कर्ते सुधारक कर्वे स्वाध्याय - Karte Sudharak Karve [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ]
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण काय बघणार आहोत हे तुम्हाला समजला असेल तर सुरुवात करुया आणि जाणून घेऊया कर्ते सुधारक कर्वे या पाठाचा स्वाध्याय त्यानुसार या पोस्टमध्ये अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत आम्ही तुमच्यासाठी या पाठाचे प्रश्न उत्तर आणि प्रश्न उत्तर आणि नंतर संपूर्ण पाठ घेऊन आलो आहेत तरी तुम्ही ब्लॉग पोस्ट पूर्ण बघावी आणि आपल्या मित्रांना सोबत देखील शेअर करावी असेच आम्हाला वाटते
निर्मळ एकेडमी नवनवीन प्रकारच्या ब्लॉग पोस्ट घेऊन येत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करणं हे अत्यंत सोपे होईल आणि या डिजिटल युगामध्ये गाईड साठी पैसे न खर्च करता ऑनलाईन माध्यमाचा वापर करुन अगदी कमी पैशात आणि अगदी चांगल्या प्रकारे आपण करू शकतो याच हेतूने आम्ही निर्मळे अकॅडमी सुरुवात केली आणि आता या निर्मळ अत्यंत गरजेच्या अशा ब्लॉग पोस्ट टाकत आहोत भविष्यामध्ये आम्ही सर्व विषयांवर ब्लॉग पोस्ट टाकणार आहेत तरी तुम्ही निर्मळ याकडे मी लांब होम स्क्रीन वर ऍड केले तरीदेखील चालेल चला आता पाहूया स्वाध्याय
खालील आकृती पूर्ण करा.
कृती | Q (१) (अ) | Page 50
1) महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार :
(१) राष्ट्रीय स्वातंत्र्य
(२) संपूर्ण स्वातंत्र्य
2) महर्षी कर्वे यांचे स्त्री-स्वातंत्र्याबद्दलचे विचार :
SOLUTION
(१) स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
(२) आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले पाहिजे.
(३) स्त्री शिक्षण घेतलेच पाहिजे.
(४) शांतपणे, सोशीकपणे व सहिष्णू वृत्ती स्त्री-शिक्षणाची चळवळ केली पाहिजे.
3) महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने :
SOLUTION
(१) पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र
(२) ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवन कार्य
4) महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने :
SOLUTION
(१) स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे.
(२) उच्चविद्याविभूषित केली पाहिजे.
(३) स्त्रीला पुरुषाइतकेच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
(४) स्त्री शिकली पाहिजे.
5)महर्षी कर्वे यांच्या कार्यकुशलतेचा ओघतक्ता तयार करा.
कार्यात नेमकेपणा होता. |
↓ |
↓ |
↓ |
विचार पक्का झाला की |
↓ |
↓ |
SOLUTION
कार्यात नेमकेपणा होता. |
ते बोलत नसत. |
विचार करीत असत. |
विचार पक्का झाला की |
तो विचार आचरणात आणत. |
लोकांना त्यांच्या कृतीतून त्यांचा विचार समजत असे. |
हे केव्हा घडेल ते लिहा.
कृती | Q (३) (अ) | Page 50
1) कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल ______
SOLUTION
कर्त्या सुधारकाने सुरू केलेले कार्य पूर्णत्वास जाईल, जेव्हा पुरुषांचेही 'शिक्षण' होईल.
2) स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल ______
SOLUTION
स्त्री पुरुषांशी स्पर्धा करू शकेल, जेव्हा ती उच्चविद्याविभूषित होईल.
चौकट पूर्ण करा.
कृती | Q (४) (अ) | Page 50
1) लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा - ______
SOLUTION
लेखकांच्या मते दुसऱ्याच्या दु:खात दु:खी व सुखात सुखी होणारा - स्थितप्रज्ञ
2) कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी - ______
SOLUTION
कर्वे यांना लोकमानसाने दिलेली पदवी - महर्षी
पाठाच्या (कर्ते सुधारक कर्वे) आधारे वाक्याचा उर्वरित भाग लिहून वाक्य पूर्ण करा.
कृती | Q (५) (अ) | Page 50
1) स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे - ______
SOLUTION
स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे आहे
2) समाजाविरूद्ध विद्रोह केला तर - ______
SOLUTION
समाजाविरुद्ध विद्रोह केला तर विद्रोह करणाऱ्याला समाज गिळून टाकायला येईल.
1) लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी - ______
SOLUTION
लोकांनी कर्वे यांची ससेहोलपट चालवली तरी कर्त्यांनी त्यांना शिव्याशाप दिले नाहीत किंवा आपल्या कार्यापासून कर्वे विचलित झाले नाहीत.
2) कार्य’ या शब्दासाठी पाठात (कर्ते सुधारक कर्वे) आलेली विशेषणे शोधा.
SOLUTION
कार्य या नामाची विशेषणे : मोठे, अतोनात, कठीण, ऐतिहासिक, जटिल, अटीतटीचे, महाकठीण, अलौकिक, महान इत्यादी.
खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधा.
कृती | Q (७) (अ) | Page 51
1) शिक्षकांनी सांगितलेली हृद्य आठवण आमच्या मनात घर करून राहिली.
SOLUTION
मनात घर करून राहणे - म्हणजे कायमचे लक्ष्यात राहणे
2) वक्त्याचे विचार अनेकांच्या पचनी पडले नाहीत.
SOLUTION
पचनी न पडणे - म्हणजे न समजले किंवा न पटणे.
खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय शोधून लिहा.
कृती | Q (८) (अ) | Page 51
1) त्याने लाडू व करंज्या खाल्ल्या.
SOLUTION
उभयान्वयी अव्यय - व
2) पाऊस आला आणि गारा पडल्या.
SOLUTION
उभयान्वयी अव्यय - आणि
3) तो येणार, कारण त्याला पैशांची गरज आहे.
SOLUTION
उभयान्वयी अव्यय - कारण
4) आजी म्हणाली, की मी उद्या गावाला जाणार आहे.
SOLUTION
उभयान्वयी अव्यय - की
केवलप्रयोगी अव्ययाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा.
कृती | Q (९) (अ) | Page 51
1) ______! काय सुंदर देखावा आहे हा!
SOLUTION
ओहो! काय सुंदर देखावा आहे हा!
2)______! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.
SOLUTION
अरेरे! असा प्रसंग वैऱ्यावर देखील येऊ नये.
3)______! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.
SOLUTION
छे! तुझी कल्पनाच मुळी मला पसंत नाही.
4) ______! आज तू खूप चांगला खेळलास.
SOLUTION
वाहव्या! आज तू खूप चांगला खेळलास.
स्वमत - मनक्या पेरेन लागा स्थूलवाचन
कृती | Q (१०) (अ) | Page 51
1) ‘स्त्रियांनी शिकणे अत्यंत गरजेचे आहे’, या विधानामागील अण्णांचा दृष्टिकोन स्पष्ट करा.
SOLUTION
समाजात स्त्रियांची संख्या पुरुषांइतकीच असते. थोडी कमी-जास्त भरेल. पण साधारणपणे स्त्रिया म्हणजे समाजाचा अर्धा भाग होय. दुर्दैवाने आपल्या समाजाने स्त्रियांना मागासलेले ठेवले. त्यामुळे अर्धा समाज मागासलेला राहिला. त्याचे अनंत तोटे समाजाला आजसुद्धा भोगावे लागत आहेत. बहुतेक वेळा हे नुकसान मोजता येत नाही. मोजता न आल्यामुळे आपले किती नुकसान झालेले आहे, हे कळतही नाही. स्त्रियांना मागासलेले ठेवल्यामुळे समाजाची अर्धी बुद्धिमत्ता निरुपयोगी राहते. त्या बुद्धीचा समाजाला उपयोग झाला असता, पण ती वाया जाते. पुरुष बहुतांश वेळा स्वार्थी व आत्मकेंद्री असतो. स्त्री अधिक सामाजिक असते. यामुळे कुटुंबातला पुरुष शिकला तर कुटुंबातील एका व्यक्तीचा विकास होतो. मात्र स्त्री शिकली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. अखंड कुटुंब शिक्षित होते. आपण हे ओळखले पाहिजे. स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले पाहिजे.
2) जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण’ हे वचन महर्षी कर्वेयांच्या जीवनाला कसे लागू पडते, ते स्पष्ट करा.
SOLUTION
अण्णासाहेबांनी फार मोठे स्वप्न पाहिले होते. ते फार मोठी झेप घेऊ पाहत होते. त्यांच्या स्वप्नाला संपूर्ण समाजाची साथ मिळाली नाही. समाजाने अण्णासाहेबांना ओळखलेच नाही. समाजाने साथ दिली नाहीच; उलट पराकोटीचा विरोध केला. त्यांचा सतत अपमान केला. त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचे कपडे फाडले. हे रोज घडत होते. त्यामुळे स्वत:चे कपडे रोज रोज शिवण्याची पाळी त्यांच्यावर येई. स्त्री-शिक्षणासाठी देणग्या गोळा केल्या तर भ्रष्टाचाराचा सतत धाक दाखवला जाई. त्यांच्या चळवळीमुळे कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागे. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यातही आला होता. हे सर्व यातनामय होते. लोककल्याणासाठी अण्णासाहेबांनी या यातना सहन केल्या. आज आपण अण्णासाहेबांची स्मारके उभारतो. परंतु प्रत्यक्ष जीवनात त्यांना दुःख, कष्ट आणि यातनाच सहन कराव्या लागल्या. 'जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण' हे तुकाराम महाराजांचे वचन अण्णासाहेबांना तंतोतंत लागू पडते.
3)कर्ते सुधारक कर्वे’ या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे तुम्हांला जाणवलेले वेगळेपण, तुमच्या शब्दांत सांगा.
SOLUTION
अण्णासाहेब कर्वे यांचे फार मोठे वेगळेपण या पाठातून वाचकांसमोर येते. बऱ्याच वेळा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना स्वतःच्या सामाजिक कार्याचा गर्व असतो. ती माणसे या गर्वामुळे आक्रमक बनतात. अण्णासाहेबांची प्रकृती याबाबतीत नेमकी उलटी होती. त्यांना प्रचंड आत्मविश्वास होता. पण गर्व नव्हता. ते कधीच आक्रमक बनले नाहीत. उलट ते शांतपणे, कोणावरही न रागावता, आक्रस्ताळेपणा न करता आपले काम करीत. त्यांचे अपमान झाले. अडवणूक झाली. त्यांच्यावर हल्ले झाले. जाता-येता त्यांचे कपडे फाडले गेले. पण ते विचलित झाले नाहीत. घाबरले नाहीत किंवा दुःखी-कष्टीही झाले नाहीत. ते स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत राहिले. नव्हे ते स्थितप्रज्ञच होते. हा त्यांचा गुण, त्यांचा वेगळेपणा मला खूप भावला आहे. खूप आवडला आहे.
कर्ते सुधारक कर्वे स्वाध्याय - Karte Sudharak Karve [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ]
- 10th class marathi chapter 12
- कर्ते सुधारक कर्वे माहिती
- Karte Sudharak Karve
- कर्ते सुधारक कर्वे स्वाध्याय
कर्ते सुधारक कर्वे स्वाध्याय - Karte Sudharak Karve [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ]
डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे (१९५२) ः
प्रसिद्ध कवी आणि लेखक. ‘एप्सिलॉन’, ‘ये, सखे, ये’, ‘स्वातंत्र्याचे मृत्युपत्र’ हे कवितासंग्रह; ‘राजा शहाजी’ ही महाकादंबरी; ‘शिवछत्रपती’ ही पटकथात्मक कादंबरी; ‘अरण्यकांड’, ‘प्रचारक’, ‘पंचमस्तंभ’, ‘जन्मभूमी’, ‘पाताळयंत्र’ इत्यादी कादंबऱ्या; ‘शून्यपूर्ण’ हा एकांकिकासंग्रह असे चौफेरे लेखन प्रकाशित. महाराष्ट्राबाहेर बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे तसेच वणी येथील ६६ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. महर्षी कर्वेयांचे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे. कर्वेयांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्रीशिक्षणावर केंद्रित केली. ‘महिला विद्यापीठ’ ही कल्पना मूर्त रूपात साकार केली. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वेयांना १९५८ साली ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला. प्रस्तुत पाठात लेखकाने महर्षी कर्वेयांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यांचा परिचय करून दिला आहे.
कर्ते सुधारक कर्वे
रेडिओवर रात्रीच्या बातम्यांत आले होते, की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वेयांचे वयाच्या एकशे पाचाव्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणवू लागले, की नातेवाईक नसलेले गृहस्थ एकशे पाचाव्या वर्षी जाऊनसुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील, तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे! स्वातंत्र्यसमराच्या ऐन धुमाळीच्या काळात, म्हणजे १८ एप्रिल, १८५८ रोजी महर्षी कर्वेयांचा जन्म झाला. नंतर १५ ऑगस्ट, १९४७ रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यांदेखत कमावले गेले; पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही स्वातंत्र्य संपूर्णच हवे असते, हे त्यांना आधीपासून जाणवत होते. या देशातली स्त्री गुलाम आहे राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावरसुद्धा ती गुलामच राहील, हे त्यांना दिसत होते. तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान यावयास हवे, की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र, खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते, की ती आपल्या गुलामीला दागिना मानीत असे!
आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे, असे भासवले जात असेलही; पण, तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रच्छन्न छळच केला जाई. सबब, तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे, हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते! तथापि, हे कार्य अतोनात कठीण आहे, हेही त्यांना दिसत होते. स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे, असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. शांत सोशिकपणे, सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असिधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल, याची त्यांनी खूणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते! नुसत्या अडीअडचणी येतील असे नव्हते. संपूर्ण समाजाविरूद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले, तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल, हे कळत होते. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्ययांतून महर्षी कर्वेयांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवाविवाह होऊ शकतो, हे दाखवून दिले. स्वत: विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला.
सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्रा. धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ ‘सत्पुरुषांचा छळ करावा’, एवढेच ‘ऐतिहासिक कार्य’ तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट, जिथे फाटला तिथे, शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससेहोलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वेविचलित झाले. जसे, संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता; पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही, तसे! कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले. महर्षी कर्वेयांनी ‘अनाथ बालिकाश्रमा’ची मुहूर्तमेढ रोवली.
कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून ‘हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था’ असे त्यांनी तिचे नामांतर केले. ‘पै पै चा निधी’ व ‘मुरुड निधी’ त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती, की यांतील पै पै चा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे! कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव! कर्वे स्वत: मोटार वापरत नसत. मैलोनगणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वत:चे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात, हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे, आपल्या कमाईतून, ते करत. उर्वरीत सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वत:च्याच विश्वात वावरतात, अशी कुरबूर, घरच्यांच्या मनांत घर करून राहिली होती. वस्तुत: समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वेयांची जिद्द होती; पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही!
नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत. विचार करत. विचार पक्का झाला, की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई, की त्यांच्या चित्तात काय चालले आहे! हे डावपेच नव्हते; उलटपक्षी, बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे, हेच श्रेयस्कर असते! महर्षी कर्वेयांजमध्येस्थितप्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वत:च्या सुखदु:खात अविचल राहातो; मात्र, दुसऱ्याच्या दु:खात दु:खी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ! महर्षी कर्वेयांचे लक्ष केवळ समाजसुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत.
इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वेयांना! भारताचे अर्धांग जे स्त्रिया; त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत‘माता’ म्हणतो; सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो, हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वेयांनी, जपानच्या धर्तीवर इ. स. १९१६ साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात, महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्रीशिक्षणाचे माहात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्रीशिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांत त्यांना दोन कार्ये करावयाची होती. एका टोकावर, स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर, तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य!
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मत:च महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात, हालअपेष्टांची तमा न बाळगता, एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो, त्याची मिसाल आहेत डॉ. धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने १९५८ साली, ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने, डोक्यावर घेतले. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागावलो मी तिला! मी तिला म्हटले,
‘‘कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही? तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना!’’ स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वेयांच्या कर्तेपणाने एसएनडीटी महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात; पण, जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतील, असे वाटत नाही. परंपरागत संस्कारांमुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानांतच येत नाही, की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिची स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे ‘अस्तित्व’ मानायला शिकवणे, म्हणजे ‘पुरुषशिक्षण’! पुरुष शिक्षित झाला, की त्याला स्त्रीस्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषांचेही ‘शिक्षण’ झाले, की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वेया कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. ... मग डोळे टिचणार नाहीत; तिथे हसू फुलेल!
कर्ते सुधारक कर्वे स्वाध्याय - Karte Sudharak Karve [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ]
विद्यार्थी मित्रांनो आपल्यालाही ब्लॉग पोस्ट कशी वाटली आम्ही प्रथम त्रास वाद्य आणि त्यानंतर धडा या स्वरूपामध्ये तुमच्यापुढे ब्लॉग पोस्ट साजरी केली तरी तुम्हाला ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की पहा तुमची प्रत्येक कमेंट आम्ही पाहत आहोत आणि त्या कमेंट ला रिप्लाय व तसेच कमेंट नुसार आम्ही कृतीदेखील करत आहोत तुम्हाला कोणत्याही प्रकारची अभ्यासाविषयी अडचण असेल आम्हाला तुम्ही बेधडक कमेंटमध्ये विचारा आम्ही अगदी लवकरात लवकर त्या विषयावर ब्लॉग पोस्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करूया
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: जय जय हे भारत देशा (गीत) | Click Now |
02: बोलतो मराठी… | Click Now |
03: आजी : कुटुंबाचं आगळ | Click Now |
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) | Click Now |
05: वसंतहृदय चैत्र | Click Now |
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) | Click Now |
07: वस्तू (कविता) | Click Now |
08: गवताचे पाते | Click Now |
09: वाट पाहताना | Click Now |
10: आश्वासक चित्र (कविता) | Click Now |
11: आप्पांचे पत्र | Click Now |
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | Click Now |
13: गोष्ट अरुणिमाची | Click Now |
14: भरतवाक्य (कविता) | Click Now |
15: कर्ते सुधारक कर्वे | Click Now |
16: काळे केस | Click Now |
17: खोद आणखी थोडेसे (कविता) | Click Now |
18: वीरांगना (स्थूलवाचन) | Click Now |
19: आकाशी झेप घे रे (कविता) | Click Now |
20: सोनाली | Click Now |
21: निर्णय | Click Now |
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) | Click Now |
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी | Click Now |
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) | Click Now |