काळे केस स्वाध्याय - काळे केस इयत्ता दहावी | Kale kes svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ]

काळे केस स्वाध्याय - काळे केस इयत्ता दहावी | Kale kes svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन ब्लॉग पोस्ट मध्ये काळे केस या इयत्ता दहावी मराठीचे धडे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण प्रथमता काळे केस स्वाध्याय इयत्ता दहावी या विषयी संपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत आणि त्यानंतर काळे केस हा धडा देखील आपण बघणार आहोत प्रथमता आपण प्रश्न उत्तरे म्हणजेच काळे केस स्वाध्याय बघणार आहोत आणि त्यानंतर काळे केस याचा धडा बघणार आहोत

 निर्मळे अकॅडमी तुमचा साठी अशा नवनवीन आणि अभ्यासासाठी मदत करणाऱ्या ब्लॉगपोस्ट घेऊन येत आहेत तरी तुम्ही आमच्या या निर्मळे अकॅडमी जास्तीत जास्त फायदा करून आपल्या इयत्ता दहावीच्या मराठीच्या पेपर साठी मदत करून घ्यावी आम्ही तुमच्यासाठी इयत्ता दहावी मराठी चे सर्व प्रश्न उत्तर गाईड नुसार टाकलेली आहेत तरी तुम्ही आमचा निर्मळे अकॅडमी ऑफिशिअल वेबसाईट ला भेट देऊन ही प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात चला तर आता पाहूया काळे केस स्वाध्याय

काळे केस स्वाध्याय - काळे केस इयत्ता दहावी | Kale kes svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ]

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (अ) | Page 54
1) तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्ये :
SOLUTION
(१) भिंतीच्या व कौलारांच्या उंचसखल व उभ्याआडव्या रांगा समोर दिसतात.
(२) पावसाळ्यात दिशा धूसर बनतात.
(३) कधी कधी पाऊस रिमझिमतो.
(४) कधी कधी पाऊस धोधो कोसळतो

2) लेखक सर्वकाळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी :
SOLUTION
(१) नव्या नव्या कल्पना
(२) अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द

कारणे शोधा.

कृती | Q (२) (अ) | Page 54
1) लेखकाला स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण ______
SOLUTION
लेखकांना स्वत:च्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही; कारण लेखकांचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते, हे लेखकांच्या लक्षात आले.

2) लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण ______
SOLUTION
लेखकांच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नांचा तगादा लावत होता; कारण तो माणूस स्वत:च्या केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि लेखकांकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती.


खालील शब्दसमूहाचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

कृती | Q (३) (अ) | Page 54

1) केसभर विषयांतर
SOLUTION
केसभर विषयांतर - अगदी थोडेसुद्धा विषयांतर.

2) केसांत पांढरं पडण्याची लागण
SOLUTION
केसांत पांढरं पडण्याची लागण - केस पांढरे होणे

3) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड
SOLUTION
प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड - कलप लावल्यामुळे पिकलेल्या केसांचा पांढरेपणा दयनीय दिसतो.

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

कृती | Q (४) (अ) | Page 54
1) गुडघे टेकणे.
SOLUTION
गुडघे टेकणे :
अर्थ : शरण येणे.
वाक्य : गुरुजींनी शेखरच्या अज्ञानापुढे गुडघे टेकले.

2) खनपटीला बसणे.
SOLUTION
खनपटीला बसणे :
अर्थ : सारखे विचारत राहणे.
वाक्य : सासू घरात आलेल्या नवीन सुनेच्या खनपटीला बसली.

3) तगादा लावणे.
SOLUTION
तगादा लावणे :
अर्थ : पुन्हा पुन्हा विचारणे.
वाक्य : सहलीला जाण्यासाठी जुईने आईकडे तगादा लावला.

4) तगादा लावणे.
SOLUTION
तगादा लावणे :
अर्थ : पुन्हा पुन्हा विचारणे.
वाक्य : सहलीला जाण्यासाठी जुईने आईकडे तगादा लावला.

5) पिच्छा पुरवणे.
SOLUTION
पिच्छा पुरवणे :
अर्थ : एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे.
वाक्य : चांगल्या गोष्टींसाठी शासन व्यवस्थेचा पिच्छा पुरवणे गरजेचे आहे.


खालील शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

कृती | Q (५) | Page 55

1) निष्णात
SOLUTION
माधुरी सतार वाजवण्यात निष्णात आहे.

2) झिलई
SOLUTION
झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात.

3) झिलई
SOLUTION
झिलई दिली की जुनी भांडी चकाकतात.

4) लहरी
SOLUTION
आपण कधी लहरी वागू नये.

5) तगादा
SOLUTION
'खाऊ दे' असा छोट्या मनूने आईकडे तगादा लावला.

खालील वाक्यातील अलंकार ओळखा.

कृती | Q (६) (अ) | Page 55
1) नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात - ______ 
SOLUTION
नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात. - उपमा अलंकार 
स्पष्टीकरण :
नवीन कल्पना जणूकाही कारंजे आहेत, म्हणजेच कल्पनेला कारंज्याची उपमा लेखकांनी येथे दिलेली आहे.

2) नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात - ______ 
SOLUTION
नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात. - उपमा अलंकार 
स्पष्टीकरण :
नवीन कल्पना जणूकाही कारंजे आहेत, म्हणजेच कल्पनेला कारंज्याची उपमा लेखकांनी येथे दिलेली आहे.

3) कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - ______ 
SOLUTION
कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - उपमा अलंकार
स्पष्टीकरण :
मानवी कल्पनेला लक्ष्मीची उपमा येथे लेखकांनी दिलेली आहे.

खालील वाक्यांतील परस्परविरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य 

कृती | Q (७) | Page 55

1) अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा.
(अ) मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात. 
(आ) त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. 
(इ) स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी. 
(ई) प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं.

SOLUTION
(अ) सुख - दुःख
(आ) गर्भित - उघड
(इ) स्तुती - निंदा
(ई) प्रश्न - उत्तर
परस्परविरोधी शब्द असलेल्या आणखी वाक्यरचना :
(अ) परीक्षेत मुलं पास-नापास होणारच.
(आ) खेळात हार-जीत आलीच.
(इ) मोठी मुलं लहान मुलांना समजावून सांगत होती.

विरुद्धार्थी शब्द लिहा.

कृती | Q (८) (अ) | Page 55
1) अवरोह × ______
SOLUTION
अवरोह × आरोह

2) अल्पायुषी × ______
SOLUTION
अल्पायुषी × दीर्घायुषी

3) सजातीय × ______
SOLUTION
सजातीय × विजातीय

4)  दुमत × ______
SOLUTION
दुमत × संमत

5) दुमत × ______
SOLUTION
दुमत × संमत


स्वमत

1) लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा.
SOLUTION
खनपटीला बसलेल्या गृहस्थाशी लेखकांनी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेमुळे माझे एक ठाम मत झाले आहे. लोक आपले वय लपवण्यासाठी, आपण म्हातारे झालेलो नाही, आपण अजूनही तरुणच आहोत, हे दाखवण्यासाठी केसांना कलप लावतात.
वास्तविक, दिवसागणिक आपले वय वाढत जाणारच. वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच. हे सर्व माणसे कधीही टाळू शकत नाहीत. माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखादया क्षेत्रात आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे. आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे. आपली कुवत काय आहे, आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते, आपण कशात प्रगती करू शकतो, याचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे. तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमावणे शक्य होईल. मग वय वाढण्याचे दुःख होणार नाही. उलट, आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील.


2) परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
लेखक व्याख्यानांच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे. तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळले-बागडलेले लोक भेटायचे.
जुनी माणसे भेटली की विचारपूस केली जायची. कोण कोण काय काय करतो ही माहिती दिली-घेतली जायची. लेखकांकडे आकर्षक बाब होती. त्यांचे केस अजूनही काळे होते. समोरची माणसे केसांच्या या काळेपणावरून त्यांना प्रश्न विचारत. त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात. पण हा प्रयत्न नेहमीच अपयशी ठरतो. कलपामुळे रूप अगदी केविलवाणे बनते. लेखकांच्या एका स्नेह्याची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे, लेखकांनी केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी, याचे त्या गृहस्थाला अमाप कुतूहल होते. ते कुतूहल शमवण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीला बसला. लेखकांनी थट्टा करीत करीत त्याची बोळवण केली.

3) प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते, याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा.
SOLUTION
प्रत्येकाची विचार करण्याची सवय व वेळ स्वतंत्र असते, यात शंकाच नाही. कोणाला कोणत्या वेळेला नवनवीन विचार सुचतील किंवा नवनवीन कल्पना स्फुरतील, हे सांगता येणे तसे कठीणच आहे. आमच्या कॉलनीत एक कवी राहतो. त्याला कॉलनीमध्ये चांगला मान आहे. अनेक जण त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रसंगांसाठी कविता लिहून घेतात. तोसुद्धा अतिशय आनंदाने लिहून देतो. या आमच्या कार्टून कॉलनीच्या टोकाला एक रस्ता आहे. तो रस्ता तिथेच संपतो. त्यामुळे तेथे वर्दळ नसते. हा कवी रोज सकाळी तिथे येरझारा घालत फिरत राहतो. असे चालता चालता त्याला कवितेच्या ओळी सुचतात. माझ्या वर्गात माझा एक मित्र आहे. तो अभ्यास करताना मोबाईलवर चित्रपट गीते लावून ठेवतो. त्याच्या मते, गाणी चालू असताना उत्तरे सुचतात, निबंध चांगला लिहिता येतो, गणित सहज सोडवता येतात. तो सांगतो की, गाणी चालू असताना त्याचे मन एकाग्र होते. 'काळे केस' या पाठाचे लेखक ना. सी. फडके यांना दाढी करता करता लेखन सुचत असे.
या बाबतीत काही नियम सांगता येणे केवळ अशक्य आहे. प्रत्येकाची सवय वेगळी असते. स्वतःचे मन मुक्त आणि आनंदी होण्याची वेळसुद्धा वेगवेगळी असते. मन मुक्त आणि आनंदी असते तेव्हा विचार सुचतात, कल्पना सुचते. मनाची ही अवस्था कोणाला कधी लाभेल हे काहीही सांगता येत नाही.

खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यांतील विभक्ती ओळखा.

भाषाभ्यास | Q (१) | Page 55

सामासिक शब्द  विग्रहविभक्ती
(अ) सभागृहसभेसाठी गृह______
(आ) कलाकुशलकलेत कुशल______
(इ) ग्रंथालयग्रंथांचे आलय______
(ई) कष्टसाध्यकष्टाने साध्य______
(उ) रोगमुक्तरोगापासून मुक्त______

SOLUTION

सामासिक शब्द  विग्रहविभक्ती
(अ) सभागृहसभेसाठी गृहचतुर्थी
(आ) कलाकुशलकलेत कुशलसप्तमी
(इ) ग्रंथालयग्रंथांचे आलयषष्ठी
(ई) कष्टसाध्यकष्टाने साध्यतृतीया
(उ) रोगमुक्तरोगापासून मुक्तपंचमी


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

भाषाभ्यास | Q (२) (अ) | Page 56

1) आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.
SOLUTION
सूर्यप्रकाश - सूर्याचा प्रकाश

2) सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा.
SOLUTION
देशार्पण - देशाला अर्पण

3) प्रत्येकाने ऋणमुक्त राहण्याचा प्रयत्न करायलाच हवा.
SOLUTION
ऋणमुक्त - ऋणापासून मुक्त

4) पाठ्यपुस्तकातील सर्व कविता संकेतला तोंडपाठ आहेत.
SOLUTION
तोंडपाठ - तोंडाने पाठ

काळे केस स्वाध्याय - काळे केस इयत्ता दहावी | Kale kes svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

ना. सी. फडके (१८९४ ते १९७८) :
मराठीतील लोकप्रिय कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार. ‘कलेकरिता कला’ हा पक्ष सातत्याने मांडणारे समीक्षक. ‘लघुनिबंध’  किंवा ‘गुजगोष्टी’ या वाङ्मयप्रकाराचे आद्यप्रवर्तक म्हणूनही ते आेळखले जातात. वेधक व्यक्तिरेखाटन, संवादचातुर्य, रचनेच्या दृष्टीने  बांधेसूदपणा, प्रसन्न, लालित्यपूर्ण भाषा, वाचकांशी चटकन संवाद साधण्याचे कौशल्य ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. त्यांचे ‘दौलत’,  जादूगार’, ‘प्रवासी’, ‘अखेरचे बंड’ इत्यादी शंभराहून अधिक कादंबऱ्या; ‘गुजगोष्टी’, ‘धूम्रवलये’ हे लघुनिबंधसंग्रह; ‘प्रतिभासाधन’,  ‘प्रतिभाविलास’ हे लेखन प्रसिद्ध आहे. १९४० साली रत्नागिरी येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६२ साली  भारत सरकारने ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. या लघुनिबंधात स्वत:च्या अजूनही काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्ताने लेखकाने आपल्या मनात येणारे विचार खुसखुशीत  शैलीत प्रकट केले आहेत.

काळे केस

  ‘‘तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत?’’ मला भेटावयास आलेल्या त्या गृहस्थांचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही. या प्रश्नाची मला आता सवय झालेली आहे. कुठे परगावी व्याख्यानासाठी मी गेलो, की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्याबरोबर असलेली व आता त्या गावी राहत असलेली जुन्या परिचयाची माणसं भेटायला येतात. जुन्या आठवणी निघतात. आता आपला तो हा कुठे  असतो, अमका तो हा काय करतो, असल्या प्रश्नांची व उत्तरांची देवघेव होते. घड्याळाचे काटे मागे फिरवून कित्येक  वर्षांपूर्वीचे दिवस उकरले जातात. मातीच्या ढिगात सुख-दु:खांचे माणिकमोती आढळतात. त्याकडे न्याहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो. 

अशा गप्पा रंगात आल्या, की परस्परांच्या वयाचेही अंदाज पडताळले जातात आणि मग मला भेटावयास आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावल्यासारखे करतो आणि विचारतो, ‘‘तुमचे केस अजून  काळे कसे राहिले आहेत?’’ त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. स्तुती-निंदेची पर्वा न करणारा मी; पण ही तारीफ ऐकून मला बरे वाटते.  मी हसतो व गप्प बसतो किंवा दुसरा विषय काढतो. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं असंही नाही. तुमचे  केस अजून काळे आहेत ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे, एवढंच त्याला म्हणायचं असतं. तुमचं हे बोलणे  ऐकून मला आनंद झाला एवढा अभिप्राय माझ्या हसण्यात व्यक्त झालेला असतो. त्याचा हेतू साधलेला असतो. माझं  कर्तव्य मी केलेलं असतं. मी विषय बदलला तरी त्याची हरकत नसते. 

पण एकदा एक गृहस्थ माझ्या खनपटीलाच बसले. ते म्हणाले, ‘‘विषय नका बदलू. केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती केलीत सांगा!’’ मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. माझ्या मनात आलं, केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावून हा गृहस्थ मला केसभर विषयांतर करू देत नाही. हा काय चमत्कार? पण त्याच्या डोक्याकडे नीट निरखून पाहिल्यावर  तो तसं का करत होता ते माझ्या डोक्यात आलं. वाढत्या वयाबरोबर डोक्यावर पसरू पाहणारा पांढरा रंग छपवण्यासाठी  बाजारी कलप वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसांवर झाकण घालता येते; पण हलके पांढरं पडण्याची लागण केसात  भलत्याच प्रमाणात होते, सारंच आभाळ फाटल्यासारखं होतं, कलपाची रंगपंचमी नित्यनेमाची होऊन बसते, माणूस  कंटाळतो आणि मेहनत सुटली, की पैलवानांची पोटं जशी केविलवाणी होतात तशी त्यांच्या केसांची दुर्दशा होते. त्या  केसांचा पांढरेपणा पुरता बुजलेला असतो, 

कलपाचा काळेपणा त्यावर चढलेला नसतो. केसांच्या रंगाची छटा हुबेहूब  वठवणं निष्णात चित्रकारालादेखील अशक्य वाटेल. मी आपले केस काळे राखण्यासाठी काही तरी विशेष उपाय केला असला पाहिजे अशी समजूत माझ्या मित्रांनी का करून घेतली होती ते माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं, ‘‘मी कोणतीही  युक्ती केलेली नाही. केस काळे राहिले झालं!’’ ते म्हणाले, ‘‘तुम्ही खरं सांगत नाही. केस आपोआप काळे राहतात काय?  बोला, खरं बोला. काय इलाज केलेत?’’ मग मला त्यांची थोडी चेष्टा करण्याची लहर आली व मी म्हटलं, ‘‘तुम्ही पिच्छाच पुरवताहात तेव्हा सांगणं भाग आहे-’’

‘‘आत कसं बोललात?’’ ते खुशीत येऊन म्हणाले, ‘‘सांगा काय केलंत?’’ मी म्हटलं, ‘‘असं पाहा, केस कशामुळे  पांढरे होतात? फार विचार केल्यानं, नाही का?’’ हे कारण मान्य करण्यात ते स्वत: फार विचारी ठरत होते. त्यामुळे क्षणाचाही विचार अगर विलंब न करता ते म्हणाले,  ‘‘हो, असं तज्ज्ञांचं मत आहे खरं.’’ मी म्हटलं, ‘‘मग या मतावरूनच केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय उघड नाही का होत? तोच उपाय मी केला!’’ mते म्हणाले, ‘‘लक्षात नाही आलं!’’ मी म्हटलं, ‘‘उगीच भ्रम आहे लोकांना!’’ असं म्हणून मी त्या गृहस्थांना तो विषय तेवढ्यावर सोडायला लावला. ते  माझा निरोप घेऊन गेल्यावर माझ्या मनात आलं, तुम्ही विचार केव्हा करता असा प्रश्न मला कोणी केला तर मी काय उत्तर  देईन? 

तुमची लिहायची वेळ कोणती असा प्रश्न मला नेहमी विचारला जाताे. त्याप्रमाणेच मला जर एखाद्यानं विचारलं,  तुमची विचार करायची वेळ कोणती, तर माझं उत्तर काय असेल? माझी विचार करण्याची वेळ कोणती? विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा! हा प्रश्न टाळता येण्यासारखा नाही. याचा एकदा निकाल लावलाच पाहिजे! या निश्चयानं मी स्वत:चं बरेच दिवस निरीक्षण केलं आणि आता मी निकाल लावला आहे. माझं उत्तर तयार आहे.  उत्तर थोडंसं चमत्कारिक आहे; पण ते तुम्हांला सांगायला हरकत नाही. मात्र माझी विचार करण्याची वेळ कोणती असं  मला नका विचारू, 

कारण अमुकच वेळी नव्हे तर सदा सर्वकाळच मी विचार करत असतो. लेखनाचा उद्योग करणाऱ्या  माणसानं तो करायलाच हवा. नव्या नव्या कल्पनांच्या शोधात तो असतो. अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा त्याचा यत्न असतो. गाढ झोपेच्या घटका सोडल्या तर त्याचं मन सतत विचार करतच असतं. त्याची सावली  ज्याप्रमाणे त्याला कधी सोडणार नाही तद्वत तो कोणत्याही उद्योगात कसला तरी विचार करत असतो. तेव्हा माझी  विचार करण्याची वेळ कोणती ते काय सांगू? पण विचार करण्यासाठी कोणती वेळ मला सर्वांत आवडते, अगर कोणत्या वेळी सर्वांत जास्त विचार मला सुचतात  असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देता येईल. माझं जे उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही कोणास ठाऊक?  माझा अनुभव तेवढा मी सांगतो. तो असा, की सकाळी दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वांत आवडती  वेळ आहे आणि त्या वेळी मला नवे नवे विचार सुचतातही! 

मी सकाळी उशिरा उठतो आणि खोलीत खुर्चीवर बसून नव्हे तर गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे  उभा राहून रोज दाढी करतो. डाव्या अंगाला सूर्य पुष्कळ वर आलेला असतो. त्याच्या किरणांचा झोत माझ्यावर पडतो.  तिसऱ्या मजल्याच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलारांच्या उंच-सखल आडव्या-उभ्या रांगा दिसतात.  पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक झिमझिम, कधी गर्जणारी वृष्टी सुरू असते; पण  बाकीच्या ऋतूंत सबंध देखावा उन्हानं झळकत असतो. खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी चालू झालेली  असते. वाहनांचे, फेरीवाल्यांचे, संभाषणांचे, आयांनी लहान मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज उठत असतात. माझं लक्ष mत्यांकडे नसतं. स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषाराप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शाची  मौज घेत आणि प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगाची चमचम बघत मी क्षणभर  उभा राहतो. तो देखावा मला मुक्या शब्दांनी म्हणतो, ‘‘नमस्ते!’’ मी उलट म्हणतो, ‘‘नमस्ते!’’ 

मग मी, गरम पाण्यात पडून  वाट पाहणारा ब्रश उचलतो, साबणाच्या कांडीवर घासतो आणि गालांवर, हनुवटीवर, गळ्यावर साबणाच्या फेसाचा जाड  थर माखवायला प्रारंभ करतो! आणि त्याच क्षणी नवे विचार, नव्या कल्पना माझ्या मनात कारंज्याच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात!... माझ्या  लेखनातल्या कितीतरी गोष्टींचा जन्म अशा प्रकारे दाढी करण्याच्या वेळी झालेला आहे. या वेळीच माझ्या विचारांना का भरती यावी ते मला सांगता येणार नाही. ते एक मला अजून न उकललेलं गूढ आहे. कदाचित असं असेल की दाढी  करण्याच्या वेळी माझ्याजवळ कोणी नसतं, असलेलं मला आवडतही नाही आणि या वेळी मिळणारा एकांत इतर सर्व

वेळच्या एकांताहून निराळ्या स्वरूपाचा असतो. कदाचित हेही कारण असेल, की साबणाचा सुगंधी, शुभ्र, गुदगुल्या  करणारा फेस तोंडावर फासताना व नंतर वस्तऱ्याच्या पात्यानं तो काढताना विचार करण्याचा माझा मुळीच हेतू नसतो आणि म्हणूनच नाना विचार माझ्या मनात येतात, कारण कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी लहरी आहे. तिची आराधना करण्यासाठी  तिच्यापुढे गुडघे टेकले, की ती रुसून दूर होते. उलट तिची पर्वा न करता पाठ फिरवली, की ती मागे लागते. इतर वेळी मी  मुद्दाम विचार करण्याचा प्रयत्न करतो. 

मला काही सुचत नाही. दाढी करायच्या वेळेस मी विचारांच्या प्रयत्नात मुळीच  नसतो. मनावर विलक्षण प्रसन्नता आलेली असते. कल्पना सुचतात... पण हे सारे माझे तर्क आहेत! खरं म्हणजे दाढी  करण्याच्या वेळेस कल्पना उचंबळून का यावी हे माझं मलाच सांगता येत नाही. माझा एक अनुभव तुम्हांला सांगितला. तो  तुम्हांला पटला नाही तर सोडून द्या. मात्र पटावा म्हणून एवढंच सांगतो, की हा  छोटासा लेखसुद्धा दाढी करता करताच  मला सुचला व मी लेखनिकाला सांगितला.

काळे केस स्वाध्याय - काळे केस इयत्ता दहावी | Kale kes svaadhyaay [ 10th कृती स्वाध्याय व स्थूलवाचन ] 

 विद्यार्थी मित्रांनो आपल्यालाही ब्लॉग पोस्ट कशी वाटली काळे केस स्वाध्याय कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन ब्लॉग पोस्ट साठी निर्मळ अकॅडमी ला फॉलो करा तसेच मित्रांना देखील हि लिंक शेअर करा जेणेकरून त्यांच्या अभ्यासासाठी देखील मदत होईल आम्ही तुमच्या कमेंट वाचत आहे तरी तुम्हाला इयत्ता दहावी विषयी कोणत्याही प्रकारचा अडचणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही लवकरात लवकर त्या अडचणीं विषयी ब्लॉग पोस्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करू

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post