दवांत आलिस भल्या पहाटीं
शुक्राच्या तोऱ्यांत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा.
अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस;
-मागे
वळुनि पाहणें विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?
लक्ष्य कुठे अन् कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!
अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मींची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!
तळहाताच्या नाजुक रेषा
कुणिं वाचाव्या, कुणीं पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन्
शुभ्र चांदण्या कुणिं गोंदाव्या!
दवांत आलिस भल्या पहाटीं
अभ्रांच्या शोभेंत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.
(मर्ढेकरांची कविता)
Also Read :
उत्तर : प्रेयसीचे आगमन व निर्गमन हे प्रत्यक्ष आहे की स्वप्नवत आहे , याचे व तिच्या सौंदर्याच्या विभ्रमांचे भावोत्कट आलेखन करणे ही ' दवांत आलीस भल्या पहाटी ' या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे . प्रेयसीच्या भेटीची आतुरता व त्यातील कातर व्याकूळता हा या प्रेमकवितेचा स्थायिभाव आहे . शुक्राच्या तेजस्वी आभेमध्ये तोऱ्यात येणारी प्रेयसी विरळ , धूसर अभ्रांच्या शोभेत स्मरणगंध मागे ठेवून निघून जाते . या दरम्यानची मानसिक घालमेल कवीने उत्कट व अनोख्या प्रतिमांमधून साकार केली आहे . अनेक गूढरम्य भावनांचे जाळे या कवितेत कवीने विणले आहे .
समकालीन प्रेमकवितेत आढळून न येणाऱ्या वेगळ्या भावरम्य प्रतिमा कवीने या कवितेत मांडल्या आहेत . ' प्रेमभावनेचे हिरवे धागे ' , ' डोळ्यांमधील डाळिंबांचा पारा ' , ' आठवणींची रांग ' , ' तांबुस नखांवरील शुभ्र चांदण्या ' , ' पावलांचा गंध ' इत्यादी भावगर्भ प्रतिमांतून प्रेमभावनेतील व्याकूळता प्रत्ययकारी रीतीने प्रकट झाली आहे . रसिकाला खिळवून ठेवणारी ही प्रतिसृष्टी केवळ अनोखी आहे . प्रेमात बुडून गेलेल्या जिवासाठी प्रेयसीचे अनोळखी वर्तन हृदयाला पीळ पाडणारे आहे . तसेच प्रेमातील हेच भागधेय आहे की काय ? प्रेमाची परिणती विरहात होते का ?
केवळ उराशी स्मृती व प्रेमगंध जपणे हीच प्रेमाची अपरिहार्यता असते का ? इत्यादी चिंतनशील आशय या कवितेतून दृग्गोचर होत राहतो . ' अनुष्टुभ ' छंदात बांधलेली ही यमकप्रधान रचना तिचा अंतर्गत नाद व लय यांमुळे रसिकाच्या ओठांत गुणगुणत राहते . त्यामुळे प्रेमातील कातरता अधोरेखित करणारी ही वा . सी . मर्डेकर यांची अनोखी प्रेमकविता मला अत्यंत प्रिय आहे .
कवी, कादंबरीकार, समीक्षक, सौंदर्यमीमांसक. भावोत्कट तरीही चिंतनशील असणारी, मानवी जीवनातील तसेच वर्तमान परिस्थितीतील अंतर्विरोधाच्या जाणिवेने निर्माण झालेली अस्वस्थता व्यक्त करणारी मर्ढेकर यांची कविता वैशिष्ट्यपूर्ण ठरली. नवीनता’ ही संकल्पना त्यांनी समीक्षेत रुजवली आणि स्वत:च्या कवितेतून तिचा प्रत्यय वाचकांना घडवला. त्यांची कविता अाविष्काराच्या दृष्टीने प्रयोगशील व क्रांतदर्शी होती. विसाव्या शतकातील भारतीय साहित्यातील एक समर्थ कवी अशी ख्याती त्यांना लाभली. ‘शिशिरागम’, ‘कांही कविता’,
‘आणखी कांही कविता’ हे कवितासंग्रह; ‘रात्रीचा दिवस’, ‘तांबडी माती’ व ‘पाणी’ या तीन कादंबऱ्या प्रसिद्ध. काव्य-कलाविषयक त्यांच्या प्रगल्भ अशा जाणिवेने मराठी कवितेचे स्वरूप अंतर्बाह्य पालटून टाकले.
मराठी काव्य क्षेत्रातील केशवसुतांच्या नंतरचे महत्त्वाचे परिवर्तन मर्ढेकरांच्या कवितेने घडवले आहे. म्हणूनच त्यांना ‘दुसरे केशवसुत’ म्हटले जाते. ‘सौंदर्य आणि साहित्य’ हे समीक्षणात्मक लेखन प्रसिद्ध. त्यांचे सौंदर्यशास्त्रविषयक लेखन त्यातील मौलिक सिद्धान्तामुळे गाजले.प्रस्तुत कविता म्हणजे प्रेयसीच्या आगमनाच्या आठवणीचे भावरम्य वर्णन आहे. पहाटेच्या संधीकाली कवीची प्रेयसीशी दृष्टिभेट झाली.
ती भेट कदाचित स्वप्नातील असेल वा प्रत्यक्षातील. त्यामुळेच भेटीचे स्वरूप धूसर होते. प्रेयसी आली तेव्हा तिने पहाटेच्या आकाशात तेजाळणाऱ्या शुक्राप्रमाणे कवीच्या मनाचे आकाश उजळून टाकले. तिचे चालण्यातले सौंदर्य, चंचल नजर यामुळे कवीची वृत्ती काहीशी उल्हसित झाली; परंतु हसूनसुद््धा ती अनोळख्यासारखी वागली. यामुळे कवीच्या मनातील व्याकूळता कायमच राहिली. प्रेमातील परस्परविरोधी भावनांचे धागे गुंफून हळव्या मन:स्थितीचे चित्रण कवीने अत्यंत तरलतेने
केले आहे.
दवांत आलिस भल्या पहाटीं कविता 11वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: जय जय हे भारत देशा (गीत) | Click Now |
02: बोलतो मराठी… | Click Now |
03: आजी : कुटुंबाचं आगळ | Click Now |
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) | Click Now |
05: वसंतहृदय चैत्र | Click Now |
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) | Click Now |
07: वस्तू (कविता) | Click Now |
08: गवताचे पाते | Click Now |
09: वाट पाहताना | Click Now |
10: आश्वासक चित्र (कविता) | Click Now |
11: आप्पांचे पत्र | Click Now |
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | Click Now |
13: गोष्ट अरुणिमाची | Click Now |
14: भरतवाक्य (कविता) | Click Now |
15: कर्ते सुधारक कर्वे | Click Now |
16: काळे केस | Click Now |
17: खोद आणखी थोडेसे (कविता) | Click Now |
18: वीरांगना (स्थूलवाचन) | Click Now |
19: आकाशी झेप घे रे (कविता) | Click Now |
20: सोनाली | Click Now |
21: निर्णय | Click Now |
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) | Click Now |
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी | Click Now |
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) | Click Now |
10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download
Tags:
मराठी कविता