सोनाली स्वाध्याय मराठी - Sonali Svaadhyaay Marathi [ 10th कृती स्वाध्याय व स्वमत ]

सोनाली स्वाध्याय मराठी - Sonali Svaadhyaay Marathi [ 10th कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ] 

सोनाली स्वाध्याय मराठी - Sonali Svaadhyaay Marathi [ 10th कृती स्वाध्याय व स्वमत ]

आकृती पूर्ण करा.

कृती | Q (१) (अ) | Page 71
1) लेखकाने निवडलेल्या पिलाची वैशिष्ट्ये :
SOLUTION
(१) जन्म होऊन दोन महिने झाले होते
(२) इतर पिल्लांपेक्षा सशक्त
(३) कमी फिसकारणारे व शांत स्वभावाचे

2) सोनाली आणि रूपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती :
SOLUTION
(१) दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत.
(२) थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत.
(३) रूपाली ‘फुल्ल' करून अंग टाकी व झोपी जाई.
(४) सोनालीला लगेच झोप येत नसे. तिला लहान मुलासारखे थोपटावे लागे. मगच ती झोपी जाई

तुलना करा.

कृती | Q (२) | Page 71
सोनालीरूपाली
____________
____________
____________
____________

SOLUTION

सोनाली

रूपाली

(१) रूपालीपेक्षा ७ दिवसांनी लहान. दिसायला लहानखुरी.

(१) वयाने सोनालीपेक्षा मोठी, सुरुवातीला अंगापिंडाने सुद्धा मोठी.

(२) रूपाली गुरगुरली की सोनाली बापडी होऊन कोपऱ्यात बसे.

(२) सोनालीवर ताईगिरी करायची. सोनालीवर गुरगुरायची. तिला दमात घ्यायची.

(३) वय वाढल्यावर रूपालीच्या दुप्पट-चौपट वाढली.

(३) वय वाढल्यावर लहानखुरीच राहिली.

(४) रूपालीला सहज तोंडात उचलून धरी. पण रूपालीला तिचे दात लागत नसत.

(४) रूपालीने तरीही आपला ताईपणा सोडला नाही. गुरगुरून सोनालीला दटावीत असे.


खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा.

कृती | Q (३) (अ) | Page 71

1) सोनालीचे दात कधी रूपालीला लागले नाहीत - ______ 
SOLUTION
सोनालीचे दात कधी रूपालीला लागले नाहीत - सोनाली प्रेमळ होती. 

2) रूपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी - ______
SOLUTION
रूपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी - सोनाली रुपालीवर जिवलग मैत्रिणीसारखे प्रेम करीत होती. 

3) सोनालीने एक मोठ्ठी डरकाळी फोडली - ______ 
SOLUTION
सोनालीने एक मोठ्ठी डरकाळी फोडली - जेवणाच्या वेळी फसवले तर सोनालीला खूप राग येत असे. 

4) सोनालीने एक मोठ्ठी डरकाळी फोडली - ______ 
SOLUTION
सोनालीने एक मोठ्ठी डरकाळी फोडली - जेवणाच्या वेळी फसवले तर सोनालीला खूप राग येत असे. 

5) सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली - ______ 
SOLUTION
सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली - झालेल्या चुकीबद्दल माफी मागण्याची सोनालीची वृत्ती होती. 

6) सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती - ______ 
SOLUTION
सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती - आपल्या माणसांपासून आपण दूर जात आहोत, याचे सोनालीला दुःख होते.

पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा.

कृती | Q (४) | Page 71

घटनाघटना केव्हा घडली
(अ) सोनाली अण्णांवर रागावली.______
(आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली.______
(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली.______
(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली.______

SOLUTION

घटना

केव्हा घडली?

(अ) सोनाली अण्णांवर रागावली.

(१) जेवणाचा डबा न घेताच अण्णा गच्चीत सोनालीकडे गेले, तेव्हा.

(आ) सोनालीने पातेल्याची चाळणी केली.

(२) सोनालीला दूध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले, तेव्हा.

(इ) सोनाली गृहस्थाच्या अंगावर धावली.

(३) त्या गृहस्थांनी दीपालीला उचलून घेतले, तेव्हा.

(ई) सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली.

(४) ती एकटीच पिंजऱ्यात अडकून पडली, तेव्हा.


कृती | Q (५) | Page 71
1) सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी लिहा.
____________
____________
SOLUTION
सोनाली आणि रूपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या दोन सवयी
(१) सोनाली व रूपाली एकत्र फिरत, एकत्र झोपत.
(२) एकत्र जेवण घेत.

खालील वाक्प्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कृती | Q (६) (अ) | Page 71
1) डोळे विस्फारून बघणे - ______ 
SOLUTION
डोळे विस्फारून बघणे -
अर्थ - डोळे मोठे करून आश्चर्याने बघणे.
वाक्य - भर उन्हात पावसाची सर आली, तेव्हा रमेश त्या दृश्याकडे डोळे विस्फारून बघू लागला.

2) लळा लागणे - ______ 
SOLUTION
लळा लावणे -
अर्थ - प्रेम वाटणे, माया लावणे.
वाक्य - सखू मावशीने त्या अनाथ मुलाला भारी लळा लावला.

3) तुटून पडणे - ______ 
SOLUTION
तुटून पडणे -
अर्थ - त्वेषाने हल्ला करणे.
वाक्य - त्या अनोळखी कुत्र्यावर गल्लीतील कुत्री तुटून पडली.

4) तावडीत सापडणे - ______ 
SOLUTION
तावडीत सापडणे -
अर्थ - कचाट्यात पडणे.
वाक्य - दूध चोरून पिणारा बोका एकदा आईच्या तावडीत सापडला.

स्वमत.

कृती | Q (७) (अ) | Page 72
1) सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
SOLUTION
एकदा दीपाली सोनालीबरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशन्ट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दीपाली चुकून सिंहिणीकडे गेली असावी, या कल्पनेने तो धावला आणि त्याने दीपालीला चटकन उचलून घेतले. एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर फिसकारली आणि चवताळून त्याच्यावर लावली. तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकली. तेवढ्यात अण्णा बाहेर आले. त्यांना घडलेली हकिकत समजली. तो प्रसंग प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णांनी त्या गृहस्थाला दीपालीला उचलायला सांगितले. त्या गृहस्थाने दीपालीला हात लावला, मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली. लेखकांचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते. घरातली माणसे ही आता तिची माणसे झाली होती. परक्या माणसांनी घरातल्या माणसांना हातसुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते. सोनालीच्या मनातली प्रेमाची ही उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होते.

2) पशूंना कोणी फसवलं, तर त्यांना राग येतो’, यासंबंधी तुम्ही अनुभवलेली एखादी घटना तुमच्या शब्दांत सांगा.
SOLUTION
आम्ही एकदा पारंब्यांना लोंबकळत खेळत होतो. निरंजनने बिस्किटे आणली होती. ती आम्ही वरच्या वर एकमेकांकडे फेकत आणि झेलत होतो. झोके घेता घेता झेल घेणे खूप कौशल्याचे होते. आम्ही बिस्किटे खात होतो. एखादे खाली पडत होते. आमच्या सोबत कुत्रा ते पडलेले बिस्कीट खाई. ते पाहून निरंजनला लहर आली. तो खाली उतरला. त्याने एक बिस्कीट दूर फेकले. दूरवर जाऊन त्या कुत्र्याने ते खाल्ले. नंतर नंतर निरंजन बिस्किटे फेकण्याची बतावणी करू लागला. बिचारा कुत्रा धावत जाई पण त्याला काही मिळत नसे. तो रागाने गुरगुर करीत होता. निरंजनने पातळसा दगड घेऊन बिस्कीट म्हणून फेकला. कुत्रा मोठ्या आशेने तिकडे धावला. पण बिस्कीट नाही, हे कळताच तो चवताळला. संतापाने निरंजनकडे धावला. निरंजन घाबरून पारंबीवर चढला. सरसर वर चढू लागला. चवताळलेला कुत्रा तिथे आलाच. त्याने झेप घेतली आणि निरंजनला पकडले. पण निरंजनची पॅन्ट फक्त त्याच्या तोंडात आली. पॅन्ट टर्र्र करून फाटली. आम्ही सगळे स्तब्ध होऊन बघतच राहिलो.

खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

भाषाभ्यास | Q (१) (अ) | Page 72

1) ती दोघे बहीणभाऊ आहेत - ______ 
SOLUTION
ती दोघे बहीणभाऊ आहेत - बहीणभाऊ 

2) खरेखोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये - ______
SOLUTION
खरेखोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये - खरेखोटे 

3) कष्टाची मीठभाकर आयत्या पक्वानापेक्षा गोड लागते - ______ 
SOLUTION
कष्टाची मीठभाकर आयत्या पक्वानापेक्षा गोड लागते - मीठभाकर 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

भाषाभ्यास | Q (२) (अ) | Page 72

1) आईवडील - ______ 
SOLUTION
आईवडील - आई आणि वडील.

2) नाकडोळे - ______ 
SOLUTION
नाकडोळे - नाक आणि डोळे 

3) सुंठसाखर - ______ 
SOLUTION
सुंठसाखर - सुंठ आणि साखर 

4) कृष्णार्जुन - ______ 
SOLUTION
कृष्णार्जुन - कृष्ण आणि अर्जुन 

5) विटीदांडू - ______
SOLUTION
विटीदांडू - विटी आणि दांडू

खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

भाषाभ्यास | Q (१) (अ) | Page 72

1) बरेवाईट प्रसंग सगळ्यांच्याच जीवनात येतात - ______ 
SOLUTION
बरेवाईट प्रसंग सगळ्यांच्याच जीवनात येतात - बरेवाईट

2) कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा - ______ 
SOLUTION
कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्यासत्याचा विचार करावा - सत्यासत्य

3) सभेला चारपाच माणसेच उपस्थित होती - ______ 
SOLUTION
सभेला चारपाच माणसेच उपस्थित होती - चारपाच

4) कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो - ______ 
SOLUTION
कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो - भाजीपाला 

5) गरिबास कपडालत्ता द्यावा, अन्नपाणी द्यावे - ______ ______
SOLUTION
गरिबास कपडालत्ता द्यावा, अन्नपाणी द्यावे - कपडालत्ता, अन्नपाणी

तक्ता पूर्ण करा.

भाषाभ्यास | Q (५) | Page 73
सामासिक शब्द  विग्रहसमासाचे नाव
पालापाचोळा____________
केरकचरा____________
तीनचार____________
खरेखोटे____________
कुलूपकिल्ली____________
स्त्रीपुरुष____________

SOLUTION

सामासिक शब्द  विग्रहसमासाचे नाव
पालापाचोळापाला, पाचोळा वैगेरेसमाहार द्वंद्‌व
केरकचराकेर, कचरा वैगेरेसमाहार द्वंद्‌व 
तीनचारतीन किंवा चारवैकल्पिक द्वंद्‌व
खरेखोटेखरे किंवा खोटेवैकल्पिक द्वंद्‌व
कुलूपकिल्लीकुलूप किंवा किल्लीइतरेतर द्वंद्‌व
स्त्रीपुरुषस्त्री किंवा पुरुषइतरेतर द्वंद्‌व


सोनाली स्वाध्याय मराठी - Sonali Svaadhyaay Marathi [ 10th कृती स्वाध्याय व काव्यसौंदर्य ] 

डॉ. वा. ग. पूर्णपात्रे(जन्म-१९२०) :
प्रसिद्ध लेखक. त्यांचे वन्यप्राण्यांविषयीचे ‘सोनाली’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्राणीजगत् हा सर्वांच्याच कुतूहलाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. लहानपणापासून पाळीव प्राणी व जंगली प्राणी या दोघांबद्दलही आपल्याला आकर्षण असते. पाळीव प्राणी व हिंस्र प्राणी  यामध्ये भेद आहेतच; परंतु जंगली प्राण्यांच्या हिंस्रपणाबाबत लहानपणापासून आपल्या मनात एक प्रकारची भीती व गैरसमज असताे.  सोनाली हा पाठ सिंह या हिंस्र श्वापदामध्येही माणसावर प्रेम करण्याची वृत्ती असू शकते याचे सत्य उदाहरण आहे. हिंस्र श्वापदाला घरात  पाळणे, नैसर्गिक वातावरणापासून त्याला दूर ठेवणे हे योग्य नाही; परंतु हिंस्र श्वापदातील पशुत्वावर प्रेमाने मात करता येऊ शकते. खरे  म्हणजे मानवामध्ये सुद्धा प्रेम व संतापी वृत्ती अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. आपल्यातील नकारात्मक प्रवृत्तींवरही मनुष्य मात करू शकतो याचाही हा वस्तुपाठ आहे. सोनाली हा सत्यकथेवर आधारित असलेला संवेदनशील पाठ माणसातील पशुत्व, वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात, ही प्रेरणा देणारा आहे. माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे असा संदेश या पाठातून मिळतो.

सोनाली - Sonali 

३१ मार्च १९७४, सोमवारचा दिवस. आमच्या साऱ्या घरात आज सुतकी वातावरण होतं. आमच्या लाडक्या  सोनालीचा आज आमच्या घरातला शेवटचा दिवस. आज सोनाली पुण्याला जाणार होती. आपल्या कायमच्या घरी.  तिथल्या पेशवे उद्यानात यापुढे तिचं कायम वास्तव्य राहणार होतं. आज मी स्वत: सोनालीला घेऊन पुण्याला निघालो  होतो. गाडी पुढे चालली होती; पण मी मात्र मनानं भूतकाळात शिरलो होतो. अजून तो दिवस आठवतोय मला. २९ ऑगस्ट, १९७३. वेळ सायंकाळची. डॉ. चित्रेयांनी छोटासा पिंजरा तयार  करूनच ठेवला होता. त्या तीन पिलांना त्यांनी मादीपासून दूर केलं आणि म्हणाले, ‘‘हो, डॉक्टर, सांगा तुमचा चॉइस.’’  तिन्ही बछड्यांना जन्मून दोन महिने झाले होते. मी तिन्ही पिल्लांना गोंजारलं; पण सगळीच फिसकन अंगावर आली. 

मी  त्यातल्या त्यात कमी फिसकारणारं, थोड्या शांत स्वभावाचं एक पिल्लूनिवडलं. ते इतरांपेक्षा थोडं सशक्तही होतं.  बच्च्याला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं. रात्रभर प्रवासात माझ्या मनात त्या छाव्याशिवाय दुसरा कशाचाच विचार नव्हता. दोन  वर्षांचे झाले, की वाघ-सिंह पूर्ण ताकदीचे होतात. मग त्यांना शिकवणं, माणसाळवणं अवघड असतं. पुन्हा माझ्या  डोळ्यांसमोर नुसतं सर्कशीसारखं वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता. मला एका जंगली जनावरावर प्रेम करायचं होतं.  अगदी पोटच्या मुलासारखं. ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो. तिला जवळ घेतल्याखेरीज मी झोपणार नव्हतो.  आजपर्यंत पूर्णपात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी शिकारी करून कीर्ती मिळवली होती; पण पशूमधील पशुत्वाची आज  मी शिकार करायला निघालो होतो. आम्ही घरात प्रवेश केला. 

पहिला दिवस तसाच गेला. या सिंहकन्येचं आगमन  होण्यापूर्वी पंधरा दिवस ‘रूपाली’चं आगमन झालं होतं. कापसासारखे शुभ्र पांढरे केस असलेली दीड महिन्यांची ही कुत्री आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली होती. तिचे ते रुपेरी केस पाहून आम्ही तिचं नाव ‘रूपाली’ ठेवलं होतं. माझा मुलगा डॉ. सुभाष याला पहिली मुलगी झाली. घरात दीप आला, म्हणून आत्यानं, म्हणजेच सुचेतानं सुचवलेलं ‘दीपाली’ नाव  ठेवलं. म्हणजे एकाच ऑगस्ट महिन्यात (१९७३) आमच्या संगम बंगल्यात ‘रूपाली’ आली, नात ‘दीपाली’ आली आणि आता सिंहकन्याही आली होती. असा हा मनोहर त्रिवेणी संगम इथं झाला होता. काय बरं या छाव्याचं नाव ठेवावं?  सोन्यासारखे केस असलेली सुवर्णकांतीची ती मादी कोचावर बसली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवतानाएकदम मला नाव सुचलं- ‘सोनाली’. सुरुवातीला रूपालीचं आणि सोनालीचं मुळीच पटेना. रूपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनालीही फिसकून  अंगावर जायची. 

तीन चार दिवस हा प्रकार चालू होता; पण चार दिवसानंतर दोघींचीही गट्टी जमली. मग एकत्र बसणं,  झोपणं सुरू झालं. हिंडताना रूपाली पुढे व सोनाली मागे. रूपाली सीनियर असल्यामुळे तो मान तिचाच होता. पुढे तर  दोघींना एकमेकींचा इतका लळा लागला, की त्यांचं जेवणही एकत्र होऊ लागलं आणि रूपालीप्रमाणे सोनालीही  माझ्याजवळ माझ्या पायथ्याशी झोपू लागली. झोपायची वेळ झाली, की सोनाली उडी मारून बिछान्यात शिरे; पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता.  बिछान्यात आली, की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे. पंजानं माझे केस विस्कटून टाकी. 

कधी ती अन्रूपाली  यांची दंगामस्ती माझ्याच बिछान्यात चालायची. दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत, थकल्या-दमल्या, की दोघीही  आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रूपा अंग टाकी आणि झोपी जाई; पण सोनालीला मात्र अशी झोप  येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपवावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपे तीही एखाद्या लहान  मुलासारखी अस्ताव्यस्त. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्ये मलाच झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. सोनाली आणि रूपाली लहान होत्या तोपर्यंत रूपालीच अंगापिंडानं मोठी होती. वयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली  सात दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करी. सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब. 

 रूपाली तिच्यावर गुरगुरली, की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं. रूपाली लहानखुरी राहिली आणि सोना बघता बघता तिच्या  दुप्पट-चौपट झाली. ती रूपालीला सहज तोंडात उचलून धरी; पण सोनालीचे दात कधी रूपालीला लागले नाहीत.  रूपालीने मात्र आपला ताईपणा शेवटपर्यंत सोडला नाही. सोनाली फार वाह्यातपणा करू लागली, की रूपाली गुर्र करून  दटावीत असे. मुंबईहून दोघींसाठी गळपट्टे व साखळ्या आणल्या. लहानपणापासून जर त्यांना साखळीची सवय लावली नाही; तर  मोठेपणी ही जनावरं साखळी घालू देत नाहीत. घराच्या गच्चीवर सोनालीचं बिऱ्हाड थाटलं. 

गच्चीवर मी नेहमी दोघींना मोकळं ठेवत असे. पुढे गच्चीवर सोनाली आणि रूपाली मोकळेपणानं खेळू लागल्या,  एकमेकींचा पाठलाग करू लागल्या. माझ्या पायांतून पळू लागल्या; पण सिंहकन्या, एक श्वानकन्या आणि एक डॉक्टर  कन्या असा हा अवर्णनीय सामना. मला त्या वेळी कोणत्याच गोष्टींचे भान राहत नसे. एक विलक्षण अवर्णनीय आनंद मी  लुटत असे, अगदी भरभरून. याच गच्चीवर त्या दोघी पहिल्या पावसाळ्यात नाचल्या होत्या. फारच जोराचा पाऊस आला म्हणजे मात्र सज्जाचा आडोसा त्या घेत. एरवी साऱ्या गच्चीवर पावसात हुंदडत. जळगावला बॅडमिंटन टूर्नामेंटस्होत्या. सोनालीला घेऊन मी कोर्टावर गेलो. तिथे माझे मित्र डॉ. आठवले आपल्या  अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले होते. चांगला उंच व दांडगा कुत्रा होता तो.

 त्याची व सोनालीची गाठ पडली. आधी त्या  कुत्र्याला हे मांजराचं पिल्लू आहे असं वाटलं असावं. तो तिच्या अंगावर धावला. सोनाली त्याच्यापुढे फारच लहान दिसत  होती; पण किंचितही न घाबरता ‘‘फिस्’’ करून ती त्याच्या अंगावर धावली, मग मात्र तो अल्सेशियन कुत्रा पळू लागला व सोनाली त्याचा पाठलाग करू लागली. कोर्टावरील साऱ्या खेळाडूंना हा प्रकार पाहून मजा वाटली. रूपालीच्यापेक्षा सोनालीची वाढ एकदम झपाट्याने झाली. ती चांगलीच मोठी िदसू लागली. वाढत्या वयाप्रमाणे  सोनालीच्या आहारातही मी वाढ केली. आता सोनाली पाच महिन्यांची झाली होती. सोनालीचं जेवण तीनदा होत असे. सकाळी नाश्ता. नाष्ट्यासाठी तिला दूध व अंडी देत होतो. दुपारी जेवताना मी  तिला खिमा देत असे. रात्री मात्र सोनाली शुद्ध शाकाहारी जेवण घेत असे. दूधपोळी, नाहीतर दूधभाताचं आणि त्यासाठी  मग ती आमच्या गंगूबाई स्वयंपाकिणीशी लाडीगोडी लावी. 

जेवायची वेळ झाली, की ती स्वयंपाकघरात जाई आणि स्वयंपाकीणबाईच्या पायांत घोटाळत राही. त्यांच्याभोवती फिरत राही. तोंडानं लाडिक ‘‘आव आव’’ करत त्यांच्याकडे  जेवणाची मागणी करी; पण तिचं जेवण ताटलीत टाकलं, की ती गुरगुरायला लागे. ताटली खाली ठेवली, की ताटलीवर  तुटून पडे. जिभेनं ताटली चाटून पुसून साफ करून होईपर्यंत तोंडानं तिची गुरगुर चालूच राही. दूधपोळी नि दूधभात खाणारी  जगातली ती एकमेव सिंहीण असावी. तिला व रूपालीला मी मोटारीतून बाहेर फिरायला नेऊ लागलो. दोघींची मोटारीतून बसायची जागाही पक्की ठरलेली.  ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची जागा. जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोघी खिडकीतून टक लावून पाहत राहत. दोघींचे पुढील पंजे दाराच्या बाहेर ऐटीत टाकलेले असत. बैलगाड्या, टांगे, गुरं यांकडे ही जोडी डोळे विस्फारून पाहत असे.  आता सोनाली वर्षाची झाली होती. तिची उंची वाढली होती. अंगात ताकद आली होती. साखळी लावल्यानंतर  आम्ही तिला न्यायच्याऐवजी तीच आम्हांला ओढू लागली होती. आता ती पूर्ण आहार घेत असे. रोज साडेतीन किलो  मटण तिला लागत असे. 

रात्री एक लिटर दूध आणि चार पोळ्या आम्ही तिला देत असू. फार आवडीने ती त्या खायची.  अर्थात प्रत्येक वेळी तिला बरोबर रूपाली लागत असे. रूपाली नसली तर सोनाली जाळीच्या दरवाजावर पंजे मारत असे.  मी तिला माझ्या हातानं खायला देत असे.  दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठं जावं लागेल याचा नेम नसे. मग माझ्या अनुपस्थितीत अण्णांकडे किंवा गड्याकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था असे. तशी सवय करणं आवश्यक होतं. अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊ घालत. कधीकधी गच्चीच्या कठड्यात  असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत. असं करून त्यांचा विश्वास वाढला आणि स्वत: हातानं तिला खाऊ  घालावं असं त्यांनी ठरवलं; पण एकदा त्यांना विचित्र अनुभव आला. त्या दिवशी दवाखान्यात मला काम होतं. सोनालीला जेवू घालण्याचं काम मी अण्णांकडे सोपवलं. 

जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजाजवळ आले.  डबा दरवाजाजवळ हॉलमध्ये ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनालीकडे गेले. दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला.  गच्चीवर गेल्याबरोबर सोनाली त्यांच्या मागे मागे गेली. तिला वाटलं त्यांनी जेवणाचा डबा आणला आहे; परंतु त्यांच्याजवळ  खाणं नाही हे लक्षात येताच सोनाली परत दरवाजाकडे धावत गेली.  सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली; पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थ कळला नाही. तिला उद्देशून ते  म्हणाले, ‘‘सोना, थांब मी डबा आणतो, बाजूला हो.’’ असं ते दरवाजापाशी जाताच सोनालीने एक मोठी डरकाळी  फोडली.  सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली. काय झालं आहे ते कोणालाच कळेना. मी हातातलं काम  टाकून दरवाजाजवळ धावत गेलो. तोच ‘‘शांताराम धाव’’ अशी अण्णांची हाक ऐकू आली. मी प्रत्यक्ष तेथे पोहोचलो तेव्हा अण्णा सोनालीला ‘‘चूप राहा’’ असं सांगत होते. 

मी पाहिलं, तर सोनालीचा आवेश फारच भयंकर होता. मी घाईघाईनं लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला व जेवणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला; परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी  रागावलेली होती, की तिनं उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला. मटण गच्चीवर इतस्तत:  पसरलं. ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. पंधरा-वीस मिनिटांत तिनं सर्व फस्त केलं. खाल्ल्यावर सोनाली शांत झाली  आणि येऊन माझे पाय चाटू लागली. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. अण्णांना मी म्हणालो, ‘‘जेवताना पशूंना कोणी फसवलं, त्यांची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी लागला तरी ते त्यांना सहन होत नाही.’’ सोनालीच्या दातांत विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध  प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध  पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली. 

रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी  गच्चीवर गेलो. पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरश: चाळणी केली होती. वन्यपशूंच्या दातांत केवढी  ताकद व चिवटपणा असतो. याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे. सोनाली आता आमच्या घरच्यापैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रूपालीवर जीव तसा दीपालीवरही होता.  दीपाली सोनालीच्या जाळीपाशी जायची व आपल्या बोबड्या आवाजात ‘‘छोना, छोना तू काय कत्ते?’’ असं म्हणून  तासन्तास तिच्याशी खेळत असायची. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथं आला, त्याला वाटलं पोर चुकून  सिंहिणीपाशी आली. त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं. त्यासरशी सोनाली मोठ्याने फिसकारली व त्या गृहस्थाच्या

अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं.  आतल्या बाजूला अण्णा होते. सोनालीचा आवाज एेकून अण्णा स्वयंपाकघरातून बाहेर आले व म्हणाले, ‘‘काय रे,  काय झालं?’’ ‘‘दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहे,’’ त्यानं अण्णांना सर्व प्रकार सांगितला. ‘‘तू पुन्हा दीपालीला उचल, मी पाहतो.’’ अण्णा म्हणाले. पुन्हा तो गृहस्थ गेला. दीपाली जाळीपाशीच होती. त्यानं  पुन्हा दीपालीला हात लावताच सोनाली पुन्हा पहिल्यासारखीच चवताळून या गृहस्थाच्या अंगावर धावली. अण्णांनी मग सोनालीला शांत केलं. दीपाली ही आपल्या घरची आहे आणि  तला कोणी इतरांनी उचलता कामा नये,  ही मोठी जाणीव सोनालीला झाली होती. अण्णांनी एका हातात दीपालीला घेतलं व दुसऱ्या हातानं प्रेमळपणे सोनालीला थोपटलं. आम्ही येणार, सोनालीला घेऊन येणार ही बातमी पुण्याच्या पेरपरमध्ये आली होती. 

आमची वाट पाहत शेकडो  पुणेकरांनी आधीच ‘कॅफे गुडलक’च्या चौकात गर्दी केली होती. येणारा जाणारा विचारे, ‘‘काय हो, कोण येणार आहे?’’ मग फूटपाथवरील एखादा तरुण सांगू लागे, ‘‘अहो, मोटारीतून सिंहीण येणार आहे.’’ ‘‘उघड्या मोटारीतून?’’ ‘‘मग, आम्ही काय खोटं सांगतोय काय?’’ पाहता पाहता गर्दी वाढू लागली. सोनाली आली. गर्दीत एकच उत्साहाची लाट आली. प्रत्येकजण सोनालीला पाहण्यासाठी धडपडत होता. मान उंच  करून, टाचा वर करून लोक पाहत होते; पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनालीला व रूपालीला आवारातच  साखळ्यांनी बांधून ठेवलं. दोघींना खूप तहान लागली होती, म्हणून बरोबर आणलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं.  जमलेल्या बघ्यांपैकी कुणी अंडे आणलं, कुणी दूध आणलं होतं. वेळ रात्रीची होती. मी अतिशय थकलो होतो; पण मला झोप येईना. उठल्या उठल्या मी कमिशनरना फोन केला. ‘‘सोनाली आली आहे’’ म्हणून सांगितलं. पेशवे बाग. शेवटचा टप्पा. तिथेही स्त्री-पुरुष, लहान मुलं यांची गर्दी. महापौरांनी सोनालीचा औपचारिक स्वीकार  केला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 

आता तिला आतल्या पिंजऱ्यात सोडायचं होतं, म्हणून सोनालीच्या  गळ्याभोवती असलेला माझा पट्टा व साखळी मी सोडली. माझी सोनालीवरची प्रेमाची मालकी संपली. अण्णा कसेबसे  अश्रू आवरून धरत होते. दु:खाचा एकेक कढ आवंढ्याबरोबर मी गिळत होतो. सारेच अधिकारी व प्रेक्षक स्तब्ध होते.  काय बोलावं तेच मला समजेना. सोना आतल्या पिंजऱ्यात जायला तयार नव्हती. मी आत गेलो, की ती आतल्या  पिंजऱ्यात येई. मी बाहेर आलो, की ती बाहेर येई. आता फसवायचं होतं. फसवूनच तिला आत कोंडणं शक्य होतं, म्हणून  रूपालीला मी प्रथम आतल्या पिंजऱ्यात पाठवली. तिच्या पाठोपाठ सोनाली पिंजऱ्यात गेली. मी दरवाजा बंद केला, मग  पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडून रूपालीला बाहेर ओढलं व चटकन दरवाजा लावला. सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली. मुकेपणानं प्रेम करणारी रूपाली पिंजऱ्यासमोर उभी राहून डोळे भरून तिच्याकडे  पाहत होती. रूपाली बाहेर, मी बाहेर, अण्णा बाहेर. सोनाली अाळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. ते गज, ती  कडीकुलपं...सोनाली बिथरली. गरगरा फिरू लागली. मोठ्याने ओरडू लागली. पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपडू लागली. जड अंत:करणाने मी पिंजऱ्याकडे पाठ फिरवली आणि मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो.

अनुक्रमणिका  INDIEX

पाठ कविता स्वाध्याय LINK
01: जय जय हे भारत देशा (गीत) Click Now
02: बोलतो मराठी… Click Now
03: आजी : कुटुंबाचं आगळ Click Now
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) Click Now
05: वसंतहृदय चैत्र Click Now
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) Click Now
07: वस्तू (कविता) Click Now
08: गवताचे पाते Click Now
09: वाट पाहताना Click Now
10: आश्वासक चित्र (कविता) Click Now
11: आप्पांचे पत्र Click Now
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) Click Now
13: गोष्ट अरुणिमाची Click Now
14: भरतवाक्य (कविता) Click Now
15: कर्ते सुधारक कर्वे Click Now
16: काळे केस Click Now
17: खोद आणखी थोडेसे (कविता) Click Now
18: वीरांगना (स्थूलवाचन) Click Now
19: आकाशी झेप घे रे (कविता) Click Now
20: सोनाली Click Now
21: निर्णय Click Now
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) Click Now
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी Click Now
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) Click Now

 10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download

Post a Comment

Thanks for Comment

Previous Post Next Post