आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय - इयत्ता दहावी मराठी | Aaji kutumbach aagal swadhyay iyatta dahavi

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय | Aaji kutumbach aagal swadhyay iyatta dahavi


पाठात आलेल्या खेळाचे वर्गीकरण करा.

कृती | Q (१) | Page 7

1) 

SOLUTION
बैठे खेळ
(१) चिंचोके
(२) गजगे
(३) खापराच्या भिंगर्‍या
(४) जिबल्या
(५) मुगळा

2) 

SOLUTION
मैदानी खेळ
(१) विटीदांडू 
(२) भोवरे
(३) कुरीचा डाव
(४) गोटया
(५) सुरपारंब्या

खालील मुद्‌द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा.

कृती | Q (२) | Page 7

SOLUTION
आजीचे दिसणे : आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती. तिचा वर्ण गोरा होता. उन्हापावसामुळे तिची त्वचा काळपटली होती. आजीच्या वयाची माणसे कमरेत वाकतात. त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. अजूनही तिचे सगळे दात शाबूत होते. डोक्यावरचे सगळे केस पिकले होते.
आजीचे राहणीमान : त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते. हिरव्या व लाल रंगांची नऊवारी इरकली लुगडी व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे. कपाळावरचं गोंदण दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी. ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वहाणा वापरत असे.

आजीची शिस्त : आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत, असा तिचा कटाक्ष होता. तिने कामांची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटूनपालटून करायला लावी. दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत आपपरभाव करू नये म्हणून मुलांना खाऊपिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. गल्लीतल्या बायका दुपारी गप्पागोष्टींना येत असत. त्या वेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे.

विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.

कृती | Q (३) | Page 7
‘अ’ गट ‘ब’ गट
(१) आळस(अ) अनास्था
(२) आदर(आ) दुरावा
(३) आस्था(इ) उत्साह
(४) आपुलकी(ई) अनादर
SOLUTION

'अ' गट

उत्तर :

(१) आळस

उत्साह

(२) आदर

अनादर

(३) आस्था

अनास्था

(४) आपुलकी

दुरावा


खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.

कृती | Q (४) (अ) | Page 7
1) सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.
SOLUTION
सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.

2) दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.
SOLUTION
दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.

3) कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.
SOLUTION
कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.

कंसातील विशेषणाचा योग्य ठिकाणी वापर करून वाक्य पुन्हा लिहा.

कृती | Q (५) (अ) | Page 7
1) समुद्रकिनारी ______ सहल गेली होती.
OPTIONS
  • खूप
  • त्याचा
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची
SOLUTION
समुद्रकिनारी आमची सहल गेली होती.

2) खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद ______ झाला.
OPTIONS
  • खूप
  • त्याचा
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची
SOLUTION
खूप दिवसांनंतर मैत्रिणीला पाहून राजश्रीचा आनंद द्‌विगुणित झाला.

3) विजय अजयपेक्षा ______ चपळ आहे.
OPTIONS
  • खूप
  • त्याच
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची
SOLUTION
विजय अजयपेक्षा अधिक चपळ आहे.

4) रवीला ______ कैऱ्या खायला खूप आवडतात.
OPTIONS
  • खूप
  • त्याचा
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची
SOLUTION
रवीला आंबट कैऱ्या खायला खूप आवडतात.

5) मला गाणी ऐकण्याची ______ आवड आहे.
OPTIONS
  • खूप
  • त्याचा
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची
SOLUTION
मला गाणी ऐकण्याची खूप आवड आहे.

6) राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु  ______ पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.
OPTIONS
  • खूप
  • त्याचा
  • आंबट
  • अधिक
  • द्‌विगुणित
  • आमची
SOLUTION
राजू कबड्डी छान खेळत होता; परंतु त्याचा पाय अचानक मुरगळल्याने तो बाद झाला.

खालील शब्दाचे दोन स्वतंत्र अर्थ लिहून चौकटी पूर्ण करा.

कृती | Q (६) (अ) | Page 7

 1) 
______वर______

SOLUTION

वरची बाजू

वर

नवरा


2) 
______ग्रह______

SOLUTION

तारा

ग्रह

समज

3)
______काठ______

किनारा

काठ

लुगड्याची किनारा

4) 
______अभंग______

SOLUTION

न भंगणारे

अभंग

एक छंद


स्वमत.

कृती | Q (७) (अ) | Page 8
1) ‘आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
SOLUTION
'आगळ' या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरही तिच्या शब्दाला मान होता. दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून आजी ढाळजेत यायची. गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या. निवडटिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या. अनेक बातम्या, गुपिते उघड व्हायची. सगळ्याजणी बातम्यांवर चर्चा करीत. त्यातून बातम्यांची शहानिशा व्हायची.
वर्तमानपत्राचे वार्ताहर गावांतून बातम्या आणतात. संपादक या बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळज वर्तमानपत्र सारखीच होती. तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या गावभर सांगायला मोकळ्या होत.

2) तुलना करा/साम्य लिहा. 
आगळ - वाड्याचे कवच, आजी - कुटुंबाचे संरक्षक कवच
SOLUTION
आगळ म्हणजे उंची-रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा. एकदा आगळ लावली की चोऱ्यामाऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे. त्यामुळेच ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते.
प्रस्तुत उताऱ्यात आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे. आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती. सुना आपापसात हेवेदावे करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर ढकलू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते.

3) पाठात (आजी : कुटुंबाचं आगळ) चित्रित झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा.
SOLUTION
या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे. त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते. आजी ही कुटुंबप्रमुख होती, कुटुंबाच्या सर्व बाबींवर, सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे. कोणी कोणकोणती कामे कधी व कशी करावीत, हे आजी ठरवत असे.
या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात; याचा कुटुंबालाच फायदा होतो, हे खरे आहे. पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वतंत्र राहत नाही. सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमौज करण्याची परवानगी नव्हती. याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहानसहान आनंदसुद्धा घेता येत नव्हते. त्यातही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावे लागे. ही चांगली स्थिती अजिबात नाही. आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंबपद्धत टिकली नाही.

4) पाठाच्या (आजी : कुटुंबाचं आगळ) शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा.
SOLUTION
ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भलीमोठी, मजबूत भिंत बांधली जाई. भिंतीत एक मजबूत दार असे. त्याला कड्या कोयंडे असतच; शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे. एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे. घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नसे. घरावर कोणाचाही हल्ला होणे शक्य नसे. यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होई. म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभले होते.

पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की, त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती. तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत. कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे. घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे. म्हणजेच त्यांच्यावर बंधने येत. त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येत. या बंधनांचा एक चांगला फायदा होई, कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसे. त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोलमडून पडत नसत. कुटुंबाला अंतर्गत व बाय असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळे. म्हणून 'आजी : कुटुंबाचं आगळ' हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे.

व्याकरण व भाषाभ्यास

शब्दसिद्धी :

1) ‘बे’ हा उपसर्ग लागून तयार होणारे चार शब्द लिहा.
SOLUTION
बेबंद
बेजबाबदार
बेहिशेब
बेबनाव.

पुढील शब्दांना ‘अनीय’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा :

(i) श्रवण – ……………
SOLUTION
श्रवणीय

(ii) वाचन – ………….
SOLUTION
वाचनीय.

दोन अभ्यस्त शब्द लिहा.

SOLUTION
लालेलाल
गारेगार.

४. सामान्यरूप :

पुढील तक्ता पूर्ण करा :

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 3 आजी कुटुंबाचं आगळ 30
SOLUTION
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 3 आजी कुटुंबाचं आगळ 31

आजी


(१) कंसातील वाक्प्रचारांचा त्या खालील वाक्यांत योग्य ठिकाणी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा :
(शाबूत असणे, कानोसा घेणे, कडुसं पडणे, शहानिशा होणे, गुण्यागोविंदाने नांदणे)

1) शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची चौकशी करायचे.
SOLUTION
शाळेतून घरी आलो की बाबा नेहमी अभ्यासाची शहानिशा करायचे.

2) मावळतीला सूर्य गेला नि अंधार पडला.
SOLUTION
मावळतीला सूर्य गेला नि कडुसं पडले.

3) घरातील दोन्ही जावा अगदी खेळीमेळीने राहत.
SOLUTION
घरातील दोन्ही जावा अगदी गुण्यागोविंदाने नांदत होत्या.

4) पाऊस पडणार आहे की नाही, याचा आमचा मोती कान टवकारून अंदाज घेतो.
SOLUTION
पाऊस पडणार आहे की नाही, याचा आमचा मोती कान टवकारून कानोसा घेतो.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 3 आजी : कुटुंबाचं आगळ

(२) पुढील वाक्यांतील वाक्प्रचार शोधून अधोरेखित करा :

1) सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.
SOLUTION
सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो.

2) दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.
SOLUTION
दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.

3) कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.
SOLUTION
कारण नसताना हुकमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 3 आजी : कुटुंबाचं आगळ

आ. (भाषिक घटकांवर आधारित कृतीः
१. शब्दसंपत्ती :

विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा :

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 3 आजी कुटुंबाचं आगळ 32
SOLUTION
(i) आळस × उत्साह
(ii) आदर × अनादर
(iii) आस्था × अनास्था
(iv) आपुलकी × दुरावा

आजी : कुटुंबाचं आगळ Summary in Marathi

पाठाचा आशय या कथानकातील आजी खमकी आहे. तिच्या देहाची ठेवण, तिचे दिसणे, तिचा पेहराव इत्यादी बाबींमध्ये तिचा खमकेपणा दिसून येतो.

‘आगळ ‘मधील नायकाच्या घरी एक गाय होती. ती वरवर्षी व्यायची. त्यामुळे घरामध्ये दुधाची खूप रेलचेल होती. मुलांना भरपूर दुध प्यायला मिळे. आजीला चार सुना होत्या. आजीचा दरारा असल्यामुळे मुलांना खायलाप्यायला देताना सुना आपपरभाव करू शकत नव्हत्या. कामचुकारपणा करू शकत नव्हत्या. आपली कामे दुसरीवर टाकू शकत नव्हत्या. सर्व कामे प्रत्येकीला करावी लागत. या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता. कोणालाही तक्रार करायला वावच नसे. आजीमुळे प्रत्येकीला किंवा प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते. हे संरक्षण आगळइतकेच भक्कम होते.

दुपारच्या वेळी मुलांचे बैठे खेळ किंवा क्वचितप्रसंगी मैदानी खेळ खेळले जात. अशा प्रकारे मुलांचे बालपण तर निसर्गामध्ये सहजगत्या घडत होते. या सगळ्याला आजीच्या मायेच्या सावलीचा आधार होता.

दुपारपर्यंतची कामे आटोपल्यावर थोडीशी विश्रांती घेऊन आजी ढाळजेत येऊन बसायची. गल्लीतल्या बायका जमायच्या. निवडटिपण असली कामे करता करता गप्पा होत. गावभरच्या बातम्या कळत. आजीच्या समोरच बातम्यांची शहानिशा होई. ही ढाळज म्हणजे एक प्रकारे गावाचे वर्तमानपत्रच होती. रात्री आठ वाजता वाड्याचा दरवाजा बंद होई आणि आगळ बसवली जाई. आगळ बसवली की संरक्षणाची हमी मिळे.

आजी : कुटुंबाचं आगळ शब्दार्थ

रापणे – त्वचेवर काळपटलेली छटा येणे.
गोंदण – विशिष्ट प्रकारच्या सुईने त्वचेवर टोचून टोचून नक्षी काढणे.
गावरान – गावठी. वेत – वासराला जन्म देणे.
धार काढणे – गाई-म्हशीचे दूध काढणे.
चरवी – दूध काढण्याचे भांडे.
धारोष्ण – उष्णपणा निवला नाही असे ताजे दूध.
सरपण – इंधन (विशेषतः लाकडांचे).
ढाळज – मोठा वाडा वगैरेंसारख्या घराच्या मुख्य दरवाजाजवळची आतल्या बाजूची
जागा, पडवी, वाकळ – गोधडी.
शहानिशा – खातरजमा,
कडुसं – काळोख होण्याची वेळ,
आगळ – अडसर (येथे अर्थ-भक्कम आधार.).
देवळी – भिंतीतला कोनाडा.
चिंचोके – चिंचेच्या बिया.
गजगे – सागरगोटे,
जिबल्या – अर्धा कापलेला जोड्यांचा तळ.
मुटके – हातपाय पोटाशी आवळून घेऊन आजूबाजूला खूप पाणी उडेल अशा रितीने पाण्यात मारलेली उडी.

आजी : कुटुंबाचं आगळ वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

हुकूमत गाजवणे : अधिकार गाजवणे.
हातात काठी येणे : म्हातारपण येणे; तोल सांभाळता न येणे.
गुण्यागोविंदाने नांदणे : समंजसपणे व आनंदाने राहणे.
धार काढणे : गायी-म्हशीचे दूध काढणे.
कटाक्ष असणे : खास लक्ष देणे.
धान्य निवडणे : धान्यातले गोटे इत्यादी वेचून बाहेर काढणे.
हुक्की येणे : लहर येणे.

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय | Aaji kutumbach aagal swadhyay iyatta dahavi

महेंद्र कदम (१९७२) :
मराठीचे अभ्यासक आणि लेखक. त्यांची ‘मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान’, ‘कवितेची शैली’ ही भाषाविषयक पुस्तके;  ‘कादंबरी : सार आणि विस्तार’, ‘कवितेचे वर्तमान’ ही समीक्षेची पुस्तके; ‘धूळपावलं’ ही कादंबरी; ‘मेघवृष्टी : अभ्यासाच्या विविध  दिशा’ हे संपादन; ‘तो भितो त्याची गोष्ट’ हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘कवितेची शैली’ या पुस्तकास २००७ साली  महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंबपद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. मानवी नातेसंबंध, त्यांतील सुरक्षितता, त्यांचे  परस्परावलंबन आिण या सगळ्याचा आधार असणारी कुटुंबप्रमुख आजी. आजी म्हणजे जणू कुटुंबाचे आगळ. ग्रामीण घरांची रचना,  ग्रामीण जीवनशैली यांवर पाठात प्रकाश टाकला आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील  मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मीळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळते. ‘ग्रामसंस्कृती’ हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो.

माझी आजी. जवळपास साडेपाच फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हापावसाने रापलेल्या त्वचेची. नवऱ्यामागं  सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या-आमच्या-पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्तरी ओलांडली तरी  काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच; पण मोत्यासारखे चमकत राह्यचे. डोकीत एकही केस काळा नव्हता.  विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण.  ताठ कणा, पायांत जुन्या वळणाच्या नालाच्या वहाणा. अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी दोन रंगांची नऊवारी  इरकल लुगडी. कपाळावरचं गांेदणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का. आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब  गुण्यागोविंदाने नांदत होते.  

आमच्या घरी एक गावरान गाय होती. तिला आम्ही कपिली म्हणायचो. एकाआड एक वेताला तरी खोंड ती नक्कीच  द्यायची. त्यामुळं दावणीला कायम कपिलीचीच बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले, की ग्लासं घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पान्हा सोडला, की वासरू आखडायचं न्च रवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली, की पुन्हा वासरू सोडायचं न्ग्लास  घेऊन लायनीत उभं राह्यचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिश्या येईपर्यंत पीत  राह्यचं. तिथंच संपवून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली, की म्हातारी ढाळजंतनं सोप्यात अवतरायची.  तिथंच बसून राह्यची. हातातील माळेचा एकेक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राह्यची, कारण एकच, माझ्या आईने व  धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणनू सक्त पहारा द्यायची. चार घरच्या चार सुना नांदायला आल्या. त्यांचा कुणाचा भरवसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हांला गोठ्यातच दूध मिळण्यावर  आजीचा कटाक्ष असायचा. 

आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरलीही होती. आपण बसून  जावांना कामं लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी  करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी  कुणी घासायची हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं  प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललं जायचं. प्रत्येकीला प्रत्येक  काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिला ती शिकवायची; पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी  करपल्या की करणारणीला लाखोली. सरपण नीट नसलं, की  गड्यांची फजिती.  स्वयंपाक झाला, की आधी आमची बाळगोपाळांची पंगत  बसायची. आजी पुढं सरकायची न्आमची आई जेवायला वाढायची किंवा कुणी काकीही; पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं. कुणाला खरकटं ठेवू  द्यायचं नाही.

 आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या.  दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून, दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजंत येणार. बसता बसता झोपी जाणार; पण झोप भारी सावध. कुठंही खुट्ट झालं, की आजी तट्ट जागी. कानोसा घेऊन पुन्हा डोळं  झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायचं असाे की धान्य निवडायचं असो, सगळ्या िमळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या. गप्पा व्हायच्या. सासुरवास, जाच अशा सगळ्यांच्या चर्चा.  आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथं  यायच्या.

 त्यांची शहानिशा व्हायची न्मग त्या गावभर जायच्या. कडुसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची  वेळ झाली, की म्हातारीची ढाळज सुटायची. माणसं ढाळजंत बसायची. रात्री आठच्या दरम्यान ढाळजंचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली, की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे  आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही सहा फुटांची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी  सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात  घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित  होतं. 

ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायाने वाड्याचं, भरभक्कम संरक्षक कवच होतं.  दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं, सुट्टीचं आम्हांला बाहेर पडायला संधी  नसायची, तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा.  भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजंत, पडवीत, सोप्यात  कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजगं, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या,  चुळूचुळू मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे, तर कधी घरातल्या सरपणातली  लाकडं काढून विटी-दांडू, भोवरं बनवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार  देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनंच हुक्की आली, की पाटी काळी कुळकुळीत  व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या  बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैलं बनवायची. 

कधी गोल गोटे आणून ते घडत बसायचे आणि त्यांच्या छान  छान गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच सटकी मारायची न्गोट्या खेळायला जायचं. तिथंच  कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राह्यची.  झोका खेळायची. उतरताना पारंब्यांच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव-शेव म्हणून खायची. देवळात जायची.  घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोर्चाविहिरीकडं वळवायचा. मनसोक्त पोहायचं. शिवणापानी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. कंटाळा आला, की ओल्या अंगाने  तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागले, की पुन्हा पाण्यात उड्या. 

थकून घरी यायचं आणि भाकरीवर  उड्या टाकायच्या. लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचांचा तौर,  उंबरं, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणसं, गहू-ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेण्ण्या, कलिंगडं,  शेंदाडं, करडीची-पात्रंची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या-मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं  माडगं असा सगळा रानमेवा पोटात जात होता. आम्ही वाढत होतो. भांडत होतो. पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजंत  आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. (आगळ)

आजी कुटुंबाचं आगळ स्वाध्याय | Aaji kutumbach aagal swadhyay iyatta dahavi

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post