वसंतहृदय चैत्र स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी | Vasant hruday chaitra swadhyay 10th

वसंतहृदय चैत्र स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी | Vasant hruday chaitra swadhyay 

विद्यार्थी मित्रांनो आज या नवीन ब्लॉग पोस्ट मध्ये आपण बघणार आहोत वसंत हद्य चैत्र स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी याचे प्रश्न उत्तर या ब्लॉग पोस्ट मध्ये सर्व प्रकारचे प्रश्न उत्तर आम्ही टाकलेली आहे तुम्ही या प्रश्नोत्तरांचा जास्तीत जास्त फायदा करून आपल्या येणाऱ्या पेपरला सामोरे जावे जास्तीत जास्त अभ्यास करावा असे मला वाटते अशाच नवीन नवीन प्रश्न उत्तरांच्या ब्लॉग पोस्ट बघण्यासाठी आपण आम्हाला कमेंट करून कळवू शकता आम्ही तुमच्यासाठी लवकरात लवकर त्या धड्याची किंवा कवितेचे प्रश्न उत्तर घेऊन येऊ तसेच आपणही ब्लॉग पोस्ट आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मध्ये शेयर करा जेणेकरून आपल्या मित्रांच्या देखील अभ्यासात मदत होईल आणि आम्हाला देखील मदत होईल चला तर पाहूया इयत्ता दहावीच्या स्वाध्याय


पाठाच्या (वसंतहृदय चैत्र) आधारे दिलेल्या वैशिष्ट्यावरून झाडाचे नाव लिहा.

कृती | Q (१) (अ) | Page 13
1) वैशिष्ट्ये : निळसर फुलांचे तुरे
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : निळसर फुलांचे तुरे
झाडाचे/वेलीचे नाव : करंजाचे झाड

2) वैशिष्ट्ये : गुलाबी गेंद
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : गुलाबी गेंद
झाडाचे/वेलीचे नाव : मधुमालती

3) वैशिष्ट्ये : कडवट उग्र वास
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : कडवट उग्र वास
झाडाचे/वेलीचे नाव : करंजाचे झाड

4) वैशिष्ट्ये : दुरंगी फुले
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : दुरंगी फुले
झाडाचे/वेलीचे नाव : घाणेरी

5) वैशिष्ट्ये : तीन पाकळ्यांचे फूल
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : तीन पाकळ्यांचे फूल
झाडाचे/वेलीचे नाव : माडाचे झाड

6) वैशिष्ट्ये : पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळ
झाडाचे/वेलीचे नाव : ______
SOLUTION
वैशिष्ट्ये : पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली फळ
झाडाचे/वेलीचे नाव : फणस


खालील संकल्पनेचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

कृती | Q (२) (१) | Page 13
1) चैत्र हा खरा वसंतात्मा, मधुमास आहे
SOLUTION
वसंतऋतूतील सर्व सर्जन, निसर्गातील सौंदर्य, विविध वृक्षांवर बोलणारी मधुर रसांनी भरलेली फळे, यांमुळे वसंताचे खरेखुरे परिपूर्ण, उत्कट दर्शन चैत्रातच होते. म्हणून चैत्र वसंतात्मा व मधुमास आहे.

2) काळीकबरी घरटी चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात.
SOLUTION
अवतीभवती दिसणारी सुंदर सुंदर निसर्ग दृश्य म्हणजे निसर्गाची चित्रलिपीच होय. निसर्ग न्याहाळता न्याहाळता मन या घरट्यांजवळ थोडेसे रेंगाळते. पुढे सरकावे असे वाटतच नाही. इथे आपण जणू विराम घेतो.

योग्य जोड्या जुळवा.

कृती | Q (३) | Page 13

‘अ’ गट‘ब’ गट
(१) लांबलचक देठ (अ) माडाच्या लोंब्या
(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी (आ) कैऱ्याचे गोळे
(३) भुरभुरणारे जावळ (इ) करंजाची कळी
SOLUTION

अ' गट

उत्तरे :

(१) लांबलचक देठ

कैऱ्याचे गोळे

(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी

करंजाची कळी

(३) भुरभुरणारे जावळ

माडाच्या लोंब्या


खालील तक्ता पूर्ण करा.

कृती | Q (४) | Page 14
शब्दअर्थ
निष्पर्णपाने निघून गेलेला
निर्गंध______
निर्वात______
निगर्वी______
नि:स्वार्थी ______
SOLUTION
शब्दअर्थ
निष्पर्णपाने निघून गेलेला
निर्गंधगंध निघून गेलेला
निर्वातहवा नसलेला
निगर्वीगर्व नसलेला
नि:स्वार्थी स्वार्थ नसलेला


खालील वाक्यात योग्य ठिकाणी योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा.

कृती | Q (५) (अ) | Page 14
1) लहानसहान अपयशाने दु:खी होणे अयोग्यच.
OPTIONS
  1. रुंजी घालणे
  2. कुचेष्टा करणे
  3. पेव फुटणे
  4. व्यथित होणे
SOLUTION
लहानसहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच.

2) गुंजारव करत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.
OPTIONS
  1. रुंजी घालणे
  2. कुचेष्टा करणे
  3. पेव फुटणे
  4. व्यथित होणे
SOLUTION
रुंजी घालत भ्रमर फुलांच्या अवतीभोवती फिरत असतात.

3) मोठ्या माणसांबद्दल चुकीचे बोलणे हासुद्धा अपराधच.
OPTIONS
  1. रुंजी घालणे
  2. कुचेष्टा करणे
  3. पेव फुटणे
  4. व्यथित होणे
SOLUTION
मोठ्या माणसांबद्दल कुचेष्टा करणे हासुद्धा अपराधच.

4) सध्या घरामध्ये उंदरांची संख्या वाढल्याने अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.
OPTIONS
  1. रुंजी घालणे
  2. कुचेष्टा करणे
  3. पेव फुटणे
  4. व्यथित होणे
SOLUTION
सध्या घरामध्ये उंदरांचे पेव फुटल्यामुळे अनेक पाहुण्यांच्या पिशव्या कुरतडल्या गेल्या आहेत.

खालील शब्दांमधील प्रत्यय ओळखून तक्ता पूर्ण करा.

कृती | Q (६) | Page 14

शब्दप्रत्ययत्याच प्रत्ययाचा वेगळा शब्
(१) अतुलनीय____________
(२) प्रादेशिक____________
(३) गुळगुळीत____________
(४) अणकुचीदार____________

SOLUTION

शब्द

प्रत्यय

त्याच प्रत्ययाचा वेगळा शब्द

(१) अतुलनीय

नीय

प्रसंशनीय

(२) प्रादेशिक

इक

सामाजिक

(३) गुळगुळीत

ईत

मुळमुळीत

(४) अणकुचीदार

दार

टोकदार


खालील वाक्यातील अधोरेखित नामांचा प्रकार ओळखून चौकटीत लिहा.

कृती | Q (७) (अ) | Page 14

1) अश्विनीला पुस्तक वाचायला आवडते. - ______ ______
SOLUTION
अश्विनी - विशेष नाम, पुस्तक - सामान्य नाम

2) अजय आजच मुंबईहून परत आला - ______ ______
SOLUTION
अजय - विशेष नाम, मुंबई - विशेष नाम

3) गुलाबाचे सौंदर्य काही निराळेच असते - ______ ______ 
SOLUTION
गुलाब - विशेष नाम, सौंदर्य - भाववाचक नाम

4) रश्मीच्या आवाजात वेगळाच गोडवा आहे - ______ ______
SOLUTION
श्मी - विशेष नाम, गोडवा - भाववाचक नाम

खालील ओळी वाचून दिलेल्या शब्दांसाठी त्यातून योग्य पर्यायी शब्द शोधून लिहा.

कृती | Q (८) | Page 14
1) जो आपल्या आनंदात सोबत असतो, दु:खात सोबत करतो आणि आपण जर वाट चुकत असू तर कान पकडून आपल्याला योग्य वाट दाखवतो, तोच खरा मित्र असतो. काय करावे हे सांगत असताना काय करू नये हे सांगणेही महत्त्वाचे असते.
(अ) कर्ण - ______
(आ) सोबती - ______
(इ) मार्ग - ______
(ई) हर्ष - ______ 
SOLUTION
(अ) कर्ण - कान
(आ) सोबती - मित्र
(इ) मार्ग - वाट
(ई) हर्ष - आनंद

2) चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
चैत्रात नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या, विविध रंगांच्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन घडले की समजावे हा वसंत ऋतू आला. वसंत ऋतूची सुरुवात फाल्गुनात होते. चैत्रामध्ये वसंत ऋतु ऐन भरात आलेला असतो, त्यातही पिंपळाची पालवी डोळ्यांचे पारणे फेडून टाकते. हिरव्या-पोपटी रंगांच्या अनेक छटा झाडांवर लहरत असतात. पिंपळाचे झाड जसजसे या नवपल्लवांनी डवरून जाते, तसतशी ही गहिऱ्या गुलाबी रंगाची पाने उन्हात झळाळू लागतात. जणू काही गुलाबी रंगाचे सुंदर सुंदर गेंदच झाडावर फुलले आहेत, असा भास होऊ लागतो. हे दृश्यरूप डोळ्यांत साठवता साठवता पानांची सळसळ ऐकावी ते पिंपळाचीच. किंबहुना पिंपळ पानांच्या सळसळीवरूनच 'झाडांच्या पानांची सळसळ' हा शब्दप्रयोग रूढ झाला आहे. आनंददायक, आल्हाददायक, मनमोहक, मनोरम, हृदयंगम, विलोभनीय, नितांत रमणीय, रम्य ही सर्व विशेषण चित्र महिन्यातील पालवीने डवरलेल्या पिंपळाला एकाच वेळी लावता येतील.

3) चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंताच्या चित्रलिपीतली विरामचिन्हे म्हणतात, या विधानाची सत्यता पटवून द्या.
SOLUTION
चैत्र महिन्यात सृष्टी सौंदर्याने न्हाऊन निघते. अनेक रंगाचे विविध आकार फुलांच्या रूपांत डोळ्यांचे पारणे फेडतात. सर्वत्र नवनिर्मितीचा उल्हास भरलेला असतो. या सर्वांचा कळस गाठला जातो तो पक्ष्यांच्या घरट्यांत. पक्ष्यांची घरटी सुद्धा कशी, अनेक लोभस आकारांत निर्मिलेली. काही कबरी घरटी लक्ष वेधून घेतात. काही लोंबत्या आकारांची, काही वाटोळ्या आकारांची, काही पसरट गोल, अशी विविध रूपांतील असतात. ही घरटी रमणीय निर्मितीचे दर्शन घडवतात. ही घरटी म्हणजे जणू चित्रलिपीच वाटते. चैत्रामध्ये निसर्गाचे जे रूप दिसते, ते जणू निसर्गाचे साहित्य होय. हे साहित्य वाचताना आपण घरट्याजवळ रेंगाळतो. म्हणून ती विरामचिन्हे ठरतात.

4) वसंतऋतूशी निगडित तुमची एखादी आठवण समर्पक शब्दांत लिहा.
SOLUTION
आम्ही एकदा आमच्या गावी गेलो होतो. वसंतऋतूच होता तो. त्या काळात रानातून नुसता फेरफटका मारणे म्हणजे फक्त आनंद आणि आनंदच असतो, काही खायला नको किंवा काही प्यायला नको, फक्त डोळे भरून निसर्गाचे दर्शन घ्यायचे, असेच फिरत असताना आम्रफुलांचा सुगंध आला, आमचे जवळच्याच आंब्याच्या झाडाकडे लक्ष गेले. झाड मोहराने भरलेले होते. अनेक फांदयांवर टरटरून फुगलेल्या टवटवीत कैऱ्या दिसल्या. आमच्या तोंडाला पाणी सुटले, नकळत आमच्या हातात दगड आलेच. ते भराभर झाडावर मारू लागलो. बाजूने जाणारा एकजण कळवळला. झाडावर दगड मारण्यामुळे त्याला वेदना झाल्या होत्या. त्याने आम्हांला थांबवले. स्वतः झाडावर चढला. आम्हांला कैऱ्या काढून दिल्या. लगोलग घरी गेलो. आईने मीठ-मसाल्याची फोडणी दिलेले तेल कैऱ्यांना लावले. आणि काय सांगू? हे लिहितानाही माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्यादिवसाची ती कैरीची चव मी अजूनही विसरलेलो नाही. अजूनही वसंतऋतू म्हटला की मला ती कैरी आठवतेच.

वसंतहृदय चैत्र स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी | Vasant hruday chaitra swadhyay 

५. वसंतहृदय चैत्र
दुर्गा भागवत (१९१०-२००२) : 
लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक, ललित लेखिका. गाढा व्यासंग, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भावोत्कटता,  चिंतनशीलता आणि संवेदनाप्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. ‘ऋतुचक्र’, ‘व्यासपर्व’ आणि साहित्य अकादमी  पुरस्कारप्राप्त ‘पैस’ ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे होत. ‘लोकसाहित्याची रूपरेखा’ हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ,  ‘राजारामशास्त्री भागवत : व्यक्ति आणि वाङ्मय’, ‘केतकरी कादंबरी’ हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. ‘सिद्धार्थजातका’च्या सात  खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचे बहुमोल कार्य आहे.  प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो. हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपांतून प्रतिबिंबित होतो. या पाठातून वसंत ऋतूतील  चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडते. वसंत ऋतूची चाहूलच खरी मनोहारी! त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे, हा सर्वार्थाने आनंदानुभव! निसर्गातील  घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दांत मांडण्याचे लेखिकेचे कसब यांमुळे वसंतहृदय चैत्र’ हुबेहूब डोळ्यांसमोर उभा राहतो.

फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात  मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी  सुंदर रीतीने वर्णन केले आहे : जैसे ऋतुपतीचे द्वार । वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी ।। ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन  तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्यतर आहेच; पण फळांचेही रूप  दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. 

 चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर; पण ही पिंपळाची  झाडे पाहा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत  उभी आहेत ती. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून  शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यांत भरत नव्हती; पण सारी  नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने  चमकतात, तेव्हा जणूकाही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले  आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार  हलत नाही; पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात  आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे, ते तर फारच बहारीचे  दिसते. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे. 

चारी  बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली  आहे. आता फुलायला आणखी जागा नाही, अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदीफांदीला ओळीने चिकटून बसली आहेत. सर्व फुलांत अतिशय हिरिरीने कोणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी, किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या  गुच्छांनी ती भरली आहे. गुलाबी फुलांत एखादे पिवळे, पिवळ्यांत एखादे गुलाबी, शेंदरी व पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंदरी आणि जांभळा, किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या  रंगांचे वर्णन करावे? वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत; पण  निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाहीत, उलट एकमेकांची शोभा


वाढवतात. गुजरातेत बऱ्याच भागांत वृक्षवनस्पतींचा दुष्काळ. तिथे या झाडाला भलतेच महत्त्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या  अतुलनीय रंगसौंदर्याला उपेक्षून पुढे जातो; पण गुजरातीत ‘चुनडी’ असे सुंदर व  यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेले आहे आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर  काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचे रहस्य मला उमगले.  भडक विशाेभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगाची  मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी  शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली. भारतीय रंगाभिरुचीचे  मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते.

 तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडे पाहा. माडाची झाडे बारमहा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात.  पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा; पण फाल्गुन लागला,  की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे  वाटते. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्या  वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून  वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत  या लोंब्या दिसतात. नारळाची फुले निर्गंध आणि टणक; पण  झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून चार-दोन फुले उचलून  घेऊन जरा निरखून पाहा. त्यांचा तो टणकपणा तुम्हांला बोचणार  नाही. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुखावतात. तीन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगांची ही फुले. 

आत तशाच  रंगांच्या केसरांची दाटी. तीन पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून, त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज  राहणार नाही. प्रचंड नारळाचे हे नखाएवढे फूल पाहून मोठी गंमत वाटते!  शेजारचे कडुनिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेले आहे. त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम  वाटतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडही सबंध फुलले आहे. करंजाच्या फुलांचे रूप अलौकिक  असते. अगदी नखाएवढी कळी; करंजीच्याच आकाराची, पांढरी, हिरवी; पण फूल उमलले की किती निराळे दिसते. आत  एक निळी-जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी. जणूकाही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे. रस्त्यावर पडलेला या फुलांचा खच फार रमणीय दिसतो चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या-फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. 

वसंताशी पौषाअखेरीपासूनच  मोहोरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड. लांबलचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत  असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागल्या आहेत की  नाहीत ते पाहण्याकरिता त्यांना चोचींनी प्रहार करतात, तेव्हा मोठी मौज  दिसते. गावाबाहेरच्या झाडांतून कोकिळांचे कूजनही बहुधा याच झाडांवर  चालत असते. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झडत  असतात; पण झाड रूक्ष असे कधीच दिसत नाही. चैत्रात याही झाडाला पालवीचे घोसच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात.  माघातले मोहोरांच्या झुबक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर  की आताचे, हे सांगणे कठीण आहे. आणि फणस? त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही  टवटवीत दिसते आहे आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली  गेलेली नजरेत भरताहेत.

 फणसाला फुले धरत नाहीत तर पौष-माघात त्याला हिरवे कोके येतात. फुगीर मिरचीसारखे. मग एकेक कोका दुभंगतो. वरचे  टरफल तपकिरी होऊन गळते. आतला हिरवा फणस गुळगुळीत, तुकतुकीत  असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात.  ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. त्यांच्या खालून काटे वाढतात  अाणि ते तंतू गळले, की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंब्याएवढा फणस तयार होतो. अगदी बंुध्यापासून ते धरतात. कधी कधी फळ अर्धे  मातीत पण गाडले जाते. रूपरसगंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या  पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची, तर काही वाटोळी चेंडूसारखी, तर काही  पसरट गोल, अशी ही काळीकबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हेवाटतात मला. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल  विरामचिन्हांकडेच पाहायला जास्त आवडते.

वसंतहृदय चैत्र स्वाध्याय मराठी इयत्ता दहावी | Vasant hruday chaitra swadhyay 

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post