व्युत्पत्ती कोश स्थूलवाचन स्वाध्याय इयत्ता दहावी | Vyutpatree kosh sthoolavaachan svaadhyaay


व्युत्पत्ती कोश स्थूलवाचन स्वाध्याय इयत्ता दहावी | Vyutpatree kosh sthoolavaachan svaadhyaay



टिपा लिहा.

कृती | Q (१) (अ) | Page 92

1) व्युत्पत्ती कोशाचे कार्य
SOLUTION
व्युत्पत्ती कोशाचे कार्य : 
व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान होय. व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखादया शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे होय. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश!
व्युत्पत्ती कोशाचे कार्य पुढीलप्रमाणे चार प्रकारे चालते :
(१) मराठी भाषेतील – प्रमाण व बोली – शब्दांचे मूळ रूप दाखवणे.
(२) विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो. हा शब्दाच्या उच्चारातील बदल व फरक दाखवणे.
(३) भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने फरक होत असतात. भिन्न भिन्न काळात जे शब्दांत बदल होतात, त्या बदलांचे कारण स्पष्ट करणे.
(४) भिन्न भिन्न समाजांत वेगवेगळ्या कारणांनी शब्दाच्या अर्थाच्या अंगानेही बदल संभवतात. हे अर्थातील बदल स्पष्ट करणे.

2) शब्द तयार होण्याचे विविध प्रका
SOLUTION
शब्द तयार होण्याचे विविध प्रकार :
दुसऱ्या भाषेच्या संपर्कातून. 
उदा., इंग्रजीतून आलेले ऑफिस, पेन, टेबल इत्यादी शब्द.
दुसऱ्याच्या भाषेतल्या शब्दांच्या वेगवेगळ्या उच्चारांतून.
उदा., 'डॅम बीस्ट' याचे जुन्या मराठीतले 'डँबीस' हे रूप.
दोन वेगवेगळ्या भाषांतील शब्द आणि प्रत्ययांचे मिश्रण करून.
उदा., फारसी ना हा उपसर्ग + पास हा इंग्रजी शब्द = नापास.
प्रत्यय आणि उपसर्ग लागून.
उदा., वारकरी प्रतिसाद

3) खालील मुद्‌द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
SOLUTION
व्युत्पत्ती कोश : एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण व्युत्पत्ती कोशाची मदत घेतो. व्युत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे तर कळतेच परंतु अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आहे, हेही कळते. असा हा शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल.
१९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 'व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे' असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅ. मुकुंदराव जयकर यांनी अर्थसाहाय्य केले व श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली. अखेर १९४६ साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले.

पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.

कृती | Q (३) | Page 92
शब्द अनेक, अर्थ एकव्युत्पत्ती कोशशब्द एक, अर्थ अनेक
उदा., जल, नीर, तोय... -पाणी उदा., पान - 
पान - झाडाचे पान (पर्ण) 
पान - पुस्तकाचे पान (पृष्ठ)
SOLUTION
शब्द अनेक

अर्थ एक

सागर, रत्नाकर, सिंधू, जलधी

समुद्र

शब्द एक

अर्थ अनेक

तीर

बाण, किनारा


खालील चौकटीत दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा.  

भाषाभ्यास | Q (१) | Page 95

इनामदारधारदारगल्लोगल्लीघमघमअचूकहुबेहूब
आंबटचिंबटमुलूखगिरीधबाधबशिष्टाईअनाकलनीयहुरहुर
हिरवाहिरवामधूनमधूनरस्तोरस्तीदांडगाईउपाहारतिळतिळ
शिलाईलुटूलुटूवटवटसंशयितबेशकमागोमाग

SOLUTION

उपसर्गघटित शब्दप्रत्ययघटित शब्दअभ्यस्त शब्द
अचूकइनामदारगल्लोगल्ली
अनाकलनीयधारदारघमघम 
उपाहारमुलूखगिरीआंबटचिंबट
बेशकशिष्टाईधबाधब 
 दांडगाईहुरहुर
 संशयितहिरवाहिरवा
 शिलाईमधूनमधून
  हुबेहूब
  रस्तोरस्ती
  तिळतिळ 
  लुटूलुटू
  वटवट 
  मागोमाग

व्युत्पत्ती कोश स्थूलवाचन स्वाध्याय इयत्ता दहावी | Vyutpatree kosh sthoolavaachan

 svaadhyaayइयत्ता नववीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भविश्वकोशातून मिळू  शकतात हे आपण अनुभवले. हे शब्द तयार कसे होतात किंवा कसे तयार झाले असावेत, याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या  मनात असते. शब्दाची व्युत्पत्ती पाहणे ही भाषासमृद्धीच्या दृष्टीने आनंददायी प्रक्रिया आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे  नाव ‘सई’ ठेवले. ‘सई’ हा शब्द संस्कृतमधील ‘सखी’ म्हणजे मैत्रीण या शब्दावरून आलेला आहे. 


हे कळल्यावर त्याला किती  आनंद होईल! आपल्या परिचयाच्या शब्दांची व्युत्पत्ती कळल्यावर जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा. व्युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी या हेतूने स्थूलवाचन विभागात समावेश  असलेला हा पाठ महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात.शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितींमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या  प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थप्राप्त होतात, हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे.

राधा : आई, हे काय आहे गं कोपऱ्यात?
आई : अगं, ती सतार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळालीय महाराजांकडून! 
गावाकडे होती, ती आज आणली आहे.
राधा : इनाम...? इनाम म्हणजे काय गं आई? 
आई : (हसून) अगं, इनाम म्हणजे बक्षीस!
राधा : अगं, माझ्या वर्गातील तनया आहे ना... तिचे आडनाव आहे ‘इनामदार’.
आई : हो...मला माहीत आहे ती.
राधा : इनाम म्हणजे बक्षीस. मग इनामदार म्हणजे...आईऽऽ कसा झाला असेल गं हा शब्द तयार?
आई : थांब. आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे. आपण पाहूया हं त्यात ‘इनाम’ शब्द कसा तयार 
झाला असेल? त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल
आई : बघितलंस का राधा? हे इथे ‘अर.’ लिहिले आहे ना! म्हणजे हा अरबी भाषेतला शब्द आहे. आता आपण 
-दार हा प्रत्यय शोधू

बघ -दार हा फारसी प्रत्यय आहे. स्वामित्वदर्शक म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे  दर्शवणारा प्रत्यय. इथे ‘इनामदार’ म्हणजे ‘ज्याच्याजवळ इनाम आहे तो’ असा अर्थ होतो आणि दार  म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. ‘जबाबदार’ हा शब्द तुला माहीत आहे  ना! जो जबाबदारी धारण करतो किंवा घेतो, ज्याच्याकडे जबाबदारी असते तो जबाबदार. तसंच  इनामदार’ म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे किंवा ज्याने इनाम धारण केलेले आहे म्हणजेच ज्याला इनाम मिळालेले आहे असा माणूस.
राधा : आई, ही माहिती किती छान आहे! आता मी नेहमी असे शब्द शोधत जाईन.

व्युत्पत्ती म्हणजे शब्दाच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या  शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या  व्युत्पत्तींचा संग्रह म्हणजे व्युत्पत्ती कोश. 
भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचे मूळ  आपल्याला शोधता येते. 
उदा., भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळांतील  भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या  होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्ती कोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. 

उदा., मराठीतील ‘आग’ हा शब्द ‘संस्कृत’मधील ‘अग्नि’ पासून आला, हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे  कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते. 
उदा., ‘अग्नि’ पासून ‘आग’ हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये‘अग्गि’ हा शब्द तयार झाला. हा उच्चार 
सोपा होत होत मराठी, हिंदी यांसारख्या आधुनिक भाषांत त्यापासून ‘आग’ हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन  भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते (कधी 
कधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होते.) या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्येपाहायला सापडते. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्परसंबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य
असतात. निरीक्षण करा, तुमचे आजी-आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई-बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही
आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा. 

(उदा., व्हॉटस्अॅपची भाषा) या सगळ्यांत खूप  फरक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू  बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थभाषेमध्येस्थिरावत जातो. उदा., ‘शहाणा’ या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्‌धिमान, चलाख असा होता हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते.  आता मूळ अर्थाव्यतिरिक्त ‘शहाणा’चा ‘अतिशहाणा’ असा अर्थसुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे.

‘दिवाळी’ हा शब्द आपण पाहिला. मूळ संस्कृत शब्द ‘दीपावलि’पासून तो आला आहे. (संस्कृत शब्द ‘दीपावलि’चा ‘लि’ ऱ्हस्व असला तरी मराठीत तो दीर्घलिहितात. या शब्दांतील ‘दी’ व ‘ली’ दोन्ही दीर्घ आहेत; पण ‘दिवाळी’ हा शब्द मराठी आहे. त्यात ‘दि’ हा ऱ्हस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे.) विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर  कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हांला वाटले असेल; पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर  आणि त्यांची मूळ रूपे समजल्यावर तुम्हांला ते सोपे वाटेल आणि आपलाच शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या  अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजाही वाटेल.  व्युत्पत्ती कोशात अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे, हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दांची  लघुरूपे आलेली आहेत ती जाणून घेणे आवश्यक आहे. शब्दात सुरुवातीला शब्दाची जात लिहिलेली असते. 

नामाच्या बाबतीत मात्र पुं.-पुल्लिंगी, स्त्री.- स्त्रीलिंगी, न/नपुं.-नपुंसकलिंगी असे लिहिलेले असते. ‘दिवाळी’ हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने ‘स्त्री.’ हे लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. सं-संस्कृत,  प्रा-प्राकृत, बं-बंगाली, ओ-ओडिया, हिं-हिंदी, पं-पंजाबी, सिं-सिंधी, गु-गुजराती. या व्यतिरिक्त कोशकार कधी  एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात. कधी कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती  आपल्याला योग्य वाटते की नाही हेही सांगतात.

लक्षात ठेवा.
(१) १९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते.
(२) स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते.
(३) ‘व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे’, असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला.
(४) कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली.
(५) बॅ. मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहकार्यामुळे व श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे 
व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली.
(६) १९४६ साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या 
निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात.


ताकास तूर लागून देणेहा वाक्प्रचार कसा आला असावा हेआपण समजून घेऊया. शाळेत नाटक बसवले जाणार होते. नाटकात काम करणाऱ्यांमध्ये शरदची निवड झाली होती. मित्र  त्याच्याकडून ही बातमी काढून घेण्यासाठी खूप प्रयत्न करत होते; पण शरदने ताकास तूर लागू दिली नाही. अशा प्रकारचे प्रसंग आपल्यावरही अनेकदा येत असतात. आपणही आपल्या मनात काय आहे हे लोकांना अजिबात  कळू देत नाही. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना आपण अशी काही उत्तरे देत राहतो, की त्यांना काही कळूच नये.  लोकही मग म्हणतात, ‘‘अरे, हा अगदी ताकास तूर लागू देत नाही की!’’ आता ‘ताकास तूर लागू न देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला कळला आहेच. कोशातही त्याचा अर्थ ‘‘(एखाद्या गोष्टीचा दुसऱ्यास) बिलकूल थांग लागू न देणे; टाळाटाळी करून स्वत:च्या मनातील विचार  दुसऱ्यास न समजू देणे’’ अशाच प्रकारचा आहे. पण ताकास तूर लागणे म्हणजे काय! ताक म्हणजे काय? आपण  पितो ते ताक? आणि तूर म्हणजे तरी काय? 

आपल्या मराठी लोकांच्या जेवणात ज्या तुरीच्या डाळीचं वरण  असतं ते त र नावाचं धान्य की काय? ताकाचा अन्तुरीचा संबंध येतो तरी कुठे? येथील शब्द ‘ताक’ असा नसून 
 ताका’ असा आहे आणि ‘ताका’ म्हणजे ‘तागा’. ‘तागा’चा अर्थ ‘मराठी व्युत्पत्ती कोशा’मध्ये कृ. पां.  कुलकर्णी यांनी (१) नव्या (अखंड) कापडाचा गठ्ठा; किंवा (२) (विणकराच्या) मागावरील सबंध न फाडलेले  (कापडाचे) ठाण असा दिलेला आहे. ‘महाराष्ट्र शब्दकोशा’च्या चौथ्या विभागात देखील असा अर्थदिलेला आहे. ताका-गा : मागावरील संबंध न फाडलेले कापड; (कापड इत्यादिकांचे) ठाण. (२) दोरा, धागा. आता ‘तूर’ या शब्दाचा ‘महाराष्ट्र शब्दकोशा’तला अर्थ पाहू. ‘तूर’ म्हणजे एक प्रकारचं द्‌विदल धान्य हा अर्थ तर आहेच. पण या शब्दाला दुसराही एक अर्थ आहे. तो असा- तूर : विणलेले वस्त्र ज्या लाकडाभोवती गुंडाळले जाते ते लाकूड; कोष्ट्याची दांडी कृ. पां. कुलकर्णी यांनी आपल्या ‘मराठी व्युत्पत्ती कोशा’त तूरचा असाच अर्थदिलेला आहे.

 तर ‘ताका’ (किंवा ‘तागा’) आणि ‘तूर’ या शब्दांचे आपल्याला नेहमी माहीत असलेले अर्थ न घेता इथे हे  विणकराच्या व्यवसायातले अर्थच ध्यानात घ्यायला हवेत. कारण विणकराच्या मागावरचा ताका किंवा तागा हा वास्तविक ‘तुरे’वर म्हणजेच लाकडाभोवती गुंडाळला जायला हवा. पण ‘ताका’चा ‘तूर’ नामक वस्तूशी संबंधच  येऊ द्यायचा नाही. ताका व तूर यांचा संबंध टाळायचा. म्हणजे कापड आणि ज्या लाकडाभोवती ते गुंडाळायचे  ते लाकूड यांचा संबंध टाळायचा; म्हणजे जे काम खरोखर अपेक्षित असते, व्हायला हवे असते, होणे रास्त असते, तेच मुद्दाम होऊ द्यायचे नाही, असा याचा अर्थ आहे. 
(‘गंमत शब्दांची’ डॉ. द. दि. पुंडेया पुस्तकातून)

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post