आकाशी झेप घे रे स्वाध्याय - Aakashi Zep Ghe Re [10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
योग्य पर्याय ओळखा.
1) सुखलोलुप झाली काया म्हणजे ______
OPTIONS
सुखाचा तिरस्कार वाटतो.
सुखाबद्दल प्रेम वाटते.
सुखाचे आकर्षण वाटते.
सुख उपभोगण्याची सवय लागते.
SOLUTION
सुखलोलुप झाली काया म्हणजे सुख उपभोगण्याची सवय लागते.
2) पिंजरा सोडून झेप घेतल्याने ______
OPTIONS
काया सुखलोलुप होते.
पाखराला आनंद होतो.
आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
आकाशाची प्राप्ती हाेते.
SOLUTION
पिंजरा सोडून झेप घेतल्याने आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते.
तुलना करा.
कृती | Q (२) | Page 66
पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
______ | ______ |
______ | ______ |
______ | ______ |
SOLUTION
पिंजऱ्यातील पोपट | पिंजऱ्याबाहेरील पोपट |
(१) पारतंत्र्यात राहतो | (१) स्वातंत्र्य उपभोगतो |
(२) लौकिक सुखात रमतो | (२) स्वबळाने संचार करतो |
(३) कष्टाविण राहतो | (३) कष्टात आनंद घेतो |
(४) जीव कावराबावरा होतो | (४) सुंदर जीवन जगतो |
(५) मनात खंत करतो | (५) मन प्रफुल्लित होते |
आकाशी झेप घे रे स्वाध्याय - Aakashi Zep Ghe Re
कृती | Q (३) | Page 66
1) पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील (आकाशी झेप घे रे) ओळी शोधून लिहा
SOLUTION
तुज पंख दिले
देवाने कर विहार सामर्थ्याने
2) कवीने (आकाशी झेप घे रे) यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.
____________
____________
SOLUTION
१) तुला देवाने पंख दिले आहेत.
२) सामर्थ्याने विहार कर.
३) कष्टाविण फळ मिळत नाही.
3) कवीने (आकाशी झेप घे रे) यशप्राप्तीच्या संदर्भांत सांगितलेली सुवचने लिहा.
____________
____________
SOLUTION
१) तुला देवाने पंख दिले आहेत.
२) सामर्थ्याने विहार कर.
३) कष्टाविण फळ मिळत नाही.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
कृती | Q (५) (अ) | Page 66
1) आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा’, या ओळीतील मथितार्थ स्पष्ट करा.
SOLUTION
'आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसांच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केला आहे व स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितले आहे.
प्रस्तुत ओळीतील मथितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जिवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुखसोईमुळे कर्तृत्व थांबते. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशात तू झेप घे. अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळीतून प्रत्ययाला येते.
कृती | Q (५) (इ) | Page 66
2) ‘स्वसामर्थ्याची जाणीव’ हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे, हे विधान स्पष्ट करा.
SOLUTION
जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. समस्यांचा सामना करता करता कधी माणूस हतबल होऊन जातो. मग तो देवावर हवाला ठेवू लागतो. नशिबाला दोष देतो. पण हे असे वागणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याचा माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे।' अशी समर्थ रामदासांची उक्ती आहे. त्याप्रमाणे आत्मबळ एकवटणे महत्त्वाचे ठरते. स्वत:च्या सामर्थ्यावर भरवसा ठेवता आला पाहिजे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वत:च्या पोटाला चिमटा घेऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. 'रयत शिक्षण संस्था' निर्माण केली. आज त्याचा महावृक्ष झाला आहे. यावरून असे स्पष्ट होते की 'स्वसामर्थ्याची जाणीव' हा उत्तम व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया आहे.
3) घर प्रसन्नतेने नटले’, याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा.
SOLUTION
कवी जगदीश खेबुडकर यांनी 'आकाशी झेप घे रे' या कवितेमध्ये माणसाला उपदेश करताना घर प्रसन्नतेने नटायचे असेल तर श्रमदेवाची पूजा करावी लागेल व घामातून मोती फुलवावे लागतील हे समजावून सांगितले आहे. कोणतीही गोष्ट घरबसल्या मिळत नाही. 'दे रे हरी। खाटल्यावरी।' असा चमत्कार होणे शक्य नसते. घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव सांगतो मला माझ्या आईसाठी थंडीमध्ये स्वेटर विणायचे होते. मी अभ्यासाची व शाळेची वेळ सांभाळून फावल्या थोड्या वेळात दररोज एक तास काढून कष्टाने स्वेटर विणले. ते आईला देताना तिच्या डोळ्यांत जे आनंदाश्रू चमकले, तेच माझ्या कष्टाचे फळ होते. आईचा तो आनंद पाहून मला 'घर प्रसन्नतेने नटल्याचा व घामातुन मोती फुलले' या विधानाचा अर्थ कळला.
आकाशी झेप घे रे स्वाध्याय - Aakashi Zep Ghe Re [10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
जगदीश खेबुडकर (१९३२-२०११) :
प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार. पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. साधे, सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट् होत. मह ये ाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना अकरा वेळा सन्मानित करण्यात आले आहे. त्याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या, असा संदेश देतात.
रसग्रहण दहावी मराठी
1) उत्तम लक्षण (संतकाव्य) संत रामदास कवितेचे रसग्रहण
2) वस्तू कविता रसग्रहण दहावी मराठी
3) आश्वासक चित्र कविता रसग्रहण दहावी मराठी
4) भरतवाक्य कविता रसग्रहण दहावी मराठी
5) आकाशी झेप घे रे कविता रसग्रहण दहावी मराठी
आकाशी झेप घे रे
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा
आकाशी झेप घे रे स्वाध्याय - Aakashi Zep Ghe Re [10th कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: जय जय हे भारत देशा (गीत) | Click Now |
02: बोलतो मराठी… | Click Now |
03: आजी : कुटुंबाचं आगळ | Click Now |
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) | Click Now |
05: वसंतहृदय चैत्र | Click Now |
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) | Click Now |
07: वस्तू (कविता) | Click Now |
08: गवताचे पाते | Click Now |
09: वाट पाहताना | Click Now |
10: आश्वासक चित्र (कविता) | Click Now |
11: आप्पांचे पत्र | Click Now |
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | Click Now |
13: गोष्ट अरुणिमाची | Click Now |
14: भरतवाक्य (कविता) | Click Now |
15: कर्ते सुधारक कर्वे | Click Now |
16: काळे केस | Click Now |
17: खोद आणखी थोडेसे (कविता) | Click Now |
18: वीरांगना (स्थूलवाचन) | Click Now |
19: आकाशी झेप घे रे (कविता) | Click Now |
20: सोनाली | Click Now |
21: निर्णय | Click Now |
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) | Click Now |
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी | Click Now |
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) | Click Now |