बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता दहावी | Bolato Marathi Swadhyay [ कृती स्वाध्याय व स्वमत]

बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता दहावी | Bolato Marathi Swadhyay



आकृत्या पूर्ण करा.

कृती | Q (१) (अ) | Page 4
(अ) भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय
SOLUTION
भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय :
(१) योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे
(२) क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे

(आ) मराठी भाषेची श्रीमंती
SOLUTION
मराठी भाषेची श्रीमंती
➤ मराठी ढंगाचे शब्दप्रयोग
➤ मराठी वाक्प्रचार

कृती | Q (२) | Page 4
 व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा.
SOLUTION
शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे :
(१) भाषेतली गंमत जाणून घेता येते.
(२) खूप नवीन माहिती मिळते.
(३) शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, हे कळते.
(४) आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत.
(५) शब्द मनात पक्का रुजतो.

पाठाच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.

कृती | Q (३) (अ) | Page 4
1) मराठी भाषेची खास शैली - ______
SOLUTION
मराठी भाषेची खास शैली - वाक्यप्रचार.

2)मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा - ______
SOLUTION
मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा - हवा

3) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन - ______
SOLUTION
शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन - शब्दकोश.

 गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.

कृती | Q (४) (अ) | Page 4
1) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.
OPTIONS
  1. ऐट
  2. डौल
  3. रुबाब
  4. चैन
SOLUTION
ऐट, डौल, रुबाब, चैन - चैन

2) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.
OPTIONS
  1. कपाळ
  2. हस्त
  3. ललाट
  4. भाल
SOLUTION
कपाळ, हस्त, ललाट, भाल - हस्त

3) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.
OPTIONS
  1. विनोद
  2. नवल
  3. आश्चर्य
  4. विस्मय
SOLUTION
विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय - विनोद

4) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.
OPTIONS
  1. संपत्ती
  2. संपदा
  3. कांता
  4. दौलत
SOLUTION
संपत्ती, संपदा, कांता, दौलत - कांता

5) गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.
OPTIONS
  1. प्रख्यात
  2. प्रज्ञा
  3. नामांकित
  4. प्रसिद्ध
SOLUTION
प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध - प्रज्ञा

खाली दिलेल्या अनेकवचनी नामाचे एकवचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा.

कृती | Q (५) (अ) | Page 4
1) रस्ते
SOLUTION
रस्ते - रस्ता.
वाक्य : डोंगरावरचा रस्ता वळणदार आहे.

2) वेळा
SOLUTION
वेळा - वेळ.
वाक्य : परीक्षेची वेळ जवळ आली.

3) भिंती
SOLUTION
भिंती - भिंत.
वाक्य : रंग लावलेली भिंत छान दिसते.

4) विहिरी
SOLUTION
विहिरी - विहीर.
वाक्य : आमची विहीर खूप खोल आहे.

5) घड्याळे
SOLUTION
घड्याळे - घड्याळ
वाक्य : बाबांनी मला नवीन घड्याळ आणले.

6) माणसे
SOLUTION
माणसे - माणूस.
वाक्य : पावसात एकही माणूस घराबाहेर पडला नाही.

खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

कृती | Q (६) (अ) | Page 4
1) पसरवलेली खोटी बातमी - ______
SOLUTION
पसरवलेली खोटी बातमी - अफवा

2) ज्याला मरण नाही असा - ______ 
SOLUTION
ज्याला मरण नाही असा - अमर

3) समाजाची सेवा करणारा - ______ 
SOLUTION
समाजाची सेवा करणारा - समाजसेवक

4) संपादन करणारा - ______
SOLUTION
संपादन करणारा - संपादक

 स्वमत.

कृती | Q (७) (अ) | Page 4
1) ‘तुम्ही शहाणे आहात’ या वाक्यातील ‘शहाणे’ या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा.
SOLUTION
'तुम्ही शहाणे आहात,' असे अनेकदा म्हटले जाते. त्या वेळी ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणा वर, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलाला, "बाळा तू शहाणा आहेस" असे म्हणते, तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलांबद्दल अशीच खात्री असते. आपला मुलगा विवेकी आहे. तो वाईट वागणार नाही, इतरांना दुःख देणार नाही, असा तिला विश्वास असतो. कधी कधी या उद्गारातून आई आपल्या मुलामध्ये चांगुलपणाचा भाव निर्माण करीत असते.

मात्र प्रत्येक वेळेला 'तुम्ही शहाणे आहात', या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच, असे नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात. चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. कधी कधी तर काही माणसांना खरोखरच साधी, सोपी गोष्टही कळत नाही. कितीही समजावून सांगितले, तरी त्यांना ते समजतच नाही. मग त्यांना 'तुम्ही शहाणे आहात,' असे ऐकवावे लागते. येथे 'शहाणे' हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात 'तुम्ही अतिशहाणे आहात', म्हणजे 'तुम्ही मूर्ख आहात', असेच म्हणत असतो.

2) ‘गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये’ या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.
SOLUTION
परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत, ते केव्हाच मराठी झाले आहेत. ते मराठी शब्द नाहीत, अशी कोणाला शंकाही येणार नाही.
मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात. आणि तेसुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ, समर्पक शब्द असताना! अलीकडे "ती पिवळीवाली दया," "तो पांढरा वाला पट्टा दाखवा" अशी वाक्ये सर्रास ऐकू येतात. वास्तविक पाहता 'पिवळी बॅग' आणि 'पिवळीवाली बॅग' यांत कोणता फरक आहे? 'पिवळी बॅग' या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना 'पिवळीवाली' हा नवीन शब्दप्रयोग का करावा? मराठीत आपण असे बोलतच नाही. मराठीत 'वाला' हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो. 'पिवळी' हे विशेषण आहे. मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला 'वाला' हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही. शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थ मध्ये कोणतीही भर पडत नाही. म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये, हे लेखिकांचे मत योग्यच आहे.

3) लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो.
माझ्या भाषेकडे बारकाईने पाहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो. 'चालणे' हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटा 'चालणे' या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ, लुटूलुटू चालणे, लबाडी चालणे, नोटा-नाणी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखाद्या रितीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे वगैरे, अशी किती वाक्ये सांगू? वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वत:च्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे.


व्याकरण व भाषाभ्यास

व्याकरण व भाषाभ्यास

अ. व्याकरण घटकांवर आधारित कृती:
1) समास
समासात कमीत कमी दोन शब्द असतात. हे दोन शब्द एकत्र करून जो जोडशब्द तयार होतो, त्यास सामासिक शब्द म्हणतात. या सामासिक शब्दाची फोड करून दाखवणाऱ्या पद्धतीला विग्रह म्हणतात.
उदा., शब्द + शब्द = सामासिक शब्द – विग्रह
(१) प्रति + दिन = प्रतिदिन – प्रत्येक दिवशी
(२) विदया + आलय = विदयालय – विदयेचे आलय (घर) .
(३) राम + लक्ष्मण = रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण
(४) नील + कंठ = नीलकंठ – निळा आहे ज्याचा कंठ तो (शंकर)

समासाचे प्रकार :

1. समासातील शब्दांना ‘पद’ म्हणतात.
पहिला शब्द → पहिले पद.
दुसरा शब्द → दुसरे पद. समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आणि कमी महत्त्वाचे किंवा गौण आहे, यावरून समासाचे चार प्रकार पडतात. [प्रधान पद +/गौण पद -]

समासाचे चार मुख्य प्रकार होतात :
Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 2 बोलतो मराठी… 18
[या इयत्तेत आपल्याला अव्ययीभाव, तत्पुरुष (विभक्ती व द्विगू) आणि द्वंद्व हे समास शिकायचे आहेत.]

(१) अव्ययीभाव समास :

ज्या समासातील पहिले पद प्रधान असते व सामासिक – शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो, त्यास अव्ययीभाव समास म्हणतात.
उदा., आजन्म, दररोज, बिनचूक, यथाशक्ती, बेशिस्त, दारोदार, प्रतिदिन इत्यादी.

(२) तत्पुरुष समास :

(१) विभक्ती तत्पुरुष :
ज्या समासातील दुसरे पद प्रधान असून, ज्या सामासिक शब्दांमधील विभक्ती प्रत्यय गाळलेले असतात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात.
उदा., तोंडपाठ (तोंडाने पाठ), क्रीडांगण (क्रीडेसाठी अंगण), विदयालय (विदयेचे आलय), घरकाम (घरातील काम) इत्यादी.

(२) द्विगू समास :
ज्या समासातील दुसरे पद प्रधान असून, पहिले पद संख्याविशेषण असते, त्यास द्विगू समास म्हणतात. उदा., त्रिभुवन, चौकोन, पंचपाळे, दशदिशा, नवरात्र इत्यादी.

(३) वंद्व समास :
ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असतात, त्यास द्वंद्व समास म्हणतात.
उदा., आईवडील, खरेखोटे, केरकचरा इत्यादी.
द्वंद्व समासाचे प्रकार :
(१) इतरेतर द्वंद्व : ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना ‘आणि’, ‘व’ या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतात, त्यास इतरेतर द्वंद्व समास म्हणतात. उदा., आईवडील (आई आणि वडील); रामलक्ष्मण (राम आणि लक्ष्मण)

(२) वैकल्पिक वंद्व : ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना ‘किंवा’, ‘अथवा’ या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो, त्यास वैकल्पिक वंद्व समास म्हणतात. (यात बहुधा परस्परविरोधी पदे असतात.) उदा., खरेखोटे (खरे किंवा खोटे), सुखदुःख (सुख किंवा दुःख) इत्यादी.

(३) समाहार वंद्व : ज्या सामासिक शब्दात अनेक गोष्टींचा समावेश असतो व ज्याचा विग्रह करताना ‘वगैरे, इतर’ या शब्दांचा वापर केला जातो, त्यास समाहार दवंदव समास म्हणतात. उदा., गप्पागोष्टी (गप्पा, गोष्टी वगैरे), मीठभाकर (मीठ, भाकर व इतर पदार्थ) इत्यादी.

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :

१. समास :
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :

1) आजन्म
SOLUTION
आजन्म – जन्मापासून

1) मोरपीस
SOLUTION
मोरपीस – मोराचे पीस

2) त्रिभुवन
SOLUTION
त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह

3) खरेखोटे
SOLUTION
खरेखोटे – खरे किंवा खोटे

4) विटीदांडू .
SOLUTION
विटीदांडू – विटी आणि दांडू

5) गुरेवासरे.
SOLUTION
गुरेवासरे – गुरे, वासरे वगैरे.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 2 बोलतो मराठी…

 शब्दसिद्धी

2) ‘अति’ हा उपसर्ग लागलेले चार उपसर्गघटित शब्द लिहा.
SOLUTION
अतिशहाणा
अतिसुंदर
अतिआनंद (अत्यानंद)
अतिआवश्यक (अत्यावश्यक).

1) ‘वान’ हा प्रत्यय लागलेले चार प्रत्ययघटित शब्द लिहा.
SOLUTION
गुणवान
धनवान
गाडीवान
अक्कलवान.

पुढील शब्दांतील सामान्यरूपे ओळखा :

पुढील शब्दांतील सामान्यरूपे ओळखा :
(1) भाषेची
SOLUTION
भाषे

(2) घरात (मार्च ‘१९)
SOLUTION
घरा

(3) विनोदाने
SOLUTION
विनोदा

(4) महोत्सवाला
SOLUTION
महोत्सवा

(5) जिभेला (मार्च ‘१९).
SOLUTION
जिभे.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 2 बोलतो मराठी…

वाक्प्रचार :

वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा :
SOLUTION
(i) खांदयाला खांदा लावणे – सहकार्य करणे.
(ii) कंठस्नान घालणे – ठार मारणे.
(iii) माश्या मारणे – निरुदयोगी असणे.
(iv) खस्ता खाणे – खूप कष्ट उपसणे.

समानार्थी शब्द लिहा :

समानार्थी शब्द लिहा :
(1) कंठ
SOLUTION
कंठ = गळा

(2) मयूर
SOLUTION
मयूर = मोर

(3) नदी
SOLUTION
नदी = सरिता

(4) पाऊस.
SOLUTION
पाऊस = पर्जन्य.

पुढे दिलेल्या अनेकवचनी नामांचे एकवचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा 

(1) रस्ते
SOLUTION
रस्ते – रस्ता.
वाक्य : डोंगरावरचा रस्ता वळणदार आहे.

(2) वेळा
SOLUTION
वेळा – वेळ.
वाक्य : परीक्षेची वेळ जवळ आली.

(3) भिंती
SOLUTION
भिंती – भिंत.
वाक्य : रंग लावलेली भिंत छान दिसते.

(4) विहिरी
SOLUTION
विहिरी – विहीर.
वाक्य : आमची विहीर खूप खोल आहे.

(5) घड्याळे
SOLUTION
घड्याळे – घड्याळ.
वाक्य : बाबांनी मला नवीन घड्याळ आणले.

(6) माणसे.
SOLUTION
माणसे – माणूस.
वाक्य : पावसात एकही माणूस घराबाहेर पडला नाही.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 2 बोलतो मराठी…

गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा :

(1) ऐट, डौल, रूबाब, चैन.
SOLUTION
चैन

(2) कपाळ, हस्त, ललाट, भाल.
SOLUTION
हस्त

(3) विनोद, नवल, आश्चर्य, विस्मय.
SOLUTION
विनोद

(4) संपत्ती, संपदा, कांता, दौलत.
SOLUTION
कांता

(5) प्रख्यात, प्रज्ञा, नामांकित, प्रसिद्ध.
SOLUTION
प्रज्ञा

पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :

(1) पसरवलेली खोटी बातमी
SOLUTION
अफवा

(2) ज्याला मरण नाही असा
SOLUTION
अमर

(3) समाजाची सेवा करणारा
SOLUTION
समाजसेवक

(4) संपादन करणारा
SOLUTION
संपादक

लेखननियम :

अचूक शब्द ओळखा :
(1) भाशातज्ञ/भाषातज्ञ/भाषातज्ज्ञ/भाशातज्ज्ञ.
SOLUTION
भाषातज्ज्ञ

(2) साहित्यिक/साहीत्यिक/साहित्यीक/साहीत्यीक. उत्तरे :
SOLUTION
साहित्यिक.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 2 बोलतो मराठी… 25

पारिभाषिक शब्द :

पुढील इंग्रजी पारिभाषिक शब्दांना मराठी प्रतिशब्द लिहा :
(1) Event
SOLUTION
घटना

(2) Drama
SOLUTION
नाटक

(3) Yard
SOLUTION
आवार

(4) Mobile
SOLUTION
भ्रमणध्वनी

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 2 बोलतो मराठी…

अकारविल्हे/भाषिक खेळ :

पुढील शब्द अकारविल्हेनुसार लिहा :
(1) भाषा → मराठी → क्रियापद → भाव.
SOLUTION
क्रियापद → भाव → भाषा → मराठी.

(2) गणित → भूगोल → भाषा → इतिहास (मार्च ‘१९).
SOLUTION
इतिहास → गणित → भाषा → भूगोल.

बोलतो मराठी… शब्दार्थ

व्युत्पत्ती – शब्दाचे मूळ शोधण्याचे शास्त्र. बोलतो मराठी… वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
पाकीट मारणे : पैशाचे पाकीट शिताफीने चोरणे.
ताव मारणे : भरपूर खाणे.
माश्या मारणे : रिकामटेकडेपणाने वेळ घालवणे.
खस्ता खाणे : खूप कष्ट करणे.
कंठस्नान घालणे : गळा कापून ठार मारणे.
खांदयाला खांदा लावणे : सहकार्य करणे.
खांदा देणे : प्रेत वाहून नेण्यात सहभागी होणे.
अकलेचा कांदा असणे : अतिशहाणा असणे.
एखाद्याला हसणे : एखादयाची थट्टा करण्याच्या हेतूने हसणे.

बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता दहावी | Bolato Marathi Swadhyay [ कृती स्वाध्याय व स्वमत]

परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता.
बायको : ‘‘तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?’’
नवरा : ‘‘नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार!’’
आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण ‘बनवणे’ हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून  आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात  रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त ‘बनवले’ जातात. मराठीत ‘बनवणे’ म्हणजे ‘फसवणे’ असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस ‘बनवणारा’ जादूगार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे.

 मराठीत ‘मारणे’ हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे,  शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. ‘मारणे’ म्हणजे ‘मार  देणे’ हा अर्थयात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार ही देखील भाषेची खास शैली असते. ‘खस्ता खाणे’ मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही,  हे माहीत आहे ना? तसेच ‘कंठस्नान घालणे’ हा वाक्प्रचार युद्धाविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे  गळ्याखालून ‘अंघोळ घालणे’, असा शब्दश: अर्थ नाही. 

‘खांद्याला खांदा लावणे’ (सहकार्य करणे) आणि ‘खांदा देणे’  (प्रेताला खांदा देणे) यांतला फरकही लक्षात घ्यायला हवा. एकाऐवजी दुसरे क्रियापद वापरले, तर अर्थाचा अनर्थ होईल.  अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. ‘अक्कलवान’ म्हणजे हुशार; पण  ‘अकलेचा कांदा’ म्हणजे ‘अतिशहाणा’ हे माहीत नसेल, तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय, हेच  आपल्याला कळणार नाही.क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरीदेखील अर्थाचा गोंधळ होतो. 

उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे  (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., ‘तुझी मदत करणे’ याऐवजी ‘तुला मदत करणे’ हवे. ‘त्यांचे धन्यवाद’ याऐवजी ‘त्यांना धन्यवाद’ असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे  इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक  भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. ‘टेबल’ हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर  भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. ‘मी स्टडी केली’ म्हणण्यातून काय नवीन  अर्थ कळतो?

 त्याऐवजी ‘मी अभ्यास केला’ म्हणणं योग्य नाही का? भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती  मिळते. ‘मोरांबा’ या शब्दातल्या ‘मोरा’चा मयूराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी (जुन्या काळी साखर मॉरिशसवरून  यायची म्हणून मोरस) संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, ते त्यातून कळते. ‘कदर करणे’ असे आपण म्हणतो. ताे वाक्प्रचार आहे. ‘कद्र’ या अरबी शब्दापासून ‘कदर’ (म्हणजे गुणांची पारख)  हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो, की आपल्या चुकाही होत नाहीत. उदा., ‘अनुसया’ असे नाव नसून  ते ‘अनसूया’ असे आहे. 

‘अन्+ असूया’ अशी त्यातील संधी आहे. मनात असूया (मत्सर) नसलेली अशी ती ‘अनसूया’  हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच ‘जराजर्जर’ या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे, ‘वार्धक्याने  विकल झालेला!’ यातील ‘ज’चे उच्चार तालव्य (ज्य) आहेत. तर जरा (थोडे), जर (कलाबतू) या शब्दातील ‘ज’चे  उच्चार दन्तमूलीय आहेत. (दन्तमूलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो  असे ध्वनी.) उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. ‘सूतकताई’ हा शब्द जर ‘सूतक ताई’ असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच ‘अक्षरश:’ हा शब्द लिहिताना ‘अक्षर शहा’ असा कोणा मुलाचे  नाव करून टाकणे बरोबर आहे का? 

‘पुराणातली वांगी पुराणात’ या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली  आहे, हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल! तिथे मूळ म्हण होती ‘पुराणातली वानगी पुराणात.’ वानगी म्हणजे उदाहरणे.  पण ‘वानगी’ झाली ‘वांगी’ आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी! अशी फजिती होते.  काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात.  उदाहरणार्थ, 
१. राजाचे ‘कलेवर’ प्रेम होते.
२. अपघातस्थळी कडेला एक ‘कलेवर’ पडले होते. 

येथे पहिल्या वाक्यात ‘कलेवर’ हे शब्दरूप ‘कला’ या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात ‘कलेवर’ हे नाम असून त्याचा अर्थ ‘शव’ असा आहे.  आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने  आपल्या भावजीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास  जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे.  उदा., आता पाऊस पडत आहे. ‘पाऊस पडणे’ या घटनेविषयी दोन वाक्यांतून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पाहा. 
१. पावसाने स्वत: जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली.
२. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या ‘मॉर्निंग वॉक’च्या बेतावर पाणी पडले.

अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे  सांगायला मदत करत असते, त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...’  से कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही. 
(छात्र प्रबोधन, दीपावली विशेषांक २०१६)

बोलतो मराठी स्वाध्याय इयत्ता दहावी | Bolato Marathi Swadhyay

  • bolto marathi swadhyay pdf download
  • 10th class marathi swadhyay pdf
  • bolto marathi question answer
  • इयत्ता दहावी मराठी स्वाध्याय
  • बोलतो मराठी
  • इयत्ता दहावी मराठी नवनीत गाईड pdf

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post