भरतवाक्य कविता स्वाध्याय - Bharatvaky kavita svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ]
इयत्ता दहावी मराठी या विषयावर आम्ही येत्या काही दिवसात भरपूर काही पोस्ट बनवल्या आहेत आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी परत एकदा भरत वाक्य या इयत्ता दहावीच्या पाठा विषयी स्वाध्याय आणि भरत वाक्य हे देखील घेऊन आलो आहेत अशाच आम्ही लवकरात लवकर संपूर्ण धड्यांच्या ब्लॉग पोस्ट म्हणजेच सर्व इयत्ता दहावी मराठीची प्रश्न उत्तरे गाईड प्रमाणे टाकत आहोत तुम्हाला या प्रश्नोत्तरांचा फायदा करून घ्यायचा असेल तर आमची निर्मळ याकडे मी ही होम स्क्रीन वर ऍड करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मदत होईल
निर्मळ याकडे मी आज तुमच्यासाठी भरत वाक्य या या अत्यंत महत्वाच्या अशा दहावीच्या एका पॉइंट विषयी प्रश्न उत्तरे घेऊन आली आहेत प्रथमता आम्ही प्रश्न उत्तर घेऊन आलो आहेत आणि त्यानंतर भरत वाक्य घेऊन आलो आहेत प्रश्न उत्तर आ मध्ये काव्यसौंदर्य अशा विविध प्रकारच्या पॉईंट देखील पुस्तकाच्या खाली असलेल्या सिक्वेन्स वाईस घेऊन आलो आहेत चला तर आता पाहूया भरतवाक्य स्वाध्याय इयत्ता दहावी
आकृती पूर्ण करा.
1) चारित्रसंपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी :
SOLUTION
(१) सुसंगतीत राहावे
(२) सुविचार ऐकावे
(३) बुद्धीचा कलंक झडावा
2) चारित्रसंपन्न बनण्यासाठी टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी :
SOLUTION
(१) विषयवासना नको
(२) दुरभिमान नसावा
(३) निश्चय ढळू नये
3) मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी :
SOLUTION
(१) मन भवच्चरित्रावर (परमार्थावर) जडवावे.
(२) मनातील निश्चय ढळू देऊ नये.
(३) भजन करताना विचलित मन होऊ नये.
(४) मन मलीन होऊ देऊ नये.
योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा.
कृती | Q (२) (अ) | Page 46
1) कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ______
OPTIONS
सतत परमेश्वराच्या सान्निध्यात राहावे.
सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.
सतत आत्मबोध घ्यावा.
चारधाम यात्रा करावी.
SOLUTION
कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे.
2) सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे ______
OPTIONS
कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो.
कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.
कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो.
कमळात मन लपून राहो.
SOLUTION
सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो.
खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.
कृती | Q (३) | Page 46
गोष्टी | विनंती |
(१) निश्चय | ______ |
(२) चित्त | ______ |
(३) दुरभिमान | ______ |
(४) मन | ______ |
SOLUTION
गोष्टी | विनंती |
(१) निश्चय | कधीही ढळू नये. |
(२) चित्त | भजन करताना विचलित होऊ नये. |
(३) दुरभिमान | सर्व गळून जावा. |
(४) मन | मलीन होऊ नये. |
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
1) मति सदुक्तमार्गीं वळो
SOLUTION
कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी, म्हणजेच सत्कार्य करावे.
2) न निश्चय कधीं ढळो
SOLUTION
दृढ केलेला निर्धार कधीही विचलित होऊ नये.
काव्यसौंदर्य
कृती | Q (५) (अ) | Page 47
1) सुसंगती सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;’ या ओळींचे रसग्रहण करा.
SOLUTION
आशयसौंदर्य : 'केकावली' या काव्य ग्रंथ के समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही 'भरतवाक्य' काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तनामनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगिकारावे, याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे.
काव्यसौंदर्य : 'सुसंगती' म्हणजे चांगल्या, सज्जन व्यक्तीची मैत्री होय, गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे, म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते, असा आशय उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. 'सुजनवाक्य' म्हणजे सुविचारांची धारणा जर केली, तर मन निर्मळ व प्रेमळ होते. असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी, म्हणून दोन वर्तन-नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात ११+१३ मात्रेची आवर्तने असणारी हे 'केकावली' नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे. 'घडो-जडो' या यमक प्रधान क्रिया पदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे.
2) स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
SOLUTION
माणसाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी स्वत:मधील स्वतत्त्व मनोमन ओळखावे. आत्मविश्वास वाढवावा, गर्विष्ठपणा त्याग करावा. दुरभिमान अजिबात बाळगू नये. आपले मन वाईट विचारांनी मलीन, भ्रष्ट करू नये. मन शुद्ध करावे. आत्मज्ञान वाढवावे. आत्मज्ञान मध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जाळून टाकाव्यात.
3) सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
सत्प्रवृत्ती व्यक्ती म्हणजे सज्जन व्यक्ती. ही मनाने अतिशय निर्मळ असते. सर्व प्राणिमात्रांबद्दल तिच्या मनात नितांत प्रेमभाव वसत असतो. कुविचारांना त्यांच्या मनात जराही थारा नसतो. त्यांचे हृदय करुणेने ओतप्रोत भरलेले असते. काम, क्रोध, मद, मत्सर, आलस्य व मोह या षड्विकारांवर त्यांनी मात केलेली असते. ते सदैव परोपकारी असतात. दुसऱ्यांच्या दुःखाने व्यथित होणारे त्यांचे मन सतत तळमळत राहते. त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडते. त्यांच्या हृदयात दया, क्षमा, शांती वसत असते. सत्प्रवृत्त व्यक्ती अंतर्बाह्य पारदर्शक असते. म्हणून सज्जनांचा सहवास असावा व त्यांच्या सद्विचारांचे श्रवण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
4) वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.
SOLUTION
सर्वप्रथम चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी कोणत्या यांची निवड विवेकबुद्धीने करावी. त्यानंतर वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी मन खंबीर करावे. बुद्धी स्थिर ठेवावी. चंचलता सोडून दयावी. चांगल्या मित्रांच्या संगतीत नेहमी राहावे. त्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा. थोरामोठ्यांचा आदर करावा. त्यांचे अनुभवाचे बोल ग्रहण करावेत. चांगल्या संस्कारमय पुस्तकांचे वाचन करावे. सद्विचाराने वर्तन करावे. दुसऱ्यांचे मन जाणून घ्यावे. शक्यतो परोपकार करावा. आपल्या वागण्याने कुणीही दुखावणार नाही याची काळजी घ्यावी. प्रेममय हृदय धारण करावे. जनात आपण प्रिय ठरू असे वर्तन करावे.
व्याकरण व भाषाभ्यास
व्याकरण व भाषाभ्यास
(कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृतीः
१. समास:
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा:
(i) हरघडी
(ii) देवघर
(iii) रामलक्ष्मण
(iv) अंथरुण पांघरुण
(v) रावरंक
(vi) नवरात्र.
SOLUTION
सामासिक शब्द – विग्रह
(i) हरघडी – प्रत्येक घडीला
(ii) देवघर – देवासाठी घर
(iii) रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण
(iv) अंथरुण पांघरुण – अंथरुण, पांघरुण वगैरे
(v) रावरंक – राव किंवा रंक
(vi) नवरात्र – नऊ रात्रीचा समूह
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य
२. अलंकार:
पुढील आकृतीवरून अलंकार ओळखा व एक उदाहरण दया:
निर्जीव वस्तू → मानवी भावनांचे → सजीव समजणे आरोपण
SOLUTION
अलंकार → चेतनागुणोक्ती
उदा., डौलदार ही गिरीशिखरे धापाच टाकू लागतात.
३. वृत्त:
पुढील ओळीचा लगक्रम लिहा:
सुसंगति सदा घडो;
सुजनवाक्य कानी पडो
SOLUTION
४. शब्दसिद्धी:
(१) ‘सु’ उपसर्ग असलेले चार शब्द लिहा:
जसे: सु + संगती → सुसंगती
SOLUTION
सुजन → सुवचन → सुविचार → सुमन
(२) पुढील शब्दांना ‘आवली’ प्रत्यय लावून शब्द तयार करा:
(i) नाम – [ ]
(ii) रंग – [ ]
SOLUTION
(i) नामावली
(i) रंगावली
५. सामान्यरूप:
पुढील शब्दांची सामान्यरूपे लिहा:
(i) दुरिताचे – ……………………………..
(ii) मार्गाला – ……………………………..
(iii) कमळात – ……………………………..
(iv) मनाने – ……………………………..
SOLUTION
(i) दुरिता
(ii) मार्गा
(iii) कमळा
(iv) मना.
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य
भाषिक घटकांवर आधारित कृती:
१. शब्दसिद्धी:
(१) समानार्थी शब्द लिहा:
(i) मती = ……………………………..
(i) कलंक = ……………………………..
(iii) निश्चय = ……………………………..
(iv) संगत = ……………………………..
SOLUTION
(i) मती = बुद्धी
(ii) कलंक = डाग
(iii) निश्चय = निर्धार
(iv) संगत = सोबत.
(२). विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) नावडो x ……………………………..
(ii) वियोग x ……………………………..
(iii) दुरभिमान x ……………………………..
(iv) दास x ……………………………..
(v) दुरित x ……………………………..
(vi) कृपा x ……………………………..
SOLUTION
(i) नावडो x आवडो
(ii) वियोग – मीलन
(iii) दुरभिमान x अभिमान
(iv) दास x मालक
(v) दुरित x सज्जन
(vi) कृपा x अवकृपा.
(३) पुढील शब्दांचे दोन अर्थ लिहा:
(i) [ ] ← सारा → [ ]
SOLUTION
(i) सर्व ← सारा → कर
(ii) [ ] ← विषय → [ ]
SOLUTION
(ii) वासना ← विषय → अभ्यासातील घटक
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य
(४) पुढील शब्दांच्या अक्षरातून चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
(1) दुरभिमान
SOLUTION
(i) दुरभिमान → [भिमा] [रमा] [मार] [मान]
(2) कुशलधामनामावली
SOLUTION
(ii) कुशलधामनामावली → [कुशल] [घाम] [नाम] [नाव]
२. लेखननियम:
अचूक शब्द ओळखा:
(i) दुष्टि – ………………………
(ii) वेशीष्ट्य – ………………………
(iii) किर्ति – ………………………
(iv) शिषर्क – ………………………
(v) सूज्ञ – ………………………
(vi) जेष्ट – ………………………
(vi) हींस्त्र – ………………………
(viii) उप्तन – ………………………
SOLUTION
(i) दुष्टि – दृष्टी
(ii) वेशीष्ट्य – वैशिष्ट्य
(iii) किर्ति – कीर्ती
(iv) शिषर्क – शीर्षक
(v) सूज्ञ – सुज्ञ
(vi) जेष्ट – ज्येष्ठ
(vii) हींस्त्र – हिंस
(viii) उप्तन – उत्पन्न
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 12 भरतवाक्य
३. विरामचिन्हे:
पुढील विरामचिन्हे ओळखा:
(१) [ : ]
(२) [ – ]
(३) [ ” ” ]
(४) [ – ]
SOLUTION
(१) [ : ] अपूर्ण विराम
(२) [ – ] अपसारण चिन्ह
(३) [ ” ” ] दुहेरी अवतरणचिन्ह
(४) [ – ] संयोग चिन्ह.
४. पारिभाषिक शब्द:
योग्य पर्याय निवडा:
(i) Sonnet – …………………….
(१) पुनीत
(२) सुनीत
(३) विनीत
(४) पुलकित
SOLUTION
(२) सुनीत
(ii) Lyric – …………………….
(१) ओळी
(२) अभावगीत
(३) भावगीत
(४) गाणे
उत्तर:
(३) भावगीत
(iii) Magazine – …………………….
(१) मासिक
(२) पाक्षिक
(३) द्वैमासिक
(४) नियतकालिक
उत्तर:
(४) नियतकालिक
(iv) Trade Mark – …………………….
(१) शोधचिन्ह
(२) बोधचिन्ह
(३) विधीचिन्ह
(४) निधीचिन्ह
उत्तर:
(२) बोधचिन्ह
५. अकारविल्हे/ भाषिक खेळ
पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा:
सुसंगती → कमळ → हरी → वियोग,
SOLUTION
कमळ → वियोग → सुसंगती → हरी.
भरतवाक्य Summary in Marathi
कवितेचा भावार्थ
चारित्र्यसंपन्न होण्यासाठी संसारीजनांना मोलाचा उपदेश करताना कवी मोरोपंत म्हणतात – नेहमी सज्जन माणसांची मैत्री जडावी. सुविचार, सुवचने कानांवर पडावीत. बुद्धीचे (मांदय), बुद्धीतील वाईट विचार झडून बुद्धी शुद्ध व्हावी, विवेकी व्हावी. कामवासनेविषयी संपूर्णत: नावड निर्माण होवो. भुंगा जसा कमळात अडकतो, सुगंधाने धुंद होऊन निग्रहाने तिथून हटत नाही जर कमळाचा विरह झाला, तर तो रडतो. त्याप्रमाणे कमळातील मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे मन सज्जनांच्या पायी गुंतो, आपले मन भक्तिमार्गात, भवचरित्रात, परमार्थात जडून राहू दे.।।
दृढ निर्धार कधीही ढळू देऊ नये. वाईट माणसांचे विघ्न टळून जाऊ दे, त्यांच्या अडचणीची बाधा आपल्याला होऊ नये. परमेश्वराचे नामस्मरण करताना मन चंचल होऊ नये. चांगला मार्ग आचरण्यासाठी बुद्धीला वळण लागो. स्वत:चे स्वत्व हृदयाला कळू दे. स्वत:ची ओळख, आत्मविश्वास वाढू दे. दुरभिमान, गर्विष्ठपणा गळून जाऊ दे. मन कधीही वाईट विचारांनी मलीन होऊ नये. आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट, दुरित भस्मसात होऊ दे.।।
हे देवा, तुझे नाव माझ्या मुखातून सदैव येत राहो. माझे शरीररूपी घर तुझ्या नामोच्चाराने कुशल व पावन होवो. तुझ्या नामस्मरणाने माझ्या मनाच्या सर्व इच्छा तत्काळ पुरवल्या जातात. तिन्ही जगांत (स्वर्गलोक, इहलोक व पाताळ) राहणाऱ्या भक्तांवर तू कृपावंत होतोस, तशी तुझ्या आश्रयाला आलेल्या, शरण आलेल्या भक्तांवर तुझी कृपा प्रकट होऊ दे.।।
भरतवाक्य कवितेची मध्यवर्ती कल्पना
माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे व सुवचनांच्या विचारांनी वागावे. खोटा अभिमान न बाळगता व मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्तिमार्गाचे अवलंबन करावे, असा उपदेश कवी मोरोपंतांनी या केकावलीमध्ये केला आहे.
भरतवाक्य शब्दार्थ
- सुसंगति – चांगल्या माणसाची संगत,
- सदा – नेहमी, सतत,
- सुजनवाक्य – सुवचन, सुविचार.
- कानी – कानांवर, श्रवणी.
- कलंक – डाग (कुविचार).
- मती – बुद्धी, प्रज्ञा.
- झडो – झडून जावो, निघून जावो.
- विषय – मोह, कामवासना.
- सर्वथा – पूर्णपणे,
- नावडो – आवडू नये.
- सदंध्रि – सज्जनांचे पाय,
- कमळी – कमळफुलात.
- दडो – लपावा.
- मुरडिता – मागे वळताना,
- हटाने – आग्रहाने, हट्टाने.
- अडो – अडकून राहो.
- वियोग – विरह.
- भवच्चरित्री – संसारधर्म, भक्तिमार्ग, परमार्थ.
- जडो – जडावा, लागून राहो.
- न ढळो – ढळू नये, विलग होऊ नये.
- कुजन – वाईट माणूस.
- विघ्नबाधा – अडचणीची लागण, व्यत्यय.
- टळो – टळून जावो, निघून जावो.
- चित्त – मन, अंत:करण,
- भजनी – भजनात, प्रार्थनेत,
- न चळो – विचलित होऊ नये, दुर्लक्ष होऊ नये,
- सदक्तमार्गी – चांगल्या वाटेला, चांगल्या जीवनमार्गाला.
- वळो – वळावी, जावी.
- स्वतत्त्व – स्वत्व, आत्मविश्वास, स्वाभिमान,
- हृदया – मनाला.
- कळो – कळावा, समजावा.
- दुरभिमान – व्यर्थ अभिमान, गर्विष्ठपणा.
- गळो – गळून जावा.
- न मळो – मलीन होऊ नये, घाणेरडे होऊ नये.
- दुरित – वाईट कृत्य, अनिष्ट गोष्टी,
- आत्मबोधे – आत्मज्ञानाने,
- जळो – जळून जाऊ दे, भस्मसात होऊ दे,
- मुखी – तोंडात. हरि – देवाचे नामस्मरण,
- वसो – राहू दे, वस्ती करू दे.
- सकल – सर्व, अवधी.
- कामना – इच्छा, आकांक्षा.
- मावली – मनात असणारी.
- कृपा – आशीर्वाद.
- प्रगट – दिसणे, प्रत्यक्ष,
- निजाश्रितजना – ज्यांना तुझ्या (देवाच्या) आश्रयाची किंवा आधाराची गरज असणारी माणसे (भक्त).
- सांवरी – आधार दयावा, सांभाळावी.
Marathi Kumarbharti Class 10th Digest भाग-३
भरतवाक्य कविता स्वाध्याय - Bharatvaky kavita svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ]
मोरोपंत (१७२९ ते १७९४) :
पंडित कवी. काव्य-नाटक-व्याकरण-अलंकारादी शिकून न्याय व वेदान्त यांचे अध्ययन. त्यांनी विपुल काव्यरचना केली आहे. २६८ काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत. त्यांपैकी ‘आर्याभारत’, ‘केकावलि’, ‘मंत्रभागवत’, ‘मंत्ररामायण’, ‘श्रीकृष्णविजय’ व ‘हरिवंश’ या रचना प्रसिद्ध आहेत. त्यांनी संस्कृत काव्यरचनाही केली आहे. त्यांचे समग्र वाङ्मय ‘कवीवर्य मोरापंतांचे समग्र ग्रंथ : खंड १ ते १२’ यामध्ये संग्रहित करण्यात आले आहे. मोराेपंतांनी या रचनेत सज्जन माणसांच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व यांकडे लक्ष वेधले आहे. खोटा अभिमान बाळगू नये, भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये असे आवाहन केले आहे. सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्य रचनेतून दिली आहे.
भरतवाक्य कविता
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
सदंघ्रिकमळीं दडो; मुरडितां हटानें अडो;
वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्रीं जडो ।।
न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो; ।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो ।।
मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली; ।
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी ।।
भरतवाक्य कविता स्वाध्याय - Bharatvaky kavita svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ]
- भरतवाक्य कविता स्वाध्याय
- भरत वाक्य कविता अर्थ
- भरत वाक्य कविता रसग्रहण
- भरत वाक्य कविता अर्थ मराठी
- भरत वाक्य कविता इयत्ता दहावी
- भरत वाक्य कविता मोरोपंत
भरतवाक्य कविता स्वाध्याय - Bharatvaky kavita svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ]
मित्रांनो आपल्यालाही भरतवाक्य कविता स्वाध्याय ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्यासाठी अजून नवनवीन ब्लॉग पोस्ट ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत तरी तुम्हाला अभ्यासाविषयी कोणत्याही प्रकारची अडचण असेल ती आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आहे जेणेकरून मी ती कमेंट वाचून लवकरात लवकर त्या प्रकारची ब्लॉग पोस्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करू तुमच्या comment मुळे हजारो विद्यार्थ्यांचे प्रश्न मिटू शकता ही तुमची जबाबदारी आहे म्हणून ही ब्लॉग पोस्ट तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपण देखील या ब्लॉग पोस्ट जास्तीत जास्त फायदा घेतला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: जय जय हे भारत देशा (गीत) | Click Now |
02: बोलतो मराठी… | Click Now |
03: आजी : कुटुंबाचं आगळ | Click Now |
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) | Click Now |
05: वसंतहृदय चैत्र | Click Now |
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) | Click Now |
07: वस्तू (कविता) | Click Now |
08: गवताचे पाते | Click Now |
09: वाट पाहताना | Click Now |
10: आश्वासक चित्र (कविता) | Click Now |
11: आप्पांचे पत्र | Click Now |
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | Click Now |
13: गोष्ट अरुणिमाची | Click Now |
14: भरतवाक्य (कविता) | Click Now |
15: कर्ते सुधारक कर्वे | Click Now |
16: काळे केस | Click Now |
17: खोद आणखी थोडेसे (कविता) | Click Now |
18: वीरांगना (स्थूलवाचन) | Click Now |
19: आकाशी झेप घे रे (कविता) | Click Now |
20: सोनाली | Click Now |
21: निर्णय | Click Now |
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) | Click Now |
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी | Click Now |
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) | Click Now |