आश्वासक चित्र स्वाध्याय - Asvasaka Citrakuti Svaadhyaay [ कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ]

आश्वासक चित्र स्वाध्याय -  Asvasaka Citrakuti Svaadhyaay [ कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ]

आश्वासक चित्रकृती स्वाध्याय -  Asvasaka Citrakuti Svaadhyaay [ कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ]

कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा.

कृती | Q (१) | Page 32
कवितेचा विषय कवितेतील पात्र कवितेतील मूल्य आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी
    
SOLUTION
कवितेचा विषय

कवितेतील पात्रे

कवितेतील मूल्य

आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी

स्त्री-पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासक आहे.

मुलगा व मुलगी

स्त्री-पुरुष समानता

(१) मुलगी व मुलगा एकमेकांची कामे करतात.
(२) भातुकलीतून वास्तवात येतील.
(३) दोघांच्या हातात बाहुली व चेंडू असतील.


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

कृती | Q (२) (१) | Page 32
1)  तापलेले ऊन
SOLUTION
तापलेले ऊन - भविष्यातील धगधगते वास्तव होय.

2) आश्वासक चित्र
SOLUTION
आश्वासक चित्र – भविष्यात स्त्री-पुरुष समानता वास्तवात येईल, याचे आश्वासन होय.

3) मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा.
(अ) ______
(आ) ______ 
SOLUTION
(अ) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी
(आ) उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत

चौकट पूर्ण करा.

कृती | Q (४) | Page 32
1) कवयित्रीच्या मनातील आशावाद - ______
SOLUTION
कवयित्रीच्या मनातील आशावाद - भविष्यात स्त्री-पुरुषांमध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल.

कवितेतील (आश्वासक चित्र) खालील घटनेतून/विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा.

कृती | Q (५) (अ) | Page 32

1)मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर
SOLUTION
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर - सहकार्य

2) मी दोन्ही करू शकते एकाच वेळी
SOLUTION
मी दोन्ही करू शकते एकाच वेळी - आत्मविश्वास

3) जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी
SOLUTION
जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी - समंजसपणा

काव्यसौंदर्य

खालील ओळींचे तुमच्या शब्दांत रसग्रहण करा.

कृती | Q (६) (अ) | Page 32
1) भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, हातांत हात असेल दोघांचाही’
SOLUTION
आशयसौदर्य : कवयित्री नीरजा यांनी आश्वासक चित्र या कवितेमधून स्त्री-पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरीत्या कसे साकारले जाईल याची दिशा खेळणारा लहान मुलगा व मुलगी यांच्या प्रतीकांतून योग्यपणे दाखवली आहे.

काव्यसौंदर्य : भातुकलीतले जग हे स्वप्नाळू असते. त्यातला संसार हा लुटुपुटीचा असतो. मोठेपणी प्रत्यक्ष संसारातील जबाबदाऱ्या या वास्तववादी असतात, त्यामुळे भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तव प्रवेश करताना सत्य स्वीकारावे लागते, स्त्री-पुरुष यांची परस्परांना स्नेहाची साथ असेल, तर समजूतदारपणा व सहकार्याने ते जगात वावरतील, स्त्री-पुरुष परस्परांची कामे मिळून करतील, असे भविष्यकालीन आशावादी चित्र उपरोक्त ओळीतून साकारले आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या ओळींमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतनाची प्रचिती येते. कवयित्रींनी साध्या विधानातून विचारगर्भ आशय थेट मांडला आहे. 'स्त्री-पुरुष समानता' हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त झाला आहे. भविष्यकालीन दोघांमधील सामंजस्याचे लोभस परंतु प्रगल्भ चित्र 'हातात हात असेल' या वाक्यखंडातून प्रत्ययकारीरीत्या प्रकट झाले आहे. स्वप्न आणि सत्य यांची योग्य सांगड तरल शब्दांत व्यक्त झाली आहे.

2) ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’ या ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
SOLUTION
'आश्वासक चित्र' या कवितेमध्ये नीरजा यांनी आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग यांविषयी दृढविश्वास व्यक्त करताना मुलीच्या तोंडी हे उद्गार लिहिले आहेत.
भातुकली खेळणारी मुलगी व चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत आहेत, हे दृश्य कवयित्री खिडकीतून पाहत आहे. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून मुलगी चेंडू खेळणाऱ्या मुलापाशी जाते व चेंडू मागते. मुलगा तिला हिणवतो की, तू पाल्याची भाजीच कर, चेंडू उडवणे तुला जमणार नाही. तेव्हा मुलगी त्याला अत्यंत आत्मविश्वासाने म्हणते की, मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते. तू माझे काम करशील का? मुलीच्या उद्गारांतून कवयित्रींनी स्त्रीचे सामर्थ्य मार्मिकपणे विशद केले आहे.

3) कवितेतील (आश्वासक चित्र) मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हांला वाटते, तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
कवयित्री नीरजा यांनी स्त्री-पुरुष समानतेचे भविष्यकालीन 'आश्वासक चित्र' रंगवले आहे. कवितेतील मुलगा हे 'पुरुष जातीचे प्रतीक आहे'; तर मुलगी ही 'स्त्री जातीचे' प्रतिनिधित्व करते. स्त्री-पुरुष समानता ही संकल्पना अजून बाल्यावस्थेत असल्यामुळे स्त्री-पुरुष तत्त्व हे मुलगी व मुलगा या लहान वयात दाखवले आहेत. उद्याच्या जगात ते दोघे प्रौढ होतील व एकत्र खेळ करतील, असा आशावाद या प्रतीकांतून कवयित्रीने व्यक्त केला आहे. स्त्री-पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री-पुरुष समानता नक्कीच येईल, असा दृढ विश्वास कवितेतून व्यक्त होतो.

4) ‘स्त्री-पुरुष समानते’ बाबत तुम्हांला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
SOLUTION
कवितेतील मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्यान खेळतात, यावरून मुलाच्या वागण्यातील बदल स्वागतार्ह आहे, हळूहळू तो आपले कसब दाखवता दाखवता घरसंसार सांभाळणे शिकेल. मोठा झाल्यावर तो स्त्रियांची कामे करील, कारण मुली पुरुषांची कामे सहजपणे करीत आहेत. स्त्री-पुरुष सहकार्याने एकमेकांची कामे करतील, हे उद्याच्या जगाचे आश्वासक चित्र असेल, दोघेही सारे खेळ एकत्र खेळतील. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री-पुरुषांची एकमेकांना साथ असेल, स्त्री-पुरुषांमध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री-पुरुष समानता नक्कीच रुजेल. असे स्त्री-पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मला अपेक्षित आहे.

आश्वासक चित्र स्वाध्याय -  Asvasaka Citrakuti Svaadhyaay [ कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ]

कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती :

१. समास:

सामासिक शब्द व विग्रह – जोड्या लावा :
सामासिक शब्द – विग्रह
(i) यथामती – (अ) धास्तीशिवाय
(ii) मतिमंद – (आ) बुद्धीप्रमाणे
(i) गणेश – (इ) माहीत न असता
(iv) बिनधास्त – (ई) गणांचा देव
(v) बेमालूम – (उ) बुद्धीने कमकुवत
SOLUTION
सामासिक शब्द – विग्रह
(i) यथामती – बुद्धीप्रमाणे
(ii) मतिमंद – बुद्धीने कमकुवत
(iii) गणेश – गणांचा देव
(iv) बिनधास्त – धास्तीशिवाय
(v) बेमालूम – माहीत न असता

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 9 आश्वासक चित्र

२. अलंकार :

पुढील अभंगातील अलंकार ओळखून स्पष्टीकरण करा :
‘हरिणीचे पाडस । व्याघ्र धरियेले
मजलागी जाहले । तैसे देवा ।।’
SOLUTION
अलंकार : हा दृष्टान्त अलंकार आहे. स्पष्टीकरण : देवाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेल्या संत कान्होपात्रा यांनी आपल्या मनाची स्थिती व्यक्त करताना एक दाखला दिला आहे. वाघाने हरिणीचे पाडस घरले; तर त्या पाडसाची जशी दयनीय अवस्था होते, तशी हे देवा, या संसारात तुझ्याशिवाय माझी अवस्था झाली आहे. विचार व्यक्त करताना इथे दृष्टान्त दिला आहे; म्हणून हा दृष्टान्त अलंकार आहे.

३. वृत्त:

पुढील ओळींचे गण पाडून वृत्त ओळखा :
झुरे आज वारा कशाने कशाने
तुटे दूर तारा कशाने कशाने
SOLUTION
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 9 आश्वासक चित्र 8
हे भुजंगप्रयात वृत्त आहे.

४. शब्दसिद्धी :

(i) मनः’ हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा :
जसे : मनः + वृत्ती → मनोवृत्ती
(१) [ ]
(२) [ ]
SOLUTION
(१) मनोकामना
(२) मनोव्यापार

(ii) ‘पुनः’ हा उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा :
(१) [ ]
(२) [ ]
SOLUTION
(१) पुनरागमन
(२) पुनरावृत्ती

(iii) ‘ता’ हा प्रत्यय लावून दोन शब्द तयार करा :
जसे : अस्वस्थ +ता → अस्वस्थता.
(१) [ ]
(२) [ ]
SOLUTION
(१) नम्रता
(२) सुंदरता

५. सामान्यरूप :

तक्ता पूर्ण करा:

शब्द मळ शब्द प्रत्यय सामान्यरूप
(i) तिला ……………………….. ……………………….. ………………………..
(ii) बाहुलीला ……………………….. ……………………….. ………………………..
(iii) हातांनी ……………………….. ……………………….. ………………………..
(iv) ओंजळीत ……………………….. ……………………….. ………………………..
(v) उन्हाच्या ……………………….. ……………………….. ………………………..
(vi) आडोशाला ……………………….. ……………………….. ………………………..

उत्तर :

शब्द मळ शब्द प्रत्यय सामान्यरूप
(i) तिलातीलाती
(ii) बाहुलीलाबाहुलीलाबाहुली
(iii) हातांनीहातनीहातां
(iv) ओंजळीतओंजळओंजळी
(v) उन्हाच्याउन्हच्याउन्हा
(vi) आडोशालाआडोसालाआडोशा

योग्य अर्थ निवडा:

(i) आश्चर्यचकित होणे – (भीती वाटणे/थक्क होणे)
(ii) कसब दाखवणे – (खूप खेळणे/कौशल्य दाखवणे)
(iii) हातात हात असणे – (सहकार्य करणे/एकत्र चालणे)
SOLUTION
(i) आश्चर्यचकित होणे – थक्क होणे.
(ii) कसब दाखवणे – कौशल्य दाखवणे.
(iii) हातात हात असणे – सहकार्य करणे.

(भाषिक घटकांवर आधारित कृती :

१. शब्दसंपत्ती :

विरुद्धार्थी शब्द लिहा :
(i) ऊन
(ii) हसून
(iii) आता
(iv) वास्तव.
SOLUTION
(i) ऊन x सावली
(ii) हसून x रडून
(iii) आता x नंतर
(iv) वास्तव x अवास्तव.

गटात न बसणारा शब्द लिहा :

(i) चेंडू, खेळणे, बाहुली, भिंगरी, भोवरा. →
(ii) खिडकी, दरवाजा, घर, जिना, पायऱ्या. →
(iii) सदन, सधन, भवन, निकेतन. → (मार्च ‘१९)
(iv) जल, नभ, गगन, आकाश. → (मार्च ‘१९)
SOLUTION
(i) चेंडू, खेळणे, बाहुली, भिंगरी, भोवरा → खेळणे
(ii) खिडकी, दरवाजा, घर, जिना, पायऱ्या → घर
(iii) सदन, सधन, भवन, निकेतन → सघन
(iv) जल, नभ, गगन, आकाश → जल

पुढील शब्दांच्या अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा :

(i) बाहुलीला →
(ii) आभाळाला →
SOLUTION
(i) बाहुलीला → बाहु – लीला – लाली – बाला
(ii) आभाळाला → आभा – आळा – आला – भाला

२. लेखननियम:

अचूक शब्द लिहा :
(i) बाहुलि/बाहूली/बाहूलि/बाहुली.
(ii) क्षीतीज/क्षितिज/क्षितीज/क्षीतिज,
(iii) सहानुभूती/सहानुभुती/सहानूभुती/सहानुभूति.
(iv) उपस्थिती/उपस्थीती/उपस्थीति/ऊपस्थिति.
SOLUTION
(i) बाहुली
(ii) क्षितिज
(iii) सहानुभूती
(iv) उपस्थिती.

३. विरामचिन्हे:

पुढील ओळींतील विरामचिन्हे ओळखा :
1) तशी हसून म्हणते ती, ‘आता तू.’
SOLUTION
[ , ] स्वल्पविराम
[ . ] पूर्णविराम
[ ‘ ‘ ] एकेरी अवतरणचिन्ह.

४. पारिभाषिक शब्द :

अचूक मराठी पारिभाषिक शब्द निवडा :
(1) Affedevit – …………………………………
(१) परिपत्र
(२) शपथपत्र
(३) प्रतिज्ञा
(४) आज्ञा.
SOLUTION
(१) शपथपत्र

(2) Dismiss –
(१) बडतर्फ
(२) शेवट
(३) हुद्दा
(४) मुद्दा.
SOLUTION
(१) बडतर्फ

3) Translator –
(१) अनुमोदक
(२) अनुवाद
(३) भाषांतर
(४) अनुवादक.
SOLUTION
(४) अनुवादक.

५. अकारविल्हे/भाषिक खेळ :

पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा :
(i) बाहुली → खेळ → भाजी → मुलगी.
(ii) चेंडू → घर → ऊन → आडोसा.
SOLUTION
(i) खेळ → बाहुली → भाजी → मुलगी.
(ii) आडोसा → ऊन → घर → चेंडू.

आश्वासक चित्र Summary in Marathi

दुपारच्या वेळी ऊन तापलेले आहे. आडोशाला सावलीत बसून एक मुलगी, बराच वेळ झाला तरी खेळते आहे. हे दृश्य कवयित्री स्वत:च्या घराच्या खिडकीतून पाहत राहिली आहे.

ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळते आहे. ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत निजवते आहे. (बाळाला आई मांडीवर घेऊन निजवते तसे.) नंतर ती भात शिजवण्यासाठी आधणाचे पातेले चिमुकल्या गॅसवर ठेवते. (तिचा लुटुपुटीचा संसार सुरू आहे.)

बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन उंच उडवून पुन्हा नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळतो आहे.

मुलगी त्या मुलाचा चेंडूचा खेळ कौतुकाने पाहते. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडवून झेलण्याचे कौशल्य तिला दाखवतो. मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते. (मुलाला वाटते या मुलीला माझा चेंडूचा खेळ जमणार नाही.) तेव्हा हसून तो तिला म्हणतो – “तू छानपैकी पालेभाजी बनव.” (भातुकलीचा खेळ, भाजी करणे हे तुझे काम ! तुला पुरुषी कामे काय जमणार ?) मुलगी त्याला म्हणते- “मी दोन्ही कामे (स्त्रीची व पुरुषाची) एकाच वेळी करू शकते. तू करू शकशील का?” (तू स्त्रीची कामे करशील ? ) मुलगा स्वतःच चेंडू तिच्या हातात देतो.

मुलगी चेंडू उंच उडवते. तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या ओंजळीत येऊन पडतो. (मुलगी चेंडू व्यवस्थित झेलते.) हे ‘ पाहून मुलगा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. (आपल्यासारखाच तिने चेंडू झेलला हे पाहून मुलगा चकित होतो.) मुलगी मुलाला म्हणते- “आता तुझी पाळी ! तू माझे काम करून दाखव.” मुलगा चिमुकल्या गॅससमोर मांडी घालून बसतो. प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला निजवतो. मग भाजी करण्यासाठी टोप शोधतो…

कवयित्री म्हणतात-तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणेही हळूहळू शिकेल. (हळूहळू तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामेही शिकेल.)

माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यातल्या जगाचे विश्वासार्ह व उत्साहवर्धक चित्र दिसते आहे. उदयाच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील, असे मला वाटते आहे. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा (स्त्री-पुरुषाचा) हात एकमेकांच्या हातात असेल ज्या हातांवर बाहुली आणि चेंडू स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असतील. (स्त्री-पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री-पुरुष समानता नक्कीच येईल.)

आश्वासक चित्र शब्दार्थ

आश्वासक – विश्वासार्ह, उत्साहवर्धक, प्रोत्साहक,
आडोशाला – आश्रयाला.
झरोक्यातून – खिडकीतून.
इवल्याशा – चिमुकल्या.
गॅसवर – गॅसच्या चुलीवर.
कसब – कौशल्य, कुशलता.
पाल्याची भाजी – पालेभाजी.
शिवून – स्पर्श करून,
पातेलं – टोप.
घर सांभाळणं – घराची देखभाल करणे, संसार चालवणे. वास्तवातप्रत्यक्षात.
विसावेल – विश्रांती घेईल, जोडीनं – सोबतीने.

Marathi Kumarbharti Class 10 Textbook Solutions भाग-२

आश्वासक चित्र स्वाध्याय -  Asvasaka Citrakuti Svaadhyaay [ कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ]

  • आश्वासक चित्र स्वाध्याय
  • आश्वासक चित्र रसग्रहण
  • आश्वासक चित्र अर्थ
  • आश्वासक चित्र कवितेचे कवी
  • आश्वासक चित्र कवितेचे कवी कोण
  • आश्वासक चित्र कविता रसग्रहण
  • आश्वासक चित्र या कवितेचा रचनाप्रकार
  • आश्वासक चित्र या कवितेचे रसग्रहण

आश्वासक चित्र स्वाध्याय -  Asvasaka Citrakuti Svaadhyaay [ कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ]

नीरजा (१९६०) : 

स्त्रीवादी कवयित्री, कथालेखिका. त्यांचे ‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्त्रीगणेशा’, ‘निरर्थकाचे पक्षी’ हे कवितासंग्रह; ‘जे दर्पणी बिंबले’,  ‘ओल हरवलेली माती’ हे कथासंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘कवी केशवसुत’, ‘इंदिरा संत’ तसेच ‘भैरू रतन  दमाणी’ इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील  कविता आहे. कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य सर्वविद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे, या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे

आश्वासक चित्र

उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून
नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत.
मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित.
तशी हसून म्हणते ती, ‘आता तू.’
मांडी घालून मुलगा बसतो गॅससमोर.

दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम;
मग शोधतो पातेलं भाजीसाठी...
हळूहळू शिकेल तोही
आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं
तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.

माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे
एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं
जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र.
भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात
हातात हात असेल दोघांचाही
ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.

तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून
खेळते आहे एक मुलगी केव्हाची.
मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून.
ती मांडीवर घेते बाहुलीला
एका हातानं थोपटत तिला, चढवते आधण भाताचं
भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर.
बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन
खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात.
  
मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे.
अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या.
मुलगा दाखवतो तिला, आपलं कसब पुन्हा एकदा.
मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे
तेव्हा तो हसून म्हणतो,
‘तू भाजी बनव छानपैकी पाल्याची.’ ती म्हणते,
‘मी दोन्ही करू शकते एकाच वेळी. तू करशील?’
मुलगा देतो चेंडू तिच्या हातात.

आश्वासक चित्र स्वाध्याय -  Asvasaka Citrakuti Svaadhyaay [ कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ]

    अनुक्रमणिका  INDIEX

    पाठ कविता स्वाध्याय LINK
    01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
    02: बोलतो मराठी… Click Now
    03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
    04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
    05: वसंतहृदय चैत्र Click Now
    06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
    07: वस्तू (कविता) Click Now
    08: गवताचे पाते Click Now
    09: वाट पाहताना Click Now
    10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
    11: आप्पांचे पत्र Click Now
    12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
    13: गोष्ट अरुणिमाची Click Now
    14: भरतवाक्य (कविता) Click Now
    15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
    16: काळे केस Click Now
    17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
    18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
    19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
    20: सोनाली Click Now
    21: निर्णय Click Now
    22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
    23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
    24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

     10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

    1 Comments

    Thanks for Comment

    Previous Post Next Post