सर्व विश्वचि व्हावे सुखी मराठी | Sarv vishvachi vhave Sukhi [ इयत्ता दहावी मराठी]
|
सर्व विश्वचि व्हावे सुखी मराठी |
खालील चौकट पूर्ण करा.
कृती | Q (१) (अ) | Page 84
1) संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना - ______
संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना - पसायदान
2) मानवी सुखदु:खाशी सहृदयतेने समरस होणे - ______
SOLUTION
मानवी सुखदु:खाशी सहृदयतेने समरस होणे - मैत्री
3) सर्वांभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत - ______
SOLUTION
‘सर्वांभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत - संत एकनाथ
4) सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत - ______
SOLUTION
सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत - संत गाडगे बाबा
5) संत तुकारामांचे जीवनसूत्र - ______
SOLUTION
संत तुकारामांचे जीवनसूत्र - परस्पर सहकार्य
आकृती पूर्ण करा
कृती | Q (२) (अ) | Page 84
1) अपयशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन :
SOLUTION
(१) धर्मकार्यासाठी पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे खर्च करून शिक्षण घ्यावे.
(२) स्वतःच स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे.
(३) सर्वांनी ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे.
(४) नेहमी सत्य तेच मांडावे.
2) संतांना माणसाकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती :
SOLUTION
(१) विनम्रता जोपासावी.
(२) सहृदय मनाने समरस झाले पाहिजे.
(३) परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधावे.
(४) अज्ञान नाहीसे करावे.
3) संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष :
SOLUTION
(१) सहृदय मनाने समरस होणे.
(२) दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे.
(३) दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे.
(४) आपपरभाव न मानणे.
तू झालास मूक समाजाचा नायक - Tu Zalas Muk samajacha Nayak 10th
फरक सांगा
सामान्य माणसाचे मागणे | संतांचे मागणे |
(अ) | (अ) |
(आ) | (आ) |
सामान्य माणसाचे मागणे | संतांचे मागणे |
(अ) वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात. | (अ) सर्व मानवजातीचे कल्याण व्हावे. |
(आ) स्वतःपुरते मर्यादित | (आ) विश्वव्यापक |
खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.
कृती | Q (४) (अ) | Page 85
1) जे खळांची व्यंकटी सांडो - ______
SOLUTION
जे खळांची व्यंकटी सांडो - माणसांच्या मनातील दुष्ट भाव नष्ट होऊ दे.
2) दुरिताचें तिमिर जावो - ______
SOLUTION
दुरिताचें तिमिर जावो - (दुरित म्हणजे दुष्कर्म.) सर्व दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे.
कृती | Q (५) | Page 85
(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)
अ. क्र. | काव्यांश | संतांचे नाव | काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा/भावना |
(१) | ‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’ | ______ | ______ |
(२) | ‘अहंकाराचा वारा न लागो राजसां’ | ______ | ______ |
(३) | ‘सर्वांभूती भगवद्भावो’ | ______ | ______ |
(४) | ‘एक एका साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ’ | ______ | ______ |
(५) | ‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’ | ______ | ______ |
अ. क्र. | काव्यांश | संतांची नावे | काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा/भावना |
(१) | ‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’ | संत तुकडोजी महाराज | विश्वकल्याण |
(२) | ‘अहंकाराचा वारा न लागो राजसां’ | संत नामदेव | नम्रता |
(३) | ‘सर्वांभूती भगवद्भावो’ | संत एकनाथ | मैत्रभाव |
(४) | ‘एक एका साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ’ | संत तुकाराम | सहकार्य |
(५) | ‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’ | संत गाडगे महाराज | स्वप्रयत्न |
स्वमत.
कृती | Q (६) (अ) | Page 85
1) सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
SOLUTION
संत स्वत:पलीकडे जाऊन संपूर्ण जगाकडे पाहतात, त्यांना सर्व प्राणिमात्रांबद्दलच कळवळा वाटतो. त्यांच्या मनात आपपरभाव नसतो. त्यांना सर्व माणसे समान वाटतात; सारखीच प्रिय वाटतात. म्हणून संत महात्मे सर्व मानवजातीचे कल्याण इच्छितात. म्हणूनच 'जो जे वांछील तो ते लाहो' असे ज्ञानदेव म्हणतात. नामदेवांना वाटते की, सर्वांच्या मनातला अहंकार नष्ट व्हावा. म्हणजे सगळेजण एकमेकाला स्वत:च्या हृदयात सामावून घेतील. संत एकनाथांना सर्वांच्याच ठिकाणी भगवद्भाव आढळतो. संत तुकाराम महाराज सर्वांनी एकमेकाला साहाय्य करीत परमेश्वर चरणांपर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतात. सर्वच संत स्वत:साठी काहीही मागत नाहीत. ते समस्त मानवजातीसाठी, समस्त प्राणिमात्रांसाठी परमेश्वराकडे हात जोडून प्रार्थना करतात.
2) भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
SOLUTION
या ओळीतील 'भूत, मैत्र आणि जीव' हे तीन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. देह धारण करणारा प्रत्येकजण 'भूत' होय. म्हणून जगातली सगळी माणसे भूत होत. पण फक्त माणसेच नव्हेत, तर सूक्ष्मजीवांपासून ते हत्ती-गेंडे यांसारखे सर्व प्राणिमात्र भूत होत. तसेच वृक्षवेली यासुद्धा सजीवच आहेत. त्यासुद्धा भूत होत. या सर्वांच्या मनात एकमेकांबद्दल निर्मळ, पवित्र अशी प्रेमभावना निर्माण झाली पाहिजे, ही इच्छा ज्ञानदेव देवाजवळ व्यक्त करतात. जात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे गोष्टींवरून आपण अनेकांना शत्रू समजतो. या भावना बाह्य गुणांवर अवलंबून आहेत. ज्ञानदेव या गोष्टींच्या पलीकडे जायला सांगतात. प्रत्येक जण सुखीच असेल. नेमकी हीच मागणी ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे करीत आहेत.
3) या पाठातून (सर्व विश्वचि व्हावे सुखी) तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
सर्व संतांनी व्यापक दृष्टिकोन बाळगून लोकांना उपदेश केला आहे. सर्व लोकांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे. एकमेकांना, अडीअडचणीत असलेल्या सर्वांना मदत करावी. सर्वांमध्ये सहकार्याची भावना हवी. या तऱ्हेने सर्वजण वागू लागले, तर समाजात शांती नांदेल. माणसे सुखासमाधानाने जगू लागतील. या अशा वातावरणातच माणसे प्रगती करू शकतात, अशा वातावरणात चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत. दंगेधोपे होणार नाहीत. कोणाची पिळवणूक होणार नाही. कोणाची फसवणूक होणार नाही. कोणावर अन्याय होणार नाही. एकंदरीत, सर्व व्यवस्था ही न्यायावर आधारलेली राहील. म्हणून सर्वांनी एकोप्याने राहावे, असे सर्व संत सांगतात. इतरेजनांशी सहृदयतेने समरस झाले पाहिजे. सर्वांनी शिक्षण घेतले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हा पाठ वाचून मला हाच संदेश मिळाला.
खालील ओळींतील वृत्त ओळखा.
भाषाभ्यास | Q (अ) | Page 86
1) म्हणे वासरा। घात झाला असा रे
तुझ्या माऊलीचेच हे खेळ सारे
वृथा धाडिला राम माझा वनासी
न देखो शके त्या जगज्जीवनासी
न दे खो | श के त्या | ज ग ज्जी | व ना सी |
U - - य | U - - य | U - - य | U - - य |
हे भुजंगप्रयात अक्षरगणवृत्त आहे
2) अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी
कधि न मुळि न थांबे, कोणत्या कारणांनी
वचनि मननि त्याच्या, ध्येय हे एक ठावे
स्वपर जनसमूहा सौख्य कारी बनावे
स्व प र | ज न स | मू हा सौ | ख्य का री | ब ना वे |
U U U न | U U U न | U U U न | U U U न | U U U न |
हे मालिनी अक्षरगुणवृत्त आहे.
3) मातीत ते पसरले अति रम्य पंख।
केले वरी उदर पांडुर निष्कलंक।।
चंचू तशीच उघडी पद लांबवीले।
निष्प्राण देह पडला श्रमही निमाले।।
नि ष्प्रा ण | दे ह प | ड ला श्र | म ही नि | मा ले |
- - U त | - U U भ | U - U ज | U - U ज | - - ग ग |
हे वसंततलिका अक्षरगुणवृत्त आहे.
तू झालास मूक समाजाचा नायक - Tu Zalas Muk samajacha Nayak 10th
डॉ. यशवंत पाठक (१९४८) :
ललित लेखक व प्राध्यापक. मराठी संतसाहित्य आणि लोकजीवन, लोककला व लोकसंस्कृती या गोष्टींशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉ. पाठक यांचे सर्व लेखन निर्माण झाले आहे. ‘नाचू कीर्तनाचे रंगी’, ‘ब्रह्मगिरीची सावली’, मातीचं देणं’ हे ललित लेखसंग्रह; ‘नक्षत्रांची नाती’ हे व्यक्तिचित्र; ‘स्पंदने श्रीसमर्थाची’, ‘तुकारामांचे अभंग’, ‘निरंजनाचे माहेर’ ही समीक्षात्मक पुस्तके; ‘आभाळाचे अनुष्ठान’ हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत.
पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. ‘हे विश्वचि माझे घर’ या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्रयुगात आपण घेत आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी ‘वैश्विक खेड्याची’ संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो. तो जवळ यावा, जोडला जावा. एकेक माणूस जोडला, माणसे मनाने जवळ आली, की अवघी मानवता सुखी होईल. संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरीत्या प्रस्तुत पाठात मांडला आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती परउपकारें ।’ ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वत:साठी काहीही मागत नाहीत; परंतु ‘बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ।।’ यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरुनानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्येविश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे, कारण ‘मी’ पासून ‘आम्ही’ या संकल्पनेप्रमाणे ‘अवघे विश्वचि माझे घर’, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा ‘विश्वकल्याण’ याचा परिचय या पाठातून करून घेऊया.
संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते; परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची प्रार्थना केली. संत ज्ञानेश्वर ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते, तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, ‘आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात.
तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा’’, यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, ‘मी देवापाशी आधी मागितले आहे. ते, म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी.’’ संत निवृत्तीनाथ म्हणाले, ‘‘ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा.’’ यातून पसायदान निर्माण झाले. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थविनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत, ‘आपणही गुण्यागोविंदाने राहावे’, हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे,
‘जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ।
माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हटले आहे किंवा ‘दुरिताचें तिमिर जावो’ असे म्हटले आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा होवो, ज्याला जे जे हवे ते ते मिळो अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. असेच मागणे संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितले. एका अभंगात ते म्हणतात,
‘अहंकाराचा वारा न लागो राजसां ।
माझ्या विष्णुदासां भाविकांसी ।।’
संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे, की देवा मला सतत नम्र राहू दे. मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात.
संत एकनाथांनी ‘सर्वांभूती भगवद्भावो । हा चि निजभक्तीचा ठावो ।’ असे म्हटले आहे. प्राणिमात्रात मैत्री असली, की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे. मानवी सुखदु:खाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दु:खात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे; असे झाले तरच जीवाचे मैत्र होते.
संत एकनाथ ‘सर्वांभूती भगवद्भावो ।’ असे म्हणतात तर संत ज्ञानेश्वर यासाठी ‘भूतां परस्परें पडो, मैत्रं जीवाचें’ असे म्हणतात. संत तुकारामांनी देवापाशी ‘संतसंग देईं सदा’ असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली, तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, ‘एक एका साह्य करूं । अवघे धरूं सुपंथ ।’ संत स्वत:साठी काहीही मागत नाहीत. जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. संत रामदास यांनीही विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली आहे.
‘कल्याण करीं देवराया, जनहेत विवरीं ।
तळमळ तळमळ होतचि आहे, हे जन हातीं धरीं ।
संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर, असे मागणे मागतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात-
‘नको धर्मकृत्ये पैसा खर्चूनिया
घेण्यासाठी विद्या तोच खर्चा ।।
स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने
शक्तीने, मुक्तीने सुखी व्हावे ।।’
शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचे कल्याण व्हावे, हेच संत गाडगेबाबांना अभिप्रेत आहे. संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे. अशा मंदिरात ‘मानव देवमूर्ति सुंदर’ असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे, अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञानविज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात, की
‘सर्व विश्वचि व्हावे सुखी । ही धर्माची दृष्टि नेटकी ।
ती आणावी सर्व गावलोकी । तरीच लाभ ।।
सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले. माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्कारांची जोपासना करावी. कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही. त्याला संवादाची नितांत गरज असते, म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे, ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली. तशी त्यांनी आचरणातही आणली. आजच्या विज्ञानयुगात विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे.
संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात ‘हे विश्वचि माझे घर आहे,’ ही कल्पना केली होती याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो; पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे. नाहीतर, राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात; पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते.
त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वत: ऊन सोसतात. लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वत: चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा; असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे.
सर्व विश्वचि व्हावे सुखी मराठी | Sarv vishvachi vhave Sukhi [ इयत्ता दहावी मराठी]
अनुक्रमणिका / INDIEX
10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download