झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ
पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...
बहरात वसंतामधल्या, तो सूर सावळा ऐकत
जातील फुलेही रंगून, जन्माला अत्तर घालत
चल सुराबरोबर आपण, तो फाया कानी ठेवू...
खेळून रंगपंचमी, फुलपाखरे भिजली सारी
हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी
हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू...
ही कोणाची रे करणी डोळ्यांत झऱ्याचे पाणी
हे उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी
गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू...
पाण्यात उतरूनी माझे, मन खडकावर बसताना
थुई थुई नाचरे पाणी, मज दिसते रे हसताना
एक रोप तुषाराचे मज, मायेने घाली न्हाऊ...
ओंजळीमध्ये मी अलगद, आकाश जरासे धरता
आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता
हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पाेहू...
हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी
झाडांच्या पायी काढी, सावली उन्हावर नक्षी
मग तिलाच फुटले पंख, नि त्यांचे झाले काऊ...
मानवी स्पर्श ना जेथे, असतील फुले-पाखरे
रानात अशा तू मजला, ईश्वरा जरा टाक रे
मी झाड होऊनी तेथे, पसरीन आपुले बाहू..
Also Read :
झाडांच्या मनात जाऊ स्वाध्याय | Jhadanchya manat jau Swadhyay | Maharashtra State Board 11th Marathi Solution
' झाडांच्या मनात जाऊ ' या कवितेचे रसग्रहण करा .
उत्तर : ' झाडांच्या मनात जाऊ ' ही कवी नलेश पाटील यांची कविता " हिरवं भान ' या कवितासंग्रहातून घेतली आहे . या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवींनी रंगवला आहे . झाडांच्या मनात शिरून त्याचे हृद्गत जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे , असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे .
वसंत ऋतूचे लोभसवाणे दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे , याचे वर्णन कवींनी अनेक प्रतीके व प्रतिमा यांतून दृग्गोचर केले आहे . ' फुलपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण , डोळ्यांत झऱ्याचे पाणी , देवाघरची गाणी , तुषारांचे रोप , सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे ,
सावलीला पंख फुटून त्यांचे झालेले काऊ ' अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकांतून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे व कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार झाला आहे . ' ईश्वरा , मला झाड बनवून आहे . निसर्गचित्र रेखाटताना अम्लान शब्दकळेतून उमटलेला उत्कट
भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे . जणू आपणच निसर्गाच्या घटकात तादात्म्य पावून निसर्ग डोळ्यांत व हृदयात साठवतो आहोत , अशी अनुभूती रसिक सनाला प्रत्ययास येते . कवींचे शब्दसामर्थ्य अनोख्या व उल्हसित प्रतिमांतून प्रकट झाले आहे .
नलेश पाटील (१९५४ ते २०१६) :
निसर्गकवी व चित्रकार. शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची उत्तम जाण. दोन शब्दांमधील विरामाचं नेमकं भान आणि
विलक्षण चित्रमयी मांडणी ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये. अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून घडते. ‘हिरवं भान’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध.
‘कवितेच्या गावा जावे’ या लोकप्रिय काव्यगायनाच्या कार्यक्रमातील सादरीकरणात सहभाग. तरल शब्द आणि खुले स्वर यांमुळे त्यांनी गायलेली कविता ऐकणाऱ्यांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत असे. झाडांचे हिरवे वैभव, पानाफुलांचे रंग-गंध, भिरभिरणारी फुलपाखरे, थुईथुई नाचताना हसणारे पाणी, फांद्या-फांद्यांवरील पक्षी, ऊन-सावल्यांची नक्षी या चैतन्यमय निसर्गसोहळ्याशी कवी एकरूप होऊन जातो.
निसर्गातील अम्लान सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपणही त्या निसर्गाचा भाग होऊन सौंदर्यानुभूतीचे दान विश्वाला द्यावे, असे त्याला वाटत राहते.
झाडांच्या मनात जाऊ कविता 11वी मराठी [ कृती स्वाध्याय व रसग्रहण ]
अनुक्रमणिका / INDIEX
पाठ कविता | स्वाध्याय LINK |
---|---|
01: जय जय हे भारत देशा (गीत) | Click Now |
02: बोलतो मराठी… | Click Now |
03: आजी : कुटुंबाचं आगळ | Click Now |
04: उत्तमलक्षण (संतकाव्य) | Click Now |
05: वसंतहृदय चैत्र | Click Now |
06: बालसाहित्यिका : गिरिजा कीर (स्थूलवाचन) | Click Now |
07: वस्तू (कविता) | Click Now |
08: गवताचे पाते | Click Now |
09: वाट पाहताना | Click Now |
10: आश्वासक चित्र (कविता) | Click Now |
11: आप्पांचे पत्र | Click Now |
12: मनक्या पेरेन लागा (स्थूलवाचन) | Click Now |
13: गोष्ट अरुणिमाची | Click Now |
14: भरतवाक्य (कविता) | Click Now |
15: कर्ते सुधारक कर्वे | Click Now |
16: काळे केस | Click Now |
17: खोद आणखी थोडेसे (कविता) | Click Now |
18: वीरांगना (स्थूलवाचन) | Click Now |
19: आकाशी झेप घे रे (कविता) | Click Now |
20: सोनाली | Click Now |
21: निर्णय | Click Now |
22: तू झालास मूक समाजाचा नायक (कविता) | Click Now |
23: सर्व विश्वचि व्हावे सुखी | Click Now |
24: व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन) | Click Now |
10th marathi digest pdf download - 10th marathi digest pdf download
Tags:
मराठी कविता
very osm post
ReplyDeleteThanks for comment
DeleteThank you
ReplyDeleteThanks for comment
Delete