहिल्यावर त्याच्या मनात त्या गरीब, दुबळ्या माणसांबद्दल कणवच नसावी, अशी भावना मनात जागी होते आणि ते पाणी स्वभावाने क्रूर असावे, असे वाटू लागते.

खालील आकृती पूर्ण करा.

अपठित गद्य आकलन | Q (आ) (१) | Page 44
1) वर्षाऋतूतील निसर्गाचे रूप :
SOLUTION
आकाश ढगांनी पूर्णपणे झाकून गेलेले असते.
संपूर्ण अवकाश पाणावलेला असतो.
अधूनमधून पाऊस कोसळत असतो.
सगळीकडे हिरवीगार वनराजी पसरलेली असते.
नदी नाल्यांतून पाणी ओसंडून वाहत असते.
नवे पाणी उसळत, घुसळत व फेसाळत वाहते.

2) पुढे वाहता वाहता पाण्याकडून होणाऱ्या विविध क्रिया :
SOLUTION
उसळत, घुसळत, फेसाळत धावणे.
काठ ओलांडून ओसंडून वाहणे.
संथपणे, धीरगंभीरपणे वाहणे.
बेफाम होऊन सगळे बुडवत धावणे.

तक्ता पूर्ण करा. खालील वाक्यांतील अव्यये ओळखा व त्यांचा प्रकार लिहा.

अपठित गद्य आकलन | Q (इ) | Page 44

वाक्यअव्ययअव्ययाचा प्रकार
(१) पाणी कुठे गच्चीवर लोळते.____________
(२) पाणी येते आणि जाते.____________
SOLUTION
वाक्यअव्ययअव्ययाचा प्रकार
(१) पाणी कुठे गच्चीवर लोळते.कुठे, वरक्रियाविशेषण व, शब्दयोगी अव्यये
(२) पाणी येते आणि जाते.आणि

उभयान्वयी अव्यय


1) उताऱ्यातून कळलेला ‘पाण्याचा स्वभाव’ तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
पावसाळ्यात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य असते. जिकडे तिकडे पाणीच पाणी असते. अधूनमधून पाऊस कोसळत असतो. त्यामुळे नदीनाल्यांतून पाणी ओसंडून वाहत असते. वाहताना ते कधी काठाला धडकते, तर कधी काठावर चढते. यावरून पाण्याचा धसमुसळेपणा जाणवतो. काही काही ठिकाणी ते इतके संथपणे वाहते कि वाटावे जणू काही ते आपला दरारा दाखवत आहे. मोठ्या पुलांखालून पाणी वाहत जाते, तेव्हा ते समजूतदार, शहाण्या मुलासारखे वाटते. कधी कधी ते काठावरच्या गरिबांच्या झोपडया उध्वस्त करते. अशा वेळी ते स्वभावाने खूप क्रूर असावे, असे मनात येते. कधी कधी ते झाडावर चढते, गच्चीवर लोळते, घाटाला बुडवते, वाटेला तुडवत. अशा वेळी त्याच्या स्वभावातला अवखळपणा जाणवत राहतो. असे पाण्याच्या स्वभावाचे अनेक पैलू या उताऱ्यातून जाणवत राहतात.

2)  वर्षाऋतूतील पाणी निष्फळ वाहून जाऊ नये म्हणून माणसाने काय काय करायला हवे, याबाबत तुमचे विचार लिहा.
SOLUTION
आपल्याकडे अनेक ठिकाणी धो-धो पाऊस कोसळतो. पावसाचे सर्व पाणी समुद्रात वाहून जाते. पावसाचे हे वाहून जाणारे पाणी अडवून ठेवण्याचे व साठवून ठेवण्याचे काही उपाय आहेत. ते आपण अमलात आणले पाहिजेत. खूप महत्वाचा आणि सोपा उपाय म्हणजे जमिनीच्या उतारावर आडवे चार खोदणे. त्या चरांमध्येच वाढणारी झाडे लावावीत. पाणी थबकत थबकत वाहत राहिल्यामुळे ते जमिनीत भरपूर मूरते. पाझर तलाव खोदल्यावरसुद्धा पाणी जमिनीत भरपूर मुरते. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे झाडे लावल्यास झाडांची मुले जमिनीत पाणी धरून ठेवतात. अशा उपायांनी जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. विहिरींमध्ये वर्षभर पाणी राहते. पाणी साठवण्यासाठी जमिनीत खड्डेसुद्धा खोदतात. या खड्ड्यांतील पाणी जमिनीत मुरून जाऊ नये म्हणून उपाययोजना करतात. त्यामुळे पावसाळ्यानंतर जवळपासच्या झाडझाडोऱ्याला व गुरांना पाणी देता येते. अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय योजून पाण्याची गरज भागवत येते.

गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय - Gosht Arunimachi svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 


व्याकरण व भाषाभ्यास

कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
अव्याकरण घटकांवर आधारित कृती :

गोष्ट

१. समास :

तक्ता पूर्ण करा:
सामासिक शब्द – विग्रह – समास
(i) दुःखमुक्त ………………………. – ……………………….
(i) पूर्वपश्चिम ………………………. – ……………………….
(iii) गल्लोगल्ली ………………………. – ……………………….
(iv) पालापाचोळा ………………………. – ……………………….
(v) सप्तपदी ………………………. – ……………………….
(vi) धर्माधर्म ………………………. – ……………………….
उत्तर:
सामासिक शब्द – विग्रह – समास
(i) दुःखमुक्त – दुःखापासून मुक्त – विभक्ती तत्पुरुष
(ii) पूर्वपश्चिम – पूर्व आणि पश्चिम – इतरेतर वंदव
(iii) गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत – अव्ययीभाव
(iv) पालापाचोळा – पाला, पाचोळा वगैरे – समाहार वंद्व
(v) सप्तपदी – सात पावलांचा समूह – द्विगू
(vi) धर्माधर्म – धर्म किंवा अधर्म – वैकल्पिक द्वंद्व

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

गोष्ट

२. अलंकार :
पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा व एक उदाहरण दया :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 17
उत्तर :
हा व्यतिरेक अलंकार आहे.
उदाहरण : कामधेनुच्या दुग्धाहुनहीं ओज हिचे बलवान,

गोष्ट

३. वृत्त
पुढील ओळींचे गण पाडा व वृत्त ओळखा :
जो घे न भोग जरी पात्र-करी न देही
त्याच्या धनास मग केवळ नाश पाही:
उत्तर :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 18
वृत्त : हे वसंततिलका वृत्त आहे.

गोष्ट

४. शब्दसिद्धी :
(१) (१) ‘पणा’ हा प्रत्यय असलेले चार शब्द लिर:
[ ] [ ] [ ] [ ]
(२) ‘प्र’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा :
[ ] [ ] [ ] [ ]
(३) ‘दिवसेंदिवस सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा :
[ ] [ ] [ ] [ ]

गोष्ट

(२) खालील तक्ता पूर्ण करा. (मार्च १९)
अवजड, लढाई, निरोगी, जमीनदार.
प्रत्ययघटित – उपसर्गघटित
उत्तर:
मख्खपणा – तल्लखपणा
खंबीरपणा – कणखरपणा

(२) प्रभाव प्रशिक्षण – प्रमोद प्रकार

(३) महिनोंमहिने – क्षणोक्षणी
जवळपास – वारंवार

(२) खालील तक्ता पूर्ण करा.
प्रत्ययघटित – उपसर्गघटित
लढाई – अवजड
जमीनदार – निरोगी

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

गोष्ट

५. सामान्यरूप :

(१) तक्ता भरा :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 19
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 20

गोष्ट

*(२) तक्ता भरा:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 21
उत्तर:
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 22

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

गोष्ट

६. वाक्प्रचार:
(१) बरोबर जोडी ओळखा :
(i) सर करणे – काबीज करणे.
(ii) देवाघरी जाणे – जिवंत ठेवणे.
(iii) शिरोधार्य मानणे – अपमान करणे,
(iv) घोळ निस्तरणे – घोटाळा करणे.
उत्तर :
बरोबर जोडी → सर करणे – काबीज करणे.

गोष्ट

(२) चुकीची जोडी ओळखा :
(i) चक्काचूर होणे – चिरडून नाश पावणे.
(ii) वावड्या उठणे – खोट्या बातम्या पसरणे,
(iii) पित्त खवळणे – आजारी पडणे.
(iv) गगनभरारी घेणे – यशाकडे झेप घेणे.
उत्तर :
चुकीची जोडी → पित्त खवळणे – आजारी पडणे,

(३) दिलेल्या वाक्यांत कंसातील वाकप्रचारांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा : (मार्च १९) (कान देऊन ऐकणे, मुहूर्तमेढ रोवणे, अचंवित होणे)
(i) सरांचे भाषण मी लक्षपूर्वक ऐकत होते.
(ii) सर्कशीतील रोमांचक कसरती पाहून राधा आश्चर्यचकित झाली.
उत्तर:
(i) सरांचे भाषण मी कान देऊन ऐकत होतो.
(ii) सर्कशीतील रोमांचक कसरती पाहून राधा अचंबित झाली.

गोष्ट

भाषिक घटकांवर आधारित कृती:

(३) पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :
उत्तर:
(i) पर्वतावर चढणारी व्यक्ती – गिर्यारोहक
(ii) डोंगरावर चढणे – गिर्यारोहण
(iii) उत्तुंग घेतलेली झेप – गगनभरारी
(iv) जखमा औषध लावून झाकणारी – मलमपट्टी
(v) नियमबद्ध घेतलेले शिक्षण – प्रशिक्षण

(४) पुढील शब्दाचे दोन अर्थ लिहा : (सराव कृतिपत्रिका-३)
[ ] ←[घन]→ [ ]
उत्तर :
[ढग] ←[घन]→ [दाट]

(५) पुढील शब्दांच्या अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा :
(i) देवाघरी → [ ] [ ] [ ] [ ]
(i) गगनभरारी → [ ] [ ] [ ] [ ]
उत्तर:
(i) देवाघरी → [देवा] [घरी] [रीघ] [वघ]
(i) गगनभरारी → [गगन] [नभ] [भरारी] [रन]

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

गोष्ट

२. लेखननियम :
(१) अचूक शब्द लिहा :
(i) शौरोधार्य / शिरोधार्य / शिरोर्याय / शौरपार्य.
(ii) पूरस्कार / पुरसकार / पुरस्कार / पुरस्कर.
(iii) ऊत्स्फूर्त/ उत्स्फूर्त/ उस्त्फूर्त/ उत्स्फुर्त. (सराव कृतिपत्रिका-३)
(iv) मनःस्थिती/मनस्थिती/मनःस्थिति / मनःस्थीती
(v) सम्मान/संमान सम्मान/सनमान.
उत्तर:
(i) शिरोधार्य
(ii) पुरस्कार
(iii) उत्स्फूर्त
(iv) मनःस्थिती
(v) सन्मान.

गोष्ट

(२) पुढील वाक्ये लेखननियमानुसार लिहा :
(i) मूसंडि मारत शीताफीने मि कॉर्नर सीट पटकावलि.
(ii) येक रेल्वे माज्या पायांवरुन धडधडत निघुन गेली.
उत्तर:
(i) मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली.
(ii) एक रेल्वे माझ्या पायांवरून घडधडत निघून गेली.

गोष्ट

३. विरामचिन्हे :
पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
(i) ओहो किती सुंदर दृश्य आहे ते
(ii) तो म्हणाला तुला काही कळतं की नाही
उत्तर:
(i) ओहो, किती सुंदर दृश्य आहे ते!
(ii) तो म्हणाला, “तुला काही कळतं की नाही?”

गोष्ट

४. पारिभाषिक शब्द :

(१) पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा :
उत्तर:
(i) Bonafide Certificate – वास्तविकता प्रमाणपत्र
(ii) Application form – आवेदन पत्र
(iii) Feedback – प्रत्याभरण
(iv) News Agency – वृत्तसंस्था
(v) Official Record – कार्यालयीन अभिलेख
(vi) Overtime – अतिरिक्त काळ,

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

गोष्ट

५. अकारविल्हे/भाषिक खेळ :
पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा :
(i) शिक्षण → प्रशिक्षण → सहनशक्ती → दुरवस्था.
(ii) स्टेशन → लखनऊ → गर्दी → लक्ष,
उत्तर:
(i) दुरवस्था → प्रशिक्षण → शिक्षण → सहनशक्ती.
(ii) गर्दी – लखनऊ → लक्ष → स्टेशन.

.

गोष्ट

गोष्ट अरुणिमाची शब्दार्थ

जन्मजात – जन्मापासून.
सांगणारेय – सांगणार आहे.
निस्तरण्यासाठी – केलेल्या चुका सुधारून काम पूर्ण करणे.
कसेबसे – नाइलाजाने, मोठ्या कष्टाने, अनिच्छेने, जमेल तसे.
दुरवस्था – वाईट अवस्था,
तल्लखपणे – तीक्ष्णपणे, आत्यंतिक हुशारीने, सर्व बुद्धिमत्ता वापरून.
शल्य – टोचणी.
खडतर – कठीण, त्रासदायक, उग्र.
सहीसलामत – सुखरूप.
गोष्ट अरुणिमाची इंग्रजी शब्दांचे अर्थ

कॉल लेटर – नोकरीचे आमंत्रण देणारे नेमणुकीपूर्वीचे पत्र.
नॅशनल – राष्ट्रीय, कॉर्नर
सीट – कडेचे आसन, (रेल्वे)
ट्रॅक – (रेल्वे) रूळ.
हॉस्पिटल – रुग्णालय,
मोटिव्हेटर – स्फूर्तिदाता.
डिस्चार्ज – रुग्णालयातून उपचारांनंतर रुग्णाची केलेली पाठवणूक, डेथ
झोन – मृत्युप्रवण क्षेत्र.
स्पॉन्सरशिप – प्रायोजकता,
ऑक्सिजन – प्राणवायू.
फॉर्चुन – भवितव्य, बेस
कॅम्प – तळछावणी.
डेस्टिनी – नियती, दैव, प्रारब्ध, प्राक्तन,
गोष्ट अरुणिमाची वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

शिरोधार्य मानणे : आदरपूर्वक स्वीकार करणे.
विचारचक्र सुरू होणे : विचार सुरू होणे.
प्रसाद देणे : आशीर्वाद म्हणून एखादी गोष्ट देणे; (येथे अर्थ) भरपूर बदडून काढणे.
ढालीप्रमाणे रक्षण करणे : सर्व संकटे स्वतः झेलून दुसऱ्याचे रक्षण करणे.
गगनभरारी घेणे : खूप प्रगती करणे.
वेड रक्तात असणे : मुळातच ओढ असणे.
डोक्यावर परिणाम होणे : वेड लागणे.
हसण्यावारी नेणे : काहीही महत्त्व न देणे.
दाखवून देणे : सिद्ध करणे.
तावून सुलाखून निघणे : आत्यंतिक कठीण परीक्षेत यशस्वी होणे.
तोंड देणे : सामोरे जाणे.
पित्त खवळणे : खूप संतापणे.
धडा देणे : शिकवण देणे.
चाळण होणे : चाळणीप्रमाणे भोके पडणे, छिन्नविच्छिन्न होणे.
Marathi Kumarbharti Class 10th Digest भाग-३

गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय - Gosht Arunimachi svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

    • गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी
    • गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय
    • गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय
    • गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय इयत्ता दहावी
    • गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी मराठी
    • गोष्ट अरुणिमा ची सुप्रिया खोत
    • गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी चा धडा
    • गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय दहावी
    • गोष्ट अरुणिमा ची स्वाध्याय

    गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय - Gosht Arunimachi svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

    सुप्रिया खोत (१९८०) :
    प्रसिद्ध लेखिका. विविध वृत्तपत्रांतून व मासिकांतून लेखन. महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, कृषीवल यांसारख्या विविध वृत्तपत्रांमधून  सदर लेखन. छात्र प्रबोधन, पुणे येथे साहाय्यक संपादिका म्हणून काही काळ कार्यरत.  जिद्द, चिकाटी, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, प्रयत्नवाद याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘अरुणिमा’! अपघातामुळे अपंगत्व आलेल्या  अरुणिमाने आयुष्यात हार तर मानली नाहीच, उलट ध्येयाचे उंच शिखर गाठण्यासाठी ती सज्ज झाली. ‘एव्हरेस्ट गाठणे’ हे भल्याभल्यांचे  स्वप्न असते; पण सकारात्मक दृष्टीने अरुणिमाने हे स्वप्न सत्यात उतरवले.  या पाठात अरुणिमा स्वत:वर आलेल्या संकटात तिला गमवाव्या लागणाऱ्या पायांसाठी सहानुभूतीची अपेक्षा करताना दिसत नाही,  तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्याचा आदर्श तुमच्यासमोर ठेवते, किंबहुना आपल्या प्रत्येकात एक ‘जिद्दी अरुणिमा’  असते. तुमच्यातल्या अरुणिमाचा शोध घ्या. ध्येय साध्य करताना आलेली निष्फळता म्हणजे अपयश नव्हे, तर कमकुवत ध्येय म्हणजे  अपयश, हे कायम लक्षात ठेवा असे अरुणिमा सांगते.

    गोष्ट अरुणिमाची - Gosht Arunimachi 

    दोस्तांनो, मी.. अरुणिमा सिन्हा! आज तुम्ही गुगलवर शोधले तर  ‘माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग महिला आणि माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय’ असा उल्लेख जिचा दिसतो तीच मी!  पण एक सांगू्? मी काही जन्मजात अपंग वगैरे नाही...नव्हते.. धडधाकट  असल्यापासूनची गोष्ट आज मी सांगणारेय तुम्हांला... लखनऊपासून २०० किमी. अंतरावर असणारं आंबेडकरनगर हे  माझं गाव. घरी मी, आई, लहान भाऊ. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं.  माझे वडील मी लहान असतानाच देवाघरी गेले. आता भाईसाब (मोठ्या  बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी  जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर ‘आता सीआयएसएफ  (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील’, हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि ‘कॉल लेटर’ आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच  चुकवलेली होती. 

    हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतून  मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. ‘बस...एवढे  कागदपत्रांचे काम झाले, की झालेच आपले पक्के.’ अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या  तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते; पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव  साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी माझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या डब्यातला प्रत्येकजण ‘अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे’,  

    अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयाण अंधारात  माझे दोन्ही हात-पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क चालत्या गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. ‘अरुणिमा,  रेल्वेयेतेय आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे’, हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता.  त्याआधीच एक रेल्वे माझ्या पायांवरून धडधडत निघून गेली. नंतर महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार,  तब्बल ४९ रेल्वेगाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या...एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा तर चक्काचूर  झालाच होता; पण दुसऱ्या पायाचीही दुरवस्था झालेली.

    त्या रात्री तब्बल सात तास, रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. आश्चर्य म्हणजे माझी  शुद्ध हरपली नव्हती आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तिथून सुटकेचा विचार करत होता...सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे  सफाई कामगार तिथे आले. हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून. त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल  केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार.  बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्यांना मीच धीर दिला, ‘डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी  चालेल.

    ’ डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वत:चे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्यादेखतच माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर होते; पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. ‘फुटबॉल  आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली’ ही बातमी प्रसारमाध्यमांनी  उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या ‘एम्स’मध्ये (AIIMS) हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्याने  अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या...पण...पण शल्य एकच होतं, की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत  होत्या. ‘अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली’ इथपासून ते  ‘अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला’, इथपर्यंत काहीही छापून येत होतं. 

    तब्बल चार महिने ‘एम्स’मध्ये (AIIMS)  राहिल्यानंतर, शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती; पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. मी नि माझं ढालीप्रमाणं रक्षण करणारं कुटुंब-आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो; पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस. त्याच दिवशी, हॉस्पिटलमध्ये पडल्या पडल्या मी निर्धार केला, ‘जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोटे दाखवत  आहेत त्यांना बोलू दे; पण एक दिवस नक्की माझा असेल, जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल!’ विश्वास ठेवा- कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नव्हता. एका फटक्यात माझं शरीर अपंग  झालं होतं; पण माझं मन थोडंच अपंग होतं? गगनभरारी घ्यायचं वेड रक्तातच असावं लागतं...जेव्हा आपण आपल्या  मनाने एखादी गोष्ट ठरवताे तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू? आपला सर्वांत मोठा मोटिव्हेटर  कोण असतो? तो दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वत:च असताे. 

    आता उठता-बसता, खाता-पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करू लागले होते. माझ्या, एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. ‘शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसताेय.’ अर्थातच लोकांनी  माझं बोलणं हसण्यावरी नेलं; पण माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला ‘शक्य आहे’ असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. ‘एम्स’मधून डिस्चार्जमिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनाेन्महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची  हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली  कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब-आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. 

    बचेंद्रीजी  म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास...तुला ठाऊक आहे, तुझ्या  आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला,  जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!’’ ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र’ बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण  सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू  पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते.  या प्रशिक्षणाच्या वेळी काही गोष्टी ठळकपणाने लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना, माझ्या कृत्रिम  पायाची टाच व चवडाज्या वेळी मी जमिनीत रुतवत असे त्या वेळी ते सतत गोल फिरत त्यामुळे तो पाय घट्ट रोवणे कठीण  होऊन बसे.

     उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता, त्यावर थोडा जरी दाब दिला गेला तर तीव्र वेदनांचे झटके बसत. माझ्या ‘अशा’ अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेरपा यायला तयारच होईना.  साहजिक आहे, जिथे अव्यंग, धडधाकट माणसे गिरिभ्रमण करण्यास धजत नाहीत तिथे माझी काय कथा? पण माझ्या  घरच्या लोकांनी माझ्या शेरपाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानांना भिडणारी जोशपूर्ण अशी ५२ दिवसांची एक रोमांचकारी लढाई!’ प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी चार बेसकॅम्प्स करावे लागतात. एकदा का तुम्ही ‘कॅम्प चार’ला पोहोचलात, की तिथून शिखर ३५०० फुटांवर आहे; पण जास्तीत जास्त मृत्यूयाच टप्प्यात होतात म्हणून याला ‘डेथ झोन’  म्हटले जाते. मला तुम्हांला सांगावंसं वाटतं, की चौथ्या बेसकॅम्पला पोहोचेपर्यंतही आधीच्या कॅम्पसमध्ये मी माझ्या  सहकारी गिर्यारोहकांमध्ये नेहमीच पुढे असे. इतकी पुढे, की लोक विचारत, ‘मॅडम, हर बार आप हमसे आगे रहते हो! 

     आखिर खाते क्या हो भई?’ मी अपंग, त्यात मुलगी, म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती  मला...कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उमटत होतं... ‘डेथ झोन’ची चढाई सुरू झाली...जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून  दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेला बांग्लादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला...पोटातून उसळून वर  येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. ‘तुला मरायचं नाहीये, अरुणिमा’, अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं  सांगते, आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. २१ मे, २०१३ ला चढाईचा अगदी शेवटला टप्पा आला. ‘अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी  झालाय, आत्ताच मागे फिर...एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील!’ शेरपा कळकळीने बजावत होता; पण अंतर्मनात कुठेतरी  मला ठाऊक होतं की Now or never! आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही, 

    तर माझ्या लेखी माझ्या  शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय, पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी  शेरपाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला..मी अशी नि तशी मरणारच  होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेरपाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं.  आधीच पित्त खवळलेल्या शेरपाने चिडत चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला...अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर  फडकवला. आता मी उतरू लागले होते. जेमतेम ४०-५० पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला...एक सांगू? 

    लक, भाग्य,  किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत; पण Fortune favours the braves यावर माझा पूर्ण विश्वास आहे...जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने  ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलिंडर आम्हांला दिसला. माझ्या शेरपाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या ‘डेथ झोन’मधून सहीसलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या  मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे...आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. ‘माझा दिवस’ अखेर आला होता...गिर्यारोहकांच्या  चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर ‘एव्हरेस्ट’ मी सर केले होते! गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. 

    माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे  तर मिळालेच; पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं  नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे  वागताे यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहाेत की नाहीत हे ठरतं. तुम्हां कुमार वयोगटांतल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं, की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे  म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं, तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं.  
    (छात्र प्रबोधन, मार्च २०१६)

    व्याकरण व भाषाभ्यास

    कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…

    अव्याकरण घटकांवर आधारित कृती :

    १. समास 

    तक्ता पूर्ण करा:
    सामासिक शब्द – विग्रह – समास
    (i) दुःखमुक्त ………………………. – ……………………….
    (i) पूर्वपश्चिम ………………………. – ……………………….
    (iii) गल्लोगल्ली ………………………. – ……………………….
    (iv) पालापाचोळा ………………………. – ……………………….
    (v) सप्तपदी ………………………. – ……………………….
    (vi) धर्माधर्म ………………………. – ……………………….
    SOLUTION
    सामासिक शब्द – विग्रह – समास
    (i) दुःखमुक्त – दुःखापासून मुक्त – विभक्ती तत्पुरुष
    (ii) पूर्वपश्चिम – पूर्व आणि पश्चिम – इतरेतर वंदव
    (iii) गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत – अव्ययीभाव
    (iv) पालापाचोळा – पाला, पाचोळा वगैरे – समाहार वंद्व
    (v) सप्तपदी – सात पावलांचा समूह – द्विगू
    (vi) धर्माधर्म – धर्म किंवा अधर्म – वैकल्पिक द्वंद्व

    Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

    २. अलंकार :

    पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा व एक उदाहरण दया :
    Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 17
    SOLUTION
    हा व्यतिरेक अलंकार आहे.
    उदाहरण : कामधेनुच्या दुग्धाहुनहीं ओज हिचे बलवान,

    ३. वृत्त

    पुढील ओळींचे गण पाडा व वृत्त ओळखा :
    जो घे न भोग जरी पात्र-करी न देही
    त्याच्या धनास मग केवळ नाश पाही:
    SOLUTION
    Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 18
    वृत्त : हे वसंततिलका वृत्त आहे.

    ४. शब्दसिद्धी :

    (१) ‘पणा’ हा प्रत्यय असलेले चार शब्द लिर:
    [ ] [ ] [ ] [ ]

    (२) ‘प्र’ हा उपसर्ग असलेले चार शब्द लिहा :
    [ ] [ ] [ ] [ ]
    (३) ‘दिवसेंदिवस सारखे चार अभ्यस्त शब्द लिहा :
    [ ] [ ] [ ] [ ]

    (२) खालील तक्ता पूर्ण करा. (मार्च १९)

    (२) खालील तक्ता पूर्ण करा. (मार्च १९)
    अवजड, लढाई, निरोगी, जमीनदार.
    प्रत्ययघटित – उपसर्गघटित
    SOLUTION
    मख्खपणा – तल्लखपणा
    खंबीरपणा – कणखरपणा

    (२) प्रभाव प्रशिक्षण – प्रमोद प्रकार

    (३) महिनोंमहिने – क्षणोक्षणी
    जवळपास – वारंवार

    (२) खालील तक्ता पूर्ण करा.

    प्रत्ययघटित – उपसर्गघटित
    लढाई – अवजड
    जमीनदार – निरोगी

    Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

    ५. सामान्यरूप :

    (१) तक्ता भरा :
    Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 19
    SOLUTION
    Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 20

    *(२) तक्ता भरा:
    Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 21
    SOLUTION
    Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची 22

    Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

    ६. वाक्प्रचार:

    (१) बरोबर जोडी ओळखा :
    (i) सर करणे – काबीज करणे.
    (ii) देवाघरी जाणे – जिवंत ठेवणे.
    (iii) शिरोधार्य मानणे – अपमान करणे,
    (iv) घोळ निस्तरणे – घोटाळा करणे.
    SOLUTION
    बरोबर जोडी → सर करणे – काबीज करणे.

    (२) चुकीची जोडी ओळखा :
    (i) चक्काचूर होणे – चिरडून नाश पावणे.
    (ii) वावड्या उठणे – खोट्या बातम्या पसरणे,
    (iii) पित्त खवळणे – आजारी पडणे.
    (iv) गगनभरारी घेणे – यशाकडे झेप घेणे.
    SOLUTION
    चुकीची जोडी → पित्त खवळणे – आजारी पडणे,

    (३) दिलेल्या वाक्यांत कंसातील वाकप्रचारांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा : (मार्च १९) (कान देऊन ऐकणे, मुहूर्तमेढ रोवणे, अचंवित होणे)
    (i) सरांचे भाषण मी लक्षपूर्वक ऐकत होते.
    (ii) सर्कशीतील रोमांचक कसरती पाहून राधा आश्चर्यचकित झाली.
    SOLUTION
    (i) सरांचे भाषण मी कान देऊन ऐकत होतो.
    (ii) सर्कशीतील रोमांचक कसरती पाहून राधा अचंबित झाली.

    भाषिक घटकांवर आधारित कृती:

    (३) पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा :
    SOLUTION
    (i) पर्वतावर चढणारी व्यक्ती – गिर्यारोहक
    (ii) डोंगरावर चढणे – गिर्यारोहण
    (iii) उत्तुंग घेतलेली झेप – गगनभरारी
    (iv) जखमा औषध लावून झाकणारी – मलमपट्टी
    (v) नियमबद्ध घेतलेले शिक्षण – प्रशिक्षण

    (४) पुढील शब्दाचे दोन अर्थ लिहा : (सराव कृतिपत्रिका-३)
    [ ] ←[घन]→ [ ]
    SOLUTION
    [ढग] ←[घन]→ [दाट]

    (५) पुढील शब्दांच्या अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा :
    (i) देवाघरी → [ ] [ ] [ ] [ ]
    (i) गगनभरारी → [ ] [ ] [ ] [ ]
    SOLUTION
    (i) देवाघरी → [देवा] [घरी] [रीघ] [वघ]
    (i) गगनभरारी → [गगन] [नभ] [भरारी] [रन]

    Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

    २. लेखननियम :

    (१) अचूक शब्द लिहा :
    (i) शौरोधार्य / शिरोधार्य / शिरोर्याय / शौरपार्य.
    (ii) पूरस्कार / पुरसकार / पुरस्कार / पुरस्कर.
    (iii) ऊत्स्फूर्त/ उत्स्फूर्त/ उस्त्फूर्त/ उत्स्फुर्त. (सराव कृतिपत्रिका-३)
    (iv) मनःस्थिती/मनस्थिती/मनःस्थिति / मनःस्थीती
    (v) सम्मान/संमान सम्मान/सनमान.
    SOLUTION
    (i) शिरोधार्य
    (ii) पुरस्कार
    (iii) उत्स्फूर्त
    (iv) मनःस्थिती
    (v) सन्मान.

    (२) पुढील वाक्ये लेखननियमानुसार लिहा :

    (i) मूसंडि मारत शीताफीने मि कॉर्नर सीट पटकावलि.
    (ii) येक रेल्वे माज्या पायांवरुन धडधडत निघुन गेली.
    SOLUTION
    (i) मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली.
    (ii) एक रेल्वे माझ्या पायांवरून घडधडत निघून गेली.

    ३. विरामचिन्हे :

    पुढील वाक्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हे घालून वाक्ये पुन्हा लिहा :
    (i) ओहो किती सुंदर दृश्य आहे ते
    (ii) तो म्हणाला तुला काही कळतं की नाही
    SOLUTION
    (i) ओहो, किती सुंदर दृश्य आहे ते!
    (ii) तो म्हणाला, “तुला काही कळतं की नाही?”

    ४. पारिभाषिक शब्द 

    (१) पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा :
    SOLUTION
    (i) Bonafide Certificate – वास्तविकता प्रमाणपत्र
    (ii) Application form – आवेदन पत्र
    (iii) Feedback – प्रत्याभरण
    (iv) News Agency – वृत्तसंस्था
    (v) Official Record – कार्यालयीन अभिलेख
    (vi) Overtime – अतिरिक्त काळ,

    Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 11 गोष्ट अरुणिमाची

    ५. अकारविल्हे/भाषिक खेळ :

    पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा :
    (i) शिक्षण → प्रशिक्षण → सहनशक्ती → दुरवस्था.
    (ii) स्टेशन → लखनऊ → गर्दी → लक्ष,
    SOLUTION
    (i) दुरवस्था → प्रशिक्षण → शिक्षण → सहनशक्ती.
    (ii) गर्दी – लखनऊ → लक्ष → स्टेशन.

    गोष्ट अरुणिमाची शब्दार्थ

    1. जन्मजात – जन्मापासून.
    2. सांगणारेय – सांगणार आहे.
    3. निस्तरण्यासाठी – केलेल्या चुका सुधारून काम पूर्ण करणे.
    4. कसेबसे – नाइलाजाने, मोठ्या कष्टाने, अनिच्छेने, जमेल तसे.
    5. दुरवस्था – वाईट अवस्था,
    6. तल्लखपणे – तीक्ष्णपणे, आत्यंतिक हुशारीने, सर्व बुद्धिमत्ता वापरून.
    7. शल्य – टोचणी.
    8. खडतर – कठीण, त्रासदायक, उग्र.
    9. सहीसलामत – सुखरूप.

    गोष्ट अरुणिमाची इंग्रजी शब्दांचे अर्थ

    1. कॉल लेटर – नोकरीचे आमंत्रण देणारे नेमणुकीपूर्वीचे पत्र.
    2. नॅशनल – राष्ट्रीय, कॉर्नर
    3. सीट – कडेचे आसन, (रेल्वे)
    4. ट्रॅक – (रेल्वे) रूळ.
    5. हॉस्पिटल – रुग्णालय,
    6. मोटिव्हेटर – स्फूर्तिदाता.
    7. डिस्चार्ज – रुग्णालयातून उपचारांनंतर रुग्णाची केलेली पाठवणूक, डेथ
    8. झोन – मृत्युप्रवण क्षेत्र.
    9. स्पॉन्सरशिप – प्रायोजकता,
    10. ऑक्सिजन – प्राणवायू.
    11. फॉर्चुन – भवितव्य, बेस
    12. कॅम्प – तळछावणी.
    13. डेस्टिनी – नियती, दैव, प्रारब्ध, प्राक्तन,


    अरुणिमाची वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

    1. शिरोधार्य मानणे : आदरपूर्वक स्वीकार करणे.
    2. विचारचक्र सुरू होणे : विचार सुरू होणे.
    3. प्रसाद देणे : आशीर्वाद म्हणून एखादी गोष्ट देणे; (येथे अर्थ) भरपूर बदडून काढणे.
    4. ढालीप्रमाणे रक्षण करणे : सर्व संकटे स्वतः झेलून दुसऱ्याचे रक्षण करणे.
    5. गगनभरारी घेणे : खूप प्रगती करणे.
    6. वेड रक्तात असणे : मुळातच ओढ असणे.
    7. डोक्यावर परिणाम होणे : वेड लागणे.
    8. हसण्यावारी नेणे : काहीही महत्त्व न देणे.
    9. दाखवून देणे : सिद्ध करणे.
    10. तावून सुलाखून निघणे : आत्यंतिक कठीण परीक्षेत यशस्वी होणे.
    11. तोंड देणे : सामोरे जाणे.
    12. पित्त खवळणे : खूप संतापणे.
    13. धडा देणे : शिकवण देणे.
    14. चाळण होणे : चाळणीप्रमाणे भोके पडणे, छिन्नविच्छिन्न होणे.

    Marathi Kumarbharti Class 10th Digest भाग-

    गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय - Gosht Arunimachi svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

    • गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी
    • गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय
    • गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय
    • गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय इयत्ता दहावी
    • गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी मराठी
    • गोष्ट अरुणिमा ची सुप्रिया खोत
    • गोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी चा धडा
    • गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय दहावी
    • गोष्ट अरुणिमा ची स्वाध्याय

    गोष्ट अरुणिमाची स्वाध्याय - Gosht Arunimachi svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

     विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हि पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा गोष्ट अरुणिमाची हा पाठ महत्त्वाचा असून हा पाठ खूप मस्त देखील आहेत या पाठाचा अभ्यास तुम्ही पूर्णपणे करावा जेणेकरून इयत्ता दहावी मध्ये झी मराठी ला विचारलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तरे तुम्हाला लवकरात लवकर शोधतील आम्ही तुमच्या सर्व कमेंट वाचत आहे तुम्हाला अशाच नवीन कोणत्याही प्रकारची ब्लॉगपोस्ट हवी असेल किंवा माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही तुमच्यासाठी ती माहिती लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू या

    अनुक्रमणिका  INDIEX

    पाठ कविता स्वाध्याय LINK
    01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
    02: बोलतो मराठी… Click Now
    03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
    04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
    05: वसंतहृदय चैत्र Click Now
    06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
    07: वस्तू (कविता) Click Now
    08: गवताचे पाते Click Now
    09: वाट पाहताना Click Now
    10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
    11: आप्पांचे पत्र Click Now
    12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
    13: गोष्ट अरुणिमाची Click Now
    14: भरतवाक्य (कविता) Click Now
    15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
    16: काळे केस Click Now
    17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
    18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
    19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
    20: सोनाली Click Now
    21: निर्णय Click Now
    22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
    23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
    24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

     10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

    Post a Comment

    Thanks for Comment

    Previous Post Next Post