वस्तू कविता स्वाध्याय 10वी मराठी - vastu kavita Swadhyay [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]

वस्तू कविता स्वाध्याय 10वी मराठी - vastu kavita Swadhyay 

विद्यार्थी मित्रांनो आजचा हा ब्लॉग पोस्ट मध्ये बघणार आहोत वस्तू कवितेचा स्वाध्याय आणि वस्तू कविता आपल्याला असेच इयत्ता दहावी मराठी प्रश्न उत्तरांची ब्लॉग पोस्ट हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही तुमच्या साठी लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू खाली वस्तू कवितेचा स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही पाहून लिहू शकता किंवा याचा अभ्यास करू शकता ही ब्लॉगपोस्ट आपण आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करू शकता जेणेकरून मित्राची देखील मदत होईल चला तर पाहूया वस्तू कविता स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी


आकृत्या पूर्ण करा.

कृती | Q (१) (अ) | Page 22
1) वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये :
SOLUTION
(१) सेवक असतात
(२) स्वच्छता आवडते
(३) माणसासारखे लाडावणे

2) वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी :
SOLUTION
(१) जीव
(२) मन

3) कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप :
SOLUTION
(१) वस्तू सुखावतात, वस्तू सेवक असतात.
(२) लाड करून घेतात, वस्तू मरण पावतात


कारणे लिहा.

कृती | Q (२) (अ) | Page 22
1) वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण ______ 
SOLUTION
वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत; कारण नंतरच्या काळातही त्या आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत.

2) वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण ______ 
SOLUTION
वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही; कारण त्यांचे आयुष्य संपते.

कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा.

कृती | Q (३) (अ) | Page 22
1)वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते 
असल्यासारखे वागलो तर वस्तू 
प्रचंड सुखावतात.
SOLUTION
आशयसौंदर्य : 'वस्तू' या कवितेत कवी द. भा. धामणस्कर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणिमात्रांसारख्या भावना असतात, त्या संवेदनशील असतात, हे बिंबवले आहे. तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे, असे प्रतिपादन केले आहे.

काव्यसौंदर्य : बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात व त्यांच्याशी निर्दयतेने वागतात. त्यांना कसेही हाताळतात. माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळींत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे, असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो. त्या सुखावतात. आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत, अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील.

भाषिक सौंदर्य : मुक्तशैलीतल्या या रचनेमुळे कवींनी या ओळींतून रसिकांशी थेट संवाद साधला आहे. अगदी साध्या पण आवाहक शब्दांत मोठे तत्त्व बिंबवले आहे. वस्तू व माणूस यांतील स्नेहबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळूवार पद्धतीने कवींनी दिला आहे.

आकृत्या पूर्ण करा.

कृती | Q (३) (आ) | Page 22
1) वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची’ याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा.
SOLUTION
द. भा. धामणस्कर यांनी 'वस्तू' या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे याचा वस्तुपाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे. बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाहीत. त्यांनाही भावना असू शकतात, हे लक्षात घेत नाहीत. कवी म्हणतात की, त्यांनाही जीव आहे, मन आहे, असे आपण समजून त्यांच्याशी वागलो, तर वस्तूंना परमानंद होतो. वस्तूंना कसेही हाताळू नये. त्यांना एखाद्या लहान मुलांसारखे लाडावून मायेने हाताळावे. हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नयेत. कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते. महात्मा गांधींचे वचन आहे की 'स्वच्छता हा परमेश्वर आहे', म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही. आपण ज्या वस्तू वापरतो, त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे. 'वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची' या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन दिलेला आहे.

2) एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली, याचे वर्णन करा.
SOLUTION
माझे दप्तर खूप छान आहे. मला ते खूप आवडते. पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्यात एक वेगळा आनंद आहे. मी माझ्या दप्तराचे खूप लाड करतो. त्याला दर रविवारी धुतो, स्वच्छ करतो. पण एकदा काय झाले! गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दप्तरात मी सर्व पुस्तके, वह्या कोंबल्या. त्यात खाऊचा डबा व पाण्याची बाटली ठेवली; त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते. तसेच ते मी पाठीवर मारून रस्त्याने ऐटीत चालू लागलो. थोड्या वेळाने कोपऱ्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टपटपत खाली पडल्या. दहा-बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले. मी परत फिरलो नि पुस्तके-वह्या गोळा करीत मागे आलो. रस्त्यावरची मंडळी मला हसत होती. माझी फजिती झाली. पण त्यातून मी धडा शिकलो की दप्तर असले म्हणून काय झाले? त्यालाही जीव आहे. किती पेलणार ते ओझे! मी दप्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही, याची दक्षता घेतली. दप्तरावरचे माझे प्रेम खूप वाढले.

3) तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा.
SOLUTION
आमच्या शाळेच्या गेटपासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांच्या कुंड्या रांगेने लावलेल्या आहेत. माझा मित्र रमेश खूप खोडसाळ आहे. एकदा शाळेत शिरताना त्याने मुद्दाम एका कुंडीला लाथ मारून खाली पाडली. आतील फुलरोपासहित माती विखुरली गेली. मी सोबतच होतो. मी त्याला या कृत्याबद्दल विचारले तेव्हा ते चुकून झाले असे सांगितले. पण मला माहीत होते, त्याने ते मुद्दामहून केले आहे. मी त्याला समजावले 'ठीक आहे. तू चुकून लाथ लागली म्हणतोस ना! मग आता आपण ती नीट उचलून ठेवू!' तो मानेना. तो पुढे जाऊ लागला तेव्हा मी त्याला या कुंड्या शाळेने फक्त शोभेसाठी लावलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे, हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे. तसेच शास्त्रात आपण शिकलो की दिवसा झाडे प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साइड घेतात. हा प्राणवायू आपल्याला मिळतो. शिवाय फुलांचे विविध रंग आपल्या डोळ्यांना सुखावतात - असे समजावून सांगितले. तो मला 'सॉरी' म्हणाला व निमूटपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली.

4) एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली, याचे वर्णन करा.
SOLUTION
माझे दप्तर खूप छान आहे. मला ते खूप आवडते. पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्यात एक वेगळा आनंद आहे. मी माझ्या दप्तराचे खूप लाड करतो. त्याला दर रविवारी धुतो, स्वच्छ करतो. पण एकदा काय झाले! गृहपाठ खूप असल्यामुळे माझ्या दप्तरात मी सर्व पुस्तके, वह्या कोंबल्या. त्यात खाऊचा डबा व पाण्याची बाटली ठेवली; त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते. तसेच ते मी पाठीवर मारून रस्त्याने ऐटीत चालू लागलो. थोड्या वेळाने कोपऱ्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टपटपत खाली पडल्या. दहा-बारा पावले पुढे गेल्यावर मला कळले. मी परत फिरलो नि पुस्तके-वह्या गोळा करीत मागे आलो. रस्त्यावरची मंडळी मला हसत होती. माझी फजिती झाली. पण त्यातून मी धडा शिकलो की दप्तर असले म्हणून काय झाले? त्यालाही जीव आहे. किती पेलणार ते ओझे! मी दप्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही, याची दक्षता घेतली. दप्तरावरचे माझे प्रेम खूप वाढले.

5) तुमचा वर्गमित्र वर्गखोली/शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगा.
SOLUTION
आमच्या शाळेच्या गेटपासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांच्या कुंड्या रांगेने लावलेल्या आहेत. माझा मित्र रमेश खूप खोडसाळ आहे. एकदा शाळेत शिरताना त्याने मुद्दाम एका कुंडीला लाथ मारून खाली पाडली. आतील फुलरोपासहित माती विखुरली गेली. मी सोबतच होतो. मी त्याला या कृत्याबद्दल विचारले तेव्हा ते चुकून झाले असे सांगितले. पण मला माहीत होते, त्याने ते मुद्दामहून केले आहे. मी त्याला समजावले 'ठीक आहे. तू चुकून लाथ लागली म्हणतोस ना! मग आता आपण ती नीट उचलून ठेवू!' तो मानेना. तो पुढे जाऊ लागला तेव्हा मी त्याला या कुंड्या शाळेने फक्त शोभेसाठी लावलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे, हाही त्यामध्ये चांगला हेतू आहे. तसेच शास्त्रात आपण शिकलो की दिवसा झाडे प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साइड घेतात. हा प्राणवायू आपल्याला मिळतो. शिवाय फुलांचे विविध रंग आपल्या डोळ्यांना सुखावतात - असे समजावून सांगितले. तो मला 'सॉरी' म्हणाला व निमूटपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली.

कंदील व विजेरी (बॅटरी) यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.

संवादलेखन | Q (१) | Page 23

 

 

SOLUTION

कंदील:फार दिवसांनी भेट झाली आपली! कशी आहेस तू?
विजेरी:मी बरी आहे. पण तू इथे काय करतोस? तुझी आता गरज उरली नाही.
कंदील: असे का म्हणतेस? तुझे नि माझे एकच तर कार्य आहे. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देणे.
विजेरी: ते ठीक आहे. पण तू अगदी जुनापुराणा झालास. तुला पेटवताना किती कष्ट पडतात. मी पाहा, एक बटन दाबले की लांबवर झोत पडतो.
कंदील: हो. पण तुझा प्रकाश डोळ्यांना त्रास देतो. मी अगदी मंद तेवतो!
विजेरी: तू तर उगाचच मिणमिणतोस. माझ्या प्रकाशाचा झगमगाट तर बघ. कशी लखलखते मी!
कंदील: अग, तुला सेल लागतात पेटवायला. ते गेले की तुझा खेळ समाप्त! मी तर अखंड तेवत राहतो.
विजेरी: तुलाही तेल लागतंच की! तेल घाला, वात ठेवा. ती भिजवा. तेव्हा कुठे तू पेटतोस!
कंदील: माझ्याकडे तेल आहे. खरंच! तेलाला स्नेह म्हणतात. फार प्राचीन काळापासून माझा व माणसांचा स्नेहबंध आहे.
विजेरी: हो. पण काळ बदलला. आता तुझी गरज नाही.
कंदील: असे म्हणू नकोस! प्रकाश देणे आपले व्रत आहे. आपल्या दोघांचेही कार्य एकच आहे. आपल्या कार्याचा विसर पडू देता कामा नये! 
  

व्याकरण व भाषाभ्यास

कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती:

वस्तू 

१. समास:
सामासिक शब्द व विग्रह यांच्या जोड्या लावा:
सामासिक शब्द – विग्रह
(i) प्रतिमास – (अ) मागे किंवा पुढे
(ii) ईश्वरनिर्मित – (आ) सात स्वर्गाचा समूह
(iii) सप्तस्वर्ग – (इ) धावणे, पळणे वगैरे
(iv) ऊनपाऊस – (ई) ईश्वराने निर्मित
(v) मागेपुढे – (उ) प्रत्येक महिन्याला
(vi) धावपळ – (ऊ) ऊन आणि पाऊस
SOLUTION:
(i) प्रतिमास – प्रत्येक महिन्याला
(ii) ईश्वरनिर्मित – ईश्वराने निर्मित
(iii) सप्तस्वर्ग – सात स्वर्गांचा समूह
(iv) ऊनपाऊस – ऊन आणि पाऊस
(v) मागेपुढे – मागे किंवा पुढे
(vi) धावपळ – धावणे, पळणे वगैरे

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 6 वस्तू 

२. अलंकार:

पुढील उदाहरण वाचून तक्ता पूर्ण करा:
(i) उदा., संगे असता नाथा आपण, प्रासादाहुन प्रसन्न कानन उपमेय → [ ] उपमान → [ ] अलंकाराचे नाव → [ ]
(ii) लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।। अलंकाराचे नाव → [ ] अलंकाराचे स्पष्टीकरण → [ ]
SOLUTION:
(i) उपमेय → जंगल उपमान → प्रासाद (राजवाडा) अलंकाराचे नाव → व्यतिरेक अलंकार
(ii) अलंकाराचे नाव → दृष्टान्त अलंकार अलंकाराचे स्पष्टीकरण → या चरणात मुंगी लहान होऊन साखरेचा कण खाते.. तशी नम्रता मला दयावी अशी देवाकडे विनवणी केली आहे. नम्रता गुण अंगिकारावा हे सांगताना मुंगीचा दृष्टान्त दिला आहे. म्हणून हा दृष्टान्त अलंकार आहे.

३. वृत्त:

पुढील काव्यपंक्तींचे गण पाडून वृत्त ओळखा:
स्वये सर्वथा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसि रे नीववावे।।
SOLUTION:
Maharashtra State Board Class 10 Marathi कुमार भारती Chapter 6 वस्तू 7
वृत्त: हे भुजंगप्रयात वृत्त आहे.

४. शब्दसिद्धी:

४. शब्दसिद्धी:
(1) निः + कासित = निष्कासित, याप्रमाणे निः हा उपसर्ग लावून पुढील शब्द लिहा:
(१) फळ – ………………………
(२) काम – ………………………
(३) कर्ष – ………………………
(४) कांचन – ………………………
SOLUTION:
(१) निष्फळ
(२) निष्काम
(३) निष्कर्ष
(४) निष्कांचन.

(2) ‘क’ हा प्रत्यय असलेले चार शब्द लिहा.
SOLUTION:
(१) सेवक
(२) लेखक
(३) वाचक
(४) साधक.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 6 वस्तू 

५. सामान्यरूप:

1) पुढील तक्ता पूर्ण करा:
शब्द – सामान्यरूप
(i) वस्तूंना …………………..
(ii) जागेवरून …………………..
(iii) हक्काच्या …………………..
(iv) हाताला …………………..
SOLUTION:
शब्द – सामान्यरूप
(i) वस्तूंना – वस्तूं
(ii) जागेवरून – जागे
(iii) हक्काच्या – हक्का
(iv) हाताला – हाता

६. वाकप्रचार:

1) योग्य अर्थ निवडा:
Maharashtra State Board Class 10 Marathi कुमार भारती Chapter 6 वस्तू 8
Maharashtra State Board Class 10 Marathi कुमार भारती Chapter 6 वस्तू 9
SOLUTION:
(i) शिल्लक ठेवणे
(ii) आश्वासन देणे

भाषिक घटकांवर आधारित कृती:

१. शब्दसंपत्ती:
SOLUTION
पुढील शब्दांचे दोन अर्थ लिहा:
Maharashtra State Board Class 10 Marathi कुमार भारती Chapter 6 वस्तू 10
उत्तर:
Maharashtra State Board Class 10 Marathi कुमार भारती Chapter 6 वस्तू 11

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 6 वस्तू 

वस्तू 

प्रश्न 2.
पुढील शब्दाच्या अक्षरांतून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा:
Maharashtra State Board Class 10 Marathi कुमार भारती Chapter 6 वस्तू 12
SOLUTION:
Maharashtra State Board Class 10 Marathi कुमार भारती Chapter 6 वस्तू 13

समानार्थी शब्द लिहा:

(i) जीव – …………………………
(ii) मन = …………………………
(iii) आयुष्य = …………………………
(iv) घर = …………………………
SOLUTION:
(i) जीव = प्राण
(ii) मन = चित्त
(iii) आयुष्य = जीवन
(iv) घर = गृह.

विरुद्धार्थी शब्द लिहा:

(i) सुखावतात x …………………………
(ii) सेवक x …………………………
(iii) मान x …………………………
(iv) स्वतंत्र x …………………………
(v) आवड x …………………………
(vi) स्वच्छ x …………………………
(vii) जिवंत x …………………………
(viii) नंतर x …………………………
(ix) कृतज्ञता x …………………………
(x) सजीव x …………………………
SOLUTION:
(i) सुखावतात x दुखावतात
(ii) सेवक x मालक
(iii) मान x अपमान
(iv) स्वतंत्र x परतंत्र
(v) आवड x नावड
(vi) स्वच्छ x अस्वच्छ
(vii) जिवंत x मृत
(viii) नंतर x आधी
(ix) कृतज्ञता x कृतघ्नता
(x) सजीव x निर्जीव,

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 6 वस्तू 

२. लेखननियम:

अचूक शब्द ओळखा:
(i) नीर्जीव/निर्जिव/निर्जीव/नीर्जिव.
(ii) अतर्मुख/अंतर्मुख/अंर्तमुख/अंतर्मूख.
(iii) सामुहिक/सामुहीक/सामूहिक/सामूहीक.
(iv) अंतकरण/अतःकरण/अंतःकरन/अंतःकरण,
SOLUTION:
(i) निर्जीव
(ii) अंतर्मुख
(iii) सामूहिक
(iv) अंतःकरण,

३. विरामचिन्हे:

पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखून लिहा: त्यांना फक्त ‘आपल्या मानलेल्या’ जागेवरून निष्कासित न होण्याची हमी दया.
SOLUTION:
(i) [ ‘ ‘ ] → एकेरी अवतरण चिन्ह
(ii) [ . ] → पूर्ण विराम.

४. पारिभाषिक शब्द:

1) पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांसाठी अचूक मराठी प्रतिशब्द कोणता?
SOLUTION:
(i) परिवहन
(ii) आदयाक्षरे
(iii) गणसंख्या
(iv) पर्यवेक्षक.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 6 वस्तू 

५. भाषिक खेळ:

५. भाषिक खेळ:
जसे –
Maharashtra State Board Class 10 Marathi कुमार भारती Chapter 6 वस्तू 18
जसे –
Maharashtra State Board Class 10 Marathi कुमार भारती Chapter 6 वस्तू 15
SOLUTION:
Maharashtra State Board Class 10 Marathi कुमार भारती Chapter 6 वस्तू 16
Maharashtra State Board Class 10 Marathi कुमार भारती Chapter 6 वस्तू 17

वस्तू Summary in Marathi

कवितेचा भावार्थवस्तू कशा हाताळाव्यात व कशा जपाव्यात, हे सांगताना कवी म्हणतात – कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे वागवू नये. (वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो.) कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागवले तर त्या वस्तूंनाही प्रचंड आनंद होतो. (वस्तू माणसासारख्या संवेदनशील असतात.)

खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात. त्या आपल्या चाकर असतात, पण तरीही त्यांना समान दर्जा दयावा, बरोबरीच्या स्नेहभावाने सन्मान दयावा. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. (त्यांना तुमच्याबरोबरच राहायचे असते. त्या स्वतःला वेगळे मानत नाहीत.) फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचे आश्वासन दया. (त्या ज्या जागेवर असतात, त्या जागेवर त्यांचे प्रेम जडलेले असते.)

वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका. वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड असते, हे हातांनीही चांगले लक्षात ठेवायला हवे. वस्तूंना जिवापाड जपावे, काळजी घ्यावी, क्वचित त्यांचे खूप लाड करावेत. (एखादया लहान गोजिरवाण्या बालकासारखी त्यांची काळजी घ्यावी व लाडावून ठेवावे.) कारण भविष्यकाळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह निरंतर जिवंत ठेवणार आहेत.

माणसांसारखेच वस्तूंचेही आयुष्य संपते. मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही. त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे वस्तूंचे आयुष्य संपले की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप यायचा असतो. हा निरोपाचा त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवावा.

वस्तू शब्दार्थ

प्रचंड सुखावतात – खूप आनंदित होतात.
निखालस – अगदी खरे.
सेवक – चाकर, सेवा करणारे.
बरोबरीचा मान – समान दर्जा.
निष्कासित – पदच्युत, जागेवरून हलवणे.
स्नेह – प्रेम, जिव्हाळा, माया.
हक्क – स्व-अधिकार,
कृतज्ञता – भावनिक ऋण, आदरयुक्त भावना.
वस्तू वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

जीव नसणे : प्राण नसणे, अचेतन असणे.
मान देणे : आदर करणे, सन्मान देणे,
हमी देणे : आश्वासन देणे.
लाडावून ठेवणे : सतत कौतुक करणे,
आयुष्य संपणे : मरण येणे.
निरोप देणे : सोडणे.
शाबूत ठेवणे : जपून शिल्लक ठेवणे.

वस्तू कविता स्वाध्याय 10वी मराठी - vastu kavita Swadhyay 

  प्रसिद्ध कवी. भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यांमुळे धामणस्कर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात.  सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकूळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही  त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. त्यांची कविता १९८० साली प्रथम ‘कविता दशकाची’ या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या  परिचयाची झाली. ‘प्राक्तनाचे संदर्भ’ व ‘बरेच काही उगवून आलेले’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली, की ती वस्तू अनमोल ठरते.  वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तूयांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील  वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंनाही भावना असतात, हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडित स्नेह जपावा, ही  भावना कवितेतून व्यक्त होत

वस्तू कविता स्वाध्याय 10वी मराठी - vastu kavita Swadhyay 

वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण
जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना.
वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते
असल्यासारखे वागलो तर वस्तू
प्रचंड सुखावतात.

वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या,
तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना.
वस्तूंना वेगळी, स्वतंत्र खोली नको असते,
त्यांना फक्त ‘आपल्या मानलेल्या’ जागेवरून
निष्कासित न होण्याची हमी द्या.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची,
हे हातांना लक्षात ठेवायला सांगा.

वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन.
त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह
नंतरच्या काळातही.
आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या
हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा
कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क
शाबूत ठेवावा.
(भरून आलेले आकाश)

वस्तू कविता स्वाध्याय 10वी मराठी - vastu kavita Swadhyay 

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post