आप्पांचे पत्र स्वाध्याय - Appance Patar Svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
कारणे लिहा.
कृती | Q (१) (अ) | Page 35
1) आजची मुले सुदैवी आहेत, कारण ______
SOLUTION
2) पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात, कारण ______
SOLUTION
पुस्तकाची पाने व झाडाची पाने दोन्ही महत्त्वाची असतात; कारण पुस्तकाच्या पानात डोक्याचे खाद्य असते आणि झाडाच्या पानात झाडाला जगवण्याचे बळ असते.
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
1)
SOLUTION
खेळपट्टीची काळजी घेणारा
त्याच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजून घेता येते कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो.
नर्स
नर्सचे काम डॉक्टरांच्या कामाइतकेच महत्त्वाचे असते.
शिपाई
चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो.
2)
SOLUTION
वृक्षसंवर्धनाचे फायदे :
(१) वृक्षांची सावली मिळते.
(२) वृक्ष हवा शुद्ध ठेवतात.
(३) फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात.
(४) जमिनीखालील पाणी पातळी टिकवून ठेवतात.
3)आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त ______
OPTIONS
हृदयाची धडधड वाढते.
कपाळावरच्या आठ्या वाढतात.
विद्यार्थ्याचे गुण वाढतात.
विचारप्रक्रियेतील आव्हान वाढते.
SOLUTION
आप्पांच्या मते चिंतेमुळे फक्त कपाळावरच्या आठ्या वाढतात.
4) शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा ______
OPTIONS
तो रोज उपस्थित असतो.
तो सर्वांची काळजी घेतो.
तो चांगलं काम करतो.
तो सर्वांशी चांगले बोलतो.
SOLUTION
शिपाईसुद्धा कौतुकास पात्र ठरतो जेव्हा तो चांगलं काम करतो.
आप्पांचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा.
1) आप्पांचे शिक्षणप्रेम - ______
SOLUTION
आप्पांचे शिक्षणप्रेम - मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात, ते खिडकीतून ऐकत असतो.
2) स्वच्छता - ______
SOLUTION
स्वच्छता - आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हांला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो.
3) चौकटी पूर्ण करा.
1)
SOLUTION
आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबददल व्यक्त केलेल्या अपेक्षा :
(१) लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे.
(२) कोणतेही काम मन लावून करावे.
(३) जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे.
(४) इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
कृती | Q (६) (अ) | Page 36
1) ती लगबगीने घरी पोहोचली.
SOLUTION
ती लगबगीने घरी पोहोचली - लगबगीने
2) जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो.
SOLUTION
जोसेफ अवघड गणितदेखील सहज सोडवतो - सहज
3) आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते.
SOLUTION
आज खूप कडाक्याचे ऊन पडले होते - आज
4) पक्ष्याने दाण्यांवर झडप घातली.
SOLUTION
पक्ष्याने दाण्यांवर झडप घातली - वर
5) तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय.
SOLUTION
तिचा चेहरा सारखा डोळ्यांसमोर येतोय - समोर
6) छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता.
SOLUTION
छोटा बाळ मुलांबरोबर खाऊ खात होता - बरोबर
7) परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले.
SOLUTION
परीक्षेत सुयश मिळाल्यामुळे विद्यार्थी सुखावले - मुळे
स्वमत - गवताचे पाते स्वाध्याय
कृती | Q (८) (अ) | Page 36
1) पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
SOLUTION
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोन्मैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उदयोगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते.
आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल. जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल. वेगळ्या शब्दांत, 'लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.' वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे.
2) पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे’, आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
SOLUTION
दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. ग्रामीण भागाची पाण्याअभावी दैना उडाली होती. सर्वत्र हाहाकार माजला होता. कळशीभर पाण्यासाठी लोक रात्रंदिवस मैलोन्मैल भटकत राहायचे. हजारो माणसे गावे सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली होती. त्या दुष्काळात शेकडो लोक मरण पावले. कित्येकांनी आत्महत्या केल्या. उदयोगधंदे बंद पडले. माणसे बेकार झाली. शेती ओस पडली. उपासमारीची दृश्ये दिसू लागली. त्या दुष्काळाने महाराष्ट्राच्या डोळ्यांत पाणी आले होते.
आपण पाणी जपून वापरले तर वाचलेले पाणी तहानलेल्यांना प्यायला मिळेल. जनावरे जगतील. शेती वाचेल. कारखान्यांना पाणी मिळेल. म्हणजे लोकांची दुःखे दूर होतील. समाधानाने जगण्याचा मार्ग मोकळा होईल. वेगळ्या शब्दांत, 'लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जातील.' वाया जाणारे पाणी वाचवणे म्हणजे नवीन पाणी निर्माण करणे होय, हे आपण आता तरी लक्षात घेतले पाहिजे.
3) आप्पांनी तुमच्याविषयीच्या व्यक्त केलेल्या अपेक्षा तुमच्या शब्दांत लिहा. या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
SOLUTION
सरधोपटपणे जीवनाचे ध्येय ठरवू नये, हे आप्पांचे म्हणणे मला खूपच पटते. कोणतेही काम निवडायला हरकत नाही. पण ते आवडीने पार पाडायचे, हे मी ठरवूनच टाकले आहे. मी एक वेगळेच ध्येय स्वत:साठी ठरवून टाकले आहे. मी खूप अभ्यास करणार आहे. खूप विचार करून शोधून काढणार आहे. वर्गात कोणताही विषय उत्तम रितीने कसा शिकवायचा, याचा शोध घेणार आहे. त्याचा शाळेशाळेत जाऊन प्रसार करणार आहे. आधी मला हा विचार सुचला, तेव्हा खूप भीती वाटली होती की माझे कोण ऐकेल? कोण समजून घेईल? पण आप्पांनी सांगितले तसे मी करणार आहे. मनापासून, जीव ओतून मी ठरवलेले काम करणार आहे. मला खात्री आहे की मी यशस्वी होईनच.
रसग्रहण दहावी मराठी
1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
व्याकरण व भाषाभ्यास
कृतिपत्रिकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) यांसाठी…
व्याकरण घटकांवर आधारित कृती:
१. समास:
पुढील समासांचा प्रत्येकी एक सामासिक शब्द लिहा:
(i) अव्ययीभाव
(ii) विभक्ती तत्पुरुष
(iii) इतरेतर द्वंद्व
(iv) वैकल्पिक द्वंद्व
(v) समाहार वंद्व
(vi) द्विगू.
SOLUTION
i) अव्ययीभाव – घरोघर
(ii) विभक्ती तत्पुरुष – कार्यालय
(iii) इतरेतर द्वंद्व – आईवडील
(iv) वैकल्पिक द्वंद्व – दोनचार
(v) समाहार वंद्व – खाणेपिणे
(vi) द्विगू – त्रिकोण.
२. अलंकार:
(१) पुढील ओळीतील उपमेय, उपमान व अलंकार ओळखा: परीहून सुंदर असे ही चिमुरडी गालावर विलसे चांदण्याची खडी
उपमेय- [ ] उपमान- [ ] अलंकार- [ ]
SOLUTION
उपमेय – [लहान मुलगी] उपमान – [परी]
अलंकार – [व्यतिरेक]
(२) पुढील वैशिष्ट्यांवरून अलंकार ओळखा व समर्पक उदाहरण दया: (सराव कृतिपत्रिका-१)
(i) एखादया घटकाचे वर्णन करणे.
(ii) ते वर्णन पटवून देण्यासाठी योग्य उदाहरण देणे.
(अ) अलंकाराचे नाव →
(आ) अलंकाराचे उदाहरण →
SOLUTION
(अ) अलंकाराचे नाव → [दृष्टान्त]
(आ) अलंकाराचे उदाहरण → [लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा]
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र
३. वृत्त:
(१) पुढील ओळींचे गण पाडून वृत्त ओळखा:
स्वजन गवसला तो त्याज पासी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो.
SOLUTION
वृत्त: हे ‘मालिनी’ वृत्त आहे.
(२) वृत्त ओळखा:
1) सदा सर्वदा योग तूझा घडावा।
तुझे कारणी देह माझा पडावा।। (मार्च १९)
SOLUTION
वृत्त: हे ‘भुजंगप्रयात’ वृत्त आहे.
४. शब्दसिद्धी:
(१) पुढील शब्दांना ‘त्व’ हा प्रत्यय लावून शब्द तयार करा:
(i) महत् – …………………………………..
(ii) कर्तृ – …………………………………..
(iii) प्रौढ – …………………………………..
(iv) वक्त – …………………………………..
SOLUTION
(i) महत् – महत्त्व
(ii) कर्तृ – कर्तृत्व
(ii) प्रौढ – प्रौढत्व
(iv) वक्तृ – वक्तृत्व.
(२) पुढील अभ्यस्त शब्द पूर्ण करा:
(i) अधून – ………………………………..
(i) दंगा – ………………………………..
(iii) हेवे – ………………………………..
(iv) काम – ………………………………..
SOLUTION
(i) अधूनमधून
(ii) दंगामस्ती
(iii) हेवेदावे
(iv) कामकाज,
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र
(३) कंसातील शब्दांचे पुढे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा: (सराव कृतिपत्रिका-३)
(महत्त्व, लुटूलुटू, निकामी, घेईघेई, चढाई, सुकुमार)
प्रत्ययघटित – उपसर्गघटित – अभ्यस्त
(i) महत्त्व (i) …………………… – (i) ……………………
(ii) …………………… – (ii) …………………… – (ii) लुटूलुटू
SOLUTION
प्रत्ययघटित – उपसर्गघटित – अभ्यस्त
(i) महत्त्व – (i) सुकुमार – (i) घेईघेई
(ii) चढाई – (ii) निकामी – (ii) लुटूलुटू
५. सामान्यरूप:
(१) पुढील शब्दांची सामान्यरूपे लिहा:
(i) अभ्यासाविषयी – ………………………………..
(ii) खेळपट्टीचा – ………………………………..
(iii) कौतुकास – ………………………………..
(iv) महोत्सवात – ………………………………..
SOLUTION
(i) अभ्यासा
(ii) खेळपट्टी
(iii) कौतुका
(iv) महोत्सवा.
(२) पुढील शब्दसमूहातील शब्दांची योग्य सामान्यरूपे लिहा: (सराव कृतिपत्रिका-३)
(i) भूगोलची वही/भूगोलाची वही →
(ii) कोकराचे पाय/कोकरूचे पाय →
(iii) इंदिरेचे पुस्तक/इंदिराचे पुस्तक →
(iv) पेनने लिही/पेनाने लिही →
SOLUTION
(i) भूगोला
(ii) कोकरा
(iii) इंदिरा
(iv) पेना।
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र
६. वाक्प्रचार:
पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा:
(i) कपाळाला आठ्या पाडणे
(ii) डोळ्यांतले पाणी पुसणे
(iii) वाया जाणे
(iv) आनंद गगनात न मावणे.
SOLUTION
(i) कपाळाला आठ्या पाडणे – नाराजी व्यक्त करणे. वाक्य: कुठलेही काम सांगितले की महादू कपाळाला आठ्या पाडत असे.
(ii) डोळ्यांतले पाणी पुसणे – अश्रू पुसणे, सांत्वन करणे, वाक्य: दुःखितांच्या डोळ्यांतले पाणी पुसणे, हीच खरी समाजसेवा होय.
(iii) वाया जाणे – फुकट जाणे. वाक्य: अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली.
(iv) आनंद गगनात न मावणे – खूप आनंद होणे. वाक्य: विजयला बोर्डाच्या परीक्षेत ९०% गुण मिळाल्यामुळे त्याच्या आईबाबांचा आनंद गगनात मावला नाही.
भाषिक घटकांवर आधारित कृतीः
१. शब्दसंपत्ती:
विरुद्धार्थी शब्द लिहा:
(i) चांगले x ………………..
(ii) जास्त x ………………..
(iii) ओळख x ………………..
(iv) आवश्यक x ………………..
(v) पूर्वज x ………………..
(vi) शिस्त x ………………..
(vi) गुण x ………………..
(viii) राग x ………………..
SOLUTION
(i) चांगले x वाईट
(ii) जास्त x कमी
(iii) ओळख x अनोळख
(iv) आवश्यक x अनावश्यक
(v) पूर्वज x वंशज
(vi) शिस्त x बेशिस्त
(vii) गुण x अवगुण
(viii) राग x लोभ.
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र
गटात न बसणारा शब्द शोधा:
(i) कावळा, कबुतर, चिमणी, ससा, गरूड.
(ii) अजंठा, शाळा, वर्ग, शिक्षक, विदयार्थी.
SOLUTION
(i) ससा
(ii) अजंठा.
पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द लिहा:
(i) समुद्रकिनारी → [ ] [ ] [ ] [ ]
(ii) फुलपाखराच्या → [ ] [ ] [ ] [ ]
SOLUTION
(i) समुद्रकिनारी → [समुद्र] [नारी] [सरी] [किनारी]
(ii) फुलपाखराच्या→ [खरा] [राख] [पारा] [पाल]
लेखननियम:
(१) अचूक शब्द लिहा:
(i) नीसर्ग/नीसंग/निसर्ग/निर्सग,
(ii) निर्पण/निष्पर्ण/नीर्पण/नीष्पर्ण.
(iii) मुहूर्त/मूहुर्त/मुहुर्त/मूहूर्त.
(iv) क्रिडांगण/क्रिडागंण/क्रीडागंण/क्रीडांगण.
SOLUTION
(i) निसर्ग
(ii) निष्पर्ण
(iii) मुहूर्त
(iv) क्रीडांगण.
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र
(२) पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा:
(i) मला वीश्वास आहे, खुप खूप शुभेच्छा!
(ii) तूमच्या शीक्षकांनी तुम्हाला वगात शीस्तीत बसलेलं बघितलंय.
SOLUTION
(i) मला विश्वास आहे, खूप खूप शुभेच्छा!
(ii) तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय.
३. विरामचिन्हे:
पुढील परिच्छेदातील विरामचिन्हे ओळखा:
तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही; पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो यावर तुमचा विश्वास नाही का?
SOLUTION
चिन्हे – नाव
(i) [ ; ] – अर्धविराम
(ii) [ , ] स्वल्पविराम
(iii) [ ? ] प्रश्नचिन्ह
४. पारिभाषिक शब्द:
पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा:
(i) Due Date –
(ii) Exchange –
(iii) Express Highway –
(iv) Earn Leave – —
(v) Bio-data – ——
SOLUTION
(i) Due Date – नियत दिनांक
(ii) Exchange – देवाण-घेवाण/विनिमय
(iii) Express Highway – द्रुतगती महामार्ग
(iv) Earn Leave – अर्जित रजा
(v) Bio-data – स्व-परिचय,
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 10 आप्पांचे पत्र
५. अकारविल्हे
(१) पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा:
(i) डॉक्टर → इंजेक्शन → पेशंट → नर्स.
(ii) वेरूळ → अजंठा → बेसिन → कार्टून.
SOLUTION
(i) इंजेक्शन → डॉक्टर → नर्स → पेशंट.
(ii) अजंठा → कार्टून → बेसिन → वेरूळ.
(२) दिलेल्या सूचनांनुसार पुढील शब्दकोडे सोडवा:
उभे शब्द- …………………… करी काम
आडवा शब्द – मन मोहित करणारा.
SOLUTION
आप्पांचे पत्र स्वाध्याय - Appance Patar Svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
अरविंद जगताप (१९७७) :
प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथालेखक. सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठीचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली प्रसिद्ध आहे. विविध सामाजिक व संवेदनशील विषयांवर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत. मराठी व हिंदी चित्रपट, मालिका यांसाठीही त्यांनी लेखन केले आहे. मराठीतील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमनकाकांच्या पत्रांच्या माध्यमातून, त्यांचे लेखन महाराष्ट्रातील सर्व जनतेपर्यंत पोहोचले आहे. त्यांचे ‘पत्रास कारण की’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विविध वृत्तपत्रेव नियतकालिके यांतूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.
त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन २०१२ चा पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. भ्रमणध्वनी (मोबाईल) व एस एम एस च्या दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद. प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे, हा या पाठामागील उद्देश आहे. प्रस्तुत पाठातून (पत्रातून) शाळेतील शिपाईकाका तुमच्याशी मनमोकळे हितगुज करत आहेत.
मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्षे राहत आहात. शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात. शाळेतील शिपाईकाका हे देखील तुमच्यासाठी अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम श्रेष्ठ, कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीने करा, कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा, यश तुम्हांला हमखास मिळेल, अशा संदेशपर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हां सर्वांना देत आहेत.
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
तुमच्याशी खूप वर्षांपासून बोलायचं होतं; पण राहून जायचं. घाबरू नका, मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई, आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता, की कधी बोलायची संधीच मिळत नाही, म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी; पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानांवर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात; पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या अाठ्या वाढतात, मार्क्सवाढत नाहीत. असो. पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे, की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार, म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो.
त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं नाहीतर शिक्षक तरी; पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायलाच पाहिजे असं नाही; पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं, आपण कौतुकास पात्र होऊ शकतो या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहीत आहे कोणतंही काम केलं, तरी ते असं करायचं, की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरच बघा. चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्सपण महत्त्वाची असते. तुम्ही बघा क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्त्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे
सुदर्शन पटनायक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात; पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे, की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्त्वाचं आहे. हे मला पटलंय म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हांला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं; पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. मला माहितेय तुम्हांला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचंय; पण कधी कधी मला वाटतं, की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार?
पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूपजण; पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हांला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाश्यांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती; पण आता खिडकी उघडा. त्या मधमाश्या नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हांला कष्टाची किंमत आणि गंमतपण कळेल. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो.
ओळख नसली तरी. आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितेय? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशांतून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. असं आपल्याभोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने दहा झाडं जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यांत जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले दहा झाडं, विचार करा.
अडचण अशी आहे, की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत; पण झाडांची नावं विचारली तर दहा झाडंसुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत. कावळा, कबुतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली, तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत. फुलंसुद्धा पाच- सातच पाठ असतात. पुस्तकातल्या पानांत डोक्याचं खाद्य असतं. झाडाच्या पानांत झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्त्वाची असतात. दोन्हीपण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली, तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही; पण झाडं मोठी झाली, तर कित्येक पिढ्यांना त्यांची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल, तर गाडी आवश्यक आहे; पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल, तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडांचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं; पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत.
तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एकजण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल; पण तुमच्यापैकी एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात; पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्यदिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. मी एवढं सगळं सांगितलं, कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय. तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय; पण मी तुम्हांला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे
अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत; पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे, की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता अाहात तसेच आनंदी रहा. जग विचारेल तुम्हांला, शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हांला वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, होस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत. हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना दहावीत किती गुण होते हे कुणाला माहीत नसतं; पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्त्वाचं आहे. दहावीत कुणाचे गुण जास्त असणार कुणाचे कमी असणार; पण आयुष्यात तुम्ही जे काही कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार. मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा!
तुमचाच,
अाप्पा
आप्पांचे पत्र स्वाध्याय - Appance Patar Svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
- आप्पांचे पत्र स्वाध्याय
- आप्पांचे पत्र इयत्ता दहावी
- आप्पांचे पत्र अरविंद जगताप
- आप्पांचे पत्र स्वाध्याय pdf
- आप्पांचे पत्र स्वाध्याय इयत्ता दहावी
आप्पांचे पत्र स्वाध्याय - Appance Patar Svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: जय जय हे भारत देशा (गीत) | Click Now |
02: बोलतो मराठी… | Click Now |
03: आजी : कुटुंबाचं आगळ | Click Now |
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) | Click Now |
05: वसंतहृदय चैत्र | Click Now |
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) | Click Now |
07: वस्तू (कविता) | Click Now |
08: गवताचे पाते | Click Now |
09: वाट पाहताना | Click Now |
10: आश्वासक चित्र (कविता) | Click Now |
11: आप्पांचे पत्र | Click Now |
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | Click Now |
13: गोष्ट अरुणिमाची | Click Now |
14: भरतवाक्य (कविता) | Click Now |
15: कर्ते सुधारक कर्वे | Click Now |
16: काळे केस | Click Now |
17: खोद आणखी थोडेसे (कविता) | Click Now |
18: वीरांगना (स्थूलवाचन) | Click Now |
19: आकाशी झेप घे रे (कविता) | Click Now |
20: सोनाली | Click Now |
21: निर्णय | Click Now |
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) | Click Now |
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी | Click Now |
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) | Click Now |