स्वतंत्रतेचें स्तोत्र (काव्यानंद) 11वी मराठी
जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवति! त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ.।।
राष्ट्राचें चैतन्य मूर्त तूं नीति-संपदांची
स्वतंत्रते भगवति! श्रीमती राज्ञी तूं त्यांची
परवशतेच्या नभांत तूंची आकाशीं होशी
स्वतंत्रते भगवती! चांदणी चमचम लखलखशी
गालावरच्या कुसुमीं किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतंत्रते भगवती! तूच जी विलसतसे लाली
तूं सूर्याचें तेज उदधिचें गांभीर्यहि तूंची
स्वतंत्रते भगवती! अन्यथा ग्रहण नष्ट तेंची
मोक्ष मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती! योगिजन परब्रह्म वदती
जें जें उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तें
स्वतंत्रते भगवती! सर्वतव सहचारी होतें
हे अधम-रक्त-रंजिते । सुजन-पूजिते । श्रीस्वतंत्रते
तुजसाठिं मरण तें जनन
तुजवीण जनन तें मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमिला दृढालिंगना कधिं देशिल वरदे
स्वतंत्रते भगवति! त्वामहं यशोयुतां वंदे
स्वतंत्रतेचें स्तोत्र |
Also Read :
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (१८८३ ते १९६६) :
कवी, कादंबरीकार, आत्मचरित्रकार, नाटककार, विचारवंत, निबंधकार. लहानपणापासूनच देशभक्ती आणि स्वातंत्र्याचा ध्यास. त्यातूनच मातृभूमीच्या सेवेची प्रतिज्ञा. ‘अभिनव भारत’ या संस्थेची स्थापना. ‘माझी जन्मठेप’ हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ.
वयाच्या अकराव्या वर्षी पहिले कवितालेखन. ‘गोमांतक’, ‘कमला’, ‘महासागर’, ‘विरहोच्छ्वास’ ही खंडकाव्ये; ‘मृत्युपत्र’, ‘स्वतंत्रतेचें स्तोत्र’, ‘जगन्नाथाचा रथ’, ‘सप्तर्षी’, ‘तारकांस पाहून’ इत्यादी कविता प्रसिद्ध. तरलता, कोमल भावना, भव्यतेची ओढ, ओज, आत्मसमर्पणाचा ध्यास, तत्त्वचिंतनात्मक वृत्ती ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये.
‘भाषाशुद्धी’ व ‘लिपिशुद्धी’ या वाङ्मयीन चळवळी. क्रांतिकारकत्व, प्रखर विज्ञाननिष्ठा, जहाल भूमिका, बुद्धिवादी विचारसरणी यांमुळे सर्वच लेखन प्रभावी. त्यांच्या साहित्यातून जाज्वल्य राष्ट्रभक्तीची भावना प्रकट होते. त्यांनी मराठीच्या साहित्यवैभवात फार मोठी भर घातली.
प्रस्तुत देशभक्तीपर रचनेत कवीने स्वातंत्र्यदेवतेचे स्तोत्र गायले आहे. स्वातंत्र्य म्हणजे राष्ट्राचे चैतन्य आहे, श्वास आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी जगणे हीच देशवासीयांच्या जीवनाची सार्थकता आहे. आपली प्रत्येक कृती आणि त्या मागचा भाव हा राष्ट्रसमर्पणाचा, राष्ट्रहिताचा असावा असा संदेश कवी या कवितेतून देतात.
स्वतंत्रतेचें स्तोत्र (काव्यानंद) 11वी मराठी
कवितेचा ( गीताचा ) भावार्थ
स्वतंत्रतेचे ( मातृभूमीचे ) गौरवगीत गाताना स्वातंत्र्यवीर सावरकर हे महापवित्र , शिवाचे सदन असलेल्या , शुभदायी स्वतंत्रतादेवी , तुझा जयजयकार असो . यशाने मंडित असलेल्या स्वातंत्र्यदेवी , तुला मी वंदन करतो . ॥धृ .॥
तू राष्ट्राचे प्रकट चैतन्य आहेस . तू नीतीची संपत्ती आहेस , हे स्वातंत्र्यदेवी , तू या सर्वांची प्रज्ञावंत महाराणी आहेस . हे स्वातंत्र्यदेवता , मुळात तू चमचम करणारी लखलखीत चांदणी आहेस . पण पारतंत्र्याच्या आकाशात तू आमच्यापासून दूर झाकोळली गेली होतीस .
हे स्वतंत्रतेदेवी , जनमानसांच्या गालांवरच्या फुलांत किंवा फुलांच्या कोमल गालांवर जी उत्साहाची लाली विलसत आहे . ती तूच आहेस ! तू सूर्याचे प्रखर तेज आहेस . समुद्राची धीरगंभीरता तूच आहे . हे स्वतंत्रतेदेवी , तू नसतीस तर पारतंत्र्याचे हे अमानुष ग्रहण नष्ट झाले नसते . ( पारतंत्र्याच्या या ग्रहणात तू सूर्यासारखी तळपलीस . ) अंधाराने हे स्वतंत्रतेदेवी , वेदांतामध्ये वर्णिलेली आणि योगिजनांनी मान्य केलेली मोक्ष व मुक्ती यांची मूर्त रूपे तूच आहेस .
या सृष्टीत उत्तम , उदात्त , प्रगतिशील , महामधुर जी जी तत्त्वे आहेत , हे स्वातंत्र्यदेवी , ती सर्व तुझ्या ठायी , तुझ्या सोबतीला आहेत . दुर्जनांचे रक्त शोषणारी , त्यांचे निर्दालन करणारी आणि सज्जनांचा कैवार घेणारी , पूजा करणारी , हे स्वतंत्रतादेवते , तुझ्यासाठी प्राणार्पण करणे हेच जीवन आहे . तुझ्याशिवाय जगणे म्हणजे मरण आहे . तुला सर्व चराचर शरण आहे .
( तुझ्या पायाशी सर्व सृष्टी नमते आहे . ) हे स्वतंत्रतादेवी , हे वरदायी , माझ्या भारतभूमीला तू कधी घट्ट मिठी मारशील ? ( भारतभूमीवर तू कधी निवास करशील ? ) हे देवते , मनोभावे यशस्वी होण्यासाठी नतमस्तक होऊन वंदन करतो .
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: जय जय हे भारत देशा (गीत) | Click Now |
02: बोलतो मराठी… | Click Now |
03: आजी : कुटुंबाचं आगळ | Click Now |
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) | Click Now |
05: वसंतहृदय चैत्र | Click Now |
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) | Click Now |
07: वस्तू (कविता) | Click Now |
08: गवताचे पाते | Click Now |
09: वाट पाहताना | Click Now |
10: आश्वासक चित्र (कविता) | Click Now |
11: आप्पांचे पत्र | Click Now |
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | Click Now |
13: गोष्ट अरुणिमाची | Click Now |
14: भरतवाक्य (कविता) | Click Now |
15: कर्ते सुधारक कर्वे | Click Now |
16: काळे केस | Click Now |
17: खोद आणखी थोडेसे (कविता) | Click Now |
18: वीरांगना (स्थूलवाचन) | Click Now |
19: आकाशी झेप घे रे (कविता) | Click Now |
20: सोनाली | Click Now |
21: निर्णय | Click Now |
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) | Click Now |
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी | Click Now |
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) | Click Now |
10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download
Tags:
मराठी कविता