खोद आणखी थोडेसे कविता - Khod Ankhi thodese kavita [10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

खोद आणखी थोडेसे कविता - Khod Ankhi thodese kavita [10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 

विद्यार्थी मित्रांनो आज आम्ही परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता दहावी मराठी खोद आणखी थोडेसे या कवितेचे प्रश्न उत्तर खोद आणखी थोडेसे स्वाध्याय हा आणि गाईड चा स्वाध्याय नुसार तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुम्ही खाली पाहू शकता की योग्य पर्याय  शोधून वाक्य पूर्ण करा तसेच त्यानंतर आकृती पूर्ण करा असे एका पाठोपाठ एक पुस्तकाप्रमाणे प्रश्न उत्तरे या ब्लॉग पोस्ट मध्ये दिली आहेत तुम्ही या ब्लॉग बसता जास्तीत जास्त सराव करून खोद आणखी थोडेसे या कवितेत जास्तीत जास्त लक्ष द्यावे असे मला वाटते 

 खोद आणखी थोडेसे या कवितेचे रसग्रहण देखील इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला विचारले जाऊ शकते तरी तुम्ही याचा रसग्रहण आवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले म्हणजे तुमचे रसग्रहण हा मधील जे गुण आहे ते कुठेही जाणार नाही

 निर्मळे अकॅडमी तुमच्यासाठी कशाच इयत्ता दहावीचे मराठी विषय सर्व ब्लॉग पोस्ट घेऊन आलेली आहेत तुम्ही इयत्ता दहावीचे मराठी या विषयाचे सर्व प्रश्न उत्तरे आमच्या निर्मळ एकेडमी ऑफिशिअल वेबसाईट वर मिळवू शकता चला तर पाहूया खोद आणखी थोडेसे कविता त्याचप्रमाणे स्वाध्याय  आणि रसग्रहण देखील

खोद आणखी थोडेसे कविता - Khod Ankhi thodese kavita [10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

कृती | Q (१) (अ) | Page 58
1) खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ______
OPTIONS
विहीर आणखी खोदणे.
जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
घरबांधणीसाठी खोदणे.
वृक्षलागवडीसाठी खोदणे.
SOLUTION
‘खोदणे’ या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.

2) गाणे असते मनी म्हणजे ______
OPTIONS
मन आनंदी असते.
गाणे गाण्याची इच्छा असते.
मनात नवनिर्मिती क्षमता असते.
गाणे लिहिण्याची इच्छा असते.
SOLUTION
गाणे असते मनी म्हणजे मनात नवनिर्मिती क्षमता असते.

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (२) | Page 58
1) 'मनातले गाणे' असे म्हटल्यावर तुम्हांला सुटणाऱ्या कल्पना :
SOLUTION
(१) आईवडिलांविषयी कृतज्ञता भाव
(२) गुरुजनांविषयी आदर
(३) देश प्रेम, मातृभूमि अभिमान
(४) मित्र/मैत्रिणीबद्दल जिव्हाळा

कवितेतील (खोद आणखी थोडेसे) खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

कृती | Q (३) | Page 58

कवितेतील संकल्पना संकल्पनेचा अर्थ
(१) सारी खोटी नसतात नाणी(अ) मनातील विचार व्यक्त करावेत.
(२) घट्ट मिटू नका ओठ(आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.
(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली(इ) सगळे लोक फसवे नसतात.
(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी(ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.
SOLUTION
कवितेतील संकल्पना

संकल्पनेचा अर्थ 

(१) सारी खोटी नसतात नाणी

(इ) सगळे लोक फसवे नसतात.

(२) घट्ट मिटू नका ओठ

(अ) मनातील विचार व्यक्त करावेत.

(३) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली

(ई) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत.

(४) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी

(आ) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे.



कवितेच्या (खोद आणखी थोडेसे) आधारे खालील विधान योग्य की अयोग्य ते लिहा.

कृती | Q (४) (१) | Page 58

1) संयमाने वागा - ______
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
संयमाने वागा - योग्य

2) सकारात्मक राहा - ______
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
सकारात्मक राहा - योग्य

3) उतावळे व्हा - ______ 
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
उतावळे व्हा - अयोग्य

4) चांगुलपणावर विश्वास ठेवा - ______ 
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
चांगुलपणावर विश्वास ठेवा - योग्य

5) नकारात्मक विचार करा - ______ 
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
नकारात्मक विचार करा - अयोग्य

6) खूप हुरळून जा - ______ 
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
खूप हुरळून जा - अयोग्य

7) संवेदनशीलता जपा - ______ 
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
संवेदनशीलता जपा - योग्य

8) जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - ______ 
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - योग्य

9) जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा - ______ 
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
जुन्याच निर्मितीवर विश्वास ठेवा - अयोग्य

10) नवनिर्मितीवर विश्वास ठेवा - ______ 
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
नवनिर्मितीवर विश्वास ठेवा - योग्य 

11) धीर सोडू नका - ______ 
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
धीर सोडू नका - योग्य

12) यशाचा विजयोत्सव करा - ______ 
OPTIONS
योग्य
अयोग्य
SOLUTION
यशाचा विजयोत्सव करा - अयोग्य

काव्यसौंदर्य.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

1) ‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’
SOLUTION
आशयसौंदर्य : 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमध्ये कवयित्रींनी संयम, जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी या गुणांच्या मदतीने जीवनध्येय साध्य करण्याची उमेद माणसाला दिली आहे. माणसाने सकारात्मक आयुष्य कसे जगावे, हे समजावून सांगताना वरील ओळीमध्ये 'प्रयत्नांती परमेश्वर' या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. अविरत प्रयत्न करून आदर्श जीवन जगण्याचा संदेश ही कविता देते.

काव्यसौंदर्य : कोणतेही कार्य करताना धीर सोडू नये. खोल खोल मातीखाली निर्मळ झरा असतो. तो प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करून आणखी थोडेसे खोदावे लागते. हतबल न होता, हिंमत न हारता प्रयत्नरत असावे. दुःखाच्या मातीच्या जाड थराखाली सुखाचा, आनंदाचा अक्षय झरा असतोच. म्हणून निराश न होता ओठ घट्ट मिटून खोदण्याचे म्हणजेच सुख धुंडाळण्याचे कार्य मध्येच थांबवू नये. अंतिमतः प्रयत्नपूर्वक दुःखावर मात करताच येते.

भाषिक वैशिष्ट्ये : साध्या, सोप्या अष्टाक्षरी छंदात कवितेची रचना केल्यामुळे व यमकप्रधानतेमुळे कवितेला गेय लय प्राप्त झाली आहे. नादानुकूल शब्दकळा व ओघवती भाषा यामुळे कवितेतील सौंदर्य प्राप्त झाले आहे. “झरा" या संकल्पनेमधून प्रयत्नवाद रसिकांच्या मनावर पूर्णत: ठसवला आहे

कृती | Q (५) (आ) | Page 58
1) ‘आर्त जन्मांचे असते, रित्या गळणाऱ्या पानी’, या ओळींमधील अर्थ तुमच्या भाषेत स्पष्ट करा.
SOLUTION
कवयित्री आसावरी काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमध्ये माणसाने प्रयत्नवादी होऊन जगण्याची उमेद धरावी, असा उपदेश केला आहे.

कवयित्री म्हणतात - घट्ट ओठ मिटून दुःख सोसत बसू नये. आपल्या मनात खोलवर एक गाणे लपलेले असते, ते शोधून काढायला हवे. हे समजावताना त्यांनी 'गळणाऱ्या पानाचे' प्रतीक वापरले आहे. शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते. झाड निष्पर्ण होते. परंतु जे पान सुकून, रिते होऊन झाडापासून विलग होते, त्या पानात झाडावर असताना सोसलेल्या वेदना असतात. हे जन्माचे आर्त, आयुष्यात सोसलेल्या वेदना, त्या सुरकुतलेल्या गळणाऱ्या पानात सामावलेल्या असतात म्हणून पुन्हा वसंतात पालवी फुटण्याची उमेद ते बाळगून असते. गळणाऱ्या पानामधून जीवन जगण्याची उमेद पुन्हा जागृत होते, हा आशावाद या ओळींतून व्यक्त झाला आहे.

2) गाणे असते गं मनी’, या ओळीतील तुम्हांला समजलेला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश स्पष्ट करा.
SOLUTION
आसावरी काकडे यांनी 'खोद आणखी थोडेसे' या कवितेमधून सकारात्मक जीवन जगण्याची शिकवण देताना प्रत्येकाच्या मनात असलेल्या निर्मिति क्षमतेला आवाहन केले आहे.
कवयित्रींच्या मते माती खाली लपलेला झरा शोधेपर्यंत माणसाने अथक प्रयत्न करायला हवेत. धीर एकवटून आयुष्याचा सकारात्मक शोध घ्यायला हवा. घट्ट ओठ मिटून दुःख सोसत राहू नये. प्रत्येकाचे मन हे निर्मितिक्षम असते. त्या अंतर्मनातील गाभ्याशी ज्याचे त्याचे गाणे दडलेले असते. मनाच्या तळाशी असलेले हे गाणे मर्मबंधाची ठेव असते. आपल्यात मग्न होऊन ते गाणे अनुभवणे हे जीवनाचे सार्थक ठरते. आपल्यातल्या निर्मितिक्षमतेचा शोध आपणच घ्यायला हवा. मनात असलेली निर्मितिक्षमता जागी करायला हवी म्हणजे मग 'आनंदाचे डोही। आनंद तरंग।' ही अवस्था अनुभवता येईल. अशा प्रकारे कवयित्रींनी 'गाणे असते गं मनी' या ओळीतून माणसाला नवनिर्मिती क्षमतेचा संदेश दिला आहे.

3)  फळ मिळत नाही’, याबाबतीत तुम्ही घेतलेला अनुभव लिहा.
SOLUTION
आमचे 'बाभूळगाव' हे गरीब शेतकऱ्यांचे गाव होय! डोंगरझाडी व बिकट मार्ग यामुळे ते तालुक्याच्या गावापासून लांब व सोयींच्या बाबतीत अडचणीचे आहे. आमच्या गावात जेमतेम चौथीपर्यंतच शाळा, तीही एकशिक्षकी एका पडक्या घरात भरायची. पाचवीनंतरच्या विद्यार्थ्यांना जंगलातून वाट काढत दहा किलोमीटर लांबवर तालुक्याच्या गावच्या शाळेत जावे लागायचे. आमचे रोकडे मास्तर फार मेहनती होते. त्यांनी तालुक्याच्या शिक्षणाधिकाऱ्याला एक अर्ज लिहिला व आम्हां मुलांना प्रत्येक पालकाची त्यावर सही आणायला सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या पालकांची सही व अंगठा आणला. पंचक्रोशीतही आम्ही जाऊन मोठमोठ्या माणसांना भेटलो. त्यांच्या शिफारशी गोळा केल्या. गेल्या १५ ऑगस्टला आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले व गुरुजींनी त्यांना पुढच्या शिक्षणव्यवस्थेचा अर्ज दिला. काही निवडक मुलांनी भाषणे करून पुढील शिक्षणाची व्यवस्था गावात होण्यासाठी विनवले. अखेर अथक व निष्ठेने केलेल्या प्रयत्नांमुळे आमच्या गावात जि.प. ची शाळा मंजूर झाली. आम्हांला 'परिश्रमाचे फळ' मिळाले!


खोद आणखी थोडेसे कविता - Khod Ankhi thodese kavita [10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 

आसावरी काकडे (१९५०) :
प्रसिद्ध कवयित्री. त्यांचे ‘अनु मनु शिरू’, ‘ऋतुचक्र’, ‘टिक टॉक ट्रिंग’, ‘भिंगोऱ्या भिंग’ हे बालकविता संग्रह; ‘आकाश’,  ‘आरसा’, ‘उत्तरार्ध’, ‘मी एक दर्शन बिंदू’, ‘लाहो’, ‘शपथ सार्थसहजीवनाची’, ‘स्त्री असण्याचा अर्थ’ हे कवितासंग्रह; ‘तरीही काही बाकी राहील’, ‘बोल माधवी’, ‘लम्हा लम्हा’ हे अनुवादित कवितासंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे. १९९० साली विशाखा पुरस्कार  व १९९२ साली राज्य पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ध्येय साध्य करताना संयमाने, जिद्दीने, आत्मविश्वासाने,  चिकाटीने कार्यरत रहावे लागते. चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात  राहू नये, उमेदीने जगण्यासाठी कष्टाची कास धरावी, असा संदेश कवितेतून व्यक्त होतो. आपण जिथे थांबतो, तिथून चिकाटीने आणखी थोडेसेच पुढे गेले तर यश निश्चितच मिळते. ‘आणखी थोडेसे’ हा शब्द चिकाटी, जिद्द, आशावाद सूचित करणारा आहे.

खोद आणखी थोडेसे कविता

खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.
घट्ट मिटू नये ओठ
गाणे असते गं मनी
आर्त जन्मांचे असते
रित्या गळणाऱ्या पानी.

मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी.
झरा लागेलच तिथे
खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला
बळ लागते थोडेसे!

खोद आणखी थोडेसे कविता - Khod Ankhi thodese kavita [10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 
खोद आणखी थोडेसे कविता
खोद आणखी थोडेसे कविता स्वाध्याय
खोद आणखी थोडेसे कविता रसग्रहण
खोद आणखी थोडेसे कविता अर्थ
खोद आणखी थोडेसे चा अर्थ
खोद आणखी थोडेसे या कवितेचा अर्थ
खोद आणखी थोडेसे कवितेचा विषय
खोद आणखी थोडेसे कविता इयत्ता दहावी
खोद आणखी थोडेसे कविता - Khod Ankhi thodese kavita [10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ] 

 विद्यार्थी मित्रांनो खोद आणखी थोडेसे या कवितेचे प्रश्न उत्तर तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्याकडून काही सुखात झालेले असतील तरीही देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या प्रकारचे इयत्ता दहावी चे प्रश्न उत्तर किंवा कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर त्या अडचणी संबंधित ब्लॉग पोस्ट प्रयत्न करूया

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

2 Comments

Thanks for Comment

Previous Post Next Post